..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ५)

Submitted by मामी on 14 March, 2013 - 05:41

आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529

काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).

२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्‍या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्‍या भागात विचारलं आहे.

३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.

या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.

४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.

आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे ..... Happy

हे धागे यशस्वी करणार्‍या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक मुलगी एका बस कंपनीची मालकीण आहे. एकदा आपल्या बस ने ती एका ठिकाणी जात असताना तिला हार्ट अटॅक आला. तिला पटकन अँब्युलन्स मधून दवाखान्यात नेलं आणि हार्ट ट्रान्स्प्लान्ट करण्यात आली.
तिची तब्येत सुधारतेय. ती पलंगावर पडून एक गाणं गुणगुणतेय. कोणतं ओळखा पाहू.

आ आ आ..अपने ही बस में नहीं मै...
दिल है कही तो हूँ कही मै...
आज फिर जीने की तमन्ना है..
ट्याव ड्याव ड्याव ड्याव..
आज फिर मरने का इरादा है
टड ड डण टडन..

धागा वर काढण्यास असेच एक कोडे:

सायंकाळी नदी किनारी तिचे नाव घेऊन बोलावून तुला काळया रंगांची केशप्रक्षालन द्रावणे देईन असे सांगणारे गाणे.

हा हा हा..... बरोबर वाटतंय

इतका वेळ मी काळ्या केशप्रक्षालन चा अर्थ काळा हेअर डाय घेत होते.

मानव भारी होतं हे. झिलमिल ग्रेट!

किंवा हे जर कोणा बंगाली ब्युटिपार्लरवाला / वाली म्हणत असेल तर तो / ती राधेला नदीकिनारी शाम्पु करण्याचं आमंत्रण देत आहे.

शाम्पु कारे (instead of saying करे)

नवविवाहित जोडपे कार ने जात असते. एका ठिकाणी थांबून सोडा प्यायचे ठरते... मुलगा दोन सॉफ्ट ड्रिंक्स जास्तच पितो... आणि गॅस होतो... त्याला गॅस झाला कि एकदमच बाहेर पडत. विथ जोराचा फार्ट साऊंड अशी त्याची कंडिशन असते... एकच फार्ट आणि तो ओके ...आणि जर गॅस पास नाही केला तर अक्खा दिवस मळमळ होते ... नॉशिया होतो वगैरे वगैरे...
तिथून निघतात तर तिला फोन येतो कि पुढच्या सिग्नल जवळ तिची मोठी ताई आणि जिजाजी आहेत ज्यांना लिफ्ट हवीय...... इकडे मुलाची हालत गॅस अडकल्या मुळे आणि थोडयाच वेळात ते गाडीत चढतील हे माहित असल्यामुळे बेकार आहे...
तर मुलगी आपल्या नवऱ्याला काय गाणे म्हणेल??

बरोबर झिलमिल, शाम्पू आणि पुढे कारे छा अर्थ बरोबर लावला मामी आणि श्रद्धा.
प्रक्षालन म्हणजे धुणे (बरोबर ना?) म्हणून केशप्रक्षालन द्रावण.

मामी बंगाली व्हर्जन परफेक्ट बसतय Lol

आज कल फिर कभी, फिर कभी बाद मे
बात रह जाएगी, याद ही याद मे
हो जो नहीं है कहा, जो नहीं है किया
अभी न किया तो फिर, कभी नहीं, कभी नहीं

पाद को हो जाने दो, पाद में खो जाने दो
ऐतबार किसका है, इंतज़ार किसका है
अभी न हुआ तो फिर, कभी नहीं, कभी नहीं
पाद को हो जाने दो, पाद में खो जाने दो !!!

सोळा दमड्या जवळ नसतील तर लांब जाऊ नये असा संदेश द्यायला ती कुठले गाणे म्हणते?
------
(आता कोडं बरोबर आहे, परत बदलायची गरज नाही. सोडवा.)

योग्य दिशा.
शेवटली ओळ धरून पुढे चला.

नाही. दिलेला नेमका संदेश त्यात यायला हवा. चित्रपटाच्या नावाचा संबंध नाही. (ते मला माहीतही नाही.)
---
रुपया म्हणजे एकदम वर गेलात.
---
दमडी पासून रुपया पर्यंत सगळं आलं, पण काय राहीलं?

Pages