भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्मे फोटोत नाहीयेत.ते आजचा डिनर लॉट खाऊन ऑलरेडी झाडावर लटकायला गेले आहेत.
त्या चित्रात कशी, गाय गवत खात असते आणि गायीने खाल्लं म्हणून गवत चित्रात नाही आणि गवत खाऊन झालं म्हणून गाय निघून गेलीय तसं Happy

हे एक लेटेस्ट आले २ ग्रुप्स मधे: उगीच मोठे मोठे साय्न्टिफिक भासणारे शब्द वापरलेत Uhoh

काय आहे माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य
आवश्य वाचावे असे.
"अंधश्रद्धानिर्मुलन वाल्यांनी सुद्धा ठेवली श्रद्धा"
"पाहुनमाऊलींच्याचैतन्यलहरींना"
------------------------
1972 चा काळ नुकताच अंधश्रद्धानिर्मुलन वाल्यांचा सुकाळ होता. त्या वेळी त्यांची
काळी दृष्टी पडली माझ्या माऊलींच्या समाधी वर संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन
न घेता या मुर्खानी डायरेक्ट आळंदी गाठली त्यावेळी झालेली सविस्तर घटना थोर
शास्त्रज्ञ आर एन शुक्ल यांनी सांगितली ती अशी त्यावेळी वारकरी सांप्रदायाची थोर
व्यक्ती ह.भ.प मामासाहेब दांडेकर हे होते त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला आळंदीची
समाधी उखडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मुलन चे लोक येत आहे त्यांचे असे म्हणणे आहे की
जर संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या
शरीरातील हाडे तरी सापडतील मामासाहेबां समोर खुप मोठा प्रश्न पडला होता यांना रोखायचे कसे त्यावेळी शुक्ल साहेब यांनी मामासाहेबांना सांगितले माऊली पाहुन घेतील.
दुसरा दिवस उजाडला. सकाळीच दोन अडिचशे माणसांचा ट्रक पुण्याहुन आळंदीला जाणार आहेत असे समजल्या. वर त्यांच्या अगोदर मामासाहेब दांडेकर व शास्त्रज्ञ शुक्ल साहेब आळंदीला पोहचले होते. शुक्ल साहेबांनी सोबत तीन मीटर्स घेतले होते.त्यातला एक होता गीगरम्यूलर काऊंटर, त्यात एक्सरे अल्फा, गॅमा, बीटा नावाचे जे किरण किंवा उर्जा असते ते एखाद्या ठिकाणी आहेत की नाहीत हे शोधून काढु शकतो. ते मीटरवर दाखवले जाते. त्याला गीगरम्यूलर स्किंटीलेशन काऊंटर असे नाव आहे. तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी पासून सहा फुट अंतरावर ठेवला. दुसरा मीटर ज्याला थर्मिस्टर बोलोमीटर म्हणतात. तो घेतला होता. त्याने अल्ट्राव्हायोलेट इन्फारेड आहेत की नाही हे पहाता येते. तो ही मीटर समाधी जवळ ठेवला. तिसरा फ्रिक्केन्सी मीटर रडार हा मीटरही त्या ठिकाणी ठेवला. तोपर्यंत अंधश्रद्धावाली मंडळी डाॅक्टर, दोन तीन इंग्लीश माणसे, घोषणा देतच मंदिरा पर्यंत पोहचली. सर्व जमावाला दाराजवळच मामांनी थांबवले आणी सांगितले समाधीबद्दल आम्ही जे सांगतो तो प्रयोग करा. आणी मग तुमचे काम करा. तो पर्यंत शुक्ल साहेबांनी समाधी झाकण्यासाठी तीन वेष्टणे आणली
होती. एक जस्ताचे, एक पितळेचे आणी एक लोखंडाचे शुक्ल साहेब त्या कार्यकर्त्यांना म्हणाले या ठिकाणी तीन मीटर्सही ठेवले आहेत.समाधी वर एकेक झाकण टाकून मीटरवर काय दिसते ते पाहावयाचे आहे. तुम्ही पहाल
त्यावेळी आम्ही येथे थांबणार नाही.बाहेर थांबु. त्यांच्यातील दहा बारा प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना गाभा-यात घेतले आणी त्यांना माहिती देवुन मामा व शुक्ल साहेब गाभा-याबाहेर निघुन आले. आम्ही सांगितल्या
प्रमाणे त्यांनी प्रयोग करून पाहिला.लोखंडी, पितळी, जस्ताचे आवरण काढल्यावर एकच ठराविक रिडींग मीटर दाखवायचे. आत कोणी नसल्याने काटा हलविण्याचा प्रश्न च नाही. त्या लोकांन पैकी कोणी मीटरला
हात लावत नव्हते मग काटा रिडींग का दाखवीत आहे. रिडींग दाखविणारे चैतन्य स्फुरण स्पंदने कोठून येत आहेत असा गहन प्रश्न अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांना पडला. यामध्ये कसलाच जादुटोणा हातचलाखी नव्हती हे त्यांच्या लक्षात आले. शास्त्रीय भाषेत हे प्रयोग त्यांना करून दाखविल्यावर त्यांच्या लक्षात आले! संजीवन समाधी म्हणजे काय? हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चित पणे
चैतन्य आहे. उर्जा आहे, स्पंदने आहेत.म्हणून च त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतो. चैतन्य दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व असते. क्ष किरण दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही.
तसेच संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहेच त्यांचे अस्तित्व मनुष्यच काय विज्ञान सुद्धा नाकारू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाने सर्व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम दुर झाल्या नंतर ही सगळी मंडळी दर सहा
महिन्याला समाधी च्या दर्शनाला येवु लागली. तीन परदेशी नागरिकांन पैकी एकाने स्वताला आळंदीला वाहुन घेतले. पुन्हा कधीच कुणी माऊलींवर आक्षेप घेण्याचे धाडस केले नाही. वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यु ह.भ.प
मामासाहेब दांडेकरांनी आलेल्या सर्व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या सदस्यांना पुन्हा एकदा संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन सांगताना म्हणाले एखाद्या साधु संत संजीवन समाधी घेतो, तेव्हा योगशास्त्राप्रमाणे तो
पंचमहाभूतात्मक होतो.शरीर पृथ्वी आप तेज वायु आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. जेव्हा तो संजीवन समाधीत उतरतो तेव्हा तो सजग असतो. समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते.निर्देही होते याचा
अर्थ त्याच्या शरीरातील पृथ्वी आप तेज वायु हे जे भाग असतात ते बाहेरच्या ब्रम्हांडातील पृथ्वी आप तेज वायु आकाश यात एकरूप होऊन जातात. त्यामुळे समाधी च्या जागी काहीही शिल्लक रहात नाही.

चैतन्य स्फुरण स्पंदने ... डेल्टा रेज (डेल्टा ...डी...फॉर ज्ञानेश्वर) असं नामकरण नाही केलं का त्या रेज चं?

वट पौर्णिमेनिमित्त व्हॉट्सअ‍ॅप वर तो ७ जन्माचं लॉजिक सांगणारा फॉरवर्ड ह्या बाफ वर येण्याच्या पात्रतेचा आहे.

१२ वर्षात शरिरातल्या सगळ्या पेशी बदलतात(!!), म्हणुन एक पुनर्जन्म (अबब!) असे, ७ म्हणजे १२*७ = ८४ वर्ष. आणी पूर्वी १६ व्या वर्षी लग्न होत(??) म्हणुन १६+८४=१०० वर्षांची सोबत!

ते तर आहेच, काल कोथिंबिरीचे पाणी प्यायले तर किडनी स्टोन जाणारच असा एक मेसेज आलेला आहे. ह्याशिवाय कुंकू, जोडवी, नथ, कानातले वगैरे कसे आवश्यक आहेत असाही एक!

या असल्या पाणी पिण्याबद्दलची चरचा पूरवी मायबोलीवर झडून गेली आहेय का? बाकी जोडवी अर्थिंग करतात. कुंकू बंदूकीला स्पॉट नाना बनवतात, व कानातले बुगडीवर डान्स करवतात असं ऐकून आहे.

बाकी जोडवी अर्थिंग करतात. कुंकू बंदूकीला स्पॉट नाना बनवतात, व कानातले बुगडीवर डान्स करवतात असं ऐकून आहे.<<<
Rofl

डायबेटीस आणी कॅन्सर बरे करणारे तर ईतके ईलाज व्हॉट्सअ‍ॅप वर फिरतात की सगळ्या फरसाण च्या भाज्यांची (चमचाभर दुधी भोपळ्याची भाजी घेऊन त्यावर पावशेर फरसाण घालून खावे, म्हणजे मुद्दलातल्या दुधी भोपळ्याची चव पुसट होते), चलती होऊन, निम्म्या तरी डॉक्टरांची दुकाने बंद होतील अशी शंका येते.

डायबेटीसचे परवाच एक आले होते. ते बोटे तळव्यात १० वेळा दाबायची वगैरे. हा उपाय औषधे चालु ठेऊन करावा कारण डायबिटीसला उपयोग नाही झाला तरी त्याने व्यायाम नक्की चांगला होईल बोटांना.

forwarded from Facebook -

गरम दुधाबरोबर गूळ खायचे फायदे -
गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठ्यातला मोठा आजारही बरा होऊ शकतो.

रोज दुध पिल्याचे फायदे तसे सगळ्यांनाच माहिती आहेत, पण गरम दुधाबरोबर गूळ खाल्ल्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं, तसंच त्वचेला निखार येतो. दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि डी तसंच कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक ऍसिड असतं. तर गुळामध्ये सुक्रोज, ग्लुकोज, कॅल्शियम, फॉस्फरस, लोखंड असतं.

शरीरातलं अशुद्ध रक्त होतं साफ

गुळामध्ये असलेल्या गुणांमुळे शरिरातील अशुद्ध रक्त शुद्ध होतं. त्यामुळे गरम दुध आणि गुळ खाल्ल्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता.

लठ्ठपणा नियंत्रणात
गरम दुधामध्ये साखर घालण्याऐवजी गूळ घातला तर लठ्ठपणा नियंत्रणामध्ये राहायला मदत होते.

पोटाचे विकार होतात दूर

गरम दुध आणि गुळाचं सेवन केल्यामुळे पोटाचे आणि पचनाचे विकार दुर होतात.

सांधेदुखी वर उपाय

गूळ खाल्ल्यामुळे सांधेदुखीला आराम मिळतो. रोज गूळ आणि आल्याचा तुकडा एकत्र करुन खाल्ला तर सांधे मजबूत होतात.

त्वचा होते मुलायम

गरम दुध आणि गूळ खाल्ल्यामुळे त्वचा मुलायम होते. एवढच नाही तर यामुळे केसही मजबूत होतात.

मासिक पाळीचा त्रास होतो कमी

मासिक पाळीवेळी महिलांनी गरम दुध आणि गूळ खाल्ला तर त्रास कमी होतो. मासिक पाळी यायच्या एक आठवडा आधी 1 चमचा गूळ रोज खाल्ला तर त्रास कमी होतो.

थकवा होतो कमी.
कामाच्या ताणामुळे तुम्ही जास्त थकले असाल तर गरम दुध आणि गूळ खा. यामुळे लगेच आराम मिळतो. रोज 3 चमचे गूळ खाल्ल्यानं थकवा दूर होतो.
संकलक : प्रमोद तांबे

मंगळसुत्र

का घालावे....?

Science च्या
दृष्टिकोनातून

मंगळसूत्र म्हणजे काळ्या मण्यांची माळ व त्याला एक किंवा दोन वाट्या. ह्या वाट्यांना मंगळसूत्रात व स्त्रीच्या आयुष्यात फार महत्व आहे. योग्य मंगळसूत्राची लांबी अशी पाहिजे की जेणे करून ते घातल्यावर वाट्या बरगडी संपून पोट सुरु होते त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. तेथे अनाहत चक्राचे स्थान असते. अनाहत चक्र मनाशी निगडीत असते. मंगळसुत्रातील वाटी ही गोलाकार घुमट (गोल पिरामिड). वाटीतून येणारी एनर्जी अनाहत चक्राला मिळते त्यामुळे अनाहत चक्राची शक्ती वाढते. त्यामुळे मन शांत राहते व स्त्रीची आत्मिक शक्ती वाढते. लग्न झाल्यावर स्त्री नवर्याचे घरी (स्वतंत्र अथवा एकत्र कुटुंबात) जाते. जेथे तिला adjust व्हायचे असते. स्त्री व्यवस्थित adjust झाली तरच संसार निट होतो अन्यथा गृहकलह वाढून संसारच मोडण्याचा धोका असतो. मंगळसूत्रातील ही वाटी अनाहत चक्रावर आल्यामुळे स्त्रीची आत्मिक शक्ती वाढते. नवीन घरात गेल्यावर स्त्रीला याची नितांत गरज असते. आत्मिक शक्ती वाढली की तिचा प्रभाव इतरांवर (नवर्यासकट) पडतो. तिच्या इच्छा न सांगताच समजून घेतल्या जातात व पूर्णही केल्या जातात. तशी इच्छा त्यांना आपोआपच होते. हे आत्मिक शक्तीचे बळ आहे. तिला अनेकदा आपल्या इच्छा सांगाव्याही लागत नाहीत.

हे आत्मिक शक्तीचे बळ स्त्रीला मिळावे म्हणून आपल्या पूर्वजांनी मंगळसूत्रात वाटीची प्रथा निर्माण केली.

हे मर्म न समजल्यामुळे हल्ली स्त्रिया मंगळसूत्र वापरत नाहीत. समाजात संसारात कलह वाढले आहेत. घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.

ज्या स्त्रियांना मंगळसूत्र वापरायची इच्छा नाही त्यांनी आपल्या अनाहत चक्रावर एक इंची पिरामिड कायम ठेवावा. पिरामिड मधील शक्ती सुद्धा त्या स्त्रीचे आत्मिक बळ वाढवेल व संसार सुरळीत व्हायला मदत करेल.

आपल्याकडील प्रथेप्रमाणे स्त्री ही नवर्याच्या घरी जात असल्याने तिला जास्तीतजास्त adjustment करावी लागते मात्र पुरुषांना तिच्या उलट पत्नीला आपल्या घरी आणायचे असल्याने तसेच कामासाठी दिवसातील बराच वेळ घराबाहेर असल्यामुळे त्याला याची गरज स्त्री एवढी नसते.

आपल्या पूर्वजांनी मानसोपचार तज्ञ, कौन्सिलर अशी ऑफिस न थाटता, धंदा न करता, त्याचे पेटंट न घेता सामान्य माणसांचे, स्त्रीचे, तिच्या कुटुंबाचे हित बघितले. त्यामुळे सध्याच्या पैशाच्या युगात त्यांना आपण अडाणी समजतो. मात्र त्यांनी ही प्रथा पडून अनेक पिढ्या, असंख्य कुटुंबांचे कल्याण केले. आणि आपण आधुनिक शास्त्राला अनुसरताना आपले कल्याण करणाऱ्या आपल्या पूर्वजांना आणि त्यांनी निर्माण केलेल्या चांगल्या उपयुक्त प्रथांना कमी लेखतो......

(मंगळसुत्राला वाटी एेवजी पदक/पेंडल लावून वाटीचे फायदे मिळत नाहीत.)

दूध/दही आणि गूळ हे विरुद्ध अन्न आहे हे आतापर्यंत ऐकलं होतं, <<
नाही. दही/ताक आणि गूळ हे विरूद्ध अन्न आहे आयुर्वेदाप्रमाणे.
दूध आणि गूळ नव्हे.
दूध आणि फळे हे विरूद्ध अन्न आहे.

अर्थात आयुर्वेदालाच भोंदू मानणारे यालाही भोंदू म्हणू शकतात. मला त्यात पडायचे नाही. आयुर्वेदात दूध आणि गूळ विरूद्ध अन्न सांगितलेले नाही इतकेच.

>>>>>मग पुरुषांना नाही वाटते गरज या 'आत्मिक' शक्तीची? <<<<

दिलय की छान Science च्या दृष्टीकोनातून याचे कारण Wink

पण घर जावयांचे काय? त्यांनी घालायला हवे मंगळसूत्र.

गरम दुधामध्ये साखर घालण्याऐवजी गूळ घातला तर लठ्ठपणा नियंत्रणामध्ये राहायला मदत होते. >>>. दुध नासेल की गुळ किंचीत आंबट असतो कधी कधी.

ज्या स्त्रियांना मंगळसूत्र वापरायची इच्छा नाही त्यांनी आपल्या अनाहत चक्रावर एक इंची पिरामिड कायम ठेवावा. पिरामिड मधील शक्ती सुद्धा त्या स्त्रीचे आत्मिक बळ वाढवेल व संसार सुरळीत व्हायला मदत करेल.

>> धन्यवाद !!!

सस्मित Rofl

दूध + साखर हे विरुद्धान्न आहे असे प्रसिद्ध आहारतज्ञांच्या पुस्तकात वाचलेय. (डॉ. मालती कारवारकर, ऋजुता दिवेकर).
पण दूध + गुळ चालेल का यावर त्यांनी काही भाष्य केलेले वाचनात नाही पण चरबी सोबत साखर टाळावी तर दूधासोबत गुळ सुद्धा टाळावा लागेल (लठ्ठ्पणा विचारात घेतल्यास).

मी सातूचे पीठ दूध आणि गुळ घालुन खातो (सेंद्रिय गुळ वापरतो, पिवळा नाही). त्यात दूधात आधी गुळ घालुन विरघळवतो जमेल तेवढा, मग सातूचे पीठ कालवतो. दूध फाटले नाही कधी.

Pages