कविता हा तसा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कवितेशी आपली ओळख आपल्या जन्मापासूनच होत असावी. बाळाला झोपवायला घेतलं की, आपोआप आई काहीतरी गुणगुणू लागते आणि आईच्या तोंडाकडे पाहत, ते गुणगुणणं ऐकत बाळ कधी झोपतं ते आईलाही कळत नाही.
शाळेत गेल्यावरही पहिली ओळख होते ती बडबडगीतांशी. बहुतेक सगळ्या लहान मुलांना 'मग शाळेत काय काय कविता, पोएम्स्, शिकवल्या तुला?' या प्रश्नाचा सामना करावा लागलेला आहे. मग काही धीट मुलं धडाधड कविता म्हणून दाखवतात, तर काही आईमागे लपून प्रश्नकर्ता कधी जातोय, याची वाट पाहतात.
कविता अशा जन्मापासूनच आपल्या सोबत असल्यामुळे की काय, अगदी पहिलीत वाचलेली कविताही आपल्याला वयाच्या पन्नाशीत जशीच्या तशी आठवत असते.
तर अशाच काही कविता, ज्यांच्याबरोबर आपण वाढलो, आज आम्ही इथे सादर करतोय, पण प्रकाशचित्रांमधून. कवितेच्या आशयाला समर्पक अशी काही प्रकाशचित्रे आम्ही देऊ, ज्यातून चाणाक्ष मायबोलीकर ती कविता ओळखतील.
हा एक खेळ आहे, आपल्याला भावलेल्या कविता प्रकाशचित्रांच्या माध्यमातून परत एकदा अनुभवण्याचा.
मंडळी, गुगलबाबाची मदत न घेता, केवळ स्मृतीवर विसंबुन कविता ओळखता येतात का हा शोध घ्यायला किती गंमत येईल ना? गुगलबाबावर तर रोबोसुद्धा कविता शोधेल, पण त्या शोधाला स्मृतींचा गंध असेल का?
प्रकाशचित्रांवरुन आठवणीत वसलेली कविता शोधायची गंमत अनुभवताना कदाचित असेही होईल की नंतर कधीतरी कवितेला परत भेट देताना इथले एखादे प्रकाशचित्र लख्खकन डोळ्यासमोर चमकुन जाईल. तेव्हा गुगलची मदत न घेता आपल्याला किती आठवतेय याचा अनुभव आणि आनंद एकदा नक्कीच घेऊन बघा.
कविता क्र. १ - 'पानगळ' - इंदिरा संत - विजेती- रैना
कविता क्र. २ - 'कणा' - कुसुमाग्रज - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ३ - 'कोलंबसाचे गर्वगीत' - कुसुमाग्रज - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ४ - 'गवतफुला' - इंदिरा संत - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ५ - 'सांगा कसे जगायचे' - मंगेश पाडगावकर - विजेती- सोनू.
कविता क्र. ६ - 'तुतारी '- केशवसुत - विजेते - गजानन
कविता क्र. ७ - 'श्रावणमासी हर्ष मानसी'- बालकवी - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ८ - 'जोगिया'- ग .दि .माडगुळकर - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ९ - 'पैठणी'- शांता शेळके - विजेते - शब्दाली
कविता क्र. १०- 'देणा-याचे हात घ्यावे. '- विंदा करंदीकर - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ११- 'मराठी असे आमुची मायबोली '- माधव ज्युलियन - विजेते - रैना
कविता क्र. १२- 'धरित्रीच्या कुशीमध्ये '- बहिणाबाई चौधरी - विजेते - मानव पृथ्वीकर
कविता क्र. १३- 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले'- बा.भ. बोरकर - विजेते - स्निग्धा
हे बरोबर वाटतेय
हे बरोबर वाटतेय
नाही...... गेय रुप
नाही...... गेय रुप नाही. अजुन कविताच आहे. :
सर्वात्मका, शिवसुंदरा
सर्वात्मका, शिवसुंदरा .......
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमच्या ने जीवना ?
शेवटच्या खूणेकडे काळजीपुर्वक
शेवटच्या खूणेकडे काळजीपुर्वक पाहा. काय बरे सांगतेय ती खूण?
चुकली दिशा तरीही....
चुकली दिशा तरीही....
दिशा चुकत नाहीय. बरोबर
दिशा चुकत नाहीय. बरोबर आहे.... जगण्याचा मार्ग दाखवेल.
विजेत्यांचे अभिनंदन.
विजेत्यांचे अभिनंदन.
आता उजाडेल ...
आता उजाडेल ...
शेवटाचा फोटो पाहा, त्या
शेवटाचा फोटो पाहा, त्या फोटोतल्या भावना पाहा.. सगळे लक्षात येईल.
अजुन थोडी मदत...
अजुन थोडी मदत...
हसवे रडवे, संध्याकाळ, तिरीप??
हसवे रडवे, संध्याकाळ, तिरीप??
नुकतेच निधन पावलेले एक जेष्ठ
नुकतेच निधन पावलेले एक जेष्ठ मराठी कवी मंगेश पाडगावकर यांची ही एक सुंदर रचना आहे. आता बघा बरे ओळखता येते का ते?
सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत
सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत?
सोनू.साठी एकदा जोरदार टाळ्या
सोनू.साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊद्यात.....
आणि सोबत हे बक्षिस..
अभिनंदन सोनू
अभिनंदन सोनू
धन्यवाद संयोजक तुम्हाला
धन्यवाद संयोजक
तुम्हाला यातलं अर्धं.
मंडळी, आम्ही लगेच परततोय
मंडळी, आम्ही लगेच परततोय एक लहानसा ब्रेक घेऊन. तोवर जाऊ नका कुठेही, पाहात राहा काव्यचित्रे.
मस्त आहे खेळ!बर्याच दिवसानी
मस्त आहे खेळ!बर्याच दिवसानी मायबोलीवर रेंगाळावस वाटल.धन्यवाद संयोजक.
शोभनाताई, खुप खुप आभार.
शोभनाताई, खुप खुप आभार. अजुन खुप खेळ बाकी आहे, तेव्हा रेंगाळा इथेच आणि पटापट कविता ओळखा.
कविता ६. हे आपल्या
कविता ६.
हे आपल्या महाराष्ट्रात आढळणा-या एका फुलाचे प्रकाशचित्र आहे. गंमत अशी की या फुलाचे जे नाव आहे ना, त्याच नावाने एक खुप प्रसिद्ध मराठी कविता आहे.
तेव्हा या कवितेला अजुन कुठलीही खूण नाही. हे फुल ओळखा आणि कविताही ओळखा.
एक तुतारी द्या मज आणुनी,
एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनी टाकीन सगळी गगने, दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
तुतारीच नाव आहे ह्या फुलाचे
तुतारीच नाव आहे ह्या फुलाचे कास पठारावरही आढळते ...
अगदि बरोबर गजानन! तुमच्यासाठी
अगदि बरोबर गजानन!
तुमच्यासाठी हे खास बक्षिस..
अरे वा! हे मस्तच आहे.
अरे वा!
हे मस्तच आहे.
कविता ७.
कविता ७.
कविता ७. दिसत न्हाई जी.
कविता ७. दिसत न्हाई जी. निस्ती लिंक दिसतिया.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे …
झुले बाई झुला माझा झुले बाई
झुले बाई झुला माझा झुले बाई झुला
सकाळच्या उन्हात या झोके घेऊ चला
हिरव्या हिरव्या फांदीला गं
झोका माझा बांधीला ग
आता होता भुईवर, भेटे आभाळात
(No subject)
हिरवे हिरवेगार गालिचे हरित
हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे
Pages