Submitted by दक्षिणा on 21 July, 2015 - 06:34
२० जुलै पासून म्हणजे काल पासून झी मराठी वर नेहमी प्रमाणे एक घरगुती सिरियल सुरू झाली आहे. ज्याची थोडक्यात कल्पना आपल्याला प्रोमोजवरून आलीच असेल.
नायिका नेहमी प्रमाणे, कामसू, साधी, परंपरावादी, सत्य वचनी, प्रेमळ काय काय आणि काय नाही 
सर्व नायिकांनी असंच असलं पाहिजे असा झी मराठी चा अट्टहास, इतक्या सिरियलित अजून एक गोड गिट्ट नायिका. इतर सिरियल्स पाहता या मालिकेची चिरफाड करण्यात आपण का मागे रहायचं?
चला तर मग, आजपासून पहा आणि लागा कामाला, इथे लिहिण्याच्या.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वानंदी बावळट आहेच थोडी , पण
स्वानंदी बावळट आहेच थोडी , पण आजीच्या साथी मुळे जरा सुधारतेय.
लोली चा नवरा म्हणाजे पात्रच ए एक.
सीसीटीव्ही आज्जी
सीसीटीव्ही आज्जी
लोली ची जाऊ कुठे गेलिय? ..
लोली ची जाऊ कुठे गेलिय? .. "वेत्सला, खरंच की गं..., ललीता ला कळतात सग्गळे व्यवहार आमच्या" ......असं म्हणणारी ....? आणि लोली चा वृद्धाश्रम वगैरे बंद पडला वाटते?
आंगो
आंगो
लली खर्चिक उधळी दाखवली आहे
लली खर्चिक उधळी दाखवली आहे शॉपिंग पण भरपूर करते तरी त्याच त्या दोन साड्या नेसते.
आजींनी सॉलिड पाचर मारलीय.
आजींनी सॉलिड पाचर मारलीय.:फिदी: त्या मॅरेज ब्युरो वाल्या बाईंना सांगतात की ललिता जहागीरदार, सुनेच्या चांगल्या साड्या फाडुन, त्याचे जरीचे काठ ब्लाऊजला लावतात.:हहगलो: ललिताला फोन आल्यावर ती जाम पिसाळते.
पण आजी असेस्तोपर्यंत स्वानंदी हुशारी दाखवणार. आजी घरी परतल्यावर स्वानंदीचे काय्?:अओ: हुशारी कंटिन्यु ठेवणार की परत गरीब गाय बनणार?
पण आजी असेस्तोपर्यंत स्वानंदी
पण आजी असेस्तोपर्यंत स्वानंदी हुशारी दाखवणार. आजी घरी परतल्यावर स्वानंदीचे काय्?अ ओ, आता काय करायचं हुशारी कंटिन्यु ठेवणार की परत गरीब गाय बनणार?>>>>>>>>>> वेड पांघरून पेड गावाला जाणारी .....
लोलीताला लईच माज आहे. सगळं
लोलीताला लईच माज आहे. सगळं त्या घोडतोंडीनं सांगीतलं तरी हिचं आपलं चालूच...
आजी घरी परतल्यावर स्वानंदीचे
आजी घरी परतल्यावर स्वानंदीचे काय्? > हुशारी टिकल्येय अजुनही. अगदीच बंडल आणि बालिशपणा आहे एकुणातच. पण त्यातल्या त्यात आता जरा मनोरंजन तरी होतय.
पण त्यातल्या त्यात आता जरा
पण त्यातल्या त्यात आता जरा मनोरंजन तरी होतय. >>> हो . निलिमा , पडवळाची भाजी पाहून ईतकी खुश झाली की विचारू नका
काल लोलीताने भज्यात भरमसाठ
काल लोलीताने भज्यात भरमसाठ मीठ घालून ठेवलं जे सगळं कॅमेर्यात शूट झालं. बावळट नील ला मात्र काहिच कळलं नाही.. काहीही दाखवतात. पावसात भिजायचं म्हणे. अती बोअर.
पण नीलिमा मला फार आवडते. किती क्यूटे !
हो ना, अगदी बालिश वागतात.
हो ना, अगदी बालिश वागतात. नीलला कळायला महाएपिसोड करतील
काल लोलीताने भज्यात भरमसाठ
काल लोलीताने भज्यात भरमसाठ मीठ घालून ठेवलं जे सगळं कॅमेर्यात शूट झालं.>> जरा विस्कटून सविस्तर सांगा ना कोणीतरी. मधे १ आठवडा मी बघितलं तर स्वानंदी एकदम संपदाला काहीतरी सुनवतेय वगैरे एपिसोड चालू होता. जरा मज्जेचं दिसतंय आता. लिवा कुनीतरी.
आणि घोड तोंडी कोण...आय मीन
आणि घोड तोंडी कोण...आय मीन स्वानंदी की वच्छी आत्या?
माझा पण चुकला कालचा एपिसोड,
माझा पण चुकला कालचा एपिसोड, टाटा स्काय च्या मराठी चॅनल मध्ये डिस्टरबन्स होता खुप. मग मूड गेला.
संपदाचे वरचे दात मला सुताराच्य तासणीने तासल्यागत वाटतात. तुम्हाला कुणाला वाटता का?
सेम पिंच दक्षु
सेम पिंच दक्षु
कुठलीतरी भिशी करते ललिता आणि
कुठलीतरी भिशी करते ललिता आणि आपला अर्धातास वाया, यांचे स्प्रिंगरोल, कबाब आणि कोडे बघण्यात!!
काय त्या भिशीच्या मैत्रिणी,
काय त्या भिशीच्या मैत्रिणी, ललिताच्या साडीचं उगाच कौतुक केलेल दाखवलयं
नील इतका बावळट का दाखवला आहे, मोठा मुलगा हुशार म्हणायचा त्याच्या पुढे.
हो ना.......आजकाल निरंजन ला
हो ना.......आजकाल निरंजन ला चांगलाच स्कोप दिलाय........बरंच फूटेज आहे त्याला......नाहीतर आधी कायम खेटर खाल्ल्यागत तोंड घेऊन वावरत असायचा! आणी समहाऊ वच्छी , संपदा व माहेरचे दाखवत नाहीयेत हल्ली!
सध्या मालिकेत रंग भरतोय.
सध्या मालिकेत रंग भरतोय. ललिताची चांगली फजिती होतेय.
स्वानंदीचं महत्व नील सोडून सगळ्यांना पटतंय
तो एकटाचा आईवरच्या प्रेमाने पार आंधळा झालाय
ललिता सगळ्या साड्यांवर एकचं
ललिता सगळ्या साड्यांवर एकचं ब्लाऊज घालते का ? का सगळ्याला जरीची पट्टी लावल्ये ? स्वानंदीच्या घरी येण्याच प्रयोजन कळलं नाही.
स्वानंदी ने ललिताचे १० लाख
स्वानंदी ने ललिताचे १० लाख हातोहात चलाखीने काढून घेतले त्याचा सूड म्हणून ललिता स्वानंदीच्या घरी सहज भेटायला जाते आणि पाय मुरगळल्याचं नाटक करून १५ दिवसाचा मुक्काम ठोकते. त्यांना खिसे ढिले करायला लावणारे आता.
कोणी नोटीस केलं का . नील आई
कोणी नोटीस केलं का . नील आई म्हणत असेल तरी वाक्य म्हणताना, आयला विचारलं का? आयला आठवण येत असेल?आयला कसं वाटत असेल? असं म्हणतो
आयला
आयला
माझा छकुला पिक्चरमधला आदिनाथ
माझा छकुला पिक्चरमधला आदिनाथ कोठारे म्हणतो तसं " माझी आय हरवलीए हो " तसं काहीसं
३०० भाग झाले याचे,
३०० भाग झाले याचे, जावईबापुंनी फोटु टाकलेत त्यावरुन कळलं.
सध्या ललीता काय करतीये...?
सध्या ललीता काय करतीये...?
लोली देश्पांडेंच्या घरात
लोली देश्पांडेंच्या घरात पडायचे नाट्क करुन तळ ठोकून आहे, काल स्वानंदीच्या आईकडुन ३०००० उकळले आहेत नेहमीच्या हातचलाखीने, स्वानंदीला संशय आलाय सासूचा, नील नेहमीप्रमाणे माझी आय माझी आय करतोय, माधवराव लोलीला साथ देत आहेत नाटकात.. बाकी हातवारे बाईंचे हातवारे सुरुच आहेत. विशेष सांगण्यासार्खे सध्या तरी काही नाही.
स्वानंदीच्या आईकडुन ३००००
स्वानंदीच्या आईकडुन ३०००० उकळले >>>स्वा आ बावळ्ट आहे का...
हो...आहेच
हो...आहेच
Pages