Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34
२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही 
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला हे कळले नाही ६०० रु. चे
मला हे कळले नाही ६०० रु. चे मंगळसूत्र तसेच दिसेल कि नाही. का अडीच तोळ्याच्या मंसू सारखे दिसेल? आणि स्वा. आ. नवर्यासमोर आपण रोज जेवतोका इतके भारी वगैरे बोलून पै पै चा हिशेब
मांडत होती अगदी आधीच्याच सीन मध्ये. मग एकदम तीस ह्ज्जार रु. देताना नवर्याला फोन वरून सांगितले पण नाही. खरेच स्टुपीड आहे. किंवा चला दोघी घेउन येउ मी तिथेच दुकानदाराला पैसे देते असे ही म्हणता आले असते कि नाही.
कम्युनिकेशन गॅप (चपखल मराठी
कम्युनिकेशन गॅप (चपखल मराठी शब्द सापडला नाही) हे सर्व मालिकांचे मूळ ब्रीद आहे.
तरी स्वा. ललिताला बर्यापैकी
तरी स्वा. ललिताला बर्यापैकी डायरेक्ट विचारते. सगळे चोर, रिक्षावाले वच्छीला कसे काय ओळखतात
ते सगळे तिच्याच चाळीतले असतात
ते सगळे तिच्याच चाळीतले असतात नेहमी.
स्वानंदी कडे गुड न्यूज होणार
स्वानंदी कडे गुड न्यूज होणार काही दिवसांनी असे मला वाटते आहे. स्वानंदीच्या माहेरी राज्य करायच्या नादात ललिता बाईंच्या लक्षात आले नाहिये कि नील स्वानंदीला मोकळे रान( खोली/ वेळ मिळू शकेल) शी थिंक्स शीइज स्मार्ट बट शी इज क्वाइट स्टुपिड रिअली. गुड फन.
काल किती वेळ ते जिवतीची उंबरे, मोरण्या नक्की काय मग रेसीपी, मग उपास करणे, ह्यातच गेला.
उर्मीला आणा पाहु इकडे. आणि अनिता बिचारी स्वैपाक व व्रत वैकल्ये ह्यसाठीच नियुक्त केली आहे वाट्ते सासूबाईंनी. ती आली आणि आपली सुटका झाली म्हणे.
आणि फ्रेम मध्ये कोणी पुरुष नसला तरी सर्व स्वामींची कृपा म्हणून सर्व बायका हात जोडतातच जोडतात.
हॅवंट दे हर्ड ऑफ फेमिनिझम? पण बघायला गोड वाट्त्ते असले.
आता जरा स्वानंदी सुसह्य अभिनय
आता जरा स्वानंदी सुसह्य अभिनय करू लागली आहे
स्वानंदी च्या नंदीत सुधारणा
स्वानंदी च्या नंदीत सुधारणा नाही.. पण ललितात सुधारणा होईपर्यन्त शिरेल चालू ठेवावी लागेल असे मागे स्वानंदी ने डिक्लेअर केलेले त्यामुळे डाव प्रतिडाव सुरु असणार आहेत कित्येक भाग ललिताबाईंमध्ये परिवर्तन होईस्तवर
आणि फ्रेम मध्ये कोणी पुरुष
आणि फ्रेम मध्ये कोणी पुरुष नसला तरी सर्व स्वामींची कृपा म्हणून सर्व बायका हात जोडतातच जोडतात.
हॅवंट दे हर्ड ऑफ फेमिनिझम? पण बघायला गोड वाट्त्ते असले. >>> अमा , त्या आपापल्या स्वामींबद्दल नाही , 'त्या , वरच्या ' स्वामींबद्दल बोलतात
अमा , त्या आपापल्या
अमा , त्या आपापल्या स्वामींबद्दल नाही , 'त्या , वरच्या ' स्वामींबद्दल बोलतात
>> ते मला माहीत आहे. पण स्वतःच्या डिसिजन्स चे फळ स्वत : घ्यायला काय हरकत आहे. ? पण नाही. आम्ही किती ते सोज्वळ, सुसंस्कारी, काय गोड सासू काय गोड गोड सुना काय गोड गोड गोड गोड मुली. असे ते सर्व आहे. व हे त्या बाबांच्या प्रेमळ छाया छत्रा खाली. बघायला खरेच छान करेसिंग गोड वाट्ते. बाकी स्वामींची कृपा.
अमा..... आपण ह्या सिरीयल्स
अमा.....
आपण ह्या सिरीयल्स मधे इतक्या इंव्हॉल्व्ह झालेलो आहोत की जणू काही आपल्याच घरात ते घडत आहे असे वाटते व संताप येतो, कीव वाटते, हसू येते, डोके चक्रावते, सगळे होते!!!
'उर्मीला आणा पाहू इकडे' हे त्याचेच उदाहरण...!!
पण असा विचार करुया की दादा व उर्मी हे नांदा सौख्य भरे मधे आले लोली कडे तर काय होईल...किंवा नचि विक्रांतचा मित्र म्हणून गेला तर? किंवा विक्रांत कुमुद वहिनींचा डॉक्टर असला तर?
शिरखेडच्या भय्यासाहेबांची
शिरखेडच्या भय्यासाहेबांची एन्ट्री झालेली आहे, बहुदा आता थोडी इन्टरेस्टींग होईल मालिका.
ही मालिका पण लवकर गाशा गुंडाळायच्या तयारीत तर नाही ना?
दादा व उर्मी हे नांदा सौख्य
दादा व उर्मी हे नांदा सौख्य भरे मधे आले लोली कडे तर काय होईल.>>> वासू आणि उर्मी नील आणि स्वानन्दी च्या घरी आले आहेत अर्थातच एअर फ्रेशनर च्या जाहीरातीत. पण उर्मीचा देवावर विश्वास नसतो असे दाखवले होते ना सिरीयल मध्ये? मग ती गणेश चतुर्थी स्पेशल जाहीरातीत कशी?
शिरखेडच्या भय्यासाहेबांची
शिरखेडच्या भय्यासाहेबांची एन्ट्री झालेली आहे>>> मला ते शिरखेड म्हटले की कमला आठवते.
ही मालिका पण लवकर गाशा
ही मालिका पण लवकर गाशा गुंडाळायच्या तयारीत तर नाही ना? >> यॅस मलाही तसच वाटतयं.
संपू दे एकदाची. एखादी काॅमेडी
संपू दे एकदाची.
एखादी काॅमेडी सिरीयल चालू करा म्हणावं.
आता ते भय्यासाहेब आलटून
आता ते भय्यासाहेब आलटून पालटून नंदी-नील आणि तिच्या दीर जावेला बेडरूममध्ये राहायला देणार.
मग नंदी-नीलकडे पाळणा हलणार आणि सिरीयल संपणार. (रच्याकने.. आमच्या घरी पण एका भैय्यासाहेबांची गरज आहे).
त्या भय्यासाहेबाना ईथला पत्ता
त्या भय्यासाहेबाना ईथला पत्ता कसा सापडला ?
जानकीवैनी कुठे आहेत ?
सगळ्यात मजेशीर जर काही असेल
सगळ्यात मजेशीर जर काही असेल तर भय्यासाहेब पहाटे ३ ला आलेत बरोब्बर पुजेच्या वेळेत
स्वानंदीने त्यांना बोलावून
स्वानंदीने त्यांना बोलावून घेतलं आहे. नेहमी ललिताचं पितळ उघडं पडताना नील गायब कसा असतो ? काल पण तो आला आणि भय्यासाहेबांनी वेगळाच ट्रॅक सुरू केला, आधी तर ललिताची खरडपट्टी करत होते.
अहो, ते बाप्पाच भय्यासाहेब
अहो, ते बाप्पाच भय्यासाहेब बनून आले वगैरे लॉजिकं असेल त्यांचे
हे नवे पात्र ललिताबाईंना
हे नवे पात्र ललिताबाईंना चांगलेच धारेवर धरते आहे.
नील इतका आंधळा असेल यावर विश्वास नाही बसत.
मला आव डते सिरेल. वच्च्ची
मला आव डते सिरेल. वच्च्ची आत्या आवडते. व स्वानंदीची फॅमिली पण. जी मुलगी नोकरी करते, स्वतः चे मत व्यक्त करते, जिला मैत्रीणींबरोबर भटकायला कॉफी प्यायला आव ड्ते ती व्यक्तिरेखा काहीतरी ग्रे शेडचीच असनार असा नेटवर्क चा बायस आहे.
संपदा, मोनिका झालंस्तर आपला बच्चा. काल ती बरोबर सांगते सोडून दे बायकोला पण नेटवर्क ला स्पष्ट
बोलणार्या मुली व्हँप वाट्तात. गौरी मॉडेलच्या बाबा वाक्यं प्रमाणं बायका व मुली. आज्ञाधारक. आपल्या
स्वानंदी सारख्या घरकामात एक्स्पर्ट. मुली म्हणजे बेस्ट. हिरॉइन मटेरिल ह्यांचं.
जी मुलगी नोकरी करते, स्वतः चे
जी मुलगी नोकरी करते, स्वतः चे मत व्यक्त करते, जिला मैत्रीणींबरोबर भटकायला कॉफी प्यायला आव ड्ते ती व्यक्तिरेखा काहीतरी ग्रे शेडचीच असनार असा नेटवर्क चा बायस आहे.
संपदा, मोनिका झालंस्तर आपला बच्चा. काल ती बरोबर सांगते सोडून दे बायकोला पण नेटवर्क ला स्पष्ट
बोलणार्या मुली व्हँप वाट्तात. गौरी मॉडेलच्या बाबा वाक्यं प्रमाणं बायका व मुली. आज्ञाधारक. आपल्या
स्वानंदी सारख्या घरकामात एक्स्पर्ट. मुली म्हणजे बेस्ट. हिरॉइन मटेरिल ह्यांचं.>>>> सहमत. पण मला ती बच्चा गुड फोर नथीन्ग वाटते. तिला धड office चीही कामे येत नाही. पण ती काल भक्तीला तिच्या प्रियकराबद्द ल ती जे बोलली ते मात्र पटले. "ज्या मुलाने तुला फसवल्,त्या मुलावर तु अजूनही प्रेम करते हे मात्र मला पटत नाही." रेवतीला मात्र खलनायीका दाखवले नाही ते आवडले मला.
गौरी मॉडेलच्या बाबा वाक्यं प्रमाणं बायका व मुली. आज्ञाधारक>>> उर्मी आज्ञाधारक नव्हती म्हणून तर तीचा पत्ता लवकर कट केला ना हयान्नी.
अमा अनुमोदन.. कसंय ना, गवरी,
अमा अनुमोदन..
कसंय ना, गवरी, नंदी, आदिती यासारख्या घरेलू बायांना काही कट शिजवावे यासाठी वेळच मिळत नाही. आणि संपी, बच्चा यांना दुसरा उद्योगच नसतो त्यामुळे बिचार्या कट शिजवण्याच्या नादात त्यांची चांगली मतं व्यक्त करण्याच्या गुणाच्या बाबतीत पण मार खातात.
मधे एकदा संपदा रडत होती असं
मधे एकदा संपदा रडत होती असं दाखवलं होतं वडिलांच नोकरीच कळल्यावर. सुधारली का आता ती?
कसंय ना, गवरी, नंदी, आदिती
कसंय ना, गवरी, नंदी, आदिती यासारख्या घरेलू बायांना काही कट शिजवावे यासाठी वेळच मिळत नाही>>> याला मात्र अपवाद गवरीचा आहे. तिला मात्र छोटी कट-कारस्थाने बरी जमतात. उदा. एखादयाच्या अन्गावर थन्ड पाणी फेकणे, त्याला मिरच्या खायला लावणे ई. सध्या मात्र बावचळलेली आहे.
किती बिनडोकपणा सुरु आहे
किती बिनडोकपणा सुरु आहे सिरीयलमधे, किती ते बळंच उपदेशाचे डोस, आज नील च्या चेहर्यावर अगदी 'अरे आवरा आता बास' टाइप भाव होते. फार पाणी घालत आहेत मालिकेत.
संपेल बहुदा ही सिरियल, देशी
संपेल बहुदा ही सिरियल, देशी सुलतानचे प्रोमोज येतायत टीव्हीवर कालपासुन
बादवे, त्या स्वानंडीच्या बांबाच्या डब्यात काहीतरी पैसे मिळाले होते आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोप झाला होता त्याचं पुढे काय झाल? ते मिटल का प्रकरण? कारण ते गणपतीची आरती करताना दिसले घरी
shubhangi, mitla prakaran
shubhangi, mitla prakaran ganapati chya krupene. पण स्वानंदीला फक्त संपदाचच नाव कळलय ह्या प्रकरणात. ललिता सुटली.
ललिताचा नवरा बळच सांगतो की ललिताने नवस बोलला होता गणपतीबसवीन म्हणुन, तिचे बाबा सहीसलामत सुटले ह्यातुन तर.
सो त्यांच्याकडे गणपती बसले.
शिरेल संपनार! फेप्रात आल्तं.
शिरेल संपनार! फेप्रात आल्तं. कालच्या लोकमतमदी. मैनाखेरीस संपंल म्हनं.
Pages