बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजसी, कुकरमधे सुरळीच्या वड्यांचे पिठ शिजवता येते. बेसनात फक्त निम्मे पाणी घालायचे. बाकिचे जिन्नस घालुन मिक्सरमधून घुसळून घ्यायचे. बाकिचे पाणी कुकरमधे उकळत ठेवायचे. उकळी आली कि बेसनाचे मिश्रण घालून भरभर ढवळायचे, मग झाकण ठेवून तीन ते पाच मिनिटे शिजवायचे, मधुन सर्व कूकर जरा उचलून गोलगोल फिरवून घ्यायचा.
सगळेच पाणी मिसळुन जर शिजवत ठेवले तर बेसन खाली बसते. तसेच कुकरच्या अर्ध्यापेक्षाही कमी मिश्रण असावे नाहीतर फसफसुन बाहेर येते.
असे बेसन शिजवून घेतल्यावर बाहेरची कृति नेहमीप्रमाणेच. बेसन जूने असेल, तर एक कप बेसनाला एक टेबलस्पून मैदा वापरायचा.

राजसी , मी मागे जुन्या माबो वर टाकली होती कृती. परत टाकते. दिनेशदा मी कुकरच्या सरळ शिट्ट्या करून करते. तुम्ही ताक नाही का घालत?

राजसी, जुन्या हितगुज वर बघ, खाली लिंक वर जा.
तिथे कुकर वापरून सुरळीच्या वड्या कश्या करायच्या हे डीटेल मधे लिहिल आहे बघ.

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/160.html?1215194107

मी ऐकलय की तांदुळाच्या पीठीच्या पण अश्याच सुरळीच्या वड्या करतात. कुणी केलाय का प्रयोग?

हो होतात ना. मी केल्यात. १ वाटी तांदूळ पिठी(एकदम बारीक, मी मोदकाचीच घेतलेली), १ चमचे लोणी(लोणीच छान लागते),हळद, आंबट दही सगळे खूप घूसळून घ्यायचे मग उकळते पाणी घालून धवळत बसायचे. तकाकी आली की बाकीचे सेम पद्धतीने वड्या करायच्या. किंचीत ह्यात ओवा पूड घातली की मस्त लागतात. लिहिते ही पाकृ यो. जा.

बटाटा उकडून त्यात गोड दही, मीठ, तिखट, जिरेपूड घालून खावे.
राजगिरा लाह्या +दुध + साखर.
बटाटा पापड ओव्हनमध्ये भाजून.. (चव खूप चांगली लागत नाही, पण चांगला भाजला जातो अन पोट भरतं.)
साबुदाणा पाण्यात शिजवून जिरे मीठ घालणे.
साबुची गोड खीर - दुध घालून.
उकडलेले रताळे - दुधात, किंवा नुसते कुस्करून साखर घालून.
लाल भोपळा खीर.
साबुदाणा १/२ वाटी, १ वाटी भगर रात्रभर पाण्यात भिजवून मिक्सरमधून काढून डोसे छान होतात. अल्प तेलावर, सोबत दाणेचटणी किंवा खोबर चटणी किंवा बटाटाभाजी. Happy
अजुन लिहू का काही? की पुरे? Happy

१५ बायका नवरात्रात दुपारी येणार आहेत नेहमीचे उपवासाचे पदार्थ सोडुन दुसरे काय करता येइल.फार तेलकट नको.

एक वर्याच्या तांदूळाची खिचडी असते बघा. ती एक मूद. काकडीची कोशिम्बीर.( छोट्या वाटीत) साबुदाण्याचे थालिपीट एक चत्कोर. एक केळे

हाय जेट एअर्वेज मधे असे मिळाले तर?

मला १६ लहान मुलं आणि साधारण ३० मोठी माणसं यासाठी (दुपारी १२ वा. बोलावलं आहे) मेनू सुचवा.
यात काही ऑसी, काही जैन, काही व्हेज तर काही नॉनव्हेज खाणारे आहेत.

घरात रिनोवेशन सुरुय, पसारा आहेच त्यात मोठा मेनु- स्वयंपाक नकोय. पावभाजी आणि छोले पुरी, दाल आणि जिरा राईस नकोय. बरेचदा झालेत कारण करुन.
अगदी सोपे सुटसुटीत काही सुचतय का? मला तीन गोष्टी सुचल्यातः
१) चना चाट - स्टार्टर्स मध्ये
२) व्हेज पुलाव- मेनमध्ये
३) व्हॅनिला आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी घालून- जेवणानंतर.

तुमच्याइथे अजुन थंडी असेल ना. टोमॅटो सुप का नाही करत? किंवा लेंटील सुप वगैरे?
किंवा कोल्हापुरी मिसळ थोडी कमी तिखट करुनही चालेल. नलूने जुन्या मायबोलीवर एक मटकीची उसळ दिलिय ती पण ब्रेडबरोबर छान होईल.

नाय गं मिनोती, ऊन आहे त्या दिवशी चांगलंच. तापायला लागलंय हळूहळु. उसळ- ब्रेड चांगली वाटतेय, अजून सुचव ना काही आय्डीआ असतील तर.

कट्लेट्स बेक करु शकतेस. सॅलड कर फ्रुट्स-कुसकुस घालून. तळणे, खुप वेळ हलवत वगैरे करणारे पदार्थ करु नकोस असे वाटते.
लहान मुलांसाठी पिनट्बटर जेली सँडविच केलीस तर? हवे तर कुकीकटरने शेप्स दे. कडेचे उरलेले पिएचेस कटलेट्स मधे घालू शकतेस.

रगडापॅटिस पण छान होइल टिक्या पोरे नुसत्या पण खौ शकतात. आणि बेक करु शकतेस.

चमचमीत पोहे अन शिरा आवडेल का लोकांना? शिरा आधी करून ठेवता येतील. कदाचित पोहेसुध्दा. नंतर मायक्रोव्हेव मधे गरम करावेत. १ ते ३ तर ठरलच आहे ना, तर शिर्‍याऐवजी गुलाबजाम? मुले आवडीने खातील. Happy

भाग्या,
स्टार्टरः चना/आलु चाट छान आहे...
नॉनव्हेज वाल्यांसाठी चिकन लॉलिपॉप - तंदुरी चिकनचे तुकडे टुथपिक वर लावुन...
व्हे़ज - तंदुरी पनीर, नाहीतर मिनी आलु टिक्की ऑन टुथपिक... Happy

मेन : दिनेशदांनी दिलेली बिर्याणी + टॉम्+काकडी रायता. बरोबर पापड...
सगळे हाणतिल. आधी करुन ठेवता येइल. सर्व करायच्या आधी तासभर बिर्याणी ओव्हन मधे वरती फॉइल लाउन गरम करायची....

डेझर्ट - गुलबजाम + आइस्क्रिम... सगळ्यांनाच आवडत.

किंवा सरळ पाउंड केक आणायचा, ग्लासात तुकडे टाकायचे, वर रेडी कस्टर्ड ओतायच, फळ/ नट्स, चॉकलेट चिप्स टेबलावर बोल मधे ठेवायचे... ज्याला हव तस घालुन खातिल. झटपट ट्रायफल, जास्त झंझट नाही..... Happy

भाग्या
कॉमन स्टार्टर्स:व्हेज स्टिक्स विथ २-३ डिप्स,चना सॅलड,कॉर्न चिप्स सालसा,

व्हेज स्टार्टर्स: कॉकटेल सॅंडविचेस(मायो+काकडी,बटर+ हिरवी चटणी) किंवा आलू टिक्की

नॉनव्हेज स्टार्टर्स : खीमा बॉल्स/कटलेट्स किंवा कॉकटेल सॅंडविचेस(हनी चिकन) पण छान लागतात आणि लहान मुले पण आवडीने खातात.आणि आधी पासुन करून ठेवली तरी छान लागतात. मी मधे एका पार्टी ला केली होती हातोहात संपली. हवी तर रेसिपी देइन.

मेन : व्हेज / चिकन बिर्याणी + रायता/ किंवा कुर्मा/ चिकन करी + ब्रेड + पुलाव + रायता

डेझर्ट - गाजर हलवा १-२ दिवस आधी केलास तरी चालेल. बरोबर व्हॅनिला आईसक्रीम

मी दहा बारा जणींसाठी पार्टी करणार आहे. समोसा चाट, व्हेज सन्डवीच आणि फालुदा हा मेनु कसा आहे. आणि काय ( सोपे) करु शकते.

समोसा चाट साठी २ कप छोले भिजवले आहेत. पुरतील ना? माझा छोल्यांचा अंदाज नेहमी चुकतो.

मी घरी एक केळवण ठरवतेय. त्यासाठी गुजराथी पदार्थ करायचे डोक्यात आहे. डाळ ढोकळी, ग्रीन गुजरात शाक, फुलके वगैरे साधारण ठरवतेय. मला गुजराथी गोड पदार्थ सुचवा बरे.. आणि चांगला मेनू पण सुचवा.

मगस बनव, सोप्पे व मस्त. (थोडेसे पुपो सारखे लागते पण गुज्जुना खूप आवडते, अक्ख्या घाटकोपरात आवडत नाही असे मला तरी भेटले नाही तेव्हा लहानपणी)

Pages