कविता हा तसा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. कवितेशी आपली ओळख आपल्या जन्मापासूनच होत असावी. बाळाला झोपवायला घेतलं की, आपोआप आई काहीतरी गुणगुणू लागते आणि आईच्या तोंडाकडे पाहत, ते गुणगुणणं ऐकत बाळ कधी झोपतं ते आईलाही कळत नाही.
शाळेत गेल्यावरही पहिली ओळख होते ती बडबडगीतांशी. बहुतेक सगळ्या लहान मुलांना 'मग शाळेत काय काय कविता, पोएम्स्, शिकवल्या तुला?' या प्रश्नाचा सामना करावा लागलेला आहे. मग काही धीट मुलं धडाधड कविता म्हणून दाखवतात, तर काही आईमागे लपून प्रश्नकर्ता कधी जातोय, याची वाट पाहतात.
कविता अशा जन्मापासूनच आपल्या सोबत असल्यामुळे की काय, अगदी पहिलीत वाचलेली कविताही आपल्याला वयाच्या पन्नाशीत जशीच्या तशी आठवत असते.
तर अशाच काही कविता, ज्यांच्याबरोबर आपण वाढलो, आज आम्ही इथे सादर करतोय, पण प्रकाशचित्रांमधून. कवितेच्या आशयाला समर्पक अशी काही प्रकाशचित्रे आम्ही देऊ, ज्यातून चाणाक्ष मायबोलीकर ती कविता ओळखतील.
हा एक खेळ आहे, आपल्याला भावलेल्या कविता प्रकाशचित्रांच्या माध्यमातून परत एकदा अनुभवण्याचा.
मंडळी, गुगलबाबाची मदत न घेता, केवळ स्मृतीवर विसंबुन कविता ओळखता येतात का हा शोध घ्यायला किती गंमत येईल ना? गुगलबाबावर तर रोबोसुद्धा कविता शोधेल, पण त्या शोधाला स्मृतींचा गंध असेल का?
प्रकाशचित्रांवरुन आठवणीत वसलेली कविता शोधायची गंमत अनुभवताना कदाचित असेही होईल की नंतर कधीतरी कवितेला परत भेट देताना इथले एखादे प्रकाशचित्र लख्खकन डोळ्यासमोर चमकुन जाईल. तेव्हा गुगलची मदत न घेता आपल्याला किती आठवतेय याचा अनुभव आणि आनंद एकदा नक्कीच घेऊन बघा.
कविता क्र. १ - 'पानगळ' - इंदिरा संत - विजेती- रैना
कविता क्र. २ - 'कणा' - कुसुमाग्रज - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ३ - 'कोलंबसाचे गर्वगीत' - कुसुमाग्रज - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ४ - 'गवतफुला' - इंदिरा संत - विजेती- स्निग्धा
कविता क्र. ५ - 'सांगा कसे जगायचे' - मंगेश पाडगावकर - विजेती- सोनू.
कविता क्र. ६ - 'तुतारी '- केशवसुत - विजेते - गजानन
कविता क्र. ७ - 'श्रावणमासी हर्ष मानसी'- बालकवी - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ८ - 'जोगिया'- ग .दि .माडगुळकर - विजेते - भरत मयेकर
कविता क्र. ९ - 'पैठणी'- शांता शेळके - विजेते - शब्दाली
कविता क्र. १०- 'देणा-याचे हात घ्यावे. '- विंदा करंदीकर - विजेते - भुईकमळ
कविता क्र. ११- 'मराठी असे आमुची मायबोली '- माधव ज्युलियन - विजेते - रैना
कविता क्र. १२- 'धरित्रीच्या कुशीमध्ये '- बहिणाबाई चौधरी - विजेते - मानव पृथ्वीकर
कविता क्र. १३- 'गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले'- बा.भ. बोरकर - विजेते - स्निग्धा
हे लिहिले आहे न आधी कोणीतरी
हे लिहिले आहे न आधी कोणीतरी
पुन्हा क्षमस्व स्निग्धा
पुन्हा क्षमस्व
स्निग्धा तुम्ही जिंकला आहात. अभिनंदन
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले
ुद्र बिलोरी ऐना सृष्टीला
ुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा म्हैना
वाकले माडांचे माथे , चांदणे पाण्यात न्हाते
आकाशदिवे लावीत आली कार्तिक नौमीची रैना
कटीस अंजिरी नेसू , गालात मिस्कील हसू
मयूरपंखी मधुरडंखी उडाली गोरटी मैना
लावण्य जातसे उतू वायाच चालला ऋतू
अशाच वेळी गेलीस का तू करून जीवाची दैना
– बा भ बोरकर
गडद निळे गडद निळे जलद भरुनी
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले>> हे मला लिहायचे होते पण वर स्निग्धाला नाही म्हटल्यावर मी लिहिले नाही
जाउ दे खेळ खेळण्यात मजा येत आहे.
संयोजक आम्ही तुम्हाला क्लू
संयोजक आम्ही तुम्हाला क्लू देऊ का.. तुम्ही खेळून बघा एक वार
हे घ्या
हे घ्या

अरेच्या !
अरेच्या !
अरे हो की. अभिनंदन स्निग्धा
अरे हो की.
अभिनंदन स्निग्धा
रॉयल मायबोलीत जेवण....
रॉयल मायबोलीत जेवण.... थंकु
धन्यवाद मानव
धन्यवाद मानव
अरे वा.. सोबत पाहुणे आले तर
अरे वा.. सोबत पाहुणे आले तर चालतील ना जेवायला?
अभिनंदन स्निग्धा आणि मानव.
अभिनन्दन स्निग्धा
अभिनन्दन स्निग्धा
अभिनंदन स्निग्धा आणि मानव
अभिनंदन स्निग्धा आणि मानव
साधना, आर्या, रैना धन्यवाद
साधना, आर्या, रैना धन्यवाद
आपण सर्व मायबोलीकरांनी भरभरून
आपण सर्व मायबोलीकरांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल संयोजक मंडळ आपणा सर्वांचे आभारी आहे.
असाच लोभ यापुढेही असावा हि विनंती.
सर्व विजेत्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
धन्यवाद, पण स्निग्धानेच आधी
धन्यवाद, पण स्निग्धानेच आधी ओळखलं होतं.
संयोजक धन्यवाद! खूप मजा आली
संयोजक धन्यवाद!
खूप मजा आली या खेळात!
अंजीर घ्या:

खरेच मजा आली. मानव तुमचे
खरेच मजा आली.
मानव तुमचे अभिनंदन धरित्रीच्या कुशीमध्ये बिजबियाणे निजली साठी.
धन्यवाद. चला वाटून खाऊ
धन्यवाद. चला वाटून खाऊ
संयोजक धन्यवाद! खूप मजा आली
संयोजक धन्यवाद!
खूप मजा आली या खेळात! >>>> + १०० खरेच खुप मजा आली खुप दिवसानंतर
चला वाटून खाऊ <<< ओके. चला
चला वाटून खाऊ <<< ओके. चला पाटा-वरवंटा आणायला लागा.
मानव पृथ्वीकर | 1 March, 2016
मानव पृथ्वीकर | 1 March, 2016 - 15:09
संयोजक धन्यवाद!
खूप मजा आली या खेळात!
अंजीर घ्या:
>> मला वाटले संयोजकांनाच कविता शोधायला लावता??
गजानन मिक्सर चालेल हो..
गजानन मिक्सर चालेल हो..
संयोजक धन्यवाद! खूप मजा आली
संयोजक धन्यवाद!
खूप मजा आली या खेळात! + १
मी ओळखे पर्यंत काव्यचित्रे
मी ओळखे पर्यंत काव्यचित्रे देत रहा >>>>> मानव, संयोजक तुमच्या शब्दाबाहेर नाहीत अगदी

खरेच की....
खरेच की....
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन! मस्त खेळ चालू अहे
हा! हा!, स्निग्धा, खरंच की
हा! हा!, स्निग्धा, खरंच की
तसं कठीण आहे ओळखणं, सर्व
तसं कठीण आहे ओळखणं, सर्व विजेते ग्रेट. अभिनंदन.
क्या बात है!!!! विजेत्यांचे
क्या बात है!!!! विजेत्यांचे अभिनंदन!!!
चला वाटून खाऊ <<< ओके. चला पाटा-वरवंटा आणायला लागा.>>>>>>गजा,
Pages