आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
भाऊ हो आपल्यालाच भास होतोय.
भाऊ
हो आपल्यालाच भास होतोय. पण काल दत्ताची अॅक्टिन्ग खूप नॅचरल वाटली, विशेषत पान्डु उपाशी आहे कळल्यावर.
<< दत्ताची अॅक्टिन्ग खूप
<< दत्ताची अॅक्टिन्ग खूप नॅचरल वाटली, विशेषत पान्डु उपाशी आहे कळल्यावर.>> दत्ता ही व्यक्तीरेखा इंटरेस्टींग व लोभस तर आहेच पण त्या मातीशी खूप प्रामाणिकही आहे. थोडी मालवणी भाषेची गोची सोडली तर त्या व्यक्तीरेखेच्या छटा फार छान खुलवल्या आहेत त्या अभिनेत्याने.
हो, दत्ताचा अभिनय खूप छान
हो, दत्ताचा अभिनय खूप छान असतो, सरिता पण चांगली करते, कधीकधी over acting होते.
भगवती छान अपडेटस. भाऊकाका
भगवती छान अपडेटस.
भाऊकाका भारी कमेंटस
.
इथल्या बाहुल्या (स्मायलीज)
इथल्या बाहुल्या (स्मायलीज) खासमखास शोधून शोधून टाकणाऱ्या माबोकराना फुल चान्स कल्पनाशक्तीला, येऊदेत धडाडड बाहुल्या (अळ्या टाकणाऱ्या), ठोकळी जेवण करताना.
भाऊकाका तुमची व्यंगचित्र पण येऊद्यात.
जनरली सगळे इथे चर्चा करतांना
जनरली सगळे इथे चर्चा करतांना दत्ताला अरेतुरे करतात (त्याचा एकेरी उल्लेख करतात).. दत्ता असा, दत्ता तसा वगैरे.. पण भगवती अपडेट्स मध्ये दत्ताला आवर्जुन अहोजाहो करते.. म्हणजे "दत्ता असे म्हणतात.. मग ते घरी येतात" इ. त्यामुळे भगवतीचे अपडेट्स वाचतांना सर्वनामाचा (ते, त्यांचे, त्यांना इ) वापर केला कि मी गडबडते कि हे नक्की दत्ताविषयीच आहे का ते.
अळ्या.. जेवणातल्या
अळ्या..
जेवणातल्या अळ्या..
प्रेमात पडलेल्या अळ्या..
हसणार्या अळ्या:
घाबरलेल्या अळ्या:
खुनशी अळ्या:
अश्या बर्याच अळ्या उपलब्ध आहेत..वेळेअभावी इतक्याच टाकते आहे
हयसर प्रतिसादांचो पाऊस
हयसर प्रतिसादांचो पाऊस पड्ल्यानी काय? नाईकांकडे दगडी पडल्यान तसा ?
अरे देवा, अळ्यान्चो पाऊस ईलो...!!
पियु ठोक अळी नै सापडली का?
पियु ठोक अळी नै सापडली का?
क्लि.. आता उरलेल्या अळ्या तू
क्लि..
आता उरलेल्या अळ्या तू टाक बघू.
अरे वा पियु, अळ्याच अळ्या .
अरे वा पियु, अळ्याच अळ्या
.
प्रेमात पडलेल्या अगदी क्युट
प्रेमात पडलेल्या अगदी क्युट दिसतात हा
.
(No subject)
प्रेमात पडलेल्या अगदी क्युट
प्रेमात पडलेल्या अगदी क्युट दिसतात हा >>> अभिअळा आणि देविकाअळी असतील ते
ई यक्स! अळ्या, नको त्या
ई यक्स! अळ्या, नको त्या अळ्या. साध्या तांदळात किंवा रव्यात जरी अळी दिसली की माझे नृत्य प्रकार सुरु होतात.:फिदी:
दत्तास आमी अरे तुरे करतय, कारण दत्ता आमच्या घरातल वाटतलो. जसा काय नाईक कुटुंब शेजारी रवतय.
मला पण हे अळ्या प्रकरण झेपलं नाही कारण या प्रकाराला भानामती म्हणतात असे वाचले आहे. जुन्या गोष्टींमध्ये याचे उल्लेख आहेत, जसे साधु-संतांच्या गोष्टी वगैरे.
मला आता ठोकळा सोडुन नाथाची बायको यमुना हिचाच संशेव यायला लागलाय. यमुना+ नेने वकिल + गुरव हे तिघे एकत्र आले असतील, त्याना पाठिंबा सुसल्याचा.
तुझ्या आमटीचा मी घास
पियु, क्लिओ ईईईईई.. आता
पियु, क्लिओ
ईईईईई.. आता बास्स करा त्या अळ्या..
बरं मला सांगा छायाच्या
बरं मला सांगा छायाच्या ट्कल्या बाहुलीला कोणी फासावर दिले असेल?
खरे आहे. मला पण त्या
खरे आहे.
मला पण त्या यमुनेचा सन्श्य येतोय.
Poorva or Yamuna may be
Poorva or Yamuna may be culprit in Aali prakaran
अरे उकल व्ह्यायला कधी सुरुवात
अरे उकल व्ह्यायला कधी सुरुवात होणार पण? का शेवटपर्यंत ताणणार, अनेक उत्तरविरहीत प्रश्न आहेत. शेवटच्या भागात सर्व माथी मारतील उत्तरे. अरे असं नका करु. एकेक उकल करा आता हळूहळू.
त्या टकलीला कोण फासावर
त्या टकलीला कोण फासावर देणार? स्वतःच लटकली असेल मज्जा म्हणून. आधी मार फिदी फिदी, खी खी हसत होती. मग स्वतच लटकली असेल गार्या गार्या भिंगोर्या करत.
पूर्वाचा संशय का येतोय्?:अओ: हे सगळे जेवायला बसले तेव्हा पूर्वा किचनच्या दारात होती, यमुनाबै किचनमध्ये होत्या, ठोकळी पण दारातच होती. सरीता, माई, माधव, अर्चिस, गणेश, दत्ता, छाया सगळे तिथे होते, नव्हता तो पांडु. या बया! पांडु तर दोषी नसेल?
<< बरं मला सांगा छायाच्या
<< बरं मला सांगा छायाच्या ट्कल्या बाहुलीला कोणी फासावर दिले असेल? >> ह्येंचां उत्तर माकां नक्की ठावक आसा; पण सांगलंय तर सिरीयलय संपतली आणि हो धागोय. नाय परवडाचां तां माकां आणि तुमकांय !!
<< मला पण हे अळ्या प्रकरण झेपलं नाही >> -
काल दुधी आणूंक सांगलंय तर दूध , पुरणपोळी सांगलंय तर सुरण घेवन इलास;
आज नीट ऐका आणि अळूच आणा! नायतर आणशात अळ्यो, नाईकांकडचां ऐकान !!
(No subject)
भाऊकाका मलापण आता पूर्वावर
भाऊकाका
मलापण आता पूर्वावर संशय येऊ लागलाय.
आता परत्येकानं एकेकाचा नाव
आता परत्येकानं एकेकाचा नाव घेवया संशयित म्हणान.
माका पांडुवरच संशय येता. लेखक येडो बनून पेढो खाताय.
माझो संशय निलिमा आणि
माझो संशय निलिमा आणि पूर्वावरच फिक्स
Yukkkkk.... tya sushalyacha
Yukkkkk.... tya sushalyacha dress kiti ghan aahe... specialy under arms javl..
यक्क.. काय त्या अळ्या!!
यक्क.. काय त्या अळ्या!!
स्वरा, निलिमाने एकच ड्रेस दिला तिला.. तो पण असल्ला फिट्ट बिना ओढणीचा.
शेवटी काय झाला?? माका कळलाच नाय.
Maainna zadajaval
Maainna zadajaval bangadyancha aawaj yeto. Mag datta te zad todayla pudhe jato toch tya guravala kay hot mahit nahi pn to dhunganala pay laun palat sutato....
Pages