रात्रीस खेळ चाले १

Submitted by मी_इंदू on 22 March, 2016 - 01:34

2016 - 1 (1).jpgआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.

आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443

शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..

पात्र परिचय :

माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट

मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः

१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?

शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .

आज विशेष

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!

रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न

१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ Lol अहो नानानी लग्न केले म्हणून तर अण्णा नावाची मोठी भानगड घरात जन्माला आली.:फिदी: आणी मग त्या भानगडीची वंशावळ पण जन्माला आली.:खोखो:

आज अखेर कळले की नानांच्या पूर्वजानी बरीच धमाल केलीय. करतलो कोण आन भोगतलो कोण! उद्याच्या भागात कोल्हे कुई किन्वा कुत्रे कुईकुई ऐकायला येईल. आता सिरीयल खरी रंगात आलीय, भीती दाटु लागलीय.

पण मला आज ठोकळीचा राग आला, तिने पूर्वा वर संशय का घेतला?:राग: ठोकळी कुठली! ठोकळ्या पण गप्प, बाईलेक हां बोलतो.

सरिता कामं करत असतांना दत्ता खोलीत येतात. ती लगेच त्यांना दिव्यात तेल भरायला सांगते. ते म्हणतात की दमून आलोय, करतो थोड्या वेळाने. तू पण थोडा आराम कर, दुसरे बघ कसे करतात, ती सांगते की लग्न करून ह्या घरात आले आणि आराम काय असतो ते वीसरले. मग ती शंका व्यक्त करते की जेवायला आलेले दिर भावजय लगेच वर का निघून गेले? ते सांगतात की असेल काहीतरी तू चहा टाक माझ्याकरिता. तेवढ्यात पुर्वा येते व आता मी काॅलेजला जायला पाहिजे सांगते. सरिता मोडता घालू बघते की घरात काय चाललयं? तुझे काय चालले आहे? पण पुर्वा समजावते की तुम्ही एवढे तुम्ही पैसे भरलेत. मला जायला पाहिजे, नुकसान माझेच होणार आहे. दत्ता तिला, तू तरी शिक म्हणून परवानगी देतात. निलीमा बाहेर विचार करत उभी असते, बेरीनाना बाहेर पडलेले/झोपलेले असतात. माधव बाहेर येतात तिला म्हणतात की कसला विचार करतेय. ती सांगते की आपण खाली येऊन परत वर खोलीत जाईपर्यंत कोण आले असेल? ते समजावतात की अशा घटना इथे होतात पण तुझा विश्वास नाहीये. ते पुढे सांगतात की दर २१ वर्षांनी काहीतरी चमत्कारीक घडते. आपल्या लग्नाच्या आधी पण मला फोन यायचे, ते जे काही बोलायचे ते भयंकर असायचे, अण्णा होते, त्यांनी नीस्तरले सगळे. ती चिडून विचारते की हे सगळे चमत्काराने घडत नाही कोणीतरी मुद्दामून केलयं. मी शोध घेईनच. बेरीनाना 'मला सोडव मला सोडव' म्हणत असतात. माई खोली आवरता आवरता काही कागद कशाचे आहे हे न कळल्याने अभिरामकडे घेऊन येतात. तो मी बघतो म्हणतो व पुस्तक वाचतो. पण लगेच काय आहे ते बघतो व माईंना जोरजोरात हाका मारतो. तो सांगतो की ही वंशावळ आहे आपली, पुढे कधीतरी कामाला येईल.
सरिता परत दत्तांना विचारते की पुर्वाला पाठवायचच का? ते हो म्हणतात व गणेशचे काही खरे नाही पण पुर्वाला तरी शिकू दे. पुर्वा चहा घेऊन येते व कधी जाऊ विचारते. दत्ता तिला उद्या जाऊ असे सांगतात तर सरिता गणेशला पण बरोबर घ्या सांगते. गणेश छायाकडे जातो तर ती बाहूलीशी खेळत असते. तो 'तुझी बाहूली' असे जेव्हा संबोधतो तर ती चीडते व राजाची राजकुमारी आहे म्हण, असे बजावते. ती सगळ्या आठवणी सांगते, की कशी मी खेळायची, तीला घेऊन झोपयची पण मला लग्नाकरिता मुुले बघायला लागली व माईंनी ती जी लपवली ती अत्ता सापडली. हिला पण माझ्यासारखी कोंडून ठेवली वगैरे. तो समजावतो की मी आहे तर ती हताशपणे सांगते की तू काय आज आहे उद्या निघून जाशील. माझी बाहूलीपण लग्न करेन. तो म्हणतो की तू पण लग्न करशील. बाहेर माधव बेरीनानांचे पाघरूण नीट करतात. ते असे का बडबडतात? त्यांना काही दिसत असेल का? अशी शंका व्यक्त करतात तर निलीमा माझ्या शंकेच काय? असे विचारते. टेक्नीकली हे पाॅसीबल नाही. कोणीतरी जाणकाराने केलेलं आहे, मी शोध घेइनच. ते सांगतात की तू घे पण कठीण वाटतय. पण मी तुझ्याबरोबर आहे. मग ते सगळ्यांना बोलावतात व सांगतात की मी आरोप करत नाहीये.
निलीमा सगळं सांगते की खाली जेवायला येऊन परत वरती गेले तर लॅपटाॅपवर ' ह्या घराचा घास मी घेणार.... हा माझा सुड आहे' हे लिहीले होते. पुर्वा तू केले का? असे विचारल्यावर सरिता खुपच चिडते. निलीमा पुढे बोलण्यात अर्थ नाही पण मी शोधून काढेनच सांगते. माई भांडणं थांबवा आणि मी वंशावळीचे पेपर्स आणले आहेत के बघा सांगतात. त्यात अण्णांचं नाव नसते तर त्या कागदाच्या पाठीमागे काय लिहीले आहे ते वाचायला लावतात. मग अभिराम वाचू लागतो, ह्या घराची पुर्वी हालाखीची परिस्थीती होती. पैसा टीकत नव्हता म्हणून चवथ्या पिढीच्या रखारामांनी अघोरीविद्येला अधीन होउन एका जोडप्याचा बळी दिला. हे कोणाला कळले नाही. त्या जोडप्याची ओळख पण नाही. त्यांच्या आयुष्याच्या शेवटी भरभराट झाली. पण त्यांनी इच्छा सांगीतली की मी गेल्यावर मला विहीरीपाशी उभे पुरा व त्यावर शीळा ठेवा. तेव्हापासुन घरात अशुभ शक्ती वावरायला लागल्या. ह्या घरातील बायका सवाश्ण म्हणुन जात नाही. कर्ते पुरूष जातात (अण्णा) किंवा भ्रमीष्ट (बेरीनाना) होतात. हे ऐकल्यावर माई मटकन खाली बसतात व कोणीच भरल्या कपाळाने जात नाहीत म्हणतात. त्यावर निलीमा सांगायचा प्रयत्न करते की हे चुकीचे आहे पण तीचे कोणीच ऐकत नाही व ते शीळेजवळ जायचे ठरवतात. बॅटरी घेऊन माई, तीन मुलगे व सरिता शीळेजवळ जातात.

पण मला आज ठोकळीचा राग आला, तिने पूर्वा वर संशय का घेतला? ठोकळी कुठली! ठोकळ्या पण गप्प, बाईलेक हां बोलतो.>> हो ना. मला पण रागच आला तिचा. Angry माधव नाहीतर आर्चिस वर नाही घेत तो संशय.

तिने पूर्वा वर संशय का घेतला>>> कारण आपण प्रेक्षकांनी आतापर्यंत पूर्वाला संशयित म्हणून पाहिलंच नाही. कायम बाकीच्यांवर संशय घेत राहिलो. त्यामुळे संशयितांच्या यादीत अजून एक नाव जोडायला.
अजून एक म्हणजे, ही लोकं त्या शीळेचा शोध अश्या पद्धतीने घेत होती की पहिल्यांदाच असं काही पाहताहेत. अरे तुम्ही वर्षानुवर्षे त्या वाड्यात रहात आहात, विहीरीचा रोज वापर करत आहात, तर अशी काही शीळा तिथे आहे हे तुम्हाला नक्कीच माहित असणार ना ! नव्यानेच काहीतरी अलिबाबाची गुहा शोधल्यासारखं का ?

अरे पण नायकांना पाणी लाभत नाय ना? मग रात्रीच्या वेळेस बॅटर्‍या घेउन कुठे विहीरीकडे निघाले?! दिवसा समुद्रावरसुद्धा जाऊ देत नव्हते ना?

ही लोकं त्या शीळेचा शोध अश्या पद्धतीने घेत होती की पहिल्यांदाच असं काही पाहताहेत. अरे तुम्ही वर्षानुवर्षे त्या वाड्यात रहात आहात, विहीरीचा रोज वापर करत आहात, तर अशी काही शीळा तिथे आहे हे तुम्हाला नक्कीच माहित असणार ना ! नव्यानेच काहीतरी अलिबाबाची गुहा शोधल्यासारखं का ?>> +१. इतक्या वर्षांत एकदाही साफसफाई केली नाही घराच्या आजुबाजूला.

भगवती छान डीटेल्स.

संशय आर्चिसवरपण घ्यायला हवा, पुर्वावरच का?

भगवती तुला मोडी लिपी म्हणायचं आहे का? बोरू लिपी नसते, पूर्वी ज्या टाकाला शाई लावून लिहायचे त्याला बोरू म्हणायचेना.

अभिराम 'कलेक्टर'च्या परिक्षेचो अभ्यास करताहा [ कधीं बघूंक नाय अभ्यास करताना, पण तो तसां परत परत सांगताहा !]. त्यामुळे, कागदपत्रांचा - मोडीत, संस्कृतात, फारशीत खंयच्याय भाषेत /लिपीत असलीं तरी - सगळां काय तां त्येका कळतां ! अगदीं भुतानी आपल्या भाषेत लिवल्यानी तरीही !! वगीचच शंका घेण्याचां कारण नाय !! Wink

आपण सर्व आहोतच भुतं, हे आत्तापर्यंत झीच्या टीमच्या लक्षात आलं असेलच ;). गुपचूप वाचत असणार नक्कीच.

अंजू, अग मोडी लिपीच म्हणायचे होते. पण माई बोरूलिपी म्हणतात. माझ्या आज्जीला यायची मोडी लिपी. लोकसत्तामधे पुर्वी तंबी दुराई यांचे लेख यायचे. त्यात त्या लेखाच्या शेवटी मोडी लिपीत सही करायच्या.

एकदम मान्य मला निधी Wink . मी आहेच भुत. Lol

शेवटी माझीच ventry आहे रा खे चा मध्ये, कोणाला सांगू नको हा. आपलं तुला सांगितलं.

शेवटी माझीच ventry आहे रा खे चा मध्ये, कोणाला सांगू नको हा. आपलं तुला सांगितलं. >>>> मी नाही वाचल हं..

अरे सगळं दिवसा घडतं आपण म्हणतोना म्हणून रात्री शिळा बघायला गेले असणार, नक्की कोणीतरी वाचतं येऊन. रा खे चा नाव सार्थ करायला हवं म्हणून गेले असतील रात्री.

सरिताला थंडीताप भरला असतो. दत्ता पुर्वाला बुरगूस (?) पांघरायला सांगतात व गरम पाणि आणायला लावतात. सरिता रडत असते, ते म्हणतात की मी आहे काळजी करू नको. त्यावर ती म्हणते की वंशावळ पाहिली ना? आपल्या घराला शाप आहे. तुम्हाला काही झाले तर माझे, मुलांचे काय होईल? हा जो काही शाप आहे तो दुर होऊ दे. अण्णांनी पण कसे काहीच सांगितले नाही? दत्ता कामे आहेत म्हणून निघू बघतात पण ती त्यांना समोरच बसायला लावते. पुर्वा पाणि घेऊन येते. दत्ता तिला सरिताजवळ बसवून मी घरातच आहे कूठे जात नाही सांगतात. इकडे माई, कुठल्या जन्माचे भोग भोगतोय काही कळत नाही आता सरिता आजारी पडली. निलीमा समजावते की तिला मानसीक धक्का बसलाय आणि डाॅक्टरकडे न्यायला पाहिजे. माईंना विश्वास बसत नाही. निलीमा दत्तांनापण समजवायचा प्रयत्न करते पण तेही ऐकत नाही. माई काहितरी उपाय करायला पाहिजे सांगतात व अभिरामला परत कागदपत्र आणायला लावतात. निलीमा परत सांगते की हे पुर्वी लिहीलेले उपाय आहेत, ते अत्ता कसे लागू होतील? अभिराम कागद घेउन येतो व सांगतो की ह्यात विधी लिहीला आहे. अमावस्येच्या रात्री सुवासीनीने पाच धान्य जात्यावर उलटी दळायची. त्या पीठाची भाकरी कर्त्या पुरूषाने शीळेजवळ ठेवायची. माई सांगतात की मी पण करायची पण का ते माहित नव्हते. पण अण्णा त्या शेवंताच्या नादी लागल्याने सगळे सोडले आणि घात झाला. हे सगळे करायला पाहिजे होते.
निलीमा सांगते की हे व्यर्थ आहे. दत्ता माधवंना सांगतात की तू कर्ता पुरूष आहे हे तू कर. निलीमा चिडून मी करणार नाही आणि माधवंना पण करू देणार नाही असे सांगून निघून जाते. माधव पण दत्तांना sorry म्हणतात व वरती जातात. सरिता सगळे ऐकते व हे सगळे मी करेन असे सांगते. दत्ता थंड पाण्याने अंघोळ करावी लागेल सांगतात. ती तुमच्याकरिता काहीही करेन असे सांगते. व धडपडत अंघोळ करते सुसल्या खीडकीतून सगळे बघत असतो. सरिता तशीच जात्यावर दळायला घेते. छाया तिच्या खोलीत एकटीच रडत असते.
सरिता खुप कष्टाने पीठ दळत असते. पुर्वा मी मदत करू का? विचारते पण माई म्हणतात की हे तिलाच करावे लागेल. निलीमा तिच्या खोलीत अस्वस्थपणे येरझार्या घालत असते. सरिताला ताप आहे तरीही ती ओलेत्यात पीठ दळतेय, तिने डाॅक्टरकडे जायला पाहीजे वगैरे सांगते. माधव म्हणतात की शापाच्या भितीने ती हा विधी करत असेल. त्यावर ती अविश्वास दाखवते. दत्ता पण अंघोळ करून देवघरात येतात. सरिता, पुर्वा व माईंच्या मदतीने बाहेर येते व भाकरी देते. दत्ता शीळेजवळ भाकरी ठेवतात तर कुत्र्यांचा रडण्याचा आवाज येतो. छाया तिच्या बाहूलीला काय झाले? तु अशी का बघतेय ते विचारते. भुक लागली का? तेवढ्यात गणेश जेवण घेऊन येतो. छाया त्यातला एक घास बाहूलीला देते व सांगते की तुला तुझा घास दिला व हसते.

येथिल प्र्तिसाद बघुन असे वाटत होते की आपण पण ही सिरियल बघावी. पण तेवढ्यासाठी केबल घेणे नको वाटत होते. काल कळले की सॅमसंग च्या लेटेस्ट स्मार्ट टीव्ही वर झी चा लाईव्ह टीव्ही अ‍ॅप फ्री आहे. लगेच डाउनलोड करुन झी चालु केला. त्या अ‍ॅप वर ७ मार्च पासुन या सिरियल चे भाग उपलब्ध होते. आज १ आठवड्याचे भाग बघुन घेतले.
मी_इंदू : सिरियल् ची माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे सिरियल कळण्यास मदत झाली. पण अत्तापर्यन्त एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही Happy
नाना कोण आहेत ते कळाले नाही, अण्णाचे वडील का?.

Pages