कविता हा तसा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कवितेशी आपली ओळख आपल्या जन्मापासूनच होत असावी. बाळाला झोपवायला घेतलं की, आपोआप आई काहीतरी गुणगुणू लागते आणि आईच्या तोंडाकडे पाहत, ते गुणगुणणं ऐकत बाळ कधी झोपतं ते आईलाही कळत नाही.
शाळेत गेल्यावरही पहिली ओळख होते ती बडबडगीतांशी. बहुतेक सगळ्या लहान मुलांना 'मग शाळेत काय काय कविता, पोएम्स्, शिकवल्या तुला?' या प्रश्नाचा सामना करावा लागलेला आहे. मग काही धीट मुलं धडाधड कविता म्हणून दाखवतात, तर काही आईमागे लपून प्रश्नकर्ता कधी जातोय, याची वाट पाहतात.
कविता अशा जन्मापासूनच आपल्या सोबत असल्यामुळे की काय, अगदी पहिलीत वाचलेली कविताही आपल्याला वयाच्या पन्नाशीत जशीच्या तशी आठवत असते.
तर अशाच काही कविता, ज्यांच्याबरोबर आपण वाढलो, आज आम्ही इथे सादर करतोय, पण प्रकाशचित्रांमधून. कवितेच्या आशयाला समर्पक अशी काही प्रकाशचित्रे आम्ही देऊ, ज्यातून चाणाक्ष मायबोलीकर ती कविता ओळखतील.
हा एक खेळ आहे, आपल्याला भावलेल्या कविता प्रकाशचित्रांच्या माध्यमातून परत एकदा अनुभवण्याचा.
मंडळी, गुगलबाबाची मदत न घेता, केवळ स्मृतीवर विसंबुन कविता ओळखता येतात का हा शोध घ्यायला किती गंमत येईल ना? गुगलबाबावर तर रोबोसुद्धा कविता शोधेल, पण त्या शोधाला स्मृतींचा गंध असेल का?
प्रकाशचित्रांवरुन आठवणीत वसलेली कविता शोधायची गंमत अनुभवताना कदाचित असेही होईल की नंतर कधीतरी कवितेला परत भेट देताना इथले एखादे प्रकाशचित्र लख्खकन डोळ्यासमोर चमकुन जाईल. तेव्हा गुगलची मदत न घेता आपल्याला किती आठवतेय याचा अनुभव आणि आनंद एकदा नक्कीच घेऊन बघा.
कविता क्र. १ - 'पानगळ' - इंदिरा संत - विजेती- रैना
कविता क्र. २ - 'कणा' - कुसुमाग्रज - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ३ - 'कोलंबसाचे गर्वगीत' - कुसुमाग्रज - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ४ - 'गवतफुला' - इंदिरा संत - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ५ - 'सांगा कसे जगायचे' - मंगेश पाडगावकर - विजेती- सोनू.
कविता क्र. ६ - 'तुतारी '- केशवसुत - विजेते - गजानन
कविता क्र. ७ - 'श्रावणमासी हर्ष मानसी'- बालकवी - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ८ - 'जोगिया'- ग .दि .माडगुळकर - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ९ - 'पैठणी'- शांता शेळके - विजेते - शब्दाली
कविता क्र. १०- 'देणा-याचे हात घ्यावे. '- विंदा करंदीकर - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ११- 'मराठी असे आमुची मायबोली '- माधव ज्युलियन - विजेते - रैना
कविता क्र. १२- 'धरित्रीच्या कुशीमध्ये '- बहिणाबाई चौधरी - विजेते - मानव पृथ्वीकर
कविता क्र. १३- 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले'- बा.भ. बोरकर - विजेते - स्निग्धा
माझ्या टर्कीचा समद्यासनी
माझ्या टर्कीचा समद्यासनी लागलाय लळा.
शिंग फुंकीले रणी - वसंत बापट
शिंग फुंकीले रणी - वसंत बापट ?
याचे कवी मानव पृथ्वीकर आहेत
याचे कवी मानव पृथ्वीकर आहेत काय
टर्की मधे टर्की पक्षाला हिंदी
टर्की मधे टर्की पक्षाला हिंदी म्हणतात.
आता सोप्पी खूण एकदम
कविता ११ खूण चौथी

हो
हो
पसायदान
पसायदान
पसायदान आणि हिंदी टर्कीचा
पसायदान आणि हिंदी टर्कीचा काहीच संंबंध नाही आहे
हिंदी, मुकुट, ज्ञानोबा माऊली
हिंदी, मुकुट, ज्ञानोबा माऊली असं काही आहे का...
बरोबर बी. हिंदी आणि मराठीचा
बरोबर बी. हिंदी आणि मराठीचा शोधा की
मित, हिंदीला मुकुट आणि???
मित, हिंदीला मुकुट आणि???
कविता ११, खूण
कविता ११, खूण शेवटची
मराठीला??
.
मराठी असे आमुची मायबोली जरी
मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला
यशाची पुढे दिव्य आशा असे
दीनांची माउली?
दीनांची माउली?
रैना बरोबर वाटतंय
रैना बरोबर वाटतंय
मराठी पाऊल पडते पुढे… खरा
मराठी पाऊल पडते पुढे…
खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठिला
भला देखे.
मला पण रैनाचे बरोबर वाटते.
मला पण रैनाचे बरोबर वाटते.
रैना अभिनंदन
रैना अभिनंदन
हुश्शय
हुश्शय
अभिनंदन रैना.. सर्वात कठीण
अभिनंदन रैना.. सर्वात कठीण काव्यचित्र सोडवलेत
रैना. हे घ्या पारितोषिक
रैना. हे घ्या पारितोषिक

कवी माधव ज्युलियन
कवी माधव ज्युलियन
रैना, तुमने तो कमाल कर
रैना, तुमने तो कमाल कर दिया........... मस्त गं.. अभिनंदन.
रैना अभिनंदन! संयोजक, कृपया
रैना अभिनंदन!
संयोजक, कृपया दिलेल्या चित्रांचा आणि कवितेचा संबंध/सांगड समजावून सांगा.
बाप्रे केवढ अवघड होत
बाप्रे केवढ अवघड होत हे.
अभिनन्दन रैना!
No no Sadhana/ Manav - I am
No no Sadhana/ Manav - I am rubbish with clues. Kavita yetat fakta.
Thanks Sanyojak.
रैना, मस्तच, अभिनंदन !!
रैना, मस्तच, अभिनंदन !!
रैना अभिनंदन
रैना अभिनंदन
हिंदीला राजमुकुट आणि
हिंदीला राजमुकुट आणि ज्ञानदेवांची मराठी भिकारीण
मला फक्त मुकुट , हिंदी
मला फक्त मुकुट , हिंदी राजभाषा, माउली हे लक्षात येतेय
टर्कीचा संबंध कळाला नाही
कृपया दिलेल्या चित्रांचा आणि
कृपया दिलेल्या चित्रांचा आणि कवितेचा अर्थ समजावून सांगा. >>>
टर्की पक्षाला टर्कीमध्ये हिंदी म्हणतात --> मराठी हिंदीचा संबंध --> हिंदी राजभाषा, मराठी मायबोली
हे असं असावं बहुदा !!
Pages