सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.
भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...
पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
वावळा आणि बीवळा हि दोन
वावळा आणि बीवळा हि दोन वेगवेगळी झाडे आहेत.
vt220 चा फोटो मोबाईलवरुन पाहिल तेव्हा बिवळ्याचा वाटलेला. पण आता कॉम्प वरुन पाहतेय तेव्हा वेगळा वाटातोय. कदाचित वावळा असेल. पण वावळाचे मधले बी अगदी व्यवस्थित दिसते. यात तसे दिसत नाही.
हा बिवळा. घारापुरीच्या जंगलात आढळला.
हा वावळा. नव्या मुंबईत खुप आहेत वावळ्याची झाडे.
हे वावळ्याचे झाड. बिवळ्याचे झाडही पाहिले पण ते जंगलात इतर झाडांनी वेढलेले असल्याने मला नीट फोटो घेता आला नाही बिवळ्याचे झाड वावळ्यापेक्षा खुप मोठे असते. वावळाही वृक्षच आहे, पण बिवळा त्यापेक्षा मोठा आहे.
म्हणजे त्या मधल्या रेघेवरून
म्हणजे त्या मधल्या रेघेवरून ठरवायचं का? वावळ्यात ती पूर्ण आहे आणि बिवळ्यात अर्धी.
बिवळा म्हणजेच बीजा ना? त्याची पिवळी फुलं पाहिली आहेत.
संपादित
संपादित
वावळा, बिवळा माहिती
वावळा, बिवळा माहिती मस्त.
लहानपणी खायचो वावळ्याचं बी. नाव माहिती नव्हतं.
धन्यवाद अदिजो आणि साधना! मला
धन्यवाद अदिजो आणि साधना!
मला वाटते मी दोन्ही बघितले आहेत पण इतका बारिक फरक कधी लक्षात आला नव्हता!
वावळा सुकल्यावरच पडतो का? मी बी उचलली तेव्हा हिरवी होती. तिथे पडलेल्या इतर बियासुद्धा हिरव्या होत्या. आधी बघितलेल्या नेहेमी सुकलेल्या बघितल्यात. दोन दिवसांनी फोटो काढला तेव्हा हिरवेपणा उतरलेला. मला वाट्तय बहुतेक हा बिवळा असावा.
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Indian%20Kino%20Tree.html
इथल्या तिसर्या फोटो मधे दिस्ताहेत तसे...
पण दुसर्या फोटो मधे जसे पिवळे फुललेलं झाड दिसतय तसं नाही बघितले. पुढल्या वर्षी लक्ष ठेवले पाहिजे.
साधना वावळा / बिवळा दोन्ही
साधना वावळा / बिवळा दोन्ही मस्तच ग..
साधना वावळा / बिवळा दोन्ही
साधना वावळा / बिवळा दोन्ही मस्तच ग.. >> +१
मस्त माहिती..
परत एकदा फोटोंचा अभ्यास करावा लागेल फरक बघायला
माझ्या ऑफिसात झाड आहे
माझ्या ऑफिसात झाड आहे वावळयाचा. त्याला पापडी पण म्हणतात. मी वर फोटो दिलाय ती फळे हिरवी असताना पण झाडाखालि पडलेली पाहिली।। खूप कचरा करते हे झाड. पूर्ण परिसर भरून जातो.
बिवल्याला बीजा पण म्हणतात का हे माहीत नाही. मी बीवळा हे नाव सुद्धा गेल्या महिन्यात पहिल्यांदा ऐकले. मी त्याला वावळा समजले होते पण फरक सांगणारी व्यक्ती बोटनिस्ट होती, त्यामुळे बीवळा असतो हे कळले.
साधना.. वावळा बिवळा.. मस्तं
साधना.. वावळा बिवळा.. मस्तं माहिती
बिवल्याला बीजा पण म्हणतात का
बिवल्याला बीजा पण म्हणतात का हे माहीत नाही.>> खरं आहे, कारण flowersofindia site वर त्या नावानेच सापडला.
खूप कचरा करते हे झाड. पूर्ण परिसर भरून जातो.>>> हे खरे. दर वर्षी हा कचरा बघते आणि विचार करते हे कुठले झाड... thanks to अदिजो आणि साधना उलगडा झाला rather दोन झाडांची माहिती मिळाली!
बाकी वावळा बिवळा rhyme मस्त आहे!
btw both trees have different
btw both trees have different family - bivala is pea family and vavala is elm family. Nature has so many wonders!
ओळखा हे काय आहे ते ??? अगदी
ओळखा हे काय आहे ते ???
अगदी सोप्पयं.
ह्या टाईपचं एक दुसरं झाड मी
ह्या टाईपचं एक दुसरं झाड मी बघितलं मागच्या आठवड्यात, असंच पर्णहीन पण टोकाला घोसाळ्यासारखी लांब पण जरा जास्त जाडी फळे होती काही हिरवी काही वरच्या रंगाची.
अन्जूताई ते बहुतेक ब्रह्मदंड
अन्जूताई ते बहुतेक ब्रह्मदंड असेल म्हणजेच सॉसेजेस ट्री.
अच्छा ओके, थांकू. ते वरचे
अच्छा ओके, थांकू.
ते वरचे बेलफळ, कवठ ह्या टाईप आहे का, उगाच टुक्का लावलाय हा. जाणकार सांगतीलच.
अर्रे जिप्सी.. खूप कमी दिसतोस
अर्रे जिप्सी.. खूप कमी दिसतोस इकडे आजकाल.. बिझी बिझी????
गमतीदार दिस्तंय झाड .. कसली फळं आहेत..
जिप्सी, गोरखचिंच आहे का?
जिप्सी, गोरखचिंच आहे का?
नसावेत. गोरखचिंच असणार.
नसावेत. गोरखचिंच असणार.
नलिनी, साधना अगदी बरोबर
नलिनी, साधना अगदी बरोबर
गोरखचिंच आहे.
अर्रे जिप्सी.. खूप कमी दिसतोस इकडे आजकाल.. बिझी बिझी????>>>>>हा वर्षूदी सध्या चिक्कार बिजी आहे.
आज सुट्टी होती.
गोरखचिंच का, अरे वा. मी
गोरखचिंच का, अरे वा. मी पहिल्यांदाच बघतेय.
गोरखचिंच का, अरे वा. मी
गोरखचिंच का, अरे वा. मी पहिल्यांदाच बघतेय.>> +१
मला 'द क्रुड्स' या अॅनिमेशनपटात असलेले लटकणारे प्राणी आठवले
मला 'द क्रुड्स' या
मला 'द क्रुड्स' या अॅनिमेशनपटात असलेले लटकणारे प्राणी आठवले फिदीफिदी >>> मस्त!
सुप्रभात.
सुप्रभात.
सुप्रभात कालचे कोळंबी,
सुप्रभात
कालचे कोळंबी, खेकडे, वांगे, बटाटा, पोपटी, सुरंग, मासे कोणचं उठलं नै वाट्टे
टीना अग तृप्त आत्मे झालेत ते.
टीना अग तृप्त आत्मे झालेत ते.
हा वावळा. >>>>>>>>>हे मी काल
हा वावळा. >>>>>>>>>हे मी काल चिंचवडला पाहिलं. पण हिरवा रंग होता. पायघड्या घालत्यात असं वाटतं होतं.
गोरख चिंच व्व! मस्तच.. कुठे
गोरख चिंच व्व! मस्तच.. कुठे दिसली तुम्हाला?
टीने मला 'द क्रुड्स' या अॅनिमेशनपटात असलेले लटकणारे प्राणी आठवले फिदीफिदी
सासुबाईंन कडे मी लावलेली काही झाडे..
कृ. कमळाचा वेल...
अबोली...
शेन्द्री / दुपारी..
शेन्द्री / दुपारी..
वा सायु मस्तच. मी आज
वा सायु मस्तच.
मी आज संध्याकाळी तू पाठवलेली लिली लावेन. जाम खुष झालेय मी ते कंद मिळाल्याने.
मस्त... मी दोन दिवस
मस्त... मी दोन दिवस दार्जीलिंगला होतो. भरपूर भटकलो. कांचनजुंगा पण काही सेकंद दिसला. झू मधले मोनल फेझंट सकट सर्व देखणे पक्षी, स्नो लेपर्ड, रेड पांडासारखे प्राणी, आणि अगणित सुंदर फुले बघितली. फोटो आणि सविस्तर लेख मग लिहीनच सवडीने.
Pages