आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
बुरगूस (?) >>> बुरणूस (कांबळ
बुरगूस (?) >>> बुरणूस (कांबळ किंवा अंगावर घ्यायची खरखरीत रजई)
धन्यवाद अंजली_१२
धन्यवाद अंजली_१२
नाना कोण आहेत ते कळाले नाही,
नाना कोण आहेत ते कळाले नाही, अण्णाचे वडील का?>> हो, आम्ही त्यांना बेरीनाना म्हणतो.
धन्यवाद
धन्यवाद
भगवतीचा असा विस्तृत प्रतिसाद
भगवतीचा असा विस्तृत प्रतिसाद (आढावा) वाचताना वाटत राहिले आहे की आमच्या ह्या भाचीला नाईक परिसराने चांगलेच आपलेसे केले आहे. ही पोरगी जणू त्या पूर्वा, सुषमा, अर्चिस, गणेश आणि पांडूसमवेत तिथेच आहे. बाजूल्या बाजल्यावर बसून सारे काही नोंदवित आहे.
सुंदरच.
परवा एका मायबोलीवर नसणार्या
परवा एका मायबोलीवर नसणार्या व्यक्तीशी बोलताना मी सवयीने बेरीनाना आणि ठोकळी असं म्हणाले. तिला काही झेपलं नाही. ती म्हणाली.. बेरीनाना म्हणजे काय.. मीपण 2 मिनिट विचार केला.. व्हॉट इज धिस बेरी?
व्हॉट इज धिस बेरी?>> बेडरीडन
व्हॉट इज धिस बेरी?>> बेडरीडन चा शाॅफाॅ.
परवा एका मायबोलीवर नसणार्या व्यक्तीशी बोलताना मी सवयीने बेरीनाना आणि ठोकळी असं म्हणाले. तिला काही झेपलं नाही. >>

मी घरातल्यांशी सिरियलबद्दल बोलताना नेहमीच इथलीच नाव वापरते आता त्यांना सवय झालीय.
हॅ! ये तर काईच नाही. मी तर
हॅ! ये तर काईच नाही.:दिवा: मी तर मुलीशी बोलताना आजकाल मालवणीत बोलते.:फिदी: ( म्हणजे धेडगुजरी का होईना पण ट्राय मारते)
दत्ता, नैवैद्य ठेवायला गेल्यावर कुत्री ( अनेकवचन ) रडत होती की कोल्हे कुई कुई करत होते देव जाणे.:अओ: सुसल्या खिडकीत बसुन बघत होती, त्या वेळेस मला तिच्या चेहेर्यावरचे भाव आवडले. त्यात बरेच कुतुहल आणी आश्चर्य होते. निलीमाची पण अॅक्टिन्ग बरी होती नेहेमीपेक्षा.
भगवती खासच वृत्तान्त लिहीते नेहेमी.:स्मित:
<< मी घरातल्यांशी सिरियलबद्दल
<< मी घरातल्यांशी सिरियलबद्दल बोलताना नेहमीच इथलीच नाव वापरते आता त्यांना सवय झालीय.>> माझी बाईल उलटां हल्लीं माकां 'माधव'च म्हणता !!!

<< बाजूल्या बाजल्यावर बसून सारे काही नोंदवित आहे.>> निलीमाचो लॅपटॉप तर नाय वापरणत ना नोंदी करूंक ! उगीचच अडाकतीत त्येंच्या भानगडींत !!!
पण एक खरां; कथानक लायनीवर येताहा अशी अंधुकशी का होईना पण चाहूल आतां लागताहा ! बघूंया चाहूल खरीच आसा कीं तोय एक भासच !!!
माझी बाईल उलटां हल्लीं माकां
माझी बाईल उलटां हल्लीं माकां 'माधव'च म्हणता !!! >> काका, मग तुम्ही होऽऽऽ होऽ होऽऽऽऽऽ हो असं म्हणता का???
भाऊकाका हो हो पण म्हणत नसतील,
भाऊकाका हो हो पण म्हणत नसतील, न बोलता डायरेक्ट व्यंगचित्र.
माझी बाईल उलटां हल्लीं माकां
माझी बाईल उलटां हल्लीं माकां 'माधव'च म्हणता !!! >> काका, मग तुम्ही होऽऽऽ होऽ होऽऽऽऽऽ हो असं म्हणता का??? >>>>>:हाहा: नुसतेच हो हो नाही तर वेगवेगळ्या लयीत, पट्टीत, पॉज घेऊन म्हणता का?:खोखो:
<< काका, मग तुम्ही होऽऽऽ होऽ
<< काका, मग तुम्ही होऽऽऽ होऽ होऽऽऽऽऽ हो असं म्हणता का??? >> अजिबात नाय. "माधव ना मीं ? मग नाईकांक पाण्यापासून धोको असता, ठावक नाय तुकां ? ", असां म्हणान पाणी भरणां, कपडे वाशींग मशिनीक लावणां , पाण्याची अगदींच बोंब असली तर भांडी पण धुणां असल्या कामात मीं बायलेक करत असलेली मदत मात्र ताबडतोब बंद केलंय !
छाया ने फूटेज बद्दल तक्रार
छाया ने फूटेज बद्दल तक्रार केलेलि दिसतेय निर्मात्य कडे, एक तर चान्गले कपडे नाही, "घो" नाही,
हेयर स्टाइल नाही आणि फूटेज पण नाही...म्हणून ति च्या हातामध्ये ती टकली बाहूली दिली आहे का ?
निलीमा ची गाडी पुढे काही
निलीमा ची गाडी पुढे काही जाईना...जे
चालू आहे, ते तिला पटत नाही अनि ती त्याचा काही शोध पण लावत नाही.
माधव ला च विचारत राहाते, आता काय करू...त्यापेक्शा मुम्बै ला द्या पा ठ्वून तिला...तेवढाच सरीता ला कमी काम...
हे बेरीनाना म्हणजे बेरीपिया
हे बेरीनाना म्हणजे बेरीपिया बडा बेदर्दी स्टाईल चं वाटलं होतं
आज अभिराम देविकाला घराला
आज अभिराम देविकाला घराला असलेल्या शापाबद्दल बोलताना म्हटला 'घराला वैवध्याचा शाप आहे'
वैधव्याचा असा शब्द पाहिजे ना..
भाऊकाकांची एवढी कामं कमी
भाऊकाकांची एवढी कामं कमी झाली, माधव पावला त्यांना ;).
वैवध्य, काहीही शब्द.
आज मी लास्ट सीन बघितला, तो बाहुला बोलतो असं वाटत असतांना ठोकळी समोर येते छायाच्या, माका वाटतंय ठोकळीच बोलते बाहुल्याच्या आवाजात आणि मग समोर येते.
दत्ता पुढच्या अंगणात असतात,
दत्ता पुढच्या अंगणात असतात, माई खुप अस्वस्थ होऊन त्यांच्याजवळ येतात व काय करतोय विचारतात. ते सांगतात की झाडाला पाणी टाकून झालं की पांडूकडून नारळं काढून घेतो. तो असेल इथेच, घराचा पत्ता विसरत नाही तोवर बरयं. माई सांगतात की सगळी कामे बाजूला ठेव व माझे ऐकशील का? मला खुप भिती वाटते रे. दत्ता म्हणतात की वंशावळीप्रमाणे सरिताने अंगात कापरं भरलं असूनपण भाकरी बनवली, मी शीळेजवळ ती ठेवली आता अजून काय करायला पाहिजे? त्या सांगतात ते कळतं रे मला, पण हे जे काही चाललयं ते थांबायला हवं. ते चिडून सांगतात की हे सुसल्यामुळे होतयं तिला घराबाहेर काढायला पाहिजे. माईपण तिच्या तोंडावर शीळा पडो असे म्हणतात व आपल्या घराचे बघायला पाहिजे. तू गुरवांकडे जा. ते म्हणतात की कुठल्या तोंडाने जाऊ आणि गेलो तर घरच्या लोकांना ते पटले पाहिजे. त्या समजावतात की त्यांना सांग निलीमाचे बोलणे मनावर घेऊ नका. तरीही दत्ता शंका व्यक्त करतात की गणेशावरून ओवाळून टाकतांना ते म्हणत होते की हे माझ्याच्याने होणार नाही. एकतर ते झालेल्या अपमानाचा राग काढताय किंवा हे प्रकरण त्यांच्या हाताबाहेर गेलेय.आणि घरातील इतरही कोणी येत नाही. माई सांगतात की बाकीच्यांचे जाऊदे तुला नसेल यायचे तर मीच जाते कशी, कोणीतरी हे काम करायलाच पाहिजे. दत्ता त्यांना म्हणतात की हे बरं जमतं तुला. येतो मी तुझ्याबरोबर. अभिराम देवीकाला भेटायला जातो. माई हाश हूश करत दत्तांबरोबर चालत असतात कारण जर दत्तांचे ऐकले नाही तर त्यापण माफी मागतील. दत्ता पुन्हा विचारतात एवढे करून वहीनींना पटले नाही तर? त्या सांगतात की मी तिला सांगणार आहे, बाईगं तूला पटले नाही तर गप्प बैस. आम्हाला आमच्या पद्धतीने ह्यातून मार्ग काढू दे. इकडे देवीका अभिरामची वाट बघत असते. ते येतात व तिला सांगतात की मला जरा तूझ्याशी बोलायचे आहे पण इथे नको. ती का कू करत हेल्मेट न घालता गाडीवर बसते. माई व दत्ता गुरवांकडे पोहोचतात. पण दाराला कुलूप असते. माई सांगतात की देवळात गेले असतील आपण तिथेच जाऊ. पण दत्ता, मी जातो तूला धाप लागली आहे म्हणून त्यांना माघारी पाठवतात.
त्या निघतात तेवढ्यात गुरव येतात व मंडळी माहेरी गेलीये, थांबा पाणी आणतो सांगून आत जातात. दत्ता म्हणतात की बरं झालं हे इथेच भेटले उगाच लोकांसमोर चर्चा नको. त्या म्हणतात की आपल्याला आपलं झालयं थोडे, लोकांचा काय विचार करायचा? आता गुरवच काय ते बघतील. गुरव पाणी घेऊन येतात, माई विनवणी करतात की आमच्या घरावरील बालंट दुर करा. ते सगळं सांगतात की तुमच्या घरावर दगडं पडले, कपड्यांवर फुल्या आल्या. दत्ता हे सगळ कळल तर, आला का नाहीत विचारतात. पण तुमच्या घरात कोणाला पटत नाही आणि हे प्रकरण माझ्या हाताबाहेर आहे म्हणून मदत करायला असमर्थता दर्शवितात. देवीका अभिरामला टेंशन देते की मला मुंबईचे स्थळ आलेय आपण लवकरच लग्न करायला पाहिजे. मी त्या स्थळाला नकार देईलच पण अभिराम ते स्थळ चांगले असेल तर? असा विचार बोलून दाखवतात. मला खुप टेंशन आलयं व तो वंशावळीबद्द्ल सांगतो व घराला वैधव्याचा शाप आहे. देवीका, माझे तुमच्यावर प्रेम आहे व मी तुमच्याशीच लग्न करेन असे सांगते.
माई व दत्ता हताश होऊन निघतात तेव्हा गुरव सांगतात की मी मदत करू शकत नाही पण हे कोण करतयं हे सांगू शकतो. ती व्यक्ती घरातीलच आहे व ती त्या शक्तीशी बोलते. इकडे अभिराम परत देवीकाला विचार करायला लावतो पण ती ठाम असते. तो सांगतो की लग्नानंतर त्या घरात त्या वातावरणात रहायचे नाही. पण ती म्हणते का त्यात काय घाबरायचे? त्यावर तो हसतो व म्हणतो की तू निलीमावहीनींसारखे बोलते. मग ते निघतात. इकडे निलीमा खाली येऊन कोणीच कसे दिसत नाही म्हणून ह्या खोलीतून त्या खोलीत जाते. ती स्वयंपाकघरात सरिताला हाका मारते. कोठीघरात पण जाते पण सरिता दिसत नाही, पण डाव चमचे हलतात. ती तीथून बेरीनानांच्या खोलीत जाते व त्यांना हाका मारून झोपेतून उठवते. छाया तीच्या खोलीत बाहूलीशी बोलत असते, की तू रागावली आहेस का? मी तुझे लग्न करीन, तुला शालू नेसवीन तुझी नजर काढीन वगैरे. दत्ता, माई गुरवाकडून परत येत असतात. ते काळजी व्यक्त करतात की दमली ना? त्या सांगतात की पाय दुखतात. ते सुसल्यावर संशय घेतात पण माई सांगतात की काही कळायला मार्ग नाही. छाया बाहूलीला विचारते की घाबरलीस का? मी आहे, नको घाबरू. ती पुढे विचारते की तुला भुक लागली आहे का? थांब मी आणते तू कुठे जाऊ नकोस. ती बाहूलीला बसवते व दाराशी येते तर बाहूली हसायला लागते. ही खुप घाबरते व तेवढ्यात निलीमा तिथे येते.
<< छाया ने फूटेज बद्दल तक्रार
<< छाया ने फूटेज बद्दल तक्रार केलेलि दिसतेय निर्मात्य कडे, एक तर चान्गले कपडे नाही, "घो" नाही,
हेयर स्टाइल नाही आणि फूटेज पण नाही.>> +१ मागेंय एकदां अशीच तक्रार केल्यान तेंवा वगीचच दोनदा फक्त दोन सेकंदांपुरतां गुलाबी/ तांबडी नेसून मिरवचो चान्स दिल्यानी. नाय तर साडी पण एकच !!!
टकली बाहुली भारीये!
भगवती , छान updats! काल माझ
भगवती , छान updats! काल माझ बघायकच राहील होत,
टकली बाहुली भारीये!
टकली बाहुली भारीये! बेरीनानांचा एक दात काल चमकुन उठला>>
कधी नव्हे ते काल साबा बघत होत्या सिरियल. बेरीनानांचा दात पण अश्या अँगलने दाखवला की त्या ईईईईईईईई करत किंचाळतच उठल्या.
गुरव सांगतो त्या शक्तीशी बोलणारी ती व्यक्ती घरात उठबस करणारी, नात्यातली आहे. आधी बेरीनाना वाटले पण आता छाया वाटतेय. शेवंता त्या बाहुल्यात येऊन राहिली असावी असा संशय आहे.
भगवती सिरियल बघताना नोटस् काढतासा वाटता.
सगळा जसाच्या तसा लिवता.
<< शेवंता त्या बाहुल्यात येऊन
<< शेवंता त्या बाहुल्यात येऊन राहिली असावी असा संशय आहे.>> तसांच असात तर तां बाहुलां ठेवचां ना अण्णांच्या फोटूच्या बाजूक; सगळो रात्रीचो खेळ अणि घोळ खतम !!!
भगवती मस्त अपडेट्स देत्येस ग
भगवती मस्त अपडेट्स देत्येस ग बायो
भाऊनो
भाऊनो
कालचा भाग मिसला होता, अपडेट्स
कालचा भाग मिसला होता, अपडेट्स बद्दल धन्यवाद भगवती.
रच्याकने, ती टकली बाहुली, बिना मेक अप चा तात्या विंचू आहे काय
अरे, त्या पांडूला कोणीतरी
अरे, त्या पांडूला कोणीतरी शंखपुष्पी सिरप द्या रे. एका भागाचा दुसर्याशी काही संबंध नसतोय. दागिने आणि कागदपत्र गायब झाले तरी नाईक थंडच. प्रत्येक भाग वेगवेगळी व्यक्ती लिहिते काय?
दिलेले संवाद लोकांना म्हणता येत नाहीत का संवाद लिहिताना चूक होते काय माहित. त्या दिवशी माधव 'भंग' च्या ऐवजी 'भग्न' म्हणाला. काल अभिराम 'वैधव्य' ऐवजी 'वैवध्य' म्हणाला.
सुशल्याला वंशावळ (ह्यातला काही भाग मोडीत होता आणि अभिरामने शीघ्र लिप्यंतर केलं की!) ची भानगड माहित नसणार. खिडकीतून आधी सरिता आणि मग दत्ता थंड पाणी अंगावर ओतून घेताना बघून काय समजूत झाली असेल तिची ते तिलाच ठाऊक.
बाकी दत्ता 'अंगे भिजली जलधारांनी' बघणं 'शिरसि मा लिख, मा लिख, मा लिख'. 
काल नटसम्राटांनी ठोकळीला पण टरकवलं. त्यांचा तो दात एकतर पाडा नाहीतर त्यांना कवळी द्या यार. त्रास होतो बघताना. परत त्यांचा क्लोजअपच मारणार ही कॅमेरामनची प्रतिज्ञा आहे.
आता दत्ता आणि माईला चकवा लागणार काय?
पांडूच्या आईवडिलांचा आण्णांनी
पांडूच्या आईवडिलांचा आण्णांनी बळी दिला असेल म्हणून पांडू सूड घेत असेल असं वाटलं. पण तो बळी नानांच्या वडिलांनी दिलाय. तेव्हा पांडूचे आईवडिल नसणार. नाईकांच्या घरात बाथरूम नाही? सगळे विहिरीवर जाऊन आंघोळ करतात? बायका पण?
माईंनी इतकी वर्षं भाकरीचा तुकडा घेऊन आपला नवरा काय करतो हे कधीच पाहिलं नाही? शोभत नाही हो बाईच्या जातीला
ती शिळा पण आत्ताच दिसली ह्यांना. दत्ता तुकडा ठेवताना कुत्रे रडलेले ऐकून मला आता शिळेतून नानांच्या बापाचा व्हॅंपायर किंवा वेअरवुल्फ बाहेर येऊन त्याला चावतो की काय असं वाटलं क्षणभर.
आणि नाईकांच्या घरात बायका
आणि नाईकांच्या घरात बायका सधवा जात नाहीत ना? मग त्या खाटेवर बेरीनानी झोपलेली असली पाहिजे. बेरीनाना कसे? तसंच कर्ता पुरुष म्हणजे माधव मोठा म्हणून का दत्ता घरचं सगळं करतो म्हणून?
Pages