राज कचोरी

Submitted by वर्षू. on 1 March, 2016 - 20:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

राज कचोरी अशीच कुठे तरी, कधीतरी चाखलेली होती , ती चव आठवून तोंपासु होत होतं पण थोडी खटपटी ची असल्या कारणाने घरी करायचं टाळत आले होते .शेवटी या रविवारी करायचीच असं ठरवलं. दोन दिवस साहित्य पैदा करण्यात गेले पण परिवाराबरोबर एकत्र बसून स्वाद घेताना सर्व श्रमांचं चीज झालं..
ज्या कुणाला ,'केल्याने होते रे .." हे वाक्य सर्वप्रथम सुचले होते त्याला मनातल्या मनात ,' अगदी! अगदी" , +१ वगैरे वगैरे करून टाकले Proud )

कचोरी करता लागणारे साहित्य.
१) मैदा २ कप
२) जाड रवा १/४ कप
३) बेकिंग सोडा , दोन चिमूट
४) मीठ - १ टी स्पून
५) साधारण अर्धी वाटी कोरडे भाजलेले अमचूर्,तिखट्,बेसन . ( मी अंदाजानेच घेतले आहेत हे तिन्ही जिन्नस )

कचोरीत भरण्याकरता -
१) उकडून घेतलेले छोले , काळे चणे , मोड आलेले मूग , बटाटे
२) फेटून घेतलेले ताजे दही
३) तिखट हिरवी चटणी
४) चिंचे ची गोड चटणी
५) जिरे भाजून केलेली पूड
६) काळे मीठ / साधे मीठ
७) कोणताही चाट मसाला.
८) अमचूर
९) तिखट
१०) सजवण्याकरता शेव , कोथिंबीर .( काही मैत्रीणी उत्साहाच्या भरात डाळिंबाचे दाणेबिणे ही टाकतात वरून, जे मला अज्जिब्बात आवडत नाहीत Happy )

क्रमवार पाककृती: 

१) प्रथम कचोरी बनवण्याकरता मैदा, बेकिंग सोडा, रवा मिसळून , पुरी च्या कणकेप्रमाणे घट्ट मळावे. खूप मळून मऊ करावे.दहा मिनिटे झाकून ठेवावे.
२) लहान गोळे करून घ्या. पुरी सारखे लाटून ,तीवर थोडेसे भाजून घेतलेले बेसन मिक्श्चर पसरा. पुन्हा गोळा करून ३,३.५ इन्चा च्या व्यासा ची पुरी लाटून तळून घ्या. सर्व कचोर्‍या तळून झाल्यावर झाकण न घालता उघड्यावरच थंड करत ठेवा.
३) थंड झाल्यावर कचोर्‍या कडक होतील . मग वरचा पापुद्रा फोडून आत वरील सर्व जिन्नस एकत्र करून भरा.
न फुगलेल्या कचोर्‍या ही चुरून या फिलिंग मधे अ‍ॅड करू शकता.
४) वरून शेव , कोथिंबीर घालून सर्व करा.

वाढणी/प्रमाण: 
माणशी, ३ ते ४ कचोर्‍या पोटभरी च्या आहेत.
अधिक टिपा: 

दोन दिवसापूर्वी शेव आणी दोन्ही चटण्या , एक दिवस आधी कचोर्‍या करून एअर टाईट डब्यात ठेवल्या कि तिसर्‍या दिवशी फिलिंग करता चणे,छोले उकडून मसाला लावून तयार करणे एव्हढेच काम असते.
इथे दिलेला ३० मिनिटाचा वेळ, हा तयार कचोर्‍यांमधे मसाला भरून खाऊन संपवायला लागणारा वेळ आहे Lol

माहितीचा स्रोत: 
नेट वरचा अभ्यास!!!
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंपासु!
आमच्यकडं मिळणार्‍या रा.क.मध्ये दहीभल्ले पण असतात. वर चिंखची गोड चटणी आणि कचोरी दिसणार नाही इतके गोड दही वर. एक रा.क.मध्ये ४ साध्या कचोर्‍या सहज मावतील, एवढी मोठी असते.

मस्तच.. करुन पाहणार..
अजून एक , कोणी सोलापूरला कचोरी खाल्ली आहे का? त्यात जे एक प्रकार्चे पातळ सारण्/चटणी असते ते अप्रतिम लागते.. कोणाला त्याची रेसिपी येत असेल तर द्या न प्लिज..

सिमंतिनी , सिमरन... Rofl Rofl Lol

बेफि.. Lol ते पाथरवटांचं लक्षात असू द्या फक्त... Wink

थांकु थांकु सर्वांना.. पण खरंच हे काम दोन तीन दिवसांत डिवाईड केलं कि इत्कं वाटत नाही.. इकडे तर शेव पण मिळण्याचे वांधे.. म्हणून शेव, आणी इतर फरसाण पण घरीच करावे लागते..

चिन्नु, यस्स.. खर्री राज कचोरी चांगली तळहाता एव्हढी खाल्लीये , बस एक ही काफी है..घरच्या आपल्या जर्राशा नाजूक साजूक, म्हणून २,३ खाल्ल्या जातात.

काय गं तु तीच वर्षू नील आहेस जिला मी भेटलेले? की त्याच नावाची ड्यु आय?????

पुरी, मैदा, जाड रवा वगैरे साहित्य वाचुन परत लेखिकेचे नाव वाचले. वर्षू नील म्हणजे चँग च्यून्ग रेसिपी टाकायच्या.. हे मैदा बिय्दा प्रकरण तु कधीपासुन????/

रेसिपी मस्तच... जरा तळतानाच्या टम्म फुगलेल्या पु-या चिकटवल्या असत्यास फोटोतुन तर काय बिघडले असते.????. पुरी लाटून तळून घ्या........ असे कोरडे लिहुन सगळा रोमान्सच काढुन टाकला. राज कचोरीची सगळी नजाकत त्या गरगरीत टाम्म फुगलेल्या पुरीत असते. ती तशी गरगरीत फुगलेली राहावी यासाठीच्या सुचना देण्यात कित्ती कित्ती फुटेज खाता आले असते. तुने तो एकदम आर्ट फिल्म बना डाली यार... नो मसाला... Sad

राज कचोरी असेच नाव आहे होय..मला वाटले राज स्वीटस मधील फेमस कचोरी म्हणून राज कचोरी.

फोटो मस्त आलाय. एवढ्यातच एका रेस्टॉरंटमध्ये खाल्ली, मला तरी फार अपील नाही झाली त्यामुळे एवढा खटाटोप काही करणार नाही Happy

भारी रेस्पी. खटपट आहेच पण. त्यापेक्षा हाटेलात हाणावी अती सोपा प्रकार! Light 1 Wink

राज कचोरी नागपुरातल्या इतवारी भागात असलेल्या हल्दिरामच्या अभिनंदन रेस्टोमध्ये खाल्लीय तेव्हढी मस्त अजून कुठेही नाही मिळाली.
गोल गरगरीत, चांगली तळहाताएवढी मोठी, टाम्म-टुम्म फुगलेली कचोरी. आत सुक्यामेव्याचं खव्यात (माव्यात) बनवलेलं जरा तिखट पण वेगळाच पोत असलेलं सारण + वरून उकडलेल्या बटाट्याच्या फोडी क्रिस्प केलेल्या + पनीर चे क्यूब्स ते ही क्रिस्प केलेले + बाकी चटण्या + फेटून मस्त स्मूथ केलेलं दही, बारीक शेव आणि चाट मसाला वर कोथिंबिरीचं पान. लई भारी प्रकार होता. आता मिळतो का ते नाही माहीत.

साधना... हीहीही..मै वोईच हूँ रे... Happy च्यांगचुंग वाली

कचोर्‍या .. माझ्याच धडक्या राहिल्या याचाच आनंद झाला म्हणून टमटमीत फुगीर राहण्याकरता सूचना देण्यात फुटेज नही खाया..

आय लाईक शाम बेनेगल Wink

सिंडरेला.. जुन्या तेलात तळलेली किंवा तळकट तळलेली असेल तर ही काय कोणतीही कचोरी, वडे अगदी नकोसे होतात.. एकदम ताजी व पर्रफेक्ट तळलेली आणी व्यवस्थित मीठमसाला असलेलीच छान लागते.

योकु, हल्दिराम साऊंड्स तोंपासु.. रेस्टोरेंट्स मधे बरेच वेरिएशन्स मिळत असतील..

खुप कष्टाचं काम दिसतंय. मुंबईत असताना कधि हा प्रकार बघितला/खाल्ला नाहि पण इथे नविनच उघडलेल्या एका चाट/मिठाईच्या दुकानात खाल्ला; आवडला.

पण कचोरीला हेच नांव का दिलं गेलं असावं, बरं?.. Wink

माय god, कसली भारी केलीय, मस्तच वर्षुताई. आमचापण ___/\___ स्वीकारा.

आता वाचून भूक लागली, खायला लागेल काहीतरी.

वॉव टीना.. कातिल फोटो खरंच..
रेडीमेड कचोर्‍या जर्रा तेलकट असतात ना??? पण तू बाकी सर्व घरीच बनवलंस .. बरीच उत्साही आहेस.. गुड जॉब !!!! Happy
झटपट डिश हवी असेल तर तयार कचोर्‍यांचा पर्याय मस्तं आहे..

आमच्या इथे बिकानेरमध्ये टिना वाली कचोरी मिळते. पण ती फक्त कचोरी, राजकचोरी नाही. बिकानेरवली कचोरीचे आवरण कडक नसते तर खुसखुशीत असते, आत कचोरी बनवताना घातलेले मुगाचे सारण असते आणि त्या सारणावर चटण्या, दही, शेव इत्यादी असते. कचोरी जरा बसकट असते. टम्म फुटबॉल नसतो. कधी कधी नुसत्याच कचोर्या, नो सारण. या खरेतर मंजुडीने लिंक दिलेल्या खस्ता कचॊऱ्या आहेत, राजकचोऱ्या नव्हे. साधारण 20 रुपये ते 30 रुपये प्लेट असते.

मी राजकचोरी म्हणून जे खाल्लंय तो कडक असा टम्म फुटबॉल होता. त्यात सारण नसते. वर्षूने लिहिलेय तसे त्यात छोले बिले आणि जशी किंमत असेल तसे अजून बरेच काही घालून सजवतात आणि देतात. मी खाल्लेली तेव्हा किंमत 35 रुपये होती. तेव्हा बाकीचे चाट आयटम 15 पर्यंत मिळायचे. गेल्या कित्येक वर्षात खाल्लि नाहीय. मला ती कडक पुरी शिळी असणार असे का वाट्तेदेव जाणे. तशा तर पाणीपुरीच्या पुर्याही शिळ्या असतात.

वाशीला क्षीरसागर म्हणून हॉटेल होते त्यात बटाट्याचा किस मोठ्या बोलच्या आकारात तळून त्यात सगळा मालमसाला भरलेली बटाटा चाट खाल्लेली.

साधना, ऑफिसात मिळते ना ही राजकचोरी (चाट)? बिल्डिंग 2 की 3च्या ग्राउंड फ्लोरला? की आता नाही मिळत? मी तिकडे होते तेव्हा आठवड्यातून किमान एकदा खायचो आम्ही (सगळे मिळून).

मिळते ग अजूनही. 2a, 3a दोन्हीकडे मिळते. मी कधीमधी खाते. एकट्याने खायचा नाही हा जिन्नस. पोट जडभारी होऊन जाते.

Pages