भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोहम्मद मध्ये डबल म आहे.

त्याचे नाव घेतल्यावर कुठला आजार जाईल ?

... काउ ऐवजी कौव्वा असा डबल व वाला आयडी घेऊ का ?

आयुर्वेदाचे अधिकृतीकरण होणे आवश्यक आहे याबाबत पूर्णपणे सहमत!
मी पण.

पण दोन तीन गोष्टी आडव्या येतात. एक मुळात आपल्याच लोकांचा आपल्या जुन्या शास्त्रांवर विश्वास नाही. नुसते बोलण्यापुरते ठीक आहे, आमच्याकडे सगळे काही होते, पण आता वेळ आली की अ‍ॅलोपॅथीचीच कास धरतात. त्यामुळे संशोधन करणारे नि त्याहून महत्वाचे म्हणजे त्यासाठी टेस्ट केसेस बनण्यासाठीहि थोडेच लोक तयार होतात.
त्यातून या गोष्टींसाठी पैसे कोण देणार? कोण देणार? मिलिग्राम औषधासाठी हजारो रुपये घेतात त्यात संशोधनाचा खर्च धरून किंमत ठरवली असते. (आजकाल भारतीय लोक उत्तम संशोधक म्हणून स्वस्तात मिळतात, पण जे पैसे वाचतील ते कंपनीचा फायदा. किंमती त्याच, किंवा थोड्या अधिक.)

ते भारतीय संशोधक बिचारे आयुर्वेदावरहि तेव्हढेच उत्तम संशोधन करतील, पण त्यावर पोट भरण्यापुरते तरी पैसे देतील का कुणी, अगदी भारतात सुद्धा!
अर्थात भारत आता खूप श्रीमंत झाला आहे असे ऐकतो, पण या कामाला कोण देतो पैसे?
मग परकीयांनी येऊन आमचे हळद बिळद ढापले असा गळा काढायचा!

माझ्याकडे पैसे नाहीत , पुस्तके नाहीत अशी कारणे सांगुन परिक्षा स्किप करता येत नाही.

आयुर्वेदिक औषधे स्वस्त असतात हे ऐकुन मात्र फार हसु आले.

विट्ठल वाल्या फॉर्वर्ड मधली माहीती मुळातच अर्धवट असावी असं वाटतंय. ज्या प्रकारे हा फॉर्व्र्ड इथे दिला आहे त्यावरून विरोधी पक्षासाठी फुल्टॉस दिल्यासारखं वाटतंय. त्या जोशींकाकांना फोन फोन केल्याशिवाय आणि बोलल्याशिवाय त्यावर उलट सुलट प्रतिसाद दिले जाऊ नयेत.

विट्ठलनाम जपताना खरंच प्राणायामासारखा व्यायाम होतो हे आत्ता लक्षात आलं. पण ते तज्ञ / जाणकाराकडून माहीती करून घ्यायला हवं. हार्ट अ‍ॅटॅक टळतो की नाही याबद्दल कधी ऐकलेले नाही. पण अगदीच थोतांड असावं असं सुद्धा वाटत नाही.

त्या फॉर्वर्ड मधे जे काही सांगितलय त्या ल़क्षणांवरून तरी वातदोष असावा, गॅस अ‍ॅटॅक सारखं काही तरी झालं असावं असं वाटतं.

प्राणायामामुळे ब्लॉकेजेस कमी होतात हे रामदेव महाराजांच्या कार्यक्रमात पाहीलेले आहे. पण अजून पतंजली मधे त्यावर काम चालू आहे. पतंजली विद्यापीठ मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा करण्याचे काम करते. आयुर्वेद किंवा योग यांचं अधिकृतीकरण करणे कठीण आहे पण हे कुणी तरी करायला हवं होतं.

रामदेव बाबांचं काम किती महत्वाचं आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं नाही. तालुका पातळीवर सुद्धा योग आणि पतंजली चिकित्सालय व औषधालयाचं नेटवर्क निर्माण झालेलं आहे. औषधं चांगली आहेत. जर पतंजली सर्टिफाईड वैद्यांनी औषधयोजना केलेली असेल तर लवकर गुण येतो असा अनेकांचा अनुभव आहे.

पैलवाना , पीटीसीए वर उगाच पैसे घातलेस रे ! विठ्ठल नामाचा टाहो फोडला असतास तर गुठळी गेली असती !

होळीमधे कापूर जाळल्याने स्वाइन फ्लू व्हायरस नष्ट होतो असा एक फॉर्वर्ड फिरतोय.
जाळण्याच्या उष्णतेने व्हायरस जाईल एक वेळ पण कापूराने जाईल यावर माझा विश्वास बसत नाहीये.
तज्ञांनी सांगावे.

उन्हाळ्याने कमी होईल स्वा फ्लू ची साथ असे ऐकले होते पण अचानक पावसाळाच आलाय सकाळपासून.

होळीमधे कापूर जाळल्याने स्वाइन फ्लू व्हायरस नष्ट होतो असा एक फॉर्वर्ड फिरतोय.>>>>> कापूर जाळल्याने स्वाइन फ्लू व्हायरस नष्ट होइल की नाही माहित........पण कापरात असे गुणधर्म असतात कि त्यामुळे हवेतील काही जीवजंतू नष्ट होतात त्यामुळे कापूर वापरणे कधीही चांगलच आहे

कापरामधे काही प्रमाणात गुणधर्म असतील पण इतक्या भयानक व्हायरसचे थैमान कापूर रोखू शकत नाही.

लोकरी कपड्यात, कपाटांमधे कसर लागू नये म्हणून कापूर ठेवतात हे माहितीये पण स्वाइन फ्लू थांबतो हे म्हणणे निव्वळ भोंदूपणाचे आहे.
कीड आणि व्हायरस यांच्यात प्रचंड फरक आहे.

कापूर जाळल्याने स्वाइन फ्लू थांबेल ही शुद्ध भोंदू अफवा आहे.
अपाय नसला तरी उपाय अजिबात नाही.

एक परिचित डॉक्टर सांगत होते थंड आणि दमट हवामान स्वा. फ्लु च्या व्हायरसला मानवते. थंडी लांबल्याने स्वा फ्लु ची साथ चालू आहे. उन पडल्यावर दमटपण कमी होऊन हळू हळू साथ कमी होइल . तपमान वाढूही लागले होते तेवढ्यात हा शिंचा पाऊस आला...

कॅनसर झालेल्या रुग्णास रोज सकाळी ०७.४६ वाजता कापूर हुंगावयास दिला तर सहा महिन्यात क्यान्सरचे रोगजन्तु मरतात असे कुठल्याशा उपनिषदात म्हटलेले आहे म्हणे...

कोणतीतरी पुरचुंडी बांधून घराच्या दारात लटकवल्यावर स्वाईन फ्लु होणार नाही असा व्हॉटसअ‍ॅप एका डॉक्टराच्या नावावर फिरतोय तो पण यातलाच प्रकार का?

तुम्हाला काय वाटतं? कसलीतरी पुरचुंडी घराच्या दारावर बांधल्यावर व्हायरसचा संसर्ग टळेल?
सिरीयसली?
बाहेर गेलात कुठेतरी तर व्हायरस तुम्हाला पुरचुंडीवाल्या घरातले म्हणून ओळखून तुमच्यापासून पोबारा करणारे की काय?
असा मेसेज पाठवणार्‍यांना माझ्याकडून बैलपोळ्याच्या शुभेच्छा!

नवे पोस्ट व्हॉ अ‍ॅ वरः
"कंबरेवर हात ठेवले आणि विठ्ठलाचा जप केला, येणारा हार्ट एटॅक आलाच नाही, इ.इ." . स्वतः काय पाहिजे तो भंपकपणा करा, अमुक नामाचा जप करुन बरे व्हा, हार्ट एटॅक आला तरी डॉक्टराचे तोंड पाहू नका इ.इ. पण या पोस्ट डिसक्लेमर न देता पुढे ढकलणार्‍यांमुळे कोणी खरा अटॅक येऊन हे प्रथमोपचार करुन डॉ कडे जाणे डिले केले तर पोस्ट ढकलणार्‍यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. किमान असे पोस्ट ढकलताना डिसक्लेमार देऊन ढकलावे.

सध्या किन्डर जॉय मध्ये हाडांचा चुरा असतो , हा संदेश फिरतोय .

आणखी एक वैद्यकीय नाही पण एक देश्भक्तीपर आवाहन फिरत होते क्स्कायवर

म्हणे वॉअ हे अमेरिकन आहे . चायनाने त्यान्च स्वःतचे वीचॅट आहे .
आपणही वॉअ वापरायला बन्द केल पाहिजे .
पहिला वहिला भारतीय मेसेन्जर " टेलिग्राम " वापरायला लागा . स्वदेशी बना वगैरे .

सकाळी सकाळी झोपेतही मी टेलिग्राम म्हणजे नक्की काय ते गुगलले .
त्याचे निर्माता रशियन निघाले .
लोक बिन्डोक , नको तिथे देश्भक्ती दाखवायला जातात .
आणि वॉअ वापरू नका हा मेस्सेज वॉअ वरच पुढे ढकलतात .

Expressway closed at lonavala. A dam has burst. Have to use old mumbai pune road. Send this msg to all
Deep depression seen at west of Mumbai. If become stronger and moves toward Mumbai then another 26 july possible.
Coming 48 hours Mumbai will receive heavy rainfall.....Met dept has declared. So, my friends please don't ignore this situation,. Store drinking water, bread, milk, candle, emergency medicines, water in wash room also. DO NOT FORGET TO CHARGE YOUR CELL PHONES.

Watch "Next 36 hours are critical for Mumbai :BP Yadav , Met dept.Director" on YouTube - https://youtu.be/a2Jn5l-QjUE

हा अजुन एक. तीन-चार वेळेला व्हॉटसअ‍ॅपवर आला. तेथेच सुनावले पाठवणार्‍याला. स्पष्ट विचारले की बाबा रे, कुठला डॅम फुटलाय, भुशी का टाटा? आणी फक्त एक्स्प्रेसवेच का बंद केलाय, रेल्वे चालु आहे का? लोणावळा गावाची काय हालत आहे? लोणावळ्यातला डॅम फुटल्याने मुंबईत मुसळधार पाऊस कसा पडेल?
समोरचा पार गार पडला. Lol
नंतर एक दुसरा मेसेज पाठोपाठ धाडला, की हे असले व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस आहेरात मिळालेल्या ब्लाऊजपीस सारखे असतात, आपल्याला मिळालेला लगेच दुसर्‍याकडे सरकवायचा.समोरच्याला उपयोग होईल का नाही ते अजिबात न बघता Lol

स्वतः काही खरोखरचे उपयुक्त क्रिएटीव लिहू शकत नाहीत तर समजु शकते, मी देखिल लिहीत नाही, पण किमान दुसर्‍याचे आलेले लिखाण वाचून त्यात तथ्य आहे वा नाही हे बघायचे तरी कष्ट नकोत का घ्यायला?
का कोंबड्या/कबुतरांना दाणे टाकल्यागत आलेले मेसेजेस पुढे सरकवत रहायचे?
आचरटपणा, भोंगळ भोळसटपणा, बाबा वाक्यंम प्रमाणम, छापिल ते ते सत्य इत्यादी अनेक विचारसरणीत अडकलेल्यांचे अचाट कर्तुत्व म्हणजे हे फॉरवर्डेड मेसेजेस.
कित्येक अतिशय उपयोगी असतात, पण निरुपयोगींची संख्या प्रचंड आहे हे खरे.

भरत, वाक्याचा दुसरा भाग खुळचट असला तरी पहिला भाग उपयुक्त आहे.

गिरीकंद, हो! हा संदेश वाचून माझंही डोस्कं फिरलं.

जेवताना/जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने ते अन्नातील मेदांना द्रवरूपात राहण्यास मदत करते. हेच मेद थंड पाणी प्यायल्याने गोठतात आणि जठर, आतडे इ.च्या आतल्या भिंतींवर साठून राहतात, जे विविध रोगांना आमंत्रण ठरते. असे स्पष्टीकरण वाचनात आले होते, जे पटले होते. यात तथ्य आहे का?

व्हॉट्स अँप न वापरणार्या पामरांपर्यत असे अमूल्य ज्ञानकण पोचावे यासाठी या धाग्याचा वापर करा की.

जेवताना/जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने ते अन्नातील मेदांना द्रवरूपात राहण्यास मदत करते. हेच मेद थंड पाणी प्यायल्याने गोठतात आणि जठर, आतडे इ.च्या आतल्या भिंतींवर साठून राहतात, जे विविध रोगांना आमंत्रण ठरते. असे स्पष्टीकरण वाचनात आले होते, जे पटले होते. यात तथ्य आहे का?>>>
आपण बर्फ खाला तर तो पोटात तस्साच नाही ना राहत....थंड पाणी प्यायल्याने त्याचे तापमान शारिरीक तापमान जेव्हढे आहे तेव्हढेच होत असेल.

Pages