Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34
२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही 
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मालिकेची पार वाट लागलीये. काल
मालिकेची पार वाट लागलीये. काल थोड्या वेळ लावली होती तर ललीता एकदम फँसी हेअरस्टआईल करुन आणि गुलाबी टू वे साडी नेसून नील साठी मुलगी पहात होती. ते लोक आलेले यांच्याकडे. काय पकाउ बोलणं, काय डोळे मोडणं............!!
सग्गळे कसे काय एव्हढे बावळट....मुख्यतः नील?
अरेरे......!!!! एका सिरेलीचा मृत्यू असा दारुण रितीने तोही सिरेल संपायच्या आधीच झाला.
हो तो ललीचा गेटप फारच भारी
हो तो ललीचा गेटप फारच भारी होता. मला मी अगदीच साधी आहे असं वाटल ते बघून. काय केस साडी अन बोलणं ते मुलीचे आईबाप कुठून पकडून आणले होते.?
मुलीचे आईबाप राहुद्या अमा, ती
मुलीचे आईबाप राहुद्या अमा, ती मुलगी तरी कसली होती? तिला दोनच डायलॉग्ज दिले होते आणि ते म्हणायच्या आधी डायरेक्टरने मी अमुक एक खूण केल्यावर डायलॉग म्हण अस सांगितल असल्यासारख वाटल. लक्ष्याच्या एका पिक्चरमध्ये (धुमधडाका बहुतेक) तो त्याच्या हिरॉइनला म्हणतो ना की मी हं म्हटल की तु डायलॉग म्हण त्याची आठवण आली.
ओळख करुन द्यायच्या सीनमध्ये त्या मितुने ही यांची मुलगी म्हटल्यावर आईने मुलीच्या हनुवटीला हात लावलेला पाहुन मला कपाळावर हात मारावस वाटल... काहीही दाखवतात श्या!
म्हणजे ही विनोदी सिरीयल आहे
म्हणजे ही विनोदी सिरीयल आहे असे डिक्लेअर तरी करुन टाकावे एकदाचे...म्हणजे तसे बघायला बरे ......
कारण चला हवा येऊ द्या मधे काही केल्या हसायला येत नाही. पुरुषांनी साड्या नेसून अंग विक्षेप करीत बोलणे हे अगदी भयंकर आणि विनोद निर्मीती ची नीचतम पातळी गाठ्णं आहे!
मला तर तो स्त्रियांचा अपमान वाटतो.
ते आत आल्याआल्या ललिताने त्या
ते आत आल्याआल्या ललिताने त्या मुलीच्या खांद्याला धरून वरपासून खालपर्यंत बघितलं ते इतकं घाण वाटलं ना..
ऐकायला विचित्र वाटेल पण आत्तापर्यंत बाईने बाईकडे पाहायची तशी नजर मी फक्त ते सिनेमात एखाद्या मुलीला कोठ्यावर वै. विकायला नेतात तेव्हा त्या कोठेवाल्या बाईची पाहिली आहे. शी !!!
आणि त्या मुलीच्या आईचा अभिनय.. क्या बात..क्या बात.. बालवाडीच्या वरताण बाळबोध अभिनय..
इंद्रनील अचानक आत येतो तेव्हा ती मुलगी आणि तिची आई कश्या बघतात त्याच्याकडे? आणि तिची आई "ए छान ए ना मुलगा' अशी खूण करते ते इतकं
वाटलं ना..
हे हे खरेच. आणि स्वानंदीच्या
हे हे खरेच. आणि स्वानंदीच्या आई , काकू आजी ह्या कुठल्या आनंदी को षात राहतात कोण जा णे?
सुखी संसार कसा असावा वगैरे च्या किती जुन्या कल्पना उराशी बाळगून बिच्यार्या राहतात? आणी परिस्थिती काय आहे सध्या. सावित्रीची कथा सांगून झाली. प्रत्येक मुलीने डोळे उघडून चतुराईने सर्वंना
सांभाळून संसार करावा अन काय काय.
या मालिकेतले बरेचसे कलाकार
या मालिकेतले बरेचसे कलाकार एका महिन्यात अॅक्टींग शिका शिबिरातुन घेतल्यासारखे वाटतात.
कालच्या भागात मोठ्या जहागीरदारीणिला सासुच बदलेल वागण लक्षात आलय आणि तिला स्वानंदीची आठवण येतेय, म्हटल स्वानंदी असे काय मोठे दिवे लावणारे? खणखणीत आवाजात सासुला, नवर्याला विमली मावशीच्या घरी काय झाल ते सांगता आल नाही तिला नुसतच मी माफी मागणार नाही, त्या म्हणतायत तस झाल नाही असल गुळमुळीत बोलत बसली आणि नवरा म्हणाला जा काही दिवस माहेरी की गेली निघुन...
आता हे लईच अवांतर होईल पण काल
आता हे लईच अवांतर होईल पण काल स्वानंदीच्या घराचा शाॅट सुरू होण्यापूर्वी बाहेरून तिच्या घराचा एक शाॅट दाखवला (हा एक पॅटर्नच आहे त्या मालिकेत).. तर कॅमेरा कसला हललाय.. मला वाटले.. भूकंप झाला की काय.. पण बहूतेक ते शूटींग हॅंडिकॅमने केल्याने अशी हलाहल झाली आहे.
डायरेक्टर वाचतोय ना...
हा एक पॅटर्नच आहे त्या
हा एक पॅटर्नच आहे त्या मालिकेत >>>> त्या नाही ऑलमोस्ट सगळ्याच मालिकांमध्ये आहे हा पॅटर्न. कारेदुमध्ये पण त्यांच्या ऑफिसचा बाहेरुन शॉट घ्यायचे कावळा उडतानाचा.
खरंच की गं मुगे.. तर बहुतेक
खरंच की गं मुगे.. तर बहुतेक झीच्या सगळ्या मालिकांचा पॅटर्न असावा.
काल ती मुलगी आलेली असताना
काल ती मुलगी आलेली असताना ललिता काय सारवासारव करते नील आल्यावर ?
प्राजक्ता, ती नीलला सांगते की
प्राजक्ता, ती नीलला सांगते की या मुलीच आणि विमलीच्या ड्रायव्हरच्या मुलाच अफेअर आहे. दोघांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये अंतर असल्याने मुलीकडचे तयार नाहीयेत या लग्नाला आणि म्हणुन त्यांच जुळवुन देण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. मुलगा ड्रायव्हरचा असला तरी चांगला शिकलेला आहे, मल्टिनॅशनल कंपनीत जॉब करतो अगदी तुझ्यासारखा आहे वै वै आणि ही मुलगी इंटिरिअर डेकोरेटर आहे अस अस सांगुन ती नीलला मुलीबद्दल माहिती देते. विमलीच्या घरी स्वानंदीने प्रॉब्लेम्स करुन ठेवल्याने मुलीकडच्यांना तिकडे न बोलावता आपल्या घरी बोलावल्याच सांगते..
हुश्श्श्श्श्श्श
येवढ लक्ष देउन अभ्यास केला असता तर
अरे काय मुर्खपण आहे
अरे काय मुर्खपण आहे
आणि नील ला सगळं पटतं....लली
आणि नील ला सगळं पटतं....लली म्हणते.."तू बाहेर नको येऊस, प्लीज...".. आणि तो मान्य करतो.

आणि त्या मुलीला जी मोजून दोनच वाक्यं होती त्यातलं एक म्हणजे ती म्हणते की ,' मी काहीच काम करत नाही. सगळं माझा स्टाफ बघतो! '
काहीही....
आणि खांद्यावर फडकं घेतलेल्या आणि चहा व समोसे सर्व्ह करणार्या, नील च्या वडिलांची लली ऑलमोस्ट "बाळू गडी" म्हणून ओळख करुन देणारच असते...तेव्हढ्यात तेच नाही म्हणतात.......
लली त्यांची ओळखच करुन देत
लली त्यांची ओळखच करुन देत नसते, मितु जेव्हा म्हणते की आपल्याला महत्त्वाच बोलायच आहे तर तुमचा गडी बाहेर गेला तरी चालेल त्यावेळी लली नवर्याची ओळख करुन देते.
ओह्ह, ती विम्मी का फिम्मी ला
ओह्ह, ती विम्मी का फिम्मी ला एवढी मोठी मुलगी आहे ??
नील म्हणजे अगदी डोकं गहाण ठेवलेला आहे. स्वानंदी ला ललिताला हँडल करताच येत नाही. नेहमी वच्छीला मदतीला याव लागतं. आधी उगाच मिर्या वाटेन वगैरे म्हणाली होती.
ओ...मुग्धा ..... तू खरेच किती
ओ...मुग्धा ..... तू खरेच किती बारकाईने बघतेस गं....... !!

ललीच्या कल्पनेतल्या श्रीमंत
ललीच्या कल्पनेतल्या श्रीमंत बाया कश्या बोलतात वागतात ते फार हिलेरिअस आहे. असं कोण वागतं . आणि आपल्याच मुलाल ठगायला बरे वाटते का हिला?!
तू खरेच किती बारकाईने बघतेस
तू खरेच किती बारकाईने बघतेस गं...... >>> काहीच काम नसत ना त्यावेळी म्हणुन इतक डिटेल बघितल जात.
अमा तिला तेवढ डोक कुठे आहे? तिला फक्त पैसा हवाय बास.
खरेच अमा... हिलेरिअस! ..
खरेच अमा...
हिलेरिअस! .. आणि नक्की हिचा हेतू काये नीलचं दुसरं लग्न करायचा? पैसा...?

आणि मीतू म्हणजे त्या विम्मी की फिम्मी ची मुलगी का?
माझे बरेच एपिसोड्स मधे मिस झाले ना... (म्हणजे मीच केले जाणून बुजून...!)
मीतू म्हणजे त्या विम्मी की
मीतू म्हणजे त्या विम्मी की फिम्मी ची मुलगी का? >> नाही ग नीलच लग्न श्रीमंत मुलीशी करण्यासाठी ललीने शोधलेली विवाह मंडळवाली आहे. आणि ती आता वच्छीच्या ओळखीची निघालीय. मला खात्री होतीच अस होणार याची.
खरंच हिलेरीअस.. खरोखर श्रीमंत
खरंच हिलेरीअस..
खरोखर श्रीमंत असणारे लोक हे असं बोलतात का?
तीन गाड्या.. आईची लहान हचबॅक..
मी काहीच करत नाही.. सगळं स्टाफच करतो.. आवरा..
सामान ठेवायला दोन मोठे फ्लॅट आणि राहायला एक लहान..
फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये २-३ महीने राहूयात..
कैच्याकै..
मला इतकं हसायला आलं ना..
पियु विचार करण्यासारखी गोष्ट
पियु विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्यांच्याकडे फर्निचर ठेवायला दोन फ्लॅट्स आहेत ते लोक २-३ महिने रहाण्यासाठी ५ स्टार मध्ये कशाला जातील? इन्वेस्टमेंट म्हणुन अजुन एखादा फ्लॅट घेतला असण्याची शक्यता नसेल का जिथे घराच रिनोव्हेशन होईपर्यंत राहु शकतील
ती ईंटिरियर डिझाईनर आहे???
ती ईंटिरियर डिझाईनर आहे??? आणि म्हणे काही करत नाही?? स्टाफ सर्व करतो म्हणे....नंबर घ्यायला हवा तीचा .. असा स्टाफ मला ही हवाय... जळ्ळ मेलंं ईथे आम्हालाच जीव घालवावा लागतो सर्वामागे. सिरीयल जो कोणी बनवतोय नक्कीच १२ वी पास आहे फक्त
मूर्खपणाचा कळस आहे ही सीरियल.
मूर्खपणाचा कळस आहे ही सीरियल. नील एव्हढे मोठे प्रोजेक्ट हाताळतोय,लोकांशी डील करतोय, तर घरातल्या खर्चाचे किंवा घराच्या हप्त्याचे हिशोब बघत नाही का कधीच? बँक स्टेट्मेंट वगैरे काही चीज असते की नाही? आईने सांगितलं की गाडी विकली आणि घराचे पैसे भरले. ह्याने विश्वास ठेवला. वच्छीआत्यासाठीचा चेक आईने स्वतःचं नाव टाकून स्वतःच्या खात्यात वळता करून घेतला. हे सगळं ह्याला कळत नाही? काहीच शंका येत नाही? पडदेखरेदीचंही तसंच. म्हणे चांगले भारीचे पडदे असताना स्वानंदीने उगीचच नव्या पडद्यांची खरेदी केली. नंदीबैलच अगदी. आई काहीही बोलली की हा नंदीबैलासारखी मान हलवतोय. बुग्गूबुग्गू. आता वटपौर्णिमेच्या नावाखाली आणखी काय काय सहन करावं लागणार आहे देव जाणे.
त्या मानाने कलर्सच्या मालिका बर्या वाटायला लागल्यात. दगडापेक्षा वीट मऊ.
नील डोक्यात जायला
नील डोक्यात जायला लागलाय.
कलर्सच्या मालिका बर्या वाटायला लागल्यात >>> मी एकच पाहिली होती चुकून - किती सांगायचंय मला. कलेक्टर सुनेने घरातली कामं सांभाळून नोकरी करायची, खानदानी दागिने घालून वावरायचं वगैरे असलं काहीतरी चालू असतं त्यात. अवघडेय एकूण.
सगळीकडेच अवघड आहे.. एखादी
सगळीकडेच अवघड आहे..
एखादी खमकी सून दाखवण्याची सुतराम शक्यता नाही यांच्याकडून..
खमकी सून म्हणजे यांच्या मते खलनायक. जसे की निशा..
आयला!!! एकाच दिवसात एवढी
आयला!!! एकाच दिवसात एवढी पिसं काढलीत मालीकेची.
सगळ्यांचा साचलेला राग बाहेर पडला वाटतं. 
नील डोक्यात जायला लागलाय.>> +१२३४५६७८९....
असा नवरा असण्यापेक्षा सिंगल राहिलेलं योग्य.
म्हणे चांगले भारीचे पडदे
म्हणे चांगले भारीचे पडदे असताना स्वानंदीने उगीचच नव्या पडद्यांची खरेदी केली. >>>> नव्या पडद्यांची खरेदी नाही हिरा, घरात उंची पडदे असताना स्वानंदीने जुन्या साड्यांचे पडदे लावले उगाचच अस म्हणण होत तिच.
बाकी हे शिरेलवाल्यांना अचानक गरीबीचा सामना करावा लागण म्हणजे कैच्याकैच प्रकरण आहे ब्वा. येवढे पैसे संपलेले असतात का की साधे खिडक्यांचे पडदे विकत घेता येउ नयेत? घरात नील, स्वानंदी, निरंजन, निलीमा चार चार लोक कमवत आहेत, घर चालवायला दोन जोडपी मिळुन ४०,००० रु देतात आणि यांना पडदे विकत घेता येत नाहीत घरासाठी?
बाकी हे शिरेलवाल्यांना अचानक
बाकी हे शिरेलवाल्यांना अचानक गरीबीचा सामना करावा लागण म्हणजे कैच्याकैच प्रकरण आहे ब्वा. येवढे पैसे संपलेले असतात का की साधे खिडक्यांचे पडदे विकत घेता येउ नयेत? घरात नील, स्वानंदी, निरंजन, निलीमा चार चार लोक कमवत आहेत, घर चालवायला दोन जोडपी मिळुन ४०,००० रु देतात आणि यांना पडदे विकत घेता येत नाहीत घरासाठी? >+१ अगदी !!
Pages