भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>विश्वास नांगरे पाटील (I.P.S.)<<
एकाचे मत दुस-याच्या शब्दात तिस-याच्या नावावर खपविण्याचा प्रकार.

शेवटचं वाक्य वाचल्यावर खात्रीच झाली की हे वरचं नक्कीच 'अखिल भारतीय झोरॅक्स दुकानदार संघटना' यांनी पसरवलेले आहे Wink

<< आइसक्रीम ची एक पोस्ट वारंवार येत आहे . त्यात डालडा तुप वापरतात,दुध नाही. >>

खरं आहे. अशा उत्पादनांच्या वेष्टणावर आईस्क्रीम असे न छापता "स्वीट डेझर्ट" असे छापलेले असते. अमूल सारखे काही अपवाद मात्र दूधच वापरतात आणि त्यांच्या वेष्टणावर आईस्क्रीम असेच छापलेले असते.

"स्वीट डेझर्ट" > Frozen dessert contains edible oil असे वेष्टनावर छापलेले असते. कंपनी फसवत नाहीये, ग्राहकाने नीट वाचुन खरेदी करणे अपेक्षित आहे.

अधिक माहिती

C A U T I O N

This msg from Dr Syed Badar Husain, renowned neurologist in Atlanta:

Plz circulate

To Each AC Car user,Now this is very interesting & MUST READ , as it's for HEALTH !...Car's manual says to roll down the windows to let out all the hot air before turning on the A/C. WHY ?

No wonder more folks are dying from cancer than ever before. We wonder where this stuff comes from, but here is an example that
explains a lot of the cancer-causing incidents.

Many people are in their cars the first thing in the morning, and the last thing at night, 7 days a week.

Please do NOT turn on A/C as soon as you enter the car.

Open the windows after you enter your car and then after a couple of minutes, turn ON the AC .

Here's why: According to research, the car's dashboard, seats, a/c ducts, in fact ALL of the plastic objects in your vehicle, emit Benzene,
a Cancer causing toxin. A BIG CARCINOGEN. Take the time to observe the smell of heated plastic in your car when you open it,
and BEFORE you start it up.

In addition to causing cancer, Benzene poisons your bones, causes anaemia and reduces white blood cells. Prolonged exposure can
cause Leukemia and increases the risk of some cancers. It can also cause miscarriages in pregnant women.

The "acceptable" Benzene level indoors is: 50mg per sq.ft.

A car parked indoors, with windows closed, will contain 400-800 mg of Benzene - 8 times the acceptable level.

If parked outdoors in the sun, at a temperature above 60 degrees F, the Benzene level goes up to 2000-4000 mg, 40 times the acceptable level.

People who get into the car, keeping the windows closed, will eventually INHALE excessive amounts of the BENZENE toxin.

Benzene is a toxin that affects your kidneys and liver. What's worse, it is extremely difficult for your body to expel this toxic stuff.

So friends, please open the windows and doors of your car - give it some time for the interior to air out
-(dispel the deadly stuff) - before you enter the vehicle.

Thought: 'When someone shares something of value with you and you benefit from it, you have a moral obligation to share it with others..

यात किती तथ्य आहे?

गोगा, या लिंकबद्दल खूप आभार. अशी काहीतरी होक्स एक्स्पोज करणारी साइट आहे हे लक्शात होते पण जल्ला नाव काही आठवेना.. आता नोट करून ठेवेन.

व्हॉटस अप वर हे रत्न प्राप्त झाले. भोंदू आहे कि नाही याबद्दल कल्पना नाही. जाणकार सांगतीलच.
------------------------------------------------------------------------------------------------------------

साजूक तूप समज आणि गैरसमज

तूप खाल्ले की जाडी वाढते असा एक समज आपल्याकडे आहे. अतिशय योग्य आहे मात्र कोणते तूप? साजूक तूप कि वनस्पती तूप? दोन्ही तुपातील नेमका फरक समजून घेऊ.

१)  वनस्पती तूप: हे तूप कसे तयार करतात याची माहिती अनेकांना नाही. वनस्पती तूप म्हणजे hydrogenated vegetable oil  हे कसे तयार करतात? निकेल अथवा प्लँटीनम धातूच्या संपर्कातून हायड्रोजन वायू खाद्य तेलात मिसळतात. (याचा शोध युरोपात लागला आहे हा प्रकार भारतीय नाही.) हे केल्यावर तेल घट्ट होते आणि तुपासारखे दिसते म्हणून त्याला आपण वनस्पती तूप म्हणतो.

२)  साजूक तूप गायीच्या अथवा म्हशीच्या दुधापासून दही ताक लोणी तयार करून ते कढवून साजूक तूप तयार केले जाते. बाजारात मिळणारे साजूक तूप हे दुधातून क्रीम वेगळे करून कढवून म्हणजेच त्यातील पाण्याचा अंश काढून टाकून तयार केलेले असते.

जेव्हा आपण वनस्पती तूप खातो तेव्हा प्रत्यक्षात आपण तेल खात असतो. त्यामुळे फ्याट/जाडी वाढते हे नक्की. मात्र जेव्हा साजूक तूप खातो  तेव्हा जाडी मुळीच वाढत नाही उलट साजूक तुपामुळे आतड्यांना आवश्यक मऊ पणा येतो. चयापचय क्रिया सुधारते.

एक गोष्ट लक्षात घ्या साजूक तूपाचा शोध आपल्या पूर्वजांनी लावला आहे युरोपियन लोकांनी नाही.

साजूक तुपाचे उपयोग:

१)   सर्दी झाली कि नाकात तूप सोडतात. याने नाक मोकळे होते. नाकातील हाड वाढले तर तूप जरूर सोडावे नक्की फायदा होतो.

२)   साजूक तूप खाल्ल्याने पोटातील व्रण (अल्सर) बरे होतात.

३)  गायीच्या तुपाने पोटातील कॅन्सर बरा व्हायला मदत होते.

४)  पोटात आग होत असल्यास साजूक तुपाचा फायदा होतो.

५)  सुंठ साखर आणि साजूक तूप खाल्ल्याने जुलाब थांबतात.

६)   एक चमचा तूप व दोन चमचे मध अथवा दोन चमचे तूप आणि एक चमचा मध (व्यस्त प्रमाण महत्वाचे) हे अतिशय उत्तम टॉनिक आहे.

७)   साजूक तुपाने उष्णतेचे विकार बरे होतात.

८)   आतड्यांना वंगण होते. त्यामुळे पोट साफ होते व पाचक रसांची निर्मिती चांगली होते.

९) साजूक तुप खाल्याने नजर सुधारायला उपयोग होतो.

प्रयोग : एक चमचा साजूक तूप व एक चमचा साखर एकत्र करून खावे आणि वरून कपभर कोमट पाणी प्यावे. असे रोज सकाळी शक्यतो अनाशा पोटी व रात्री झोपण्यापूर्वी करावे. हा प्रयोग सलग ७ दिवस करून वजनातील फरक जरूर बघावा.

मधुमेही लोकांनी साजूक तूप नुसते खावे आणि वरून कोमट पाणी प्यावे. मात्र पाण्यात तूप घालून खाण्यापेक्षा वरून कोमट पाणी प्यावे हे उत्तम.

अनुभव:

१)  १९६५ साली मला पोटात खूप दुखत होते. अल्सर होता. आईने मला एका वैद्यांकडे नेले. त्यांनी मला दररोज ४ टेबल स्पून साजूक तूप खाण्यास सांगितले. मी १५ दिवस केल्यावर चांगला फरक जाणवला. तेव्हा पासून आजपर्यंत मी रोज ४ टेबल स्पून साजूक तूप नियमितपणे खातो. त्या नंतर मला पोटाचा त्रास कधीही झाला नाही. माझे वजन एकदम नॉर्मल आहे आणि जाडीही वाढली नाही.

२)  एक पेशंट माझ्याकडे आल्या. २५ वर्षे अँसिडीटीचा त्रास आहे असे सांगितले त्यांना तूप साखरेचा प्रयोग सांगितला दुसऱ्याच दिवशी त्यांनी चांगला फरक पडल्याचे सांगितले.

३)   माझ्या एका मद्रासी मित्राच्या बहिणीला तूप साखरेचा प्रयोग सांगितला. तिला संडासला साफ होत नव्हते. काहीही खाल्ले तरी उलटी व्हायची. अन्नावरची इच्छा उडाली होती. एक महिन्याने तिने मित्राला फोन करून सांगितले कि साजूक तूप हे अमृत आहे. त्याने मला खूप फायदा झाला आता मी सगळे काही खाते.

४)  माझ्या मुलाला रात्री अँसिडीटीमुळे झोप येत नसेल तर दोन चमचे नुसतेच साजूक तूप खातो त्यामुळे त्याला शांत झोप लागते.

५)   हा प्रयोग आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी केला आहे त्या सर्वांनाच फायदा झाला आहे. कोणाचेही वजन वाढले नाही.

आपल्याला काहीही शंका असल्यास मला जरूर विचाराव्यात.

अरविंद जोशी

९४२१९४८८९४

अरविंद सर एक जोडप्रश्न. पतंजली गायिचे तुप खाण्यास योग्य आहे का? की घरगुती पद्धतिने तुप करुन वापरावे?

विजयजी, अहो भोंदू फॉर्वर्ड्स मधे दिलेली माहिती आहे ही, येथे विचारून काय होणार ?
तसाही अरविन्द जोशी यांचा नंबर दिलेला आहेच त्यावर चौकशी करू शकाल.

Finally Good News For Diabetes.

Hope you can forward the below message to help some one who needs this info...!

A woman (65) was diabetic for the last 20+ years
and
was taking insulin
twice a day.
She used the enclosed homemade medicine for a fortnight and
now she is absolutely free of diabetes and taking all her food as normal
including sweets.

The doctors have advised her to stop insulin and any other blood sugar controlling drugs.
I request you all please circulate the email below to as many people as you
can and let them take maximum benefit from it.

AS RECEIVED :
DR. TONY ALMEIDA
( Bombay Kidney Speciality expert )
made the extensive experiments with perseverance and patience and discovered a
successful treatment for diabetes.
Now a days a lot of people, old men &
women in particular suffer a lot due to Diabetes.

Ingredients:
1 - Wheat 100 gm
2 - Gum(of tree) (gondhh) 100 gm
3 - Barley 100 gm
4 - Black Seeds (kalunji) 100 gm

Method of Preparation :
Put all the above ingredients in 5 cups of water.
Boil it for 10 minutes and put off the fire.
Allow it to cool down by itself.
When it has become cold, filter out the
seeds and preserve water in a glass jug or bottle.

How to use it?
Take one small cup of this water every day early morning when your stomach is empty.
Continue this for 7 days.
Next week repeat the same but on alternate days. With these 2 weeks of
treatment you will wonder to see that you have become normal and can eat
normal food without problem.

Note:
A request is to spread this to as many as possible so that others can
also take benefit out of it.

SINCE THESE ARE ALL NATURAL INGREDIENTS,
TAKING THEM IS NOT HARMFUL.
SO THOSE WHO ARE SCEPTICAL ABOUT THIS TREATMENT
MAY STILL TRY IT WITHOUT ANY HARM.

Once again Thanks for sending this message for those who suffer ths deadly diabetes..!

( Bombay Kidney Speciality expert )

<<

what specialty is this? that too with a spelling mistake?

http://zeenews.india.com/marathi/news/health-mantra/know-your-blood-grou...

नारळ सांगतो तुमचा रक्तगट... केवळ १० सेकंदात

गुहा यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीच्या डोक्याच्या थोडं वरती हातात नारळ द्यावा. थोड्याच वेळात नारळ वेगळ्या दिशेला फिरतो. ज्या जागेवर भूमिगत पाणी किंवा पाण्याची पाईपलाईन तिथे मात्र नारळ योग्य दिशा दर्शवण्यात असमर्थ ठरतो.
ए पॉझिटीव्ह रक्त गट असेल तर नारळ ४५ डिग्री अंश कोनात वळतो. एबी पॉझीटीव्ह असेल तर ४५ ते ५५ डिग्री, बी पॉझिटीव्ह असेल तर ६० डिग्री, ओ पॉझिटीव्ह असेल तर ९० डिग्री आणि ओ निगेटीव्ह असेल तर १८० डिग्री अंश कोनात वळतो.

फेसबुक वर "कणीक मळून प्फ्रिज मध्ये ठेवू नका, त्याला पिंड समजून आत्मे आकर्षित होतील आणि घरात संकट येईल" वगैरे पोस्ट फिरते आहे.म्हणजे सगळे मोठे हॉटेल वाले आत्मे बाळगूनच फिरत असणार.
आमच्या पोळ्यावाल्या मावशींना 'रोज ताजी कणीक मळूनच पोळ्या करा, कणिक उरली नाही पाहिजे, फ्रिज मध्ये ठेवायची नाही' सांगितलं तर त्या शून्य डे नोटिस वर पेपर्स टाकतील Happy

नारळाची बातमी सगळ्यात खतरनाक आहे. त्याच बातमीत पुढे म्हटलयः
>>
वेगवेगळ्या रक्त गटांच्या बाबतीत नारळ वेगवेगळ्या दिशेनं का फिरतो, यामागच्या वैज्ञानिक कारणाचा ते सध्या शोध घेत आहेत. या कामात त्यांना त्यांच्या मुली सोनाली, मोनाली आणि मुलगा आयुष मदत करतोय. कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करणारे गुहा यांचे तीनही मुलांना यामागचं वैज्ञानिक कारण लवकरच शोधून काढता येऊ शकतं, असा विश्वास आहे.
>>>

हाहाहा

>>>कणीक मळून प्फ्रिज मध्ये ठेवू नका, त्याला पिंड समजून आत्मे आकर्षित होतील आणि घरात संकट येईल" <<<

आमच्या स्वयंपाकीण बाई सकाळच्या पोळ्या झाल्यावर उरलेली कणीक फ्रीजमध्ये ठेवतात. कातरवेळी त्या रात्रीच्या स्वयंपाकासाठी पुन्हा येतात तेव्हा फ्रीजकडे आकर्षित होऊन ती कणीक बाहेर काढतात. पण त्या ढळढळीत माणूस आहेत.

Pages