राज कचोरी

Submitted by वर्षू. on 1 March, 2016 - 20:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

राज कचोरी अशीच कुठे तरी, कधीतरी चाखलेली होती , ती चव आठवून तोंपासु होत होतं पण थोडी खटपटी ची असल्या कारणाने घरी करायचं टाळत आले होते .शेवटी या रविवारी करायचीच असं ठरवलं. दोन दिवस साहित्य पैदा करण्यात गेले पण परिवाराबरोबर एकत्र बसून स्वाद घेताना सर्व श्रमांचं चीज झालं..
ज्या कुणाला ,'केल्याने होते रे .." हे वाक्य सर्वप्रथम सुचले होते त्याला मनातल्या मनात ,' अगदी! अगदी" , +१ वगैरे वगैरे करून टाकले Proud )

कचोरी करता लागणारे साहित्य.
१) मैदा २ कप
२) जाड रवा १/४ कप
३) बेकिंग सोडा , दोन चिमूट
४) मीठ - १ टी स्पून
५) साधारण अर्धी वाटी कोरडे भाजलेले अमचूर्,तिखट्,बेसन . ( मी अंदाजानेच घेतले आहेत हे तिन्ही जिन्नस )

कचोरीत भरण्याकरता -
१) उकडून घेतलेले छोले , काळे चणे , मोड आलेले मूग , बटाटे
२) फेटून घेतलेले ताजे दही
३) तिखट हिरवी चटणी
४) चिंचे ची गोड चटणी
५) जिरे भाजून केलेली पूड
६) काळे मीठ / साधे मीठ
७) कोणताही चाट मसाला.
८) अमचूर
९) तिखट
१०) सजवण्याकरता शेव , कोथिंबीर .( काही मैत्रीणी उत्साहाच्या भरात डाळिंबाचे दाणेबिणे ही टाकतात वरून, जे मला अज्जिब्बात आवडत नाहीत Happy )

क्रमवार पाककृती: 

१) प्रथम कचोरी बनवण्याकरता मैदा, बेकिंग सोडा, रवा मिसळून , पुरी च्या कणकेप्रमाणे घट्ट मळावे. खूप मळून मऊ करावे.दहा मिनिटे झाकून ठेवावे.
२) लहान गोळे करून घ्या. पुरी सारखे लाटून ,तीवर थोडेसे भाजून घेतलेले बेसन मिक्श्चर पसरा. पुन्हा गोळा करून ३,३.५ इन्चा च्या व्यासा ची पुरी लाटून तळून घ्या. सर्व कचोर्‍या तळून झाल्यावर झाकण न घालता उघड्यावरच थंड करत ठेवा.
३) थंड झाल्यावर कचोर्‍या कडक होतील . मग वरचा पापुद्रा फोडून आत वरील सर्व जिन्नस एकत्र करून भरा.
न फुगलेल्या कचोर्‍या ही चुरून या फिलिंग मधे अ‍ॅड करू शकता.
४) वरून शेव , कोथिंबीर घालून सर्व करा.

वाढणी/प्रमाण: 
माणशी, ३ ते ४ कचोर्‍या पोटभरी च्या आहेत.
अधिक टिपा: 

दोन दिवसापूर्वी शेव आणी दोन्ही चटण्या , एक दिवस आधी कचोर्‍या करून एअर टाईट डब्यात ठेवल्या कि तिसर्‍या दिवशी फिलिंग करता चणे,छोले उकडून मसाला लावून तयार करणे एव्हढेच काम असते.
इथे दिलेला ३० मिनिटाचा वेळ, हा तयार कचोर्‍यांमधे मसाला भरून खाऊन संपवायला लागणारा वेळ आहे Lol

माहितीचा स्रोत: 
नेट वरचा अभ्यास!!!
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसिपी मस्तच .. खुणावत आहे पण भितीही वाटते .. Happy

>> तेव्हा आठवड्यातून किमान एकदा खायचो आम्ही (सगळे मिळून).

सगळे मिळून एकच (दो दोस्त एक प्याली में चाय पियेंगे? ;)) की सगळे मिळून आपापली कचोरी खायचे? Wink

यप.. साधना.. इंदौर ला खाल्ली होती अशी गपगार करणारी राजकचोरी.. अर्ध्यातच क्लीन बोल्ड झाले.. घरी येऊन हिंगवटी , हाजमोला इ.इ. प्रकार खावे लागले. तेंव्हा पासून रेडीमेड कचोरीची धास्तीच बसलीये मला Lol

Pages