काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईला आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही का? सासरची रीत मुलीने जपलेली पाहून.>>
आश्चर्य कशाचं? उलट राग येत असेल, कार्टीनं प्रेमविवाह केला म्हणून! Wink

नाही तिला आश्चर्य वाटलय, भौतेक त्यांच्या लग्नाला फारसे दिवस झालेले नसावेत आणि येवढ्यात दोघांनीही एकमेकांच्या रीती समजुन घेउन आचरायला सुरुवात केलीय हे पाहुन आलेल आश्चर्य आहे,

बादवे, काशीला गुढीपाडवा साजरा करतात का? आणि हो तर आपण करतो तसाच करतात की अजुन काही वेगळी पद्धत आहे?

म्हणजे तेच ते. सासरच्या रंगात रंगुन गेलेली, रीतीभाती सांभाळणारी, लग्नाआधी असलेलं आपलं स्वत्व विसरुन गेलेली, अतिगुणी सुन.

सगळे प्रोमोज आत्तापर्यंतचे छान वाटले. हिरवीण हिरो दोघेही मस्त दिसताहेत. बाकी मोहन जोशी आणि शुभांगी गोखले आहेत म्हणल्यावर काहीतरी चांगल मिळेल बघायला अस वाटतय. बघुयात

बाकी मोहन जोशी आणि शुभांगी गोखले आहेत म्हणल्यावर काहीतरी चांगल मिळेल बघायला अस वाटतय. बघुयात>>>> अजुन एक भाबडी आशा.

आवो ते बाबा मधेच गायब होतात.

आणि तसंही लेकीला परदेसी दिलंय. तर आता हे आई बाबा - मोहन जोशी आणि शुभांगी गोखले - लेकीच्या घरी राहिले तरच रोजरोज दिसतील ना. कारण ही लेकीची तिच्या सासरची स्टोरी आहे ना.

का आपलं म्हणजे प्रेक्षकांचं रोज यु पी - मुंबई अपडाउन होणारे Happy

म्हणजे तेच ते. सासरच्या रंगात रंगुन गेलेली, रीतीभाती सांभाळणारी, लग्नाआधी असलेलं आपलं स्वत्व विसरुन गेलेली, अतिगुणी सुन.>> हं, आता मराठमोळ्या परंपरा, रीतीभाती दाखवून गुळगुळीत झाल्या म्हणून मुलीला परराज्यात देऊन तिथल्या परंपरा सांभाळणारी अतिगुणी सुन दाखवण्याची नवकल्पना का ही? Uhoh

आईला आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही का? सासरची रीत मुलीने जपलेली पाहून.>> वो मी भाजी निवडता निवडता देख्या ना, तो इतने बारकाईसे नै देख्या. आज परत बघेन. Happy

अजुन एक भाबडी आशा. >> मुग्धा. Lol

एक प्रश्न पडलाय.. गुढीपाडव्यादिवशी तिचे आईबाबा कसे काय तिच्याकडे गेले? आपल्याकडे एवढा मोठा सण असताना.. Uhoh

शुभांगीला मम. आवं थांबा प्रेक्षकांनो, प्रोमोज आणि मेन स्टोरीत ताळमेळ असतोच असं नाही.

बाकी झीला खुप दिवसांनी(वर्षांनी) गोड चेहे-याची हिरविण मिळाली, अभिनय चांगला असेल तर दुधात साखर. जोडी छान वाटते.

पण आईला आधी मिठी मारायला हवी होती मग नमस्कार, पदर डोक्यावर घेऊन वगैरे. नैसर्गिक वाटलं असतं ते.

म्हणजे तेच ते. सासरच्या रंगात रंगुन गेलेली, रीतीभाती सांभाळणारी, लग्नाआधी असलेलं आपलं स्वत्व विसरुन गेलेली, अतिगुणी सुन.>>>+१

वो मी भाजी निवडता निवडता देख्या ना, तो इतने बारकाईसे नै देख्या. >>> मी तो देख्या च नै ना.. तुमि लोग क्या बोलते ऐकुन आता बघेन मी पण आ़ज!

आईची अपेक्षा होती मुलीला आधी जवळ घ्यायची त्याप्रमाणे मुलगी जात असते पण थांबते आणि पदर डोक्यावर घेऊन आईबाबांना वाकून नमस्कार करते मग आईला मिठी मारते.

मला नाय ब्वा पटलं ते, आधी घट्ट मिठी मारुन मग नमस्कार करायला हवा होता. प्रेमापेक्षा परंपरा जपणं आधी महत्वाचं वाटलं मुलीला, सासरी गेल्यावर.

पु. ल. म्हणतात तस आता आश्चर्यचकीत व्हायची पाळी मराठी प्रेक्षकांवर आली..>> हो ना मुग्धा.

मला नाय ब्वा पटलं ते, आधी घट्ट मिठी मारुन मग नमस्कार करायला हवा होता. प्रेमापेक्षा परंपरा जपणं आधी महत्वाचं वाटलं मुलीला, सासरी गेल्यावर.>> तेच ना अन्जू. सासरी गेल्यावर लगेच प्रेमाच्या आधी परंपरा येते हे मुळीच पटलं नाही.

ती डोक्यावरून पदर घेते तेव्हा आईला आश्चर्य वाटलेलं दिसलं नाही का? >>> हां पाहिला प्रोमो. शुगो आश्चर्यचकित झालीय खरी. Happy

ही मालिका पहिल्या एपिसोडपासून पाहायची (आणि ’तेरी कहके लूंगा’ स्टाईल तिचा कीस काढायचा) असं मी ठरवलेलं आहे :व्हॉट्सअ‍ॅपवरचा गॉगल इमोजी:
Proud

हिरवनीचं नाव काय...आधी ती निवेदिता सारखी वाट्ली..पण आता जुळुनयेती....मध्ल्या मेघना ची लहान बहीण वाटतेय... तशीच बोलत होती Happy

Agdi typical family ahe Gauri chi ...ani first episode la ch heroine che promotion ????
Ithe amchya JAY sahebana last episode la kahi tari hati lagle ...nashibach ho poriche Happy

baki heroine chan ahe ani hero suddha

अरे मी आत्ता बघतेय. आई पोळ्या करत असते तो तवा घासलेला नाहीका? माझं नेमकं तिथे लक्ष गेलं. काळजी घ्यायला हवी होतीना. मग लगेच आजी फोडणी करते ती कढई बघितली, ती नीट वाटली, स्वच्छ.

मी स्वत:वरच वैतागलेय, असं का माझं तिकडे लक्ष गेलं. ह्या घरात मात्र सासु चांगली दिसतेय, सुनेकडून फार अपेक्षा नाहीत, स्वतः कामं करतेय, ट्युशन्स घेतेय एकीकडे. सुनेने मदत करायला हवी थोडी असं वाटलं, अर्थात मुलगा-सुन दमले असतील कदाचित.

Pages