राज कचोरी

Submitted by वर्षू. on 1 March, 2016 - 20:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

राज कचोरी अशीच कुठे तरी, कधीतरी चाखलेली होती , ती चव आठवून तोंपासु होत होतं पण थोडी खटपटी ची असल्या कारणाने घरी करायचं टाळत आले होते .शेवटी या रविवारी करायचीच असं ठरवलं. दोन दिवस साहित्य पैदा करण्यात गेले पण परिवाराबरोबर एकत्र बसून स्वाद घेताना सर्व श्रमांचं चीज झालं..
ज्या कुणाला ,'केल्याने होते रे .." हे वाक्य सर्वप्रथम सुचले होते त्याला मनातल्या मनात ,' अगदी! अगदी" , +१ वगैरे वगैरे करून टाकले Proud )

कचोरी करता लागणारे साहित्य.
१) मैदा २ कप
२) जाड रवा १/४ कप
३) बेकिंग सोडा , दोन चिमूट
४) मीठ - १ टी स्पून
५) साधारण अर्धी वाटी कोरडे भाजलेले अमचूर्,तिखट्,बेसन . ( मी अंदाजानेच घेतले आहेत हे तिन्ही जिन्नस )

कचोरीत भरण्याकरता -
१) उकडून घेतलेले छोले , काळे चणे , मोड आलेले मूग , बटाटे
२) फेटून घेतलेले ताजे दही
३) तिखट हिरवी चटणी
४) चिंचे ची गोड चटणी
५) जिरे भाजून केलेली पूड
६) काळे मीठ / साधे मीठ
७) कोणताही चाट मसाला.
८) अमचूर
९) तिखट
१०) सजवण्याकरता शेव , कोथिंबीर .( काही मैत्रीणी उत्साहाच्या भरात डाळिंबाचे दाणेबिणे ही टाकतात वरून, जे मला अज्जिब्बात आवडत नाहीत Happy )

क्रमवार पाककृती: 

१) प्रथम कचोरी बनवण्याकरता मैदा, बेकिंग सोडा, रवा मिसळून , पुरी च्या कणकेप्रमाणे घट्ट मळावे. खूप मळून मऊ करावे.दहा मिनिटे झाकून ठेवावे.
२) लहान गोळे करून घ्या. पुरी सारखे लाटून ,तीवर थोडेसे भाजून घेतलेले बेसन मिक्श्चर पसरा. पुन्हा गोळा करून ३,३.५ इन्चा च्या व्यासा ची पुरी लाटून तळून घ्या. सर्व कचोर्‍या तळून झाल्यावर झाकण न घालता उघड्यावरच थंड करत ठेवा.
३) थंड झाल्यावर कचोर्‍या कडक होतील . मग वरचा पापुद्रा फोडून आत वरील सर्व जिन्नस एकत्र करून भरा.
न फुगलेल्या कचोर्‍या ही चुरून या फिलिंग मधे अ‍ॅड करू शकता.
४) वरून शेव , कोथिंबीर घालून सर्व करा.

वाढणी/प्रमाण: 
माणशी, ३ ते ४ कचोर्‍या पोटभरी च्या आहेत.
अधिक टिपा: 

दोन दिवसापूर्वी शेव आणी दोन्ही चटण्या , एक दिवस आधी कचोर्‍या करून एअर टाईट डब्यात ठेवल्या कि तिसर्‍या दिवशी फिलिंग करता चणे,छोले उकडून मसाला लावून तयार करणे एव्हढेच काम असते.
इथे दिलेला ३० मिनिटाचा वेळ, हा तयार कचोर्‍यांमधे मसाला भरून खाऊन संपवायला लागणारा वेळ आहे Lol

माहितीचा स्रोत: 
नेट वरचा अभ्यास!!!
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे दिलेला ३० मिनिटाचा वेळ, हा तयार कचोर्‍यांमधे मसाला भरून खाऊन संपवायला लागणारा वेळ आहे >> Biggrin
एरवी मी कचोरीची रेसिपी वाचतच नाही. "राज" म्हणलं म्हणून धागा उघडला, ३० मि. म्हणून वाचला, तर शेवटी असं... Biggrin जा सिमरन खा ले अपनी कचोरी...

तुम्ही आलात की तुम्हाला किडनॅप करायची योजना करून ठेवलेली आहे. दोन, चार दिवसांत सर्व पदार्थ करून घेऊन मग हत्तीवरून परत सोडून देण्यात येईल. Light 1

छान!

दिल्ली एअरपोर्टवर खाल्ली ती आवडली नाही.

पण आधी दिल्ली की चंदिगढमध्ये खाल्ली ती एकदम मस्त होती.

अफलातून.
मुंबईत खाल्लेली नक्की कुठे ते आठवत नाही पण ग्रांटरोड/ काळबादेवी तिकडेच कुठेतरी. नंतर बे-एरियात एल-कामिनो वर इंदोरी चाट दुकानात भारी मिळालेली. मग बेकरीत असताना रोज तीच खायचो.
ही कितीही कॉम्प्लेक्स असली तरी नक्की करून बघणार. धन्यवाद. Happy

फोटो मस्त दिसतोय. थंडगार दही हवं वरून... पोटात जाऊन गप्प बसते मग ही कचोरी Lol

मी इथल्या पाकृप्रमाणे खस्ता कचोर्‍या केल्या होत्या. त्याही मस्त झाल्या होत्या.

खरचं बाई दंडवत तुम्हा सुगरणींना ___/\___ किती तो उत्साह.

नाहीतर मी आळशी, चिवडा करण्यासाठी पोहे आणुन ठेवलेत महिन्याभरापासुन, येत्या रविवारी करु करता करता ५ रविवार निघुन गेले Proud

खरचं बाई दंडवत तुम्हा सुगरणींना ___/\___ किती तो उत्साह.

नाहीतर मी आळशी, चिवडा करण्यासाठी पोहे आणुन ठेवलेत महिन्याभरापासुन, येत्या रविवारी करु करता करता ५ रविवार निघुन गेले >>>>>>>>>>>>>>>>>>> तूच माझी खरी मैत्रिण.

नाहीतर मी आळशी, चिवडा करण्यासाठी पोहे आणुन ठेवलेत महिन्याभरापासुन, येत्या रविवारी करु करता करता ५ रविवार निघुन गेले >>>>>>>>>>>>>>>>>>> खरचं, सेम हिअर. आता त्याचा चिवडा न करता दडपे पोहे वैगेरे करुनच संपवीन बहुतेक

सही दिसतेय. आता घरी कचोरी बनवण्याचीही हौस भागवुन घेइन.
ऑफीसच्या बाहेरच इन्दौरी कचोरीची गाडी लागली होती. एका कचोरीतच पोट भरत होत. Biggrin
गावाकडे मिळणार्‍या कचोरीत भाजलेल्या मिश्रणासोबत मुगाची दाळ भरलेली असते. एक नम्बर लागतात त्या ही कचोर्या.

वर्षू, तुझा पुण्याचा दौरा कधी आहे पुन्हा?

सगळे साहित्य पुरविले जाईल काळजी नको करुस! Happy

तोंपासू पदार्थ एकदम! Happy

नाहीतर मी आळशी, चिवडा करण्यासाठी पोहे आणुन ठेवलेत महिन्याभरापासुन, येत्या रविवारी करु करता करता ५ रविवार निघुन गेले >>>>>>>>>>>>>>>>>>> खरचं, सेम हिअर. आता त्याचा चिवडा न करता दडपे पोहे वैगेरे करुनच संपवीन बहुतेक >>> मी तर त्याच्याही पलिकडे आहे.. मला पोहे बनवायचा सुद्धा कंटाळा येतो बरेचदा.. एकट तयार्‍ करुन खाण्यात काहीच मजा नाही Sad

कचोरी घरी बनवणे म्हणजे तू सर्वात सॉल्लीड्ड शेफ आहे ..
समोसा आणि कचोरी घरी बनवता येत नाही असा माझा पुर्वग्रह दुषित आहे ..
तरी करुन बघेल प्रयत्न..

Pages