आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
<< ..., उलट देवकीची आई
<< ..., उलट देवकीची आई हबकल्यासारखी वाटली काल. म्हणजे तिला कसला तरी धक्का बसलाय..... असे वाटले कालच्या प्रसंगावरुन.>> नाईकांच्या घरार दोनय हातानी रातभर दगड फेकून दमून इल्यासारखी वाटली माकां !!
(No subject)
भाऊ सही!
भाऊ सही!:हहगलो:
माका वाटता नाइकांचो घर जंगलात
माका वाटता नाइकांचो घर जंगलात आसा. एवढी दगडं पडली तरी गाववाल्यांका पत्ता नाय. आणि एवढी दगडा फेकुचा काम काय माणसाचा नाय. ठोकळीक काय वाटता ते तिला नी त्या शेवंताक माहित.
भाऊकाका
भाऊकाका
आणी मला वाटत की त्या घराच्या
आणी मला वाटत की त्या घराच्या कौलाला भोके असतील, त्यातुन पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून अण्णानीच भोका-भोकात दगडं घालुन भोकं बुजवली असतील. पण या लोकांच्या दररोजच्या गोंधळ व आरड्या-ओरड्याने ती दगडं एकेक करुन धबाधबा चोहीकडे पडली असतील.:फिदी:
नाहीतर पांडुच अगोचरपणा करायला गेला असेल छ्परावर आधी, नंतर धडपडत येऊन बसला असेल खाली.
(No subject)
(No subject)
<< दगड फेकून दमून इल्यासारखी
<< दगड फेकून दमून इल्यासारखी वाटली माकां !! >>, << माका वाटता नाइकांचो घर जंगलात आसा....>>, <<आणी मला वाटत की त्या घराच्या कौलाला भोके असतील...>>... "प्रत्येकाक काय काय वाटता तसो तसो त्येना अर्थ काढून सिरीयल बघूंची ; आम्ही कसांय, काय काय रोज दाखवत रवतलंव ", असो अभिनव प्रयोग हीच खासियत आसतली ह्या सिरीयलची !!
अर बाबौ! काय बी दाखवु र्हायले
अर बाबौ! काय बी दाखवु र्हायले ह्ये लोक. माका आता पक्का डाऊट असा की ह्ये ज्ये काय असान ना त्याच्या माग माधवच असां! तां रहस्यकथा लिवता पण ती असल होण्यासाठी मांजराक मारता. काय खर नाय ह्या नाईकांचे.
आजचा माधवच्या बालपणाबद्दलचा
आजचा माधवच्या बालपणाबद्दलचा (मांजरीवर निबंध लिहायला मांजर मारून समोर ठेवणे, आधी करून बघीन मग लिहीन अशी विचारसरणी) संवाद ऐकून तोच संशयित नंबर १ वाटायला लागलाय !!
रश्मीताई, सेम पिंच
रश्मीताई, सेम पिंच
आज असं दाखवलं? ठोकळीची
आज असं दाखवलं? ठोकळीची शोधमोहीम कधी चालू होणार?
छाया खुप वर्षांनी सापडलेली
छाया खुप वर्षांनी सापडलेली बाहुली बघुन हरखुन जाते व माधवंना विचारते की आठवते का नानांनी मला ही बाहुली आणली हेती. माधवंना अजिबात आठवतय असे दिसत नसले तरी ते हो हो म्हणतात मग ती लहानात लहान होऊन तिच्याशी बोलू लागते. सरिता वैतागते की काय चाललय ह्यांचे त्यावर ती पण तिला ही बघ चोंबडी कशी बोलतेय वगैरे म्हणते. माधव गालातल्या गालात हसतात. छाया सरिताला विचारते की येते का खेळायला माझ्या बाहुलीशी खेळायला? ती चाडून उत्तर देते की माझी मुलगी पण खेळत नाही बाहुलीशी. छाया उड्या मारत मारत निघुन जाते. सरिता सामानाची आवराआवर करतांना काही पुस्तकं खाली पडतात. ती ऊचलायला जाते तेवढ्यात माधव तिला अडवतात. ते बघतात व खजीना मिळाला असे आनंदाने माईंना सांगतात. त्यांच्या लहानपणीची त्यांनी लिहीलेली पुस्तकं मिळतात. ते पण आनंदाने निघून जातात व सरिता बाकीचे आवरायला घेते. माधव बाहेर येऊन बसतात व पुस्तकांवरची धुळ झटकतात. तेवढ्यात अर्चिस येतो व आम्ही आवरतोय व तुम्ही काय रद्दी घेऊन बसलाय? विचारतो. त्यावर ते मी कसा रहस्य कथा लिहायचो वगैरे रंगवून सांगतात. मी कसं सगळे लहानपणी ठरवले होते..... तो विचारतो की प्राध्यापक का? तर ते नाही म्हणतात व मी रहस्यकथाकार व्हायचे ठरविले होते. मग ते त्यातली एक कथा वाचून दाखवतात.
तो आश्चर्य व्यक्त करतो की हे तुम्ही लिहीलय? आणि मला साधा निबंध लिहीता येत नाही. ते सांगतात की बघ कसे आता मी स्वत:चे रहस्य कथांचे पुस्तक लिहीतो. पुर्वा चहा घेऊन येते व काय चाललयं विचारते. अर्चिस सांगतो की ते लहानपणी कथा लिहायचे व अत्ताच एक वाचून दाखवली त्यावर ती पण त्या कथा वाचायला देणार का म्हणून विचारते त्यावर ते दिल्या असे सांगतात व अत्तापासुन वाचकवर्ग तयार झालाय बघुन खुश होतात व अर्चिसला हे सगळे निलीमालापण सांगायला सांगतात. इकडे माई झाडू शोधत येतात तर दत्ता तक्रार करतो की माधव रहस्यकथा वाचत बसलाय मीच का म्हणुन काम करू?
मी पण काम करणार नाही. त्या खुप हसतात व लहानपणीची गम्मत सांगतात की अण्णा ओरडले की तुम्ही दोघे येऊन मला एकमेकांची नावे घ्यायचात की कोणाची चुक आहे. दत्ता सांगतात की तेव्हा पण मलाच कामे करावी लागायची व तो वहीपुस्तक घेऊन बसायचा. पुर्वा माईंना चहा हवा का विचारते तर त्या नंतर घेईन सांगतात. माई पुर्वाला माधवंच्या आठवणी सांगतात की कसे ते दुसर्याचे निबंध दुरूस्त करून लिहायचे व मास्तर आम्हाला शाळेत बोलवायचे. दत्ता सांगतात की एकदा तर मांजरावर निबंध लिहायला मांजरीला मारून पुढे ठेऊन निबंध लिहीला की मी आधी करेन मग लिहील. तो निबंध वाचून मास्तर आजारी पडले. पुर्वा पण लिहायची इच्छा व्यक्त करते माई काय करायचे ते कर म्हणतात व सरिताला बोलवायला सांगतात. तेवढ्यात निलीमा खाली येते व सांगते की आवरले सगळे आता जेवूया, जेवायची वेळ झालीय. माई सरिताला वाढायला सांगतात व यमुनाला पाणि तापत ठेव हा निरोप द्यायला लावतात. इकडे यमुना बेचैन असते ती नाथाला सांगते कि सुसल्या बघा कसा घरात जावून बसलाय, त्याता वाटापण आहे. तुम्ही गडी म्हणून किती दिवस राहणार. घरात आवराआवर चालली आहे सोनं लांबवता येईल. नाईकांना काही कमी नाही एखादा दागीना लांबवला तर. पण नाथा मी करणार नाही व तू पण विचार सोडून दे सांगतात. ती वैतागते व निघून जाते. अर्चिस वर खोलीत येतो व निलीमाला डॅड कसे चांगले लेखक आहेत हे सांगतो. निलीमा मग आता रोज कथा ऐकाव्या लागतील म्हणून हसते. अर्चिस सुचवतो की त्यांनी पुस्तक काढायला पाहिजे. तेवढ्यात माधव खोलीत येतात. निलीमा सांगते की तुमचा लेक तुमचे कौतूक करत होता. माधव हसतात व झाडाकडची खिडकी उघडतात. त्यावर निलीमा पुर्वीसारखे वागल्याबद्दल कौतूक करते व एखादी कथा सांगायला लावते. त्यावर ते माझे वाचकच वाचून दाखवतील असे सांगतात.
त्यांच्या वहीकडे निलीमाचे लक्ष जाते ती कसली वही म्हणून हातात घेते तर ते सांगतात की हात नको लावू, माझी वही आहे. खाली छाया बाहूल्याला झोप येत नाही म्हणून राजकुमारीची गोष्ट सांगते की एक राजकूमारी असते तिला भाऊभावजय, आई असते तरी ती एकटीच असते एक राजकूमार तिच्याशी लग्न करू पाहतो तर ही सगळी फौज त्याला अडवते मग तो राजकुमारीला जिंकायचे ठरवतो वगैरे. पुर्वा निलीमा, माधवंना जेवायला बोलावते तर निलीमा जेवण वरच घेऊन ये कारण मी जरा कामात आहे सांगते. माधव सगळ्यांबरोबर जेवायचा आग्रह करतात. मग ते सगळे खाली जातात, तेवढ्यात निलीमाला आठवते की माधव जेवणाआधीची गोळी घ्यायला विसरले. ती खोलीत येते तर लॅपटाॅपवर, 'ह्या घराचा घास मी घेणार... हा सुड आहे' असे लिहीलेले दिसते.
मस्तच भगवती, थांकू. आता कुठे
मस्तच भगवती, थांकू.
आता कुठे कथेत रंग भरायला सुरुवात झालीय.
<< आता कुठे कथेत रंग भरायला
<< आता कुठे कथेत रंग भरायला सुरुवात झालीय.>> तथास्तु !!!! आमेन !!!
भगवती (मांजरीवर निबंध
भगवती
(मांजरीवर निबंध लिहायला मांजर मारून समोर ठेवणे, आधी करून बघीन मग लिहीन अशी विचारसरणी)>>> ठोकळा ईज नॉट ठोकळा एनीमोर...
काल सुरुवातीचा भाग बघितला
काल सुरुवातीचा भाग बघितला थोडा, ठोकळ्याला रहस्यकथालेखक व्हायच असत अस ऐकल आणि या धाग्याची आठवण झाली. कल्प्रेट नंबर वन.
आजचा माधवच्या बालपणाबद्दलचा
आजचा माधवच्या बालपणाबद्दलचा (मांजरीवर निबंध लिहायला मांजर मारून समोर ठेवणे, आधी करून बघीन मग लिहीन अशी विचारसरणी) संवाद ऐकून तोच संशयित नंबर १ वाटायला लागलाय !! <<< +१
काल पहिल्यांदाच माधवला दोन
काल पहिल्यांदाच माधवला दोन मिन्ट पाहिल त्याला ठोकळा नाव देणार्याला शंभर मोदक माझ्याकडुन..
ठोकळा, छाया सायको वाटु
ठोकळा, छाया सायको वाटु लागलेत.
ठोकळा आर्चिसला कथा सांगत होता तेव्जा कस्ला वेडा वाटत होता.
सस्मित अगदी अगदी हेच लिहायला
सस्मित अगदी अगदी हेच लिहायला आले होते. छायाला नाही पाहिलेल, पण कालच्या दोन-पाच मिन्टात माधव मात्र नक्की सायको वाटला.
अगं छाया पण त्या बाहुल्याशी
अगं छाया पण त्या बाहुल्याशी बोलते काय, त्याला गोष्टी काय सांगते आणि त्याला घेउन नाचते काय. बघायला हवं होतस तु.
हम्म. नाही बघता येतय आहेत
हम्म. नाही बघता येतय आहेत काही कारणं
ठोकळा ईज नॉट ठोकळा
ठोकळा ईज नॉट ठोकळा एनीमोर...>>> हो ना
आहेत काही कारणं>>> मुग्धा हे
आहेत काही कारणं>>>:हहगलो: मुग्धा हे तु अगदी ठोकळी सारखं म्ह्णालीस!!! तिचे कारणं शास्त्रीय असतात येवढंच!
माधव मात्र नक्की सायको वाटला. >>+११ तो ठोकळीवर ओरड्ला तेव्हा ही बघणेबल सीन होता..
अरे यार दिलीयत का तिने
अरे यार
दिलीयत का तिने शास्त्रीय कारण आजपर्यंत? कारण आजपर्यंतच्या वाचलेल्या अपडेट्सवरुन तर ती फक्त शास्त्रीय कारण आहेत अस म्हणते पण कारण काय ते मात्र सांगितलेल नाही.
ठोकळा ईज नॉट ठोकळा
ठोकळा ईज नॉट ठोकळा एनीमोर...>>> हो ना >> +१.
काल पहिल्यांदाच माधवला दोन मिन्ट पाहिल त्याला ठोकळा नाव देणार्याला शंभर मोदक माझ्याकडुन..>> तु ठोकळीला पाहिलंस तर माधव ठोकळा वाटणारच नाही.
आहेत काही कारणं>>> मुग्धा हे तु अगदी ठोकळी सारखं म्ह्णालीस!! >>
अपडेट्स वाचून भाग फार बालिश
अपडेट्स वाचून भाग फार बालिश वाटत होता ( भगवती ,तुझ्या लिखाणावर काहीच आक्शेप नाही . प्लीज . गैरसमज नसावा.
) , पण रीपीट बघायला मज्जा आली.थोडी रंगत आली काल.
मांजराला मारून त्यावर निबंध लिहिणारा माधव कोणालाच 'यक्स ' वाटत नाही . आणि पूर्वाला का लिखाणाची ओढ वातावी अचानक . छायाचं कोणावर प्रेम होत का ?
माशाबाला हसायला येत , ती माणसाळतेय हे पाहून आनंद झाला. तिच्या पेपरच काय झाल ??
हे लोकं सगळे प्रश्न
हे लोकं सगळे प्रश्न अनुत्त्रित ठेवतायत. कदाचित नंतर उलगडा करणार असतील. पण त्यामुळे बघायचा उत्साह कमी होतो. मालिका कमी भागांची असती तर झटपट रहस्य उकल झाली असती. संशयित- माधव, सुषमा, एका एपिसओड्मधे सुषमाच्या टोनमधे बोलणारी देविका, छाया आणि अर्थात नेने वकील आणि गुरव आहेतच.
Pages