राज कचोरी अशीच कुठे तरी, कधीतरी चाखलेली होती , ती चव आठवून तोंपासु होत होतं पण थोडी खटपटी ची असल्या कारणाने घरी करायचं टाळत आले होते .शेवटी या रविवारी करायचीच असं ठरवलं. दोन दिवस साहित्य पैदा करण्यात गेले पण परिवाराबरोबर एकत्र बसून स्वाद घेताना सर्व श्रमांचं चीज झालं..
ज्या कुणाला ,'केल्याने होते रे .." हे वाक्य सर्वप्रथम सुचले होते त्याला मनातल्या मनात ,' अगदी! अगदी" , +१ वगैरे वगैरे करून टाकले )
कचोरी करता लागणारे साहित्य.
१) मैदा २ कप
२) जाड रवा १/४ कप
३) बेकिंग सोडा , दोन चिमूट
४) मीठ - १ टी स्पून
५) साधारण अर्धी वाटी कोरडे भाजलेले अमचूर्,तिखट्,बेसन . ( मी अंदाजानेच घेतले आहेत हे तिन्ही जिन्नस )
कचोरीत भरण्याकरता -
१) उकडून घेतलेले छोले , काळे चणे , मोड आलेले मूग , बटाटे
२) फेटून घेतलेले ताजे दही
३) तिखट हिरवी चटणी
४) चिंचे ची गोड चटणी
५) जिरे भाजून केलेली पूड
६) काळे मीठ / साधे मीठ
७) कोणताही चाट मसाला.
८) अमचूर
९) तिखट
१०) सजवण्याकरता शेव , कोथिंबीर .( काही मैत्रीणी उत्साहाच्या भरात डाळिंबाचे दाणेबिणे ही टाकतात वरून, जे मला अज्जिब्बात आवडत नाहीत )
१) प्रथम कचोरी बनवण्याकरता मैदा, बेकिंग सोडा, रवा मिसळून , पुरी च्या कणकेप्रमाणे घट्ट मळावे. खूप मळून मऊ करावे.दहा मिनिटे झाकून ठेवावे.
२) लहान गोळे करून घ्या. पुरी सारखे लाटून ,तीवर थोडेसे भाजून घेतलेले बेसन मिक्श्चर पसरा. पुन्हा गोळा करून ३,३.५ इन्चा च्या व्यासा ची पुरी लाटून तळून घ्या. सर्व कचोर्या तळून झाल्यावर झाकण न घालता उघड्यावरच थंड करत ठेवा.
३) थंड झाल्यावर कचोर्या कडक होतील . मग वरचा पापुद्रा फोडून आत वरील सर्व जिन्नस एकत्र करून भरा.
न फुगलेल्या कचोर्या ही चुरून या फिलिंग मधे अॅड करू शकता.
४) वरून शेव , कोथिंबीर घालून सर्व करा.
दोन दिवसापूर्वी शेव आणी दोन्ही चटण्या , एक दिवस आधी कचोर्या करून एअर टाईट डब्यात ठेवल्या कि तिसर्या दिवशी फिलिंग करता चणे,छोले उकडून मसाला लावून तयार करणे एव्हढेच काम असते.
इथे दिलेला ३० मिनिटाचा वेळ, हा तयार कचोर्यांमधे मसाला भरून खाऊन संपवायला लागणारा वेळ आहे
वा... खरच तोंपासु वाटतायत.
वा... खरच तोंपासु वाटतायत.
मस्त... दिल्ली एअरपोर्टवर
मस्त... दिल्ली एअरपोर्टवर बघितली होती तेव्हापासून करायची होती. आता आयतीच मिळाली रेसिपी !!!
वा! आवडत्या पदार्थात आहे.
वा! आवडत्या पदार्थात आहे. संध्याकाळचा नाश्ता म्हणून इंदोरला खायचो.
अगदी तोंपासु.
अगदी तोंपासु.
बाबौ एकच नंबर!!!
बाबौ एकच नंबर!!!
इथे दिलेला ३० मिनिटाचा वेळ,
इथे दिलेला ३० मिनिटाचा वेळ, हा तयार कचोर्यांमधे मसाला भरून खाऊन संपवायला लागणारा वेळ आहे >>
एरवी मी कचोरीची रेसिपी वाचतच नाही. "राज" म्हणलं म्हणून धागा उघडला, ३० मि. म्हणून वाचला, तर शेवटी असं... जा सिमरन खा ले अपनी कचोरी...
तुम्ही आलात की तुम्हाला
तुम्ही आलात की तुम्हाला किडनॅप करायची योजना करून ठेवलेली आहे. दोन, चार दिवसांत सर्व पदार्थ करून घेऊन मग हत्तीवरून परत सोडून देण्यात येईल.
वॉव !! खावीशी वाटली. एवढा
वॉव !!
खावीशी वाटली.
एवढा खटाटोप करायचा धीर झाला की करणार.
छान! दिल्ली एअरपोर्टवर
छान!
दिल्ली एअरपोर्टवर खाल्ली ती आवडली नाही.
पण आधी दिल्ली की चंदिगढमध्ये खाल्ली ती एकदम मस्त होती.
वा..फारचं छान !
वा..फारचं छान !
तोंपासु
तोंपासु
मस्त...मस्त ! एकदम तोंपासु .
मस्त...मस्त ! एकदम तोंपासु .
अफलातून. मुंबईत खाल्लेली
अफलातून.
मुंबईत खाल्लेली नक्की कुठे ते आठवत नाही पण ग्रांटरोड/ काळबादेवी तिकडेच कुठेतरी. नंतर बे-एरियात एल-कामिनो वर इंदोरी चाट दुकानात भारी मिळालेली. मग बेकरीत असताना रोज तीच खायचो.
ही कितीही कॉम्प्लेक्स असली तरी नक्की करून बघणार. धन्यवाद.
फोटो मस्त दिसतोय. थंडगार दही
फोटो मस्त दिसतोय. थंडगार दही हवं वरून... पोटात जाऊन गप्प बसते मग ही कचोरी
मी इथल्या पाकृप्रमाणे खस्ता कचोर्या केल्या होत्या. त्याही मस्त झाल्या होत्या.
.मस्त ! एकदम तोंपासु .
.मस्त ! एकदम तोंपासु .
वर्षु, मस्त रेसिपी. .
वर्षु, मस्त रेसिपी. . लिहीलयस ही छानच.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
मस्त!
मस्त!
राज कचोरी मस्त खाली ते दाब
राज कचोरी मस्त
खाली ते दाब चिंगरी काय ते ही पाहावे लागेल
मस्त पाककृती आणि फोटो एकदम
मस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु............
तोंपासु!! लागणारा वेळ >>
तोंपासु!!
लागणारा वेळ >>
खरचं बाई दंडवत तुम्हा
खरचं बाई दंडवत तुम्हा सुगरणींना ___/\___ किती तो उत्साह.
नाहीतर मी आळशी, चिवडा करण्यासाठी पोहे आणुन ठेवलेत महिन्याभरापासुन, येत्या रविवारी करु करता करता ५ रविवार निघुन गेले
तोपांसु
तोपांसु
खरचं बाई दंडवत तुम्हा
खरचं बाई दंडवत तुम्हा सुगरणींना ___/\___ किती तो उत्साह.
नाहीतर मी आळशी, चिवडा करण्यासाठी पोहे आणुन ठेवलेत महिन्याभरापासुन, येत्या रविवारी करु करता करता ५ रविवार निघुन गेले >>>>>>>>>>>>>>>>>>> तूच माझी खरी मैत्रिण.
नाहीतर मी आळशी, चिवडा
नाहीतर मी आळशी, चिवडा करण्यासाठी पोहे आणुन ठेवलेत महिन्याभरापासुन, येत्या रविवारी करु करता करता ५ रविवार निघुन गेले >>>>>>>>>>>>>>>>>>> खरचं, सेम हिअर. आता त्याचा चिवडा न करता दडपे पोहे वैगेरे करुनच संपवीन बहुतेक
सही दिसतेय. आता घरी कचोरी
सही दिसतेय. आता घरी कचोरी बनवण्याचीही हौस भागवुन घेइन.
ऑफीसच्या बाहेरच इन्दौरी कचोरीची गाडी लागली होती. एका कचोरीतच पोट भरत होत.
गावाकडे मिळणार्या कचोरीत भाजलेल्या मिश्रणासोबत मुगाची दाळ भरलेली असते. एक नम्बर लागतात त्या ही कचोर्या.
मस्त!
मस्त!
वर्षू, तुझा पुण्याचा दौरा
वर्षू, तुझा पुण्याचा दौरा कधी आहे पुन्हा?
सगळे साहित्य पुरविले जाईल काळजी नको करुस!
तोंपासू पदार्थ एकदम!
नाहीतर मी आळशी, चिवडा
नाहीतर मी आळशी, चिवडा करण्यासाठी पोहे आणुन ठेवलेत महिन्याभरापासुन, येत्या रविवारी करु करता करता ५ रविवार निघुन गेले >>>>>>>>>>>>>>>>>>> खरचं, सेम हिअर. आता त्याचा चिवडा न करता दडपे पोहे वैगेरे करुनच संपवीन बहुतेक >>> मी तर त्याच्याही पलिकडे आहे.. मला पोहे बनवायचा सुद्धा कंटाळा येतो बरेचदा.. एकट तयार् करुन खाण्यात काहीच मजा नाही
कचोरी घरी बनवणे म्हणजे तू सर्वात सॉल्लीड्ड शेफ आहे ..
समोसा आणि कचोरी घरी बनवता येत नाही असा माझा पुर्वग्रह दुषित आहे ..
तरी करुन बघेल प्रयत्न..
वर्षूताई तोपासु आहे ग एकदम
वर्षूताई तोपासु आहे ग एकदम रेसिपी.
Pages