आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
काम छान केलंय त्याने पांडूचं.
काम छान केलंय त्याने पांडूचं. मी दोन एपि. बघितलेत तेव्हा आवडलं.
साहेबानुं,, आज गुरव आसा रजेवर
साहेबानुं,, आज गुरव आसा रजेवर ; उद्यां सांगतयंच त्येकां, ती फाईल
निदान नाईकांच्या तरी कपाटात गावता काय तां बघूंक !!
काम छान केलंय त्याने पांडूचं.
काम छान केलंय त्याने पांडूचं. मी दोन एपि. बघितलेत तेव्हा आवडलं.>>>>> दोनच एपिसोड पाहीले?:राग: फक्त दोनच पाहीले?:राग: धिक्कार असो, त्रिवार धिक्कार असो अन्जूचा.:फिदी::दिवा:
भाउकाका
भाउकाका
भाऊ तुम्ही मालवणी संवाद
भाऊ
तुम्ही मालवणी संवाद लिहीताय का सिरीयलचे? हे खरे असेल तर अभिनन्दन हो!:स्मित:
<< तुम्ही मालवणी संवाद
<< तुम्ही मालवणी संवाद लिहीताय का सिरीयलचे? हे खरे असेल तर अभिनन्दन हो!>> रश्मीजी, ह्येचो अर्थ एकच; तुमकां 'मालवणी' बिलकूल येणां नाय ! सिरीयलीतलां असलां 'मालवणी' मीं लिवलंय असां भायेर कळलां, तर व्हाणेनच मारतीत मालवणी माकां !!
भाऊनो
भाऊनो
रश्मी म्या लवकर कंटाळते स्लो
रश्मी
म्या लवकर कंटाळते स्लो सिरीयलला आणि पाहण्यापेक्षा इथे वाचायचं, मस्त वाटतं.
भाऊकाका व्यंगचित्र
आज काय बाहुला/ली बघून घाबरत
आज काय बाहुला/ली बघून घाबरत आहेत का नाईक ?
नायकानु इतक घाबारन बर नाय .
<< नायकानु इतक घाबारन बर नाय
<< नायकानु इतक घाबारन बर नाय .>> अहो, ते तर आपल्याक घाबरवूंक बघतहत. आणि, हंय तां बघून उलटां लोक त्येंकांच हंसतहत !!!
बरोबर असा भाऊ , झी न भारी
बरोबर असा भाऊ , झी न भारी कामेडी शिरेल बनवली असा .
भाऊकाका, व्यंगचित्र मस्तच.
भाऊकाका, व्यंगचित्र मस्तच.
आज काहीच खास घडलं नाही.
आज काहीच खास घडलं नाही.
शेवटी १ मि. बघितलं, तो
शेवटी १ मि. बघितलं, तो बाहुला क्युट होता की, घाबरले का सगळे?
ठोकळी खरंच ठोकळी आहे. आज
ठोकळी खरंच ठोकळी आहे. आज दगडांचे आवाज आले म्हणाली, पण कुठून दगड येताहेत हे बाहेर बघितले देखील नाही. आणि म्हणे हिला रहस्य शोधायचे आहे. मग माधव आणि बाकीचे बरे. प्रामाणिकपणे घाबरतात हे मान्य तरी करतात. दिग्दर्शक आणि लेखक दिवसाच शूटींग दरम्यान डुलक्या काढतात बहुतेक.
दत्ता वैतागत बाहेर येतात व
दत्ता वैतागत बाहेर येतात व जोरजोरात नाथाला हाका मारतात. पांडू तिथेच बसलेला असतो. दत्ता, नाथाला सगळे दगड उचलायला लावतात व पांडूला पण कळलं का विचारतात. नाथा मग पांडूला समजावून सांगतो की एक एक दगड उचलून घमेल्यात टाकायचे. पांडू दगडांचा पाऊस पडला वगैरे बडबडत दगड उचलतो. पुर्वा मदत करू बघते पण दत्ता तिला अडवतात की खुप दगड आहे तू कुठे ऊचलणार? ते करतील सगळे. गणेश गोंधळल्यासारखा उभा असतो व म्हणतो की नाना इथेच आहेत मी सांगत होतो तुम्हाला वगैरे. आता दत्तांची सटकते व ते त्याला खुप बोलतात की मोठ्या मुश्कीलीने तू ह्यातून वाचलाय आता तरी सुधार आणि त्याचा हात धरून घरात आणायला बघतात पुर्वा त्यांना हात सोडायची विनंती करते. तेवढ्यात सरिता पण येते व गणेशचा हात सोडा सांगते व त्याला अजूनही बरे नाही म्हणते. दत्ता सांगतात की आपल्याला आधीच ताप कमी आहे का? वर ह्याची बडबड ऐकून घ्यायची. सरिता गणेशला आत घेऊन जाते. दत्ता नाथाला पटापट हात उचलायला लावतात. माधव वरून खालचा दगडांचा खच बघत असतात, बघताबघता त्यांची नजर झाडावर जाते. ते चापापतात व खीडकी लावून घेतात हे कमी की काय पडदा पण लावतात. घशाला कोरड पडल्याने पाणी न पिता सांडतात. निलीमा सगळी गंमत बघत असते. माधव सांगतात की दगडांचा खुप खच पडलाय. ती म्हणते की घाबरास का? तू प्रोफेसर आहेस ते सांगतात की मी पण एक माणूसच आहे. एवढा दगडांचा पाऊस पडला तर माणूस घाबरणार नाही का? ती म्हणते की तू पण इतरांसारखाच विचार करतोय. सारासार विचार कर. ती पुढे विचारते की तू कुठे होतास? ते सांगतात की आम्ही सगळे गप्पा मारत होतो अचानक दगडांचा आवाज आला. त्यावर ती सांगते की म्हणजे तू नव्हतास बघायला की हे कोणी केलय. डोळ्यांना जे दिसते त्यावर विश्वास ठेवावा. माधव मग विचारतात की तू कुठे होतीस? तर ती सांगते की खोलीतच होते पण कोणी दगड मारले कळलं नाही. माधव परत खीडकीतून दगडं बघतात व पाणी पीतात. इकडे गावकरी गप्पा मारत मारत काय झाले ते बघायला येतात व नेमकं पांडूला विचारतात. तो पण सगळं सांगायला जातो की आम्ही गप्पा मारत असतांना दगडांचा पाऊस पडत होता.
तो पुढे सांगतो की ही कशी भुताटकी आहे व दत्तादादा पण घाबरलेले आहेत पण तसे दाखवत नाहीत. हे ऐकून दत्ता चिडतात व पांडूची मानगूट पकडून दगड उचलायला लावतात. मग पुढे येऊन सांगतात की तुम्ही हे ऐकून आलात बरे केलेत पण आम्ही आमचे बघून घेऊ, या तुम्ही. गावकरी जायला निघतात तेवढ्यात छाया धावत बाहेर येते व जोरजोरात बडबड करते. की हे जे कोणी केलयं त्याला भोगावे लागेल वगैरे. खुप बडबड करते. माधव थांबवतात तशी ती त्यांच्या हाताला झटका देऊन झाडापाशी येते व झाडावर दगड मारते व म्हणते की तूला घरात घेतले नाही म्हणून तू हे करतेस ना? तुझ्या लेकीला घरात घेतले तरी तूझे समाधान झाले नाही वगैरे. माई तिला आवरायचा प्रयत्न करतात. पुर्वा तिला घ्यायला जाते. दत्ता सरिताला ओरडतात की बघत काय बसलीये, छायाला आत घेऊन जा. मग त्या सगळ्या छायाला ओढतच आत घेऊन जातात. दत्ता आलेल्या गावकर्यांकडे बघतात व गावकरी ते काही बोलायच्या आतच निघून जातात. दूर रस्त्यावर गुरव व वकिलकाका हे सगळे बघत असतात. सुसल्या वकिलकाकांना फोन लावून तिच्या वाट्याबद्दल व दागिन्यांबद्दल विचारते, म्हणते की ह्याचे वाद होतच राहतील पण माझ्या वाट्याबद्दल लवकर काय ते बघा. ते सांगतात की बघतो. खाली पुर्वा छायाला पाणी आणुन देते.
छाया अजूनही घुश्श्यात असते. माई समजावतात की जे नशीबात आहे ते बघावेच लागते. ती परत चवताळून बाहेर बघते व हे जे कोणी केलेय त्याला भोगावे लागेल असे पुन्हा म्हणते. अभिराम समजावू पाहतो की ह्याने काही होणार नाही पण तमाशे होतील त्यावर ती म्हणते की तूला काय पडलेली आहे? मला त्रास होतो वगैरे. ती पुर्वाला पण हेच सांगते की मला तुझ्या बाबांना होतो तसाच ह्या सगळ्यांचा त्रास होतो. पुर्वा समजावून सांगते की हे सगळे बोलून तू वाईटपणा घेतेय. माधवपण काही समजावू पाहतात तर ती फणकार्याने निघून जाते. सरिता मग संधी साधते. ती म्हणते की इथे सगळ्यांना त्रास होतो. आज दगडांचा पाऊस पडला उद्या दरोडा पडेल. ती माईंना सांगते की ते दागीने माझ्याकडे ठेवायला द्या, मी जपून ठेवते. त्यावर माई ते दागीने नीटच ठेवले आहेत सांगतात. तेवढ्यात देवीका अभिरामला फोन करते. सरिता पुर्वावर सगळा राग काढून तिला चहा करायला पिटाळते. देवीका अभिरामला वेगळ्याच सुरात काय झाले ते विचारते व सगळे ठीक आहे ना ह्याची चौकशी करते.
तो सांगतो की कोणीतरी हे मुद्दाम करतयं. पण तु काळजी करू नको मलापण ह्यातून लवकरात लवकर बाहेर पडायचे आहे. ती विचारते की सगळ्या गावाला माहितीये तुमच्या घरात काय चाललयं मग माझे आईवडील फेरविचार करू शकतात आपल्या लग्नाचा. तो तिला विश्वास देतो की मी काय ते बघतो व मलापण लवकरच लग्न करायचे आहे. त्यावर की काळजी घ्या म्हणून फोन ठेवते. तिची आई समोरच बसलेली असते. मग ही दागीने घालत आईकडे बघते.
सरिता माईंना सांगते की छाया एकदा बोलायला लागल्या तर थांबतच नाहीत. माई ते जाऊदे सांगत घर आवरून घ्यायला सांगतात. माधव म्हणतात की तिने एकटीने का म्हणून का आवरायचे आम्ही सगळे मिळून आवरू. ते सगळे मग आपापली खोली आवरायचे ठरवतात व अडगळीची खोली छाया आणि माधव आवरायचे ठरते. निलीमा आणि अर्चिस वरची खोली आवरत असतांना जडशी ट्रंक बाहेर काढतात व परत ठेऊन देतात. सुसल्या गजर्याचा वास घेऊन रंगविलेले ओठ परत रंगवतो. सरिता दमून जाते व पुर्वाला परत चहा करायला लावते. छाया खुप जड ट्रंक उचलायचा प्रयत्न करते माधव तुझ्याच्याने होणार नाही म्हणून तिला मदत करतो. अशारितीने सगळे दिवाळीची स्वच्छता केल्यासारखं घर आवरतात. सरिता अडगळीच्या खोलीत येऊन बडबड करते अजून कसे नाही आवरून झाले? व ती पण ऊचकपाचक करते तर एक ट्रंक ऊघडतांना बाहूला भसकन पाॅप होतो. सगळे खुप घाबरतात व छाया सांगते हा माझा बाहूला आहे. (पण तो तात्या विंचूसारखा नसतो.)
साफसफाई करताना ह्येंका इतके
साफसफाई करताना ह्येंका इतके जड जड ट्रंक प्रत्येक खोलींत गावतत; मग जमीनीच्ये कागदपत्र शोधतान घराचो कानो-कोपरो धुंडाळसास तो काय डोळ्याक पट्टी बांधून ! आणि, साधी बाहुली बघल्यार सगळ्यांच्या डोळ्याच्ये बाहुले कित्याक भायेर येंवक होये ?
'आपली सिरीयल', 'आपली सिरीयल' म्हणत आम्ही प्रेमान बघतंव, म्हणान तुम्ही आमकांच खुळे ठरवतलास कीं काय !!!
साफसफाई करताना ह्येंका इतके
साफसफाई करताना ह्येंका इतके जड जड ट्रंक प्रत्येक खोलींत गावतत; मग जमीनीच्ये कागदपत्र शोधतान घराचो कानो-कोपरो धुंडाळसास तो काय डोळ्याक पट्टी बांधून ! आणि, साधी बाहुली बघल्यार सगळ्यांच्या डोळ्याच्ये बाहुले कित्याक भायेर येंवक होये ?>>>>>> बरोबर बोलल्यात भाऊ! माका पण होच प्रश्न पडलेलो.
कालचे अजून पडलेले प्रश्न
दागिन्याचो डबो चिंग चांगकडे कसो आयलो?
नार्वेकरीण अशी सर्बरीत कित्याक झाली?
सुसल्या,एकदम मॉड कसा झाला?
'
तां छायाक कोणीतरी सांगा,
तां छायाक कोणीतरी सांगा, जास्त थयथयाट नको करु.. डोक्याचो गंगावन कधीही निसटून पडतलो !
भाऊ असे आहे होय. माका वाटतला
भाऊ
असे आहे होय. माका वाटतला का तुम्हाला डॉयलॉग लिहायला बोलावले. असे असते तर बरे झाले असते की.:स्मित:
दागिन्याचो डबो चिंग चांगकडे कसो आयलो?
नार्वेकरीण अशी सर्बरीत कित्याक झाली?
सुसल्या,एकदम मॉड कसा झाला?>>>>>>>>>> देवकी तिन्ही प्रश्नान्ची उत्तरे मिळणे कठिण आहे, आधीचीच गावेनात, मगे ही उत्तरे कशी मिळतील? पण खरच, काल देविका फार विचीत्र वागत बोलत होती. पण तिला अॅक्टिन्ग जमत नाही, त्यामानाने तिची आई सरस वाटते.
मित
शुगोल, खरच ती ठोकळी म्हणजे
शुगोल, खरच ती ठोकळी म्हणजे ठोकळीच आहे. पण मला वाटतय की या सार्या घटनान्मागे माधवच ( ठोकळा) असावा. कारण त्याला किस्से रन्गवुन सान्गायची फार सवय आहे.
पांडु लेखक आहे ना मग
पांडु लेखक आहे ना मग विसरणारच सगळं.. पुढलं पाठ आधीच सपाट...
<< पांडु लेखक आहे ना मग
<< पांडु लेखक आहे ना मग विसरणारच सगळं..>> वगीच काय हंसत असता तो, आपल्या सगळ्यांक " कशे खुळे बनवतहंय ह्येंकां " म्हणत !!!
ती सुसल्या त्या वकिलाला
ती सुसल्या त्या वकिलाला अरेतुरे करते?
की ओव्हरऑल मालवणीत असं बोलतात?
या मालिकेतील नाईक आणि
या मालिकेतील नाईक आणि नार्वेकर कुटुंबातील अनेक पात्रांसोबत बाहेरचे एक महत्त्वाचे पात्र म्हणजे "नेने वकील". त्यांच्या अभिनयाकडे पाहाताना जाणवते की या सर्वांच्या विरोधाला हा गृहस्थ अत्यंत शांतपणे सामोरे जातो आणि त्याच्या डोक्यात नाईक मिळकती संदर्भातील ज्या काही कल्पना आहेत त्याना मूर्त रुप देण्याची योजना राबविण्याचा यत्न करीत आहे.
नेने वकीलांची भूमिका करणारे आहेत श्री.दिलीप बापट. कोल्हापूरात सांस्कृतिक पातळीवर जे काही विविध उपक्रम चालू राहिले आहेत....गेली तीस-पस्तीस वर्षे त्यामागे बापट यांचा कला क्षेत्रातील उत्साह आणि इतरांना आपल्यासोबत घेऊन काम करण्याची त्यांची प्रवृत्ती. देशीविदेशातील अनेक उत्तमोत्तम चित्रपट इथल्या रसिकांना पाहायला मिळावेत म्हणून त्यानी कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनात चित्रसप्ताह साजरा करण्याचे मोठे काम केले, ते टी.एफ.टी. या युनिटची स्थापना करून. हौशी नाट्यसंस्था स्थापन करून राज्य नाट्यमहोत्सवात त्यानी सादर केलेल्या नाटकांना अनेक पारितोषिके मिळाली असून त्या द्वारे ते आजही कार्यरत आहेत. बॅन्केतील नोकरी सांभाळून त्यानी आपल्या या हौसेकडे लक्ष दिले आहे. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकारिणीवर त्यांची नियुक्ती झाली असून त्याना तेथील आणि चित्रपट महोत्सव गटातील त्यांच्या कार्याची पावतीही मिळाली आहे. एशियन फिल्म सोसायटीतर्फे चित्र चळवळीत लक्षणीय कार्य करणार्या दिलीप बापट याना यंदाचा "सत्यजीत रे" पुरस्कार मिळाला आहे.
हाय लोक्स... भगवती नाईस
हाय लोक्स...
भगवती नाईस अप्डेट
सगळेच प्रतिसाद भारी !
आम्ही प्रेमान बघतंव, म्हणान तुम्ही आमकांच खुळे ठरवतलास कीं काय !!!>>तसंच चालुये एकंदर
पण मला वाटतय की या सार्या घटनान्मागे माधवच ( ठोकळा) असावा. कारण त्याला किस्से रन्गवुन सान्गायची फार सवय आहे.>>>यस्स , असु शकतंय , त्याच्या पुस्त्कात्ल्या गोश्टीप्रमाणे घटना घड्वून आणत असेल तो
पण मला वाटतय की या सार्या
पण मला वाटतय की या सार्या घटनान्मागे माधवच ( ठोकळा) असावा. कारण त्याला किस्से रन्गवुन सान्गायची फार सवय आहे.>>>यस्स , असु शकतंय , त्याच्या पुस्त्कात्ल्या गोश्टीप्रमाणे घटना घड्वून आणत असेल तो. >> बाकी सगळं ठिकाय गं... पण ठोकळीच्या कपाळी तिच्या नकळत मळवट भरण्याची हिम्मत तो करेल काय??
अशोकजी, या सिरीयलमधे
अशोकजी, या सिरीयलमधे सर्वोत्तम 'बेअरींग' साधलं गेलंय तें नेनेवकील व माईच्या भूमिकांचच ! श्री. बापट यांच्याबद्दलच्या माहितीसाठी धन्यवाद.
ठोकळी खरंच ठोकळी आहे. आज
ठोकळी खरंच ठोकळी आहे. आज दगडांचे आवाज
आले म्हणाली, पण कुठून दगड येताहेत हे बाहेर
बघितले देखील नाही. आणि म्हणे हिला रहस्य
शोधायचे आहे.>>>> दगडांचा असा मारा होत असताना ती बाहेर गेली असती किंवा डोकावली असती तर तिचे डोके किंवा डोळा फुठला नसता का ? काही शोधायला आधी डोक आणि डोळे तरी शाबूत राहायला हवे ना .
कालचे अजून पडलेले प्रश्न
दागिन्याचो डबो चिंग चांगकडे कसो आयलो?>>> त्यांचो स्वताचो असू शकतो , नाहीतर अभि संमोहनात स्वतःहून देऊन आला असेल , जे त्याला आता आठवत नसेल .
अशोकजी, या सिरीयलमधे
अशोकजी, या सिरीयलमधे सर्वोत्तम 'बेअरींग' साधलं गेलंय तें नेनेवकील व माईच्या भूमिकांचच ! श्री. बापट यांच्याबद्दलच्या माहितीसाठी धन्यवाद +१
Pages