आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
थँक्स स्वरा. मी बघितलं पण
थँक्स स्वरा. मी बघितलं पण आवाज अगदीच कमी असल्याने नेमकं काय झालं ते कळलंच नव्हतं.
ठोकळीनं पोहे कसले सुपरफास्ट खाल्ले.
बाकीच्यांच्या डिशमध्ये पोहे शिल्लक असताना हिने सगळ्यात शेवटी घेऊनसुद्धा संपवले पण लगेच.
भाऊकाका
भाऊकाका
कालच्या झालेल्या प्रकारानंतर
कालच्या झालेल्या प्रकारानंतर सगळेजण काळजीत अंगणात बसलेले असतात. गणेश जमीनीवर रेघोट्या मारत असतो. बेरीनानांना पण बाहेरच आणले जाते. दत्ता विचारतात की आपण शेवटी किती वेळ बाहेर रहायचे? पण माई म्हणतात की बाबारे माझ्या डोळ्यासमोर ते अळ्या पडलेले अन्नच येते आहे. सरिता म्हणते पण ह्या अळ्या आल्यातरी कशा? यमुना तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते की मी काही केले नाही, जेवण बनवलेले होते. झाकण उघडले तर अळ्या पडलेल्या, त्यावर माई सांगतात की हा प्रकार आम्हाला नवीन नाहीये. तुझ्यावर कोणी आळ घेत नाही. दत्तां विचारतात की वहीनी कुठे आहेत तर माधव सांगतात की ती वाॅकला गेलीये. सरिता म्हणते की घरात काय चाललयं, ह्यांचे काय चाललयं? ती दत्तांना सांगते की घरात चित्रविचीत्रं घडतयं, मी मुलांना माहेरी घेउन जाते, तुम्ही पण चला. वाटल्यास आपण सगळेच जाऊ माझ्या माहेरी, पण माई पाहूण्यांच्या घरी जायला नकार देतात. सरिता वैतागून म्हणते की लोक एवढे सगळे होऊनसुद्धा फिरायला जातात पण मी जीव वाचवायला बघतेय तर मलाच बोलतात. मला तर ती लटकलेली बाहूलीच डोळ्यासमोर येतेय. छाया तिच्या बाहूलीला घ्यायला घरात जाऊ बघते पण दत्ता तिला अडवतात की तुला दिसत नाहीये का काय चाललयं ते? तिकडून निलीमा येते. माई विचारतात की कुठे गेली होतीस? घरात काय चाललयं? ती पण म्हणते की मग इथे घाबरून बसू का? कोणीतरी हे मुद्दाम करतयं, दत्ता वितारतात की कोण करतयं? ती म्हणते की मला पण तोच प्रश्न पडलाय पण माझी, तुमची शोधायची पद्धत वेगळी आहे, शंका वेगळ्या आहेत. हे कसे झाले पेक्षा हे कोणी केले? हे कळलं तर सगळे प्रश्न सुटतील. पण माई तिला सांगतात की हे सगळं आम्हाला आमच्या पद्धतीने सोडवू दे. ती पण सांगते की मी तुम्हाला अडवणार नाही, तुम्ही पण मला अडवू नका. सरिताला दागिन्यांची आठवण येते. ती माईंना सांगते की सुसल्या घरात आहे व आपण बाहेर. ती चोरणार तर नाही ना? निलीमाला ते पटलं नाही ती सरिताला खोडून काढते की इतके दिवस ती घरात आहे, कशाला चोरेल? यमुना मी आत जाऊ का? म्हणून संधी साधू पाहते पण माई नको जाऊ बजावतात. ती पुन्हा आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. माधव सांगतात की आम्हाला कळलं, पण तू आत जाऊ नकोस. ते निलीमाला सांगतात की मी जे डोळ्यांना दिसतयं त्यावरच विश्वास ठेवतोय. ती सांगते पण त्यामागची कारणं पण शोधून काढायला हवीत. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. तुम्ही जर घाबरलात तर हे जे कोणी करतयं त्याला फावेल. मुले भुकेली होतात. तर ती सांगते की कोणी आणून देणार नाही आपल्यालाच काय ते करावे लागणार.
ती परत म्हणते की येताय ना? अभिराम जाऊ बघतो पण माई त्याला अडवतात. निलीमा, यमुनाला चल म्हणते, सरिता तिला विचारते की तुच होतीस ना आत काल? ती परत सांगते की मी काही केले नाही. निलमा म्हणते की मला माहितीये की हे तू केले नाहीस. निलीमा मुलांना सांगते की भुक लागली तर घरात जावे लागेल. माधव थांबवू पाहतात. निलीमा समजावते की सत्य आणि कल्पना ह्यात गल्लत करताय. अभिराम पण निलीमाला आत जाऊ नको म्हणतात तर ती उलट विचारते की अशा विचारांनी तू तुझी स्वप्न कशी पुर्ण करणार? तेवढ्यात सुसल्या पोहे घेऊन येते. मोठ्या आत्मीयतेने ती सगळ्यांना म्हणते की सगळ्यांनी काहिच खाल्ले नाही, भुक लागली असेल, खाऊन घ्या. निलीमा म्हणते की जी मते तुम्ही कोणाविषयी मांडतात ती व्यक्ती तशी असेलच असे नाही. माई, दत्ता व सरिता सोडून सगळे पोहे खातात. सुसल्या विचारतो की जेवण पण बनवू का? तर माई चिडतात व म्हणतात की घाल तुझ्या नरड्यात. तुझ्या आईने असेच गोड गोड बोलून माझ्या नवर्याला नादी लावले व तू तसेच करून हे घर लुबाडू बघतेय. सुसल्याला वाईट वाटते, ती म्हणते की मी एवढे केले तरी ह्यांना काहीच नाही मग दत्ता पण म्हणतात, मग निघून का नाही जात. निलीमा आत जायला निघते व अर्चिसला पण बोलावते पण माधव त्याला थांबवतात. गणेश म्हणतो की अण्णा आत आहेत व मला दिसतात आहे. दत्ता चिडतात व घराचे वाट्टोळे होतेय तरी तू सुधारत नाही म्हणून काठीने त्याला मारतात.
माधव त्यांना अडवतात. ते सांगतात की मी काय करू? ह्या घरासाठी मर मर केली पण बाप म्हणून हरलोय, व ढसाढसा रडतात. सरिता पण त्याला मारते व तू सुधार नाहीतर आम्हाला मारून टाक म्हणून ती पण खुप रडते. मुले गणेशला बाजूला घेऊन जातात, तो पण रडत असतो. माधव दत्तांना समजावतात की त्याला मारून प्रश्न सुटणार नाहीत. माई पण धीर देतात. ह्या घरात सगळ्यांचे संसार नीट झाले पण माझ्या मुलांनाच का त्रास होतोय?
गुरव लगबगीने नाईकांकडे येतात व फाटकापाशीच थांबतात. माई आत यायला सांगतात. पण ते नकार देतात व हे जे काही चाललयं ते भयंकर आहे व लपून राहत नाही. मग ते सगळ्यांना सांगतात की हे सगळं कोणीतरी घरातीलच माणूस करतेय, व ते त्या शक्तीशी बोलतेय. तुम्ही शोधून काढा. माई पुन्हा विनवणी करतात की काहीतरी उपाय सुचवा. मग ते दत्तांना ते झाड तोडायला सांगतात. दत्ता नाथाला कुर्हाड आणायला सांगतात माई त्या झाडाजवळ जातात तर त्यांना बांगड्याचा आवाज येतो. सुसल्या वरून सगळं बघत असतो. तेवढ्यात गुरव ओरडतात की कोणी इथे राहू नका व ते पण घाबरे होऊन पळत जातात.
<< tya guravala kay hot
<< tya guravala kay hot mahit nahi pn to dhunganala pay laun palat sutato.... >> परवानगीशिवाय झाड तोडणां, हो आतां गुन्हो आसा ह्यां गुरवाक ठावक आसा. म्हणानच, नाईकांक गोत्यात आणूंक त्येंका झाड तोडूक सांगान , गुरव पोलिस आणि फॉरेस्टवाल्यांकडे चुगली करूंक धावलो असतलो !!
तां सुसल्या पोहे करताव, आणी
तां सुसल्या पोहे करताव, आणी माका पण पोहे खाऊक वाटतां ते पण रात्री साडेदहा वाजुन गेल्यावर.
माका वाटतय की गणेशा खर बोलतय. अण्णा आणी शेवंता दडुन बसले असतील कुठेतरी वर वळचणीत. उगाच दगड पडले की कौलावरुन?:डोमा::फिदी: शेवंता झाडावर बसली असां बांगड्या वाजवत. बेरीनाना पण मग एक दात चमकवत हसतात.
<< tya guravala kay hot mahit
<< tya guravala kay hot mahit nahi pn to dhunganala pay laun palat sutato.... >> परवानगीशिवाय झाड तोडणां, हो आतां गुन्हो आसा ह्यां गुरवाक ठावक आसा. म्हणानच, नाईकांक गोत्यात आणूंक त्येंका झाड तोडूक सांगान , गुरव पोलिस आणि फॉरेस्टवाल्यांकडे चुगली करूंक धावलो असतलो !! डोळा मारा<<<<<<
भाऊकाका...
अतिशय बेक्कार सिरियल चालू
अतिशय बेक्कार सिरियल चालू आहे.
कसलाही बेस नसलेली.
पांडू भुकेल्या पोटी काह्ही लिहितोय आणि माथी मारतोय आमच्या...
जाऊ द्या. कजाग सासु, चावट,
जाऊ द्या. कजाग सासु, चावट, बेरकी सासरा ( नांदा सौख्य), मठाधिपती आणी आधुवादी यांचा गोंधळ ( प आ मुलगी) दोन बायका अन फजिती ऐका ( जय मल्हार) यापेक्षा ह्ये बरा असां ! काहीतरी टाईमपास होतला. नायतर जीव पिकला होता ह्ये समद बघुन.:फिदी:
सिरियल चालू व्हायच्या आधी
सिरियल चालू व्हायच्या आधी प्रोमोमधून जशी टरकेबल दाखवली होती त्याच्या चार आणे पण भीतीदायक आणि गूढ नाही आहे हि मालिका.
कालचा भागच 'काहीही हां '
कालचा भागच 'काहीही हां ' कॅटेगरीतला होता.
त्या एकटॉपव्रता सुसल्याचं काहीतरी सिरीयसली करा रे !
एकटॉपव्रता<<<<<<< नाहीतर काय,
एकटॉपव्रता<<<<<<< नाहीतर काय, काल ते बघून मलाच कसंतरी व्हायला लागलं… ईईईई…. यक… अगदी तिच्या काखेखाली घामाचे पांढरे डाग पण दिसत होते स्पष्ट…
अरे कै चललाहा नाईकंकडे ... तो
अरे कै चललाहा नाईकंकडे ... तो दत्ता दीसेल त्येका मारतोय आणि गुरव ईला तरी पळुन जातंय..
ठोबै काही शोधणार नै... चहा पोहे खाणं नि सुसल्याशी गट्टी फु करणं एवढच काम तिचं...
आधी वाटले शेवंता लट्कल्यामुळे झाड सस्पेन्स आहे... मग वाट्ले विहीर... मग वाटले ती शिळा आणि अघोरी विद्या
<< जाऊ द्या. कजाग सासु, चावट,
<< जाऊ द्या. कजाग सासु, चावट, बेरकी सासरा ( नांदा सौख्य), मठाधिपती आणी आधुवादी यांचा गोंधळ ( प आ मुलगी) दोन बायका अन फजिती ऐका ( जय मल्हार) यापेक्षा ह्ये बरा असां ! काहीतरी टाईमपास होतला. नायतर जीव पिकला होता ह्ये समद बघुन >> १००% सहमत ! आणि, नाईकांक पाण्यापासून धोको म्हणान इतर सिरीयलींसारखो ' पाणी घालून वाढवण्या'चो किळसवाणो प्रकारय हंय नाय, ह्यां काय कमी आसा ? माझ्यापुरतां तरी, रोज अर्धो तास कोकणात नेवन आणतत , ह्येच्याकरतां सिरीयलीक सगळां माफ !!!
'....माझ्यापुरतां तरी, रोज
'....माझ्यापुरतां तरी, रोज अर्धो तास कोकणात नेवन आणतत...."
~ भाऊ नमसकर....या तुमच्या वाक्यात मीही कुठेतरी आहे असे अवश्य समजा. कोकण दर्शनासाठीच मी त्या झाडाखाली बसण्यासाठी रोज अर्धा तास काढतोच. असू देत कितीही त्रुटी....चालतील.
माझ्यापुरतां तरी, रोज अर्धो
माझ्यापुरतां तरी, रोज अर्धो तास कोकणात नेवन आणतत , ह्येच्याकरतां सिरीयलीक सगळां माफ !!! >>>> +१०००
अगदी ह्याच करणाकरता मी ही
अगदी ह्याच करणाकरता मी ही सीरियल बघतय !
व्हाट्सअप साभार रात्रीस खेळ
व्हाट्सअप साभार
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
अजुन बरेच काही प्रश्न आहेत ,पण तूर्तास हेच
एवढे एपिसोड झाले एक भुत दिसेना !!! कराव काय .....
<< एवढे एपिसोड झाले एक भुत
<< एवढे एपिसोड झाले एक भुत दिसेना !!! कराव काय .....>> नाईकांक मासे, मटण करूंक सांगा , बघा दिसतत किं नाय तीं . अहो, कोकणातलींच भुतां तीं ! नाईकांच्या घरांत बघूंचा तेंव्हां नुसतो भाजीपालो; मासे- मटणाचा नांव नाय, वासय नाय !! म्हणान नाईकांच्या घरात नुसतोच थयथयाट करतत आणि मग जातत आजुबाजूक तसलो वास घेंवक !!!
माझ्यापुरतां तरी, रोज अर्धो
माझ्यापुरतां तरी, रोज अर्धो तास कोकणात नेवन आणतत , ह्येच्याकरतां सिरीयलीक सगळां माफ !!! >>>> > +१
त्याच बरोबर मालवणी ऐकायला मिळते हा आणि एक प्लस पॉईट. लहानपणी परबाच्या किंवा घाडीगावकराच्या आजीकडुन मालवणी ऐकली होती त्यानंतर कधी परत हा योग नाही आला.
तात्यानुं, तुमचोय त्येच्यांत
तात्यानुं, तुमचोय त्येच्यांत काय सहभाग नाय मां ? मग सांगूक काय झालां
नाना आणि अण्णांच्यो भानगडी ? वगीचच आमच्या डोक्याक ताप !!!
(No subject)
आजच्या भागात ते भावल्याचे पोत
आजच्या भागात ते भावल्याचे पोत हलताना का दाखवलय? आता ह्यात कुणाचो हात असा??
बॅटरी सेलचो .
बॅटरी सेलचो ;).
भाऊकाका लय भारी.
भाऊकाका लय भारी.
माधव व अर्चिस घरात येत असतात
माधव व अर्चिस घरात येत असतात तर लटकलेली बाहुली खाली पडते. माधव खुप घाबरतात व अर्चिसला घेऊन खोलीत येतात. निलीमा, नेहमीप्रमाणे फोनवर समोरच्याला बोलू न देता, "या या या" म्हणून फोन ठेवते. माधव पाणी पीतात व सांगतात की अशी थट्टा कोण करेल? निलीमा परत सांगते की खेळण्यातील बाहूली आहे, तिच्याकडे आपण खेळणं म्हणूनच बघत होतो मग आताच असे काय झाले? अर्चीसला काय वाटेल असेल त्याच्या वडिलांना असे बघून? निलीमा ती बाहूली आणायला जाते, जेणेकरून घरातील सगळ्यांची तिच्याविषयी भीती जाईल. इकडे सरिता पण स्वयंपाकघरात घाबरून बसलेली असते. दत्ता तिला स्वयंपाक करायला लावतात पण ती सांगते की भांडी बघीतली तरी भीती वाटते. काय होईल ते माहित नाही. मग ते म्हणतात की उपाशी रहायचे का सुसल्याच्या हातचे खायचे? ती सांगून बघते की बाकीचे खाताय तर....पण ते म्हणतात की आपले व आईचे काय? मीच चूल पेटवतो व रांधतो. ती सांगते की मी करते स्वयंपाक पण तुम्ही इथेच थांबा. इतक्यात नाथा माईंना हाका मारतो व बाहूलीविषयी विचारतो, व तीला घरात घेऊ नका सांगतो.
गुरवांनी ती बाहुली पुरायला सांगीतलीय. ती जर घरात ठेवली तर घर गीळेल? नाथा सांगतो की बहूलीचा बंदोबस्त करायला पाहिजे. माई म्हणतात की छायाला वाईट वाटेल, तिची लहानपणीची बाहुली आहे, पण तिला वाईट वाटेल म्हणून घराला धोका नको. दत्ता नाथाला बाहूली पिशवीत टाकायला सांगतात. तेवढ्यात छाया येते व मी तुम्हाला ह्या बाहूलीला हात लावू देणार नाही सांगते पण दत्ता ह्या घराचे ती वाट्टोळे करेल. दे आम्हाला नाहीतर तुलापण हिच्यासकट बाहेर काढेन. ती, माझापण ह्या घरावर हक्क आहे व माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही सांगते. तरी माई तिच्याहातून ओढून घ्यायला बघतात. तो आरडाओरडा ऐकून निलीमा (राखाडी रंगाचा ड्रेस घालून) खाली येते. ती छायाची बाजू घेते, गुरवांनी आज बाहूली पुरायला सांगीतली, उद्या घरच्या माणसांचा जीव घ्या सांगतील ते तुम्ही कराल का? पण तिचे कोणीच ऐकत नाही. माई छायाला ओढत आत नेतात . दत्ता नाथाला बाहूली उचलायला सांगतात. ती तणतणत (पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून) खोलीत येते. ती वैतागते की तीच्या घरात हे सगळं चाललयं. ती सांगते की माधव जसे जुन्या वह्या बघून खुश झाले तशीच छायापण खुश झाली, आणि आता कोणाच्या तरी सांगण्यावरून हे ती बाहूली पुरायला निघाले आहेत.
अर्चिस दुर्लक्ष करायला सांगतो. पण मी गप्प बसू शकत नाही. ती सांगते की बहिण रडतेय पण भाऊ ती बाहूली गाढायला (गाडायला हवे होते) चालले आहेत. माधव खाली जातात. इकडे दत्ता व नाथा रानात ती बाहूली घेऊन जात असतात. नाथा हळूहळू चालायला लागतो तर दत्ता विचारतात की काय झाले? तो म्हणतो की बाहूली जड वाटतेय. तेवढ्यात एकजण येत असतात. ते विचारतात की कुठे चालले व ह्या गोणपाटात काय आहे? हे काही न बोलता निघून जातात. इकडे छाया ढसाढसा रडत असते. माई तिला समजावत असतात की ती बाहूली पंख्याला कशी लटकली? गुरवींनी तसा निरोप धाडला गं. पण ती म्हणते की मी जीव देईन, माई सांगतात की दे, पण पहिले मला मार. ती खुपच रडत असते व म्हणते की इथे कोणाला वेळ नाही माझ्याशी बोलायला. मी त्याच्याशी बोलते.... ती खुप रडते, मग माई तिला कोंडून निघून जातात. इकडे नाथा खड्डा खोदत असतो. तर मागून देवीकाचे आईवडिल नेमके येतात. ते एकमेकात कुजबूजतात व निघून जातात. नाथा खड्डा खोदत असतांना पोत्यातील बाहूली हलते. नाथा पटकन ती बाहूली पुरतो.
भाऊकाका व्यंगचीत्र मस्त.
भाऊकाका व्यंगचीत्र मस्त.
पांडूला जेवतांना, निदान पोहे खातांना तरी दाखवले पाहिजे होते.
मस्त भगवती. ठोकळीचा राखाडी
मस्त भगवती.
ठोकळीचा राखाडी ड्रेस खाली येताना आणि खोलीत जाताना पिवळा, हे एकाच सीनमध्ये दाखवलं का, मग ड्रेस रंग बदल सायंटिफिक कारण काय ब्वा.
(No subject)
काय हुशार पोरगी आहे ही भगवती
काय हुशार पोरगी आहे ही भगवती ! राहते पार साता समुद्रापल्याड आणि इथे कोकणातील एका घरात निलीमाने जिना उतरताना राखाडी ड्रेस घातला आहे तर तिच एक मिनिटाने वरच्या खोलीत गेल्यावर राखाडी ड्रेसचा रंग पिवळा होतो....हे अचूकपणे निरीक्षण देखील करते. धमालच आहे.
पण कालचा एपिसोड खरच धमाल
पण कालचा एपिसोड खरच धमाल होता. मला त्या वेळी जाम हसू आले जेव्हा देविकाचे आई वडिल दत्ताला काहीतरी पुरताना बघतात. आता देविकाला जाऊन ते काहीतरी सांगणार आणी धमाल उडवणार. पण ते बाहुल का काय जे पोत्याच्या आत हलतय तर बघायला नको का? पोत्याच्या आत एखादी मांजर वा कोंबडी पण चुकून शिरली असेल आणी मग बाहेर यायची धडपड करत असेल. नायकान्च्या घरात कोंबड्या नाssssssssय, पण बर्याच वेळा सीन मध्ये मागुन एखादी कोंबडुली पळताना दिसतेच दिसते, मग काय माका भास होतलो?
ठोकळी नुसती तणतण करते आणी डोळे मोठे करत बोलते, त्यापेक्षा शोध लाव ना काय तो. नुसतीच रागाची दमछाक करते.
Pages