निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा मस्तच..

सायली एक कल्पना सांगु का ?
हि नुसती बरणी इतकी छान नै वाटत.. परत त्यावर क्षार जर साचले ते ही वाईट दिसत.. मी फ्लॉवर अरेंजमेंट करते तेव्हा त्या पाण्यात जराशी साखर अन मिठ टाकते.. त्यामुळ ती जास्त वेळ तजेलदार राहतात असा माझा अनुभव आहे..

एक काम कर ना.. सई ला हाताशी घे आणी सुतळी असते ना मऊ असलेली नारळाची दोरी म्हण हव तर जी आपण आंब्याच्या पानांच तोरण करताना वापरतो ते.. ती आण बाजारातुन एक पावभर वगैरे आणि त्या बरणीला फेविकॉल लाव (फायबर ग्लु सुद्धा मिळत एंब्रॉडरी च्या दुकानात तो प्रिफर कर) आणि एकसलग गोल गोल गुंडाळ ती दोरी बरणीच्या सभोवती.. मग त्यावर लाकडी पॉलीश मार.. खुप रीच, क्लासीक आणि सुंदर फ्लॉवर पॉट बनेल त्याचा.. भरीस भर क्षारामुळे पडलेले डाग सुद्धा दिसणार नाही कितीही वापरलीस तरी आणि जर चुकुन हाता़ळताना पडलीच तर दोरीच्या कुशन मुळे लवकर फुटणार सुद्धा नाही .. बघ जमतय का ते Happy

अन्जू.. कसल काय न कसल काय.. घरातल्या वस्तू अगदी कुठल्याच..टाकाऊ सुद्धा फेकवत नै मला.. मग घरचे ती कशी टाकाऊ आहे न त्याच कस कैच काम नै घरात हे मला समजवत बसतात न मी त्यांना ह्याला अस करुन तस केल तर कशी तशी वस्तु तयार होईल हे सांगत बसत असते.. जोडीला लोकांच्या करामती जालावर बघत असतेच म्हणून असले प्रताप बाकी कै नै Proud

जिप्सीच्या फोटोत पिवळा धोत्रा आहे,काटेरिंगणी नाही ती.त्याला स्वर्णक्षिरी असेही म्हणतात.>>>>धन्यवाद सरीवा Happy मी सुद्धा याला काटेरिंगणीच समजत होतो. Happy

टीना, मस्तच आयडीया.

गुलाबी गोकर्ण, मी फक्त एका ठिकाणीच ( दादरला, हिंदु कॉलनीत ) बघितला होता, त्यालाही आता ३० वर्षे झाली.
खरं वाटणार नाही, पण मी अजूनही त्या ठिकाणी जाऊन तो आता आहे का. ते बघत असतो. पण नंतर नाहीच दिसला.
आता असे वाटतेय कि त्यावेळी अचानक जीन्स मधे बदल होऊन तो रंग तयार झाला होता का ?

जिप्स्या पण आमच्याइथेही त्याला रिंगणच म्हणतात. मी अगदी लहानपणापासून अजुन पर्यंत सर्वांच्या तोंडी रिंगणच ऐकते. मी मागेही लिहीले होते की नागिण ह्या रोगावर ह्या रिंगणच्या फळांपासून औषध बनवतात गावठी. पण पुर्ण कसे बनवतात ते माहीत नाही.
ह्या फुलांच्या पाकळ्या काढून आम्ही पूर्वी हावलू बाय म्हणजे होळीच्या आधीच्या ज्या छोट्या होळ्या असतात त्यांना हार बनवायचो. त्या पाकळ्यांचा स्पर्श मला अजुन जाणवतो Happy

टिना माझ्याकडेही सेम कलर बिगुनिया आहे. सेम सेम Happy

घारापूरीला गेलेले तेव्हा ह्या काळ्या कुड्याच्या शेंगा दिसल्या. मागे एकदा दिनेशदांनी लिहिले होते घारापूरीला काळा कुडा भरपूर आहे म्हणून मला लगेच ओळखता आल्या.

मी फ्लॉवर अरेंजमेंट करते तेव्हा त्या पाण्यात जराशी साखर अन मिठ टाकते.. त्यामुळ ती जास्त वेळ तजेलदार राहतात असा माझा अनुभव आहे.. >>>>>> क्या आयडिया - अजून एक - त्यात अ‍ॅनासिन किंवा तत्सम गोळीही टाक - त्याचाही खूप उपयोग होतो - फुले जास्त दिवस टवटवीत रहाण्यासाठी ... Happy

अजून एक - त्यात अ‍ॅनासिन किंवा तत्सम गोळीही टाक - त्याचाही खूप उपयोग होतो - फुले जास्त दिवस टवटवीत रहाण्यासाठी ... ++अगदी बरोबर. आत्तच एक पुष्प रचनेचे शिबीर अटेंड केले, तीथे हेच सांगीतले, डीस्प्रीन / अ‍ॅनासिन पाण्यात टाकायला सांगीतली.. Happy

संयोजक, अभिनंदन आणि शुभेच्छा!!! Happy

सायली - तुला काही खास सवलत म्हणून चोवीस ऐवजी २८-३६ तास दिलेत का ???? - रांगोळी, पुष्परचना, घरकाम, ऑफिस - कसे काय एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतेस ...... _____/\_____

शशांकजी... Happy ------ /\---------
रच्याकने,आत्ता दिनशे दां चे एक वाक्य आठवले, हरबर्‍याच झाड खुप नाजुक असत बर्का... Happy

सायली - तुला काही खास सवलत म्हणून चोवीस ऐवजी २८-३६ तास दिलेत का ???? - रांगोळी, पुष्परचना, घरकाम, ऑफिस - कसे काय एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतेस ....>>>सायली - तुला काही खास सवलत म्हणून चोवीस ऐवजी २८-३६ तास दिलेत का ???? - रांगोळी, पुष्परचना, घरकाम, ऑफिस - कसे काय एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतेस ........ >>> शशांक शंभर टक्के सहमत.

सायली आणि सायु दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत.. सायली नोकरी, घरकाम, मुलांचे, मुलांच्या बाबांचे सगळे करते.

सायु, रांगोळ्या काढते, पुष्परचना करते, शेरोशायरी करते, व्हॉट्स अप वर टिपी करते....

शशांक, तो फुलदाणीत अ‍ॅनासिन / अ‍ॅस्प्रो टाकायचा प्रकार माझ्या लहानपणी ऐकला होता. त्यावेळी अस्टरचा मोठा गुच्छ मिळायचा बाजारात.. पण तो मुद्दा नाही. एकदा मला तापाने ग्रासले होते. तर माझी खेळ सवंगडी आईला म्हणाली, बादलीतल्या पाण्यात या गोळ्या टाकून दिनूला उभे करा.. त्यालापण तरतरी येईल !!!

फुलदाणीत अ‍ॅनासिन / अ‍ॅस्प्रो टाकायचा प्रकार >> मीपन करते..पण गोळ्या हमेशा नसतात घरी पण मिठ साखर असतेच असते म्हणुन ते मात्र नेहमी टाकते Happy

बादलीतल्या पाण्यात या गोळ्या टाकून दिनूला उभे करा.. त्यालापण तरतरी येईल >> Biggrin

अर्रर.. संक्रान्त झाली की, तरी आज माझ्यावर संक्रान्त का? Lol Lol Lol
दा, तुम्ही पण ना! Happy
बादलीतल्या पाण्यात या गोळ्या टाकून दिनूला उभे करा.. त्यालापण तरतरी येईल >> खो खो ++ हे खरच भारीये हा!

टिनिमिनी मस्तंये आयडिया तुझी.. तू भी पिन्ट्रेस्ट फॅन नं???

सायु.. बॉटलब्रश बॉटल में.. वाह!! छान!!!

अ‍ॅस्प्रिन चा नवा उपयोग भारीये... दिनेश Lol

सध्या कोस्तारिका मधे आहे.. इथे फळाफुलांची विविधता पाहताना सतत निगप्रेमींचा विचार मनात घोळत असतो कि वो होते तो यूँ कहते.. इस फूल पे हैरान होते .. इ. इ. Happy

हे एक गमतीदार फळ दिसले इकडे. लोकल भाषेत ,'काईमितो' नांव आहे. आतमधे दोन चार बिया आणी मऊ , मधुर गर. चव खूप छान आहे.साल जाड आहे..मँगुस्तिन सारखं..

कापल्यावर

गोकर्णाचे वेल आणि फुले बघून अगदी भरून आले, माझे उपटून टाकलेले पंधरावीस वेल आठवून.
पिवळा धोत्रा म्हणजेच आर्जिमोने का?
रानकाटेवांगे या झुडुपाची फळे (जी छोट्या वांग्यासारखी दिसतात ती) शिबे किंवा शिबले या त्वचाविकारावर वाटून लावतात. तसेच कोळसुंदी/शिंदीची पानेसुद्धा त्या डागांवर वाटून लावतात.
गुजरातीत रिंगणां म्हणजे वांगी.

तू भी पिन्ट्रेस्ट फॅन नं???>> ना गं.. हालाकी त्यावरचे पिक्स बघितले आहे दोन चार वेळेला.. मला एकदम अडाणी असल्याचा फिल आला.. तेव्हापासुन म्हटल आपण गावातच बरं.. उगा मेट्रोसिटीचा ध्यास नकोच बापा.. तसपण आमच यवतमाळ आता महानगरपालिका झालय Wink ..

ते फळ म्हणजे चिक्कु चा मोठा भाऊ वाटतोय.. डिएनए टेस्ट केल्यावर दुसर्‍या फटूत ..

बादलीतल्या पाण्यात या गोळ्या टाकून दिनूला उभे करा.. त्यालापण तरतरी येईल !!! >>>>>> हे खासच ....

काईमितो, मँगुस्तिन ----- वर्षुदी - तुझ्या लक्षात कशी काय रहातात इतकी विविध देशातील फळे, फुले, पदार्थ ...
आपकी हार्ड डिस्क टेरा-टेराबाईट्स की है क्या ???? Happy - कुछ गिगाबाईट्स जरा इधर बी पास करना....

Pages