काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्या मालिकांमध्ये सगळच 'लॉजिकल' दाखवायला लागले तर बरेचसे 'जाणकार' मा बो कर ईथे न दिसता मालिकेतच दिसतील... Happy

[मात्र जावई बापूंच्या ईतक्या खोड्या काढणारी सासू आजी अजून तरी कुठे पाहिलेली नाही हे खरे आहे] Happy

मालिका संपेपर्यंत गौरी ला अभिनय 'जमेल' .. धीर धरावा.

काहीही चालू आहे सध्या. विस्कळीत. कोणती आई अशी प्रतिक्रिया देईल? लगेच नवऱ्याला सांगणार नाही का मुलीचं प्रकरण? की उगीचच लांबलचक,आडवळणाने सूचक संवाद? कैच्याकै..!

अरे, ती शिवची आज्जी पाहिली का?
शेरावाली... मुझे दर्शन तु करादे ( डीजेवाले, मेरा गाना तु चलादे च्या चाली त म्हणनारी), तिच्या पेक्षा बालनाट्यात काम करणारी पोरे परवडली.

का कोण जाणे ति मला मराठी च वाटते.

शिवचा काका भारी. काहीही आयडिया. चौमहा (चातुर्मास काय?) मे तो पंछी भी घर ना बदले है

, ती शिवची आज्जी पाहिली का? हो. हो. अतिशय इरिटेटिंग.. एकतर आजीच्या वयाची वाटतच नाही आणि अभिनयाच्या नावानेओवर अ‍ॅक्टींग.!
काही च्या काही चालू आहे मालिकेत.. घर बदलणं,परत कॅन्सल.ट्रान्स्फर होणं.. काहीही..
गौरी ती आजी तर डोक्यात जाते आता.

मला तर खूप मजा येतेय. शिव आणि गौरी प्रकरण कळल्यावरची आजीची रिअ‍ॅक्शन धमाल होती. शिरा करायला हवा Lol

शिवच्या हम्माला आवरायला बाबूजींची हम्मा आल्याने आता पारडे संतुलित झाले. नाहीतर बिचारे शिव आणि गौरी काय करणार होते?

मजनूचाचाचं राजाच्या दरबारात उभं असल्यासारखं हात बांधून साळसूदपणे उभं राहणं, गरीब नजरेनं बघणं.

हो मला पण मजा येत आहे..

आजी जरा जास्तच बोलतात पण असतात ना अशे लोकही ..
मनात येईल...ते बोलतात ..त्यामुळे खुप हसायला येतं..

माझी एक मैत्रिण अशी आहे .. काही तारतम्यच नाही बोलतना पण मजा येते कारण मनाने साफ आहे..

आज्जींच्या वयाला ते शोभत नाही पण ठीक आहे

सध्या काय चालु आहे ?
ईथे कोणीतरी सवीस्तर अपडेट लिहा ना प्लीज....
गौरीच्या आईला त्या दोघांबद्दल कळते त्या भागानंतर बघणे जमलेच नाहीये

गौरीच्या आईकडून आजीला कळलंय आणि ती खुष आहे.
शिवने आपल्या बॉसला बाबूजींनी ट्रान्सफरसाठी केलेल्या नाटकाबद्दल सांगितलंय.
बाबूजींनी शिवला ऑल्मोस्ट परवानगी दिलीय. फक्त हम्माचं काय करायचं ते तू बघ असं म्हटलंय.
मजनूचाचाने स्वतःच्या हम्माला चावी मारून घर बदलणे रहित केले आहे.
वहिनीने शिवच्या हम्माला चावी मारून मुंबईला बोलावून घेतलंय.

या घडामोडी. बाकी शिवकडून गौरीच्या आईची, आपल्या बाबूजींची मनधरणी चालू आहे. त्या दुसर्‍या मुलीचे पालक किती फॉर्वर्ड आहेत हे बघून शिवच्या बाबूजींचा विरोध डळमळला.

पसरणी , " मी एकटी बाई ...काय काय करणार?" असे बोलून वात आणते.
काय तिचा तो पसरट चेहरा, चपटे ओठ व प्रिंटेड सिंथेटिक साड्या!!

त्या दुसर्‍या मुलीचे पालक किती फॉर्वर्ड आहेत हे बघून शिवच्या बाबूजींचा विरोध डळमळला. >> असं काय कळलं?

आजी , गौरी व शिव हे श्रावणी सोमवार म्हणून शिवमंदिरात जातात. व पूजा करतात. आजी आशीर्वाद देते. ही आजी गौरीची विकी बरोबर जोडी बनवताना पण तितकीच उत्साही आता पण तितकीच उत्साही.
नगाला नग टाइप. मग शुगो येते( ही आजकाल विचित्रच दिसते. . मध्यम वर्गीय गोडवा लुप्त झाला आहे.) आणि ये असंभव है असे म्हणून जाते. सारा गोंधळ बाबांना व संबंधीत सर्व लोकांना एकत्र बसून सुधरण्यासारखा आहे. पण मग दळण कसे होणार. आता ह्या आठवडयात शिवची अम्मा सगाई करकेच रहुंगी म्हणून पधारलेली आहे. मुले सुखी एकटी राहिलेली बघवत नाहीत का शिरीअलीत.

मध्यम वर्गीय गोडवा लुप्त झाला आहे>> चांगल्या साड्या पण वाईट नेसते. अन्‌ तिच्या भुमिकेला अद्याप काही वावच मिळालेला नाही

चांगल्या साड्या पण वाईट नेसत>>> याच नाही सगळ्याच सिरियल्स मध्ये. स्वतःचा मेकप स्वतःच करत असावी अगदीच नवख्या व्यक्तीने केल्यासारखा थापलेला असतो. बाकीच्यांचे बरे असतात. हीच अशी अस्ताव्यस्त वेंधळी टाईप का दाखवतात. नोकरी करणारी दाखवूनही साधा पदर हि नीट पीनप केलेला नसतो. त्यापेक्षा आजी बरी असते नीटनेटकी.

पसरणी , " मी एकटी बाई ...काय काय करणार?" असे बोलून वात आणते. >>> खरंच!! Uhoh आणि ती १८० अंशात डोळे कसले फिरवते इकडून तिकडे ... मला ते बघून गरगरतं.

ललिता..:-)
१८० अंशात डोळे फिरवणं म्हणजे तिला खलनायिकेची सर्वोच्च पातळी वाटते.
आणी ते नेहमी उपमाच का खातात?

हो. नाहीतरी नाश्ता आणि जेवण, स्वयंपाक, डबे... हे जरा जास्तच डिटेल दाखवतात. रोज एखादा तरी सीन नाश्ता, जेवण, डबे, स्वयंपाक इ. वर असतोच असतो. मग ते गौरीचं घर, शिवचं घर किंवा निशाचं माहेर असलं तरी.!

विनिता Lol

मी विचारणारच होते की ते पोहे नाही का खात? पण म्हटलं जाऊदे, आपण काही हि सिरीयल बघत नाही तर नको चौकशा करायला. मराठी सिरीयलमध्ये उपमा, पोहे आणि गोडाचा शिरा दाखवतात बरेचदा. थालीपीठ, डोसे, इडली, आप्पे, उकड, मोकळी भाजणी वगैरे कोणी करत नाही की काय, कुठेच दाखवत नाहीत.

>>>>>आणी ते नेहमी उपमाच का खातात?>>>चूक आणि णिषेध देखील. दिवा घ्या ते पोहेही खातात.<<<<<
चूक. ते सारखं चहा आणि शिरा सुद्धा खातात.
आणि जेवणात पातळ वरण असतंच असतं नेहमीच.. Proud

परब आणि सावंत म्हणतात पण एकदाही मासे किंबा मटण ताटात दिसले नाही. आता तर जल्ला श्रावण आहे...
----------------------------

शुगो डोळ्याचा मेकाअप पहिलील्या पोरीसारखा करते. आणि चेहर्‍यावर घामाने चट्टे उठल्यासारखा मेकाअप आणि तो हि चुकीच्या शेडस वापरून केलेला.
त्यामुळे कधी एका बाजूला उजळ तर एका गालाला लाल काळा छटा.

ती निशा एकदम भयानक पसरट आहे. साड्या तिच्या स्वतःच्या आहेत वाटतं.

जेवणात पातळ वरण असतंच असतं नेहमीच >>> Lol

आणि बरेचदा भात-आमटी-पोळी-भाजी सगळं एकदम वाढलेलं असतं पानात... Uhoh

जुयेरेगा मधे बरेचं पदार्थ करायचे की, ह्या सगळ्या मालिकांपेक्षा उजवी होती जुयेरेगा सुरूवातीला तरी.

Public memory is short. भजी, आइस्क्रीम, शिवला न चालणार्या भाज्या, झालंच तर उत्तर भारतीय पदार्थही.
यांच्याकडे नाश्त्याला उपमा असतो. पण शेजारून पोहे येतात.

Pages