Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बस्के, किरण थॅंक्स फॉर द
बस्के, किरण थॅंक्स फॉर द इन्फो
मुखवटे आणि चेहरे फारच मस्त
मुखवटे आणि चेहरे फारच मस्त पुस्तक आहे!
दरेकर नावाच्या लेखकानी
दरेकर नावाच्या लेखकानी लिहिलेले अल्पसंख्याकाकरता नेमलेल्या "सच्चर" आयोगाबाबत व आयोगाने केलेल्या सुचनां /शिफारशींबद्दलचे पुस्तक नुकतेच मिळाले आहे. वाचतो आहे. भन्नाट पुस्तक आहे, पुराव्यानिशी आकडेवारीनिशी बाबी मांडल्यात.
दिलीप प्रभावळकरांचं 'एका
दिलीप प्रभावळकरांचं 'एका खेळियाने' विषयी ऐकलं होतं, पण 'मुखवटे आणि चेहरे' विषयी लिहील्याबद्दल धन्यवाद.
'एक होता फेंगाड्या' - इंटरेस्टिंग दिसतंय पुस्तक.>> +१
पुराव्यानिशी आकडेवारीनिशी
पुराव्यानिशी आकडेवारीनिशी बाबी मांडल्यात.
>>>
कोणाच्या बाजूने?
पद्मजा फाटक(मजेत) ह्यांचे
पद्मजा फाटक(मजेत) ह्यांचे 'हसरी किडनी' वाचून संपवले. १० एक वर्षापूर्वी जेव्हा वाचले होते तेव्हा बेहद्द आवडल्याची आठवण होती. हेच मनात ठेऊन वाचायला लागल्यामुळे की काय, मला आत्ता हे पुस्तक तितके भावेना. हरिश्चंद्राची फॅक्टरी ह्या मुव्हीबाबत जे मला सहज मान्य होते की - त्या मुव्हीची जातकुळी मर्मविनोदी ढंगाची असल्याने त्याच्यात त्यांचा स्ट्रगल तितका जोरकसपणे समोर येत नाही - हे मला ह्या पुस्तकाबाबत अॅप्लाय करता येईना. (जे १० वर्षापूवी करू शकले होते.) किडनी फेल्युअर आणि इतर १० सिरिअस आजार मागे लागले असताना पुस्तकभर सततच हास्याच्या कारंजांचा मला कंटाळा आला.मला काही रडगाणं वाचायची इच्छा होती अशातला भाग नाही पण हे जे काही रसायन आहे ते जमेना. शिवाय पुस्तकात कुठेही एकसलगता नव्हती. मध्येच रोपणानंतरच्या प्रसंगांची हजेरी, त्याच्यानंतर डायलेसिसच्या गोष्टी.. कुठेही संगतवार सापडेना मला.
त्याचबरोबर, अशा पुस्तकात ऋणनिर्देश करण्याच्या हिशोबाने का होईना, फाटकांच्या मित्रपरिवाराचा सतत उल्लेख येणे तसे साहजिक होते.. पण त्यात सर्वच बडीबडी नावं ह्याचाही कंटाळा आला!ती नावं व ते प्रसंग पुस्तकात असणे ह्याची आवश्यकता मला समजते, पण प्रामाणिक उल्लेख न वाटता शोऑफ का वाटू लागला हे मला कळेना. जरी त्यांनी ह्यासंदर्भात सुरवातीलाच लिहीले असले तरी. (की किर्लोस्कर भेटले तर किर्लोस्कर भेटलेच लिहीणार, एक मोठे मराठी उद्योगपती असे का लिहू? वगैरे) असंही वाटून गेले त्यासर्व लोकांसाठी एकच चॅप्टर ठेऊन बाकीचे स्ट्रिक्टली आजाराबद्दल, व तो कसा बीट केला ह्याबद्दल माहिती असती तर आवडले असते.
माझा भलताच भ्रमनिरास झाला. मला हे पुस्तक खरंच परत एकदा आवडायला हवे होते!
आधी हे पुस्तक इतके आवडले असताना आता असा रिव्ह्यु हे 'मी किती बदलले' ह्याचे लक्षण आहे. मी फार सिनिकल, स्केप्टिकल झाले की काय असेही वाटून गेले. 
अजुन एक विचार मनात आला. ह्या पुस्तकाचे नाव आधी केवळ हसरी किडनी होते. आत्ताच्या पुस्तकात अर्थात 'अठरा अक्षौहिणी' असे देखील अॅडीशन झाले आहे. आधीच्या पुस्तकाचा फॉर्मॅटच वेगळा होता का? ह्या नव्या एडिशनमध्ये असे बदल केले आहेत का? कोणी सांगू शकेल का? (कारण मला सतत हेच ते पुस्तक आहे का? असं फिलिंग खूपदा आले.)
बस्के, मी हे पुस्तक वाचलेलं
बस्के, मी हे पुस्तक वाचलेलं नाही, पण तू लिहिलंयस ते आवडलं. एक पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रचंड आवडणे आणि तेच आता परत वाचून त्यावर नव्याने विचार करणे - हा एक इंटरेस्टिंग एक्सरसाईझ असू शकतो. मला ही कल्पनाच फार आवडली.
एक पुस्तक काही वर्षांपूर्वी
एक पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रचंड आवडणे आणि तेच आता परत वाचून त्यावर नव्याने विचार करणे - हा एक इंटरेस्टिंग एक्सरसाईझ असू शकतो. मला ही कल्पनाच फार आवडली. >>> अस माझं वपुंबद्दल होतं
बस्के, 'अठरा अक्षौहणी '
बस्के,
'अठरा अक्षौहणी ' होते मी वाचलेल्या आवृत्तीत तरी. मला आवडले होते 'हसरी किडनी'. पुन्हा वाचून पहायला हवे.
ही कविता मला फार आवडते. तुझी पोस्ट वाचून आठवली. मी पण पुस्तकं च्या पुस्तकं विसरुन गेले आहे. पुन्हा वाचताना 'अरेच्चा' असे होते.
Forgetfulness
by Billy Collins
The name of the author is the first to go
followed obediently by the title, the plot,
the heartbreaking conclusion, the entire novel
which suddenly becomes one you have never read,
never even heard of,
as if, one by one, the memories you used to harbor
decided to retire to the southern hemisphere of the brain,
to a little fishing village where there are no phones.
Long ago you kissed the names of the nine Muses goodbye
and watched the quadratic equation pack its bag,
and even now as you memorize the order of the planets,
something else is slipping away, a state flower perhaps,
the address of an uncle, the capital of Paraguay.
Whatever it is you are struggling to remember
it is not poised on the tip of your tongue,
not even lurking in some obscure corner of your spleen.
It has floated away down a dark mythological river
whose name begins with an L as far as you can recall,
well on your own way to oblivion where you will join those
who have even forgotten how to swim and how to ride a bicycle.
No wonder you rise in the middle of the night
to look up the date of a famous battle in a book on war.
No wonder the moon in the window seems to have drifted
out of a love poem that you used to know by heart.
Raina, the poem is fantastic!
Raina, the poem is fantastic! Thanks for sharing!
लली.. रैना, काय सुरेख
लली..
रैना, काय सुरेख कविता!!
सर्व प्रश्न अनिवार्यः रमेश
सर्व प्रश्न अनिवार्यः रमेश इंगळे उत्रादकर
निषाणी डावा अंगठा या नितांत सुंदर पुस्तकाच्या लेखकाचे हे अजून एक पुस्तक. शाळांमधील कॉपीचा भ्रष्टाचार ज्यास शाळासंचालक, प्रशासनाची सक्रिय मदत आहे आणी एकूण समाजाच्या या बाबीकडे पाहण्याचा ढासळलेला दृष्टिकोण हा या पुस्तकाचा विषय. पात्रे उभी करणे, त्यांची भाषा, त्यांच्या अवकाषाशी असलेले त्यांचे अस्सल नाते हे सर्व निषाणी डावा अंगठा प्रमाणेच भक्कम आहे या पुस्तकातदेखील. मात्र ४०-५० पानांचा ऐवज असलेल्या कथाबीजाला ओढून ताणून कादंबरी बनवले आहे असे वाटले. जरा वैश्विक आयाम देण्यासाठी दर प्रकरणानंतर येणारे सुत्रधाराचे प्रकरण हे कृत्रिम वाटले. हा प्रश्न विस्तृतरित्या मांडला आहे मात्र त्यावर पुढचे काहीच भाष्य पुस्तक करत नाही. नुसतेच एका मागोमाग एक घटना येत राहतात. लेखकाने या प्रश्नावर तोडगा द्यायलाच हवा असे काही नाही मात्र फक्त हा एकच प्रश्न घोळवत घोळवत लांबवत मांडला असे झाले. मुंबई दिनांक मधला दिगू पण कुठलेच उत्तर देत नाही मात्र त्या कादंब्रीत ढासळती राजकारणातली नितीमुल्ये मांडत अरुण साधू एक मोठा कॅनवास उभा करतात. इथे हा कॅनवास मिनिएचर पेंटिंग्ज एव्हडाच राहिला आहे.
तरिही शैली, भाषा व हा कळीचा प्रश्न या गोष्टींसाठी पुस्तक वाचावे. लेखक समस्या कळकळीने मांडतो. पुस्तकाचा एक नायक शेषराव याच्या तोंडची चटकदार संवाद समाजातल्या अनेक पैलूंवर हळूच चिमटे घेतात. तसेच सपकाळ सरांचा आदर्शवादी शिक्षक कृत्रिम वाटत नाही - तशी होण्याची या पात्राची शक्यता खूप मोठी होती.
सध्या तोत्तोचान वाचतेय,
सध्या तोत्तोचान वाचतेय, त्याआधी प्रिन्सेस गायत्रीदेवींचं आत्मचरीत्र वाचलं.
बस्केच्या लिस्टमधली काही वाचली नाहीयेत, ती वाचायला हवीत. हसरी किडनी काही वर्षापुर्वी वाचलं, तेव्हा ठिक वाटलं.
ऱैना कविता फारच
ऱैना कविता फारच सुंदर...
शेवटच्या दोन ओळि अगदि अगदि झाल
बस्के, हसारी किडनी मी माग्च्या वर्षी वाचल आणि आवड़ल पण सतत हास्याची कारांजी त्या त्या प्रासंगात उड़त असेल का हा प्रश्न पुस्तकभर पड़ात राहिला शेवटी अपने बसाकी बात नही म्हणून सोडुन दिल झाल.
रैना, काय सुरेख कविता!!>>>
रैना, काय सुरेख कविता!!>>> +१
शेवटच्या दोन ओळि अगदि अगदि झाल >> +१११
रैना, कविता छान आहे. शेवटचं
रैना, कविता छान आहे. शेवटचं कडवं परफेक्ट!
)
(त्यासाठी पेशन्स ठेवून वाचली... तुला कारण माहितीच आहे
माझ्याकडे बुकगंगा इ रिडर अॅप
माझ्याकडे बुकगंगा इ रिडर अॅप आहे.चांगले आहे, पण जो मोबाईल वर पी डी एफ वगैरे वाचतो त्याला अडोब ची काही फिचर्स मिस होतात.
मुख्य म्हणजे काही आऊट ऑफ प्रिंट असलेल्या पुस्तकांच्या इ कॉपी अजून आहेत हे चांगले आहे.
बस्के तुझ्या वरच्या एका
बस्के तुझ्या वरच्या एका पोस्ट्शी सहमत.
कदाचित मी ते त्या विशिष्ट वयात वाचलं नसेल. कारण ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक नक्की वाच भारी आहे असं सांगितलं होतं, त्यांनी ते त्यांच्या कॉलेजवयात वाचलं होतं.
एखादं पुस्तक वाचायचं पण एक विशिष्ट वय असतं (हेमावैम) उदा. अधांतरी मी जेव्हा वाचलं तेव्हा मी अढनिड्या वयात होते आणि त्यातल्या त्या शाळकरी मुलानं माझ्यावर अशी भूल केली होती की कित्येक वर्ष मी त्यात अडकून होते, या वयात मी पुन्हा अधांतरी वाचायला घेतलं तर मला ते नक्कीच आवडणार नाही, माझ्या मनातली भूल उतरून जाईल आणि मला ते आवडणार नाही बहुधा म्हणून मी ते पुस्तक पुन्हा वाचलं नाही कधीच.
सेम गोष्ट दुनियादारीची, काय पुस्तक आहे, काय पुस्तक आहे असं खूप ऐकल्याने एकदा वाचायला घेतलं (अलिकडे) आणि त्यात मला काहीच भावलं नाही.
अलिकडे मी
खमंग - लेखिकेचं नाव विसरले दुसर्यांदा वाचलं. वाचताना कमला आज्जी ओगलेंची आठवण येत राहिली पदोपदी.
सध्या गुलझार लिखित रावीपार चं दुसर्यांदा वाचन सुरू आहे. पहिल्यांदा वाचलं त्याला अनेक वर्ष झाली, त्यातली शिर्षककथा अगदी मनाला भिडून गेली होती, नव्याने वाचताना गोष्टी पुन्हा नव्याने कळतायत, उमगतायत.
<खमंग - लेखिकेचं नाव विसरले
<खमंग - लेखिकेचं नाव विसरले दुसर्यांदा वाचलं>
दुर्गा भागवत.
बस्के सारख फिलिंग मला दवणे
बस्के सारख फिलिंग मला दवणे वाचून आलेलं . इनफॅक्ट सानेगुरुजी वाचूनही .
दुनियादारीबदल दक्षिणाशी सहमत. बरच काही ऐकलं होत. पण पुस्तक वाचून जास्त काही भावलं वगैरे नाही
दुनियादारी रादर सु.शिं. ची
दुनियादारी रादर सु.शिं. ची सगळी पुस्तकं चिरकाल वाचनीय आहेत ( असं मला वाटतं ). ती योग्य वयात वाचली गेल्यामुळे असेल कदाचित.
दवणेन बाबत अगदी सहमत. दर
दवणेन बाबत अगदी सहमत. दर आठवड्याला त्यांचे लेख यायचे ते वाचून भारी वाटलेलं पण नंतर मात्र तोच तोच टिपिकल संस्कारीपणाचे दाखले, साजूक तुपातल वाचून कंटाळा आला.
http://www.ndtv.com/india-new
http://www.ndtv.com/india-news/political-science-teaches-cooking-said-bi...
सर्व प्रश्न अनिवार्य हे पुस्तक वाचल्यावर ही वरची बातमी अगदी फिट बसते आहे
मला अगदी मजा वाटली ती म्हणजे
मला अगदी मजा वाटली ती म्हणजे वपु अजिबात आवडणार नाहीत असे वाटत असताना महोत्सवमधील दोन लेख चांगले वाटले.
गम्मतचंय!
कोणाला कंटेंपररी उत्तम जॅपनीज
कोणाला कंटेंपररी उत्तम जॅपनीज किंवा चायनीज शॉर्ट स्टोरीज / फिक्शन माहित आहे का? काही सजेश्न्स प्लीज?
बानाना योशिमोतो. शिन्तारो
बानाना योशिमोतो. शिन्तारो इशिहारा. मुराकामी. काझुओ इशिगुरो. कोबो आबे. मियुकी मियाबे.
धन्यवाद. स्पेसीफीक पुस्तकं
धन्यवाद. स्पेसीफीक पुस्तकं सांगीतलीस तर अधिक धन्यवाद
मुराकामी, योशिमोतो, इशिगुरो
मुराकामी, योशिमोतो, इशिगुरो यांची बहुतेक सगळीच.
मियुकी मियाबेची क्राईम थ्रिलर्स जबरी आहेत. सगळ्यांचा अनुवाद झालेला नाही. कोबो आबेचे मी फक्त लेख वाचले आहेत. त्याच्या फिक्शनचा मला अंदाज नाही. पण ते उत्तमच असेल, कारण त्याला भविष्यात नोबेल मिळेल, याची सर्वांनाच खात्री होती.
'होती'च्या ऐवजी 'आहे' झालं.
कोबो आबे? दुसरे कोणी
कोबो आबे? दुसरे कोणी म्हणायचेय का? तो १९९३ मध्ये गेला ना?! नोबेल पोस्थ्युमसली नाही देत ना?!
त्याची पुस्तके मस्त आहेत हे खरेच.
"Never let me go" by
"Never let me go" by ishiguro. Its very melancholic.
Pages