कविता हा तसा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कवितेशी आपली ओळख आपल्या जन्मापासूनच होत असावी. बाळाला झोपवायला घेतलं की, आपोआप आई काहीतरी गुणगुणू लागते आणि आईच्या तोंडाकडे पाहत, ते गुणगुणणं ऐकत बाळ कधी झोपतं ते आईलाही कळत नाही.
शाळेत गेल्यावरही पहिली ओळख होते ती बडबडगीतांशी. बहुतेक सगळ्या लहान मुलांना 'मग शाळेत काय काय कविता, पोएम्स्, शिकवल्या तुला?' या प्रश्नाचा सामना करावा लागलेला आहे. मग काही धीट मुलं धडाधड कविता म्हणून दाखवतात, तर काही आईमागे लपून प्रश्नकर्ता कधी जातोय, याची वाट पाहतात.
कविता अशा जन्मापासूनच आपल्या सोबत असल्यामुळे की काय, अगदी पहिलीत वाचलेली कविताही आपल्याला वयाच्या पन्नाशीत जशीच्या तशी आठवत असते.
तर अशाच काही कविता, ज्यांच्याबरोबर आपण वाढलो, आज आम्ही इथे सादर करतोय, पण प्रकाशचित्रांमधून. कवितेच्या आशयाला समर्पक अशी काही प्रकाशचित्रे आम्ही देऊ, ज्यातून चाणाक्ष मायबोलीकर ती कविता ओळखतील.
हा एक खेळ आहे, आपल्याला भावलेल्या कविता प्रकाशचित्रांच्या माध्यमातून परत एकदा अनुभवण्याचा.
मंडळी, गुगलबाबाची मदत न घेता, केवळ स्मृतीवर विसंबुन कविता ओळखता येतात का हा शोध घ्यायला किती गंमत येईल ना? गुगलबाबावर तर रोबोसुद्धा कविता शोधेल, पण त्या शोधाला स्मृतींचा गंध असेल का?
प्रकाशचित्रांवरुन आठवणीत वसलेली कविता शोधायची गंमत अनुभवताना कदाचित असेही होईल की नंतर कधीतरी कवितेला परत भेट देताना इथले एखादे प्रकाशचित्र लख्खकन डोळ्यासमोर चमकुन जाईल. तेव्हा गुगलची मदत न घेता आपल्याला किती आठवतेय याचा अनुभव आणि आनंद एकदा नक्कीच घेऊन बघा.
कविता क्र. १ - 'पानगळ' - इंदिरा संत - विजेती- रैना
कविता क्र. २ - 'कणा' - कुसुमाग्रज - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ३ - 'कोलंबसाचे गर्वगीत' - कुसुमाग्रज - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ४ - 'गवतफुला' - इंदिरा संत - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ५ - 'सांगा कसे जगायचे' - मंगेश पाडगावकर - विजेती- सोनू.
कविता क्र. ६ - 'तुतारी '- केशवसुत - विजेते - गजानन
कविता क्र. ७ - 'श्रावणमासी हर्ष मानसी'- बालकवी - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ८ - 'जोगिया'- ग .दि .माडगुळकर - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ९ - 'पैठणी'- शांता शेळके - विजेते - शब्दाली
कविता क्र. १०- 'देणा-याचे हात घ्यावे. '- विंदा करंदीकर - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ११- 'मराठी असे आमुची मायबोली '- माधव ज्युलियन - विजेते - रैना
कविता क्र. १२- 'धरित्रीच्या कुशीमध्ये '- बहिणाबाई चौधरी - विजेते - मानव पृथ्वीकर
कविता क्र. १३- 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले'- बा.भ. बोरकर - विजेते - स्निग्धा
मराठी असे आमुची मायबोली
मराठी असे आमुची मायबोली
मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला
यशाची पुढे दिव्य आशा असे
जरी पंचखंडातही मान्यता घे
स्वसत्ताबळे श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही
कुशीचा तिच्या, तीस केवी त्यजी
जरी मान्यता आज हिंदीस देई
उदेले नवे राष्ट्र हे हिंदवी
मनाचे मराठे मराठीस ध्याती
हिची जाणुनी योग्यता, थोरवी
असू दूर पेशावरी, उत्तरी वा
असू दक्षिणी दूर तंजावरी
मराठी असे आमुची मायबोली
अहो ज्ञानदेवीच देखा खरी
मराठी असे आमुची मायबोली
जरी भिन्नधर्मानुयायी असू
पुरी बाणली बंधुता अंतरंगी
हिच्या एक ताटांत आम्ही बसू
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू
वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी
जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे
हिला बैसवू वैभवाच्या शिरी
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा
नका फक्त पाहू हिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूप चापल्य देखा
पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा
न घालूं जरी वाङमयातील उंची
हिरे मोतियांचे हिला दागिने
"मराठी असे आमुची मायबोली"
वृथा ही बढाई सुकार्याविणे
मराठी असे आमुची मायबोली
अहो पारतंत्र्यांत ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षे-
मुळे खोल कालार्णवाच्या तळी
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्ने
नियोजू तयांना हिच्या मंडणी
नको रीण, देवोत देतील तेव्हा
जगांतील भाषा हिला खंडणी
कवी : माधव ज्यूलियन
शब्दालीला अनुमोदन. नुसतेच
शब्दालीला अनुमोदन.
नुसतेच टर्कीचे चित्र पाहून ही कविता तर्क करणे म्हणजे मला तरी जमले नसते. पुढची चित्रे जी क्लू म्हणून दिली आहेत ती सगळीच पहिल्या पोस्टीत आली असती तर योग्य झाले असते असे मला वाटते. क्लू म्हणून दुसरी द्या कृपया.
आता नवीन खेळ चालू होतोय या
आता नवीन खेळ चालू होतोय या धाग्यावर
http://www.maayboli.com/node/57867
पण इथेही येतीलच आणखी कविता
ओळखत राहा
आम्ही परत आलोय नविन कवितेसह
आम्ही परत आलोय नविन कवितेसह
कविता १२, खूण पहिली

काळ्या मातीत...
काळ्या मातीत...
काळ्या मातीत मातीत तिफन चालते
काळ्या मातीत मातीत तिफन चालते
नाही नाही
नाही नाही
या नभाने या भुईला दान द्यावे
या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतूनी चैतन्य गावे ?
कविता १२ खूण दुसरी
कविता १२ खूण दुसरी

स्निग्धा जवळ आहात
स्निग्धा जवळ आहात
हो नभ उतरु आलं ...
हो नभ उतरु आलं
...
बीज अंकुरे अंकुरे
बीज अंकुरे अंकुरे
नभ कुठे दाखवले आतापर्यंत??
नभ कुठे दाखवले आतापर्यंत??
बीज अंकुरे अंकुरे >> हे बरोबर
बीज अंकुरे अंकुरे >> हे बरोबर वाटतय
डबल पोस्ट
डबल पोस्ट
कविन, प्रयत्न करा. अचूक दिशा
कविन, प्रयत्न करा. अचूक दिशा
पुढच्या चित्रात उतरतील नभ असा
पुढच्या चित्रात उतरतील नभ असा अंदाज घेऊन!
कविन यांची दिशा योग्य असेल
कविन यांची दिशा योग्य असेल तर.....
आधी बीज एकलें बीज अंकुरलें रोप वाढलें एका बीजापोटीं, तरु कोटी कोटी जन्म घेती
अंदाज नका ना घेऊ.
अंदाज नका ना घेऊ.
कृष्णा, दिशा थोडीशी बदला.
कृष्णा, दिशा थोडीशी बदला. अगदी किंचित
महानोर या शेतान लळा लाविला ?
महानोर
या शेतान लळा लाविला ?
नाही
नाही
या दूरच्या दूर ओसाड जागी कीडे
या दूरच्या दूर ओसाड जागी कीडे पाखारांवीन नाही कुणी
हा भूमिचा भाग आहे अभागी इथे एक आहे समाधी जुनी
मुक्तेश्वर कुळकर्णी . अगदीच
मुक्तेश्वर कुळकर्णी . अगदीच लांब गेलात.
अभागी भूमी नाही इथे
बीज अंकुरे अंकुरे ओल्या
बीज अंकुरे अंकुरे
ओल्या मातीच्या कुशीत
बापरे, काळ्या मातीच्या
बापरे, काळ्या मातीच्या धनावर तर कित्येक कविता लिहिल्या गेल्यात. आता त्यातुन संयोजकांच्या मनात कुठली हे ओळखणे कठिण...
मला वाट्ते की फोटोतुन एक क्रम दिसतोय. त्या दिशेने विचार केल्यास कदाचित काहीतरी हाती लागु शकेल.
धरणी आईची माया कशी जाईल वाया
धरणी आईची माया कशी जाईल वाया
कृष्णा, तुमचे विचार योग्य
कृष्णा, तुमचे विचार योग्य दिशेने जाताहेत. याच अर्थावर अजुन थोडा विचार करुन कविता शोधा.
या पिकल्या शेतावरं तुझ्या
या पिकल्या शेतावरं तुझ्या आभळाच जर
धरतीच्या कुशीमंदी बिजबियानं
धरतीच्या कुशीमंदी
बिजबियानं निजली
वर्हे पसरली माती
जशी शाल पांघरली
Pages