कविता हा तसा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कवितेशी आपली ओळख आपल्या जन्मापासूनच होत असावी. बाळाला झोपवायला घेतलं की, आपोआप आई काहीतरी गुणगुणू लागते आणि आईच्या तोंडाकडे पाहत, ते गुणगुणणं ऐकत बाळ कधी झोपतं ते आईलाही कळत नाही.
शाळेत गेल्यावरही पहिली ओळख होते ती बडबडगीतांशी. बहुतेक सगळ्या लहान मुलांना 'मग शाळेत काय काय कविता, पोएम्स्, शिकवल्या तुला?' या प्रश्नाचा सामना करावा लागलेला आहे. मग काही धीट मुलं धडाधड कविता म्हणून दाखवतात, तर काही आईमागे लपून प्रश्नकर्ता कधी जातोय, याची वाट पाहतात.
कविता अशा जन्मापासूनच आपल्या सोबत असल्यामुळे की काय, अगदी पहिलीत वाचलेली कविताही आपल्याला वयाच्या पन्नाशीत जशीच्या तशी आठवत असते.
तर अशाच काही कविता, ज्यांच्याबरोबर आपण वाढलो, आज आम्ही इथे सादर करतोय, पण प्रकाशचित्रांमधून. कवितेच्या आशयाला समर्पक अशी काही प्रकाशचित्रे आम्ही देऊ, ज्यातून चाणाक्ष मायबोलीकर ती कविता ओळखतील.
हा एक खेळ आहे, आपल्याला भावलेल्या कविता प्रकाशचित्रांच्या माध्यमातून परत एकदा अनुभवण्याचा.
मंडळी, गुगलबाबाची मदत न घेता, केवळ स्मृतीवर विसंबुन कविता ओळखता येतात का हा शोध घ्यायला किती गंमत येईल ना? गुगलबाबावर तर रोबोसुद्धा कविता शोधेल, पण त्या शोधाला स्मृतींचा गंध असेल का?
प्रकाशचित्रांवरुन आठवणीत वसलेली कविता शोधायची गंमत अनुभवताना कदाचित असेही होईल की नंतर कधीतरी कवितेला परत भेट देताना इथले एखादे प्रकाशचित्र लख्खकन डोळ्यासमोर चमकुन जाईल. तेव्हा गुगलची मदत न घेता आपल्याला किती आठवतेय याचा अनुभव आणि आनंद एकदा नक्कीच घेऊन बघा.
कविता क्र. १ - 'पानगळ' - इंदिरा संत - विजेती- रैना
कविता क्र. २ - 'कणा' - कुसुमाग्रज - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ३ - 'कोलंबसाचे गर्वगीत' - कुसुमाग्रज - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ४ - 'गवतफुला' - इंदिरा संत - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ५ - 'सांगा कसे जगायचे' - मंगेश पाडगावकर - विजेती- सोनू.
कविता क्र. ६ - 'तुतारी '- केशवसुत - विजेते - गजानन
कविता क्र. ७ - 'श्रावणमासी हर्ष मानसी'- बालकवी - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ८ - 'जोगिया'- ग .दि .माडगुळकर - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ९ - 'पैठणी'- शांता शेळके - विजेते - शब्दाली
कविता क्र. १०- 'देणा-याचे हात घ्यावे. '- विंदा करंदीकर - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ११- 'मराठी असे आमुची मायबोली '- माधव ज्युलियन - विजेते - रैना
कविता क्र. १२- 'धरित्रीच्या कुशीमध्ये '- बहिणाबाई चौधरी - विजेते - मानव पृथ्वीकर
कविता क्र. १३- 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले'- बा.भ. बोरकर - विजेते - स्निग्धा
कोंबड्यावर अनिलांची एक
कोंबड्यावर अनिलांची एक मुक्तछंदातली कविता.आहे.
आस्तिन का साप ला मराठीत काय
आस्तिन का साप ला मराठीत काय म्हणातात?
टर्की वर कविता ???
टर्की वर कविता ???
गजानन ,ऋचा मी पण माझ्या
गजानन ,ऋचा मी पण माझ्या गोंधळाला जाम हसले….
या खेळात भाग घेणारया सर्व संवंगड्यांना अन संयोजकांना काजु कतरी ..........
धन्यवाद मानव प्रुथ्वीकर !
मित, आधीची खूण, आणि आताची,
मित, आधीची खूण, आणि आताची, संबंध शोधा
परदेशी पक्षी ?
परदेशी पक्षी ?
देशाचे नाव, पक्षाचेही नाव,
देशाचे नाव, पक्षाचेही नाव, असा काही संबंध आहे का?
हो
हो
पाखरा जा दूर देशी ? (अगदीच
पाखरा जा दूर देशी ?
(अगदीच काहीतरी गेस असावा हा
)
पक्षी कोणता आहे तो ? मी अगदीच
पक्षी कोणता आहे तो ?
मी अगदीच ढ आहे ते ओळखण्यात
ऋचा नाही. देशाचे नाव,
ऋचा नाही.
देशाचे नाव, पक्षाचेही नाव
पाखरा येशिल का परतून ?
पाखरा येशिल का परतून ? रेव्हरंड टिळक
पक्षी टर्कीच आहे
पक्षी टर्कीच आहे
कविता ११, खूण तिसरी
कविता ११, खूण तिसरी
ऋचा पुढे आठवा
ऋचा
पुढे आठवा
विदेशी राणी? काय बरे असावे?
विदेशी राणी? काय बरे असावे?
गजानन, टर्कीला विसरु नका हो
गजानन, टर्कीला विसरु नका हो
टर्की पक्षी आणि वर टर्की
टर्की पक्षी आणि वर टर्की देशही ... दोन दोनदा टर्की... काहीतरी संबंध असेल ना??
रुपेरी वाळूत माडांच्या बनात
रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना
बनात ये ना, जवळ घे ना
चंदेरी चाहूल लावीत प्रीतित ये ना
प्रीतित ये ना, जवळ घे ना
कविता ११ आहे ही.. क्रम बरोबर
कविता ११ आहे ही.. क्रम बरोबर करा प्लीज
टर्कीश वर आहे काही तरी
टर्कीश वर आहे काही तरी
कुण्या देशीचे पाखरू, माझ्या
कुण्या देशीचे पाखरू, माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेशी, परी ओळखीचे डोळे
तरुण तुर्क म्हातारे अर्क
तरुण तुर्क म्हातारे अर्क
बी, टर्की कुठे गेला?
बी, टर्की कुठे गेला?
कुण्या गावच आल पाखरु, बसलेय
कुण्या गावच आल पाखरु, बसलेय डौलात
कुण्या गावच आल पाखरु, बसलेय
कुण्या गावच आल पाखरु, बसलेय डौलात >>> हेच मलाही आठवलं होतं पण हे अगदीच कैतरी होईल असं वाटलं
कुठल्या तरी एका मराठी कवितेत
कुठल्या तरी एका मराठी कवितेत इस्तांबुल/इस्तंबुलचा उल्लेख आहे पण ती कविता आठवत नाही. बहुतेक ही ती कविता असावी
आपल्याला कविता शोधायची आहे
आपल्याला कविता शोधायची आहे
बी एकदम सिक्सर मारताहेत..
बी एकदम सिक्सर मारताहेत.. टर्की पाहुन एकदम रुपेरी वाळूबिळू.....
आपल्याला कविता शोधायची आहे
आपल्याला कविता शोधायची आहे फिदीफिदी >> हो की
Pages