Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला आठवतेत्याप्रमाणे अशोक
मला आठवतेत्याप्रमाणे अशोक मनकड ( असे त्यावेळी उच्चारले जायचे ) हा कप्तान म्हणून खूप वरच्या दर्जाचा होता उत्तम स्ट्रॅटेजिस्ट. >> +१. मला जे व्हढे वाचलेले आठवते त्याप्रमाणे काका ला पहिल्या दोन तीन टेस्ट नंतर ओपन करायला सांगितले. तो पहिल्या काहि एक दोन सिरीज मधे सलामीचा फलंदाज म्हणून झक्कास खेळला होता. त्यामूळे तो त्याच स्लॉट वर राहिला. पण शॉर्ट बॉल खेळायचे त्याचे तंत्र सदोष होते त्यामूळे त्याला फारसे जमू शकले नाही विशेषतः विंडीजबरोबर. त्या नंतर एकंदर घसरणच झाली. थोडक्यात काय तर एखाद्याला त्याच्या नॅचरल नंबर वर खेळू न देता त्याची वाट लावण्याचा पायंडा पूर्वापार आहे. "नॉन प्लेईंग कॅपटन म्हणून ठेवावे" हे चालले असते नक्कीच.
रनजीतले अनेक वाघ आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ढेपाळतात हा इतिहास आहे. अजूनही ती परम्परा चालूच आहे >> हे खरे असले तरी तेव्हढीच उदाहरणे रणजीमधे नि टेस्ट मधेही तेव्हढीच यश्स्वी झालेल्या खेळाडूंचीही आहेत.
रन आउट करायचं असेल, तर फिल्डर ने दिलेला थ्रो, बॉलर ने एक पाय त्या दगडावर ठेवून झेलायचा (बेल्स/स्टंप्स उडवायची भानगडच नाही). बॉलर ने कॅच त्या अवस्थेत व्यवस्थित झेलला, आणि त्या वेळी रनर ची बॅट क्रिजच्या बाहेर असेल तर आउट!!! >> आम्ही त्याला करंट असे म्हणायचो नि त्याचेच खेचलेले रुप म्हणजे एक जण दगडावर पाय देऊन शक्य तेव्हढे हात पाय ताणून उभे रहाणार नि त्याच्या हाताला हात जोडत अजून एक जण सर्कीट पूर्ण करणार नि बॉल पकडणार. क्रिकेट मधे साखळी . करंट फ्लोज. तेंव्हा रेझिस्टर वगैरे भानगडी माहित नव्हत्या म्हणून नाहितर बॅटींग टिममधला एखादा मधे घुसून करंट स्लो करायलाही कमी न करता
करंट जबरी आहे
करंट जबरी आहे
करंटेपण करत खेळलेलं क्रिकेट
करंटेपण करत खेळलेलं क्रिकेट आठवलं. फार उशीरा बेसबॉल मधे ह्याच पद्धतीनं आऊट करतात हे कळलं, आणी लहानपणापासूनच आपण काळाच्या पुढे आहोत हे समाधान मिळालं.
अशोक मंकड विषयी वाचलय आणी मुंबई च्या क्रिकेट फॅन्स कडून ऐकलं सुद्धा आहे. (एखाद्या अस्सल मुंबईकराला क्रिकेटचा ईतिहास विचारा, पी. विठ्ठल, सी. के. नायडू, ईथपासून नावं फेकत फेकत, सोळकर, वाडेकर, गावसकर ईथपर्यंत येऊन पोहोचतील.) ह्यात, मी आत्तापर्यंत विजय मांजरेकर हे नाव पण ऐकलं आहे. विजय मांजरेकर ला खेळताना कधी पाहिलं नाही, पण त्याचा डेरिव्हेटीव्ह, संजय मांजरेकरला पाहीलय (आणी ऐकलय), I just hope, की बेटेसे बाप बराच सवाई असेल. सं. मा. ने गेल्या काही वर्षांत क्रिटीक म्हणून चांगला जम बसवलाय (त्याला खेळायला घेणार नाहीत, हे नक्की पटल्यावर).
डोमेस्टीक स्टॉलवर्ट्स बरेच झाले, जे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचू शकले नाहीत किंवा पोहोचल्यावर चमकू शकले नाहीत. माझ्याकडून आणखी काही नावं म्हणजे, सुगवेकर, भावे, अभिजीत काळे (जय महाराष्ट्र!
), अमोल मुजुमदार, मिथुन मन्हास, श्रीकांत कल्याणी, सितांषु कोटक, अमरजीत कायपी, रश्मी (पुरुष आहे) परिदा, श्रीधरन श्रीराम, विजय भारद्वाज.
करंटेपण >> सही पोस्ट
करंटेपण >>
सही पोस्ट फेरफटका. यातील बहुतेक लोक लक्षात आहेत. मधली काही वर्षे शंतनू सुगवेकर व सुरेंद्र भावे रणजीत इतक्या धावा ओतत की यांना सिलेक्ट कसे करत नाहीत हा नेहमी प्रश्न पडे. चंद्रकांत पंडित सुद्धा रणजी भरपूर खेळे, पण त्याला निदान संधीतरी मिळाली.
फारएण्ड, मी तर आता असं
फारएण्ड, मी तर आता असं सांगायला सुरूवात करणार आहे, की क्रिकेट बघण्याचा माझा पूर्ण वेळ व्यवसाय आहे, बाकी नोकरी वगैरे गोष्टी पार्ट-टाईम करतो (आत्ताही ऑफिस मधून क्रिकेट वरच लिहीतोय
)
तुम्ही चंद्रकांत पंडीत (आणखी एक आचरेकर अॅकेडमी प्रॉडक्ट) विषयी लिहीलय. विकेटकीपर च्या बाबतीत असं नेहेमीच होतं, की एकाचा जम बसला, की बाकीचे समकालीन 'ऑल्सो रॅन' मधे मोडतात.
विजय भारद्वाज आठवला , चष्मा
विजय भारद्वाज आठवला , चष्मा होता ना त्याल ?
श्रीराम पण खेळला वाटत ओपनर म्हणून . बाकी ना कधी पाहिल नाही . पण बर्याच जणांची नाव ऐकली आहेत
की क्रिकेट बघण्याचा माझा
की क्रिकेट बघण्याचा माझा पूर्ण वेळ व्यवसाय आहे, बाकी नोकरी वगैरे गोष्टी पार्ट-टाईम करतो >>>
"घर पाण्यावरी, बंदराला करतोय ये जा" प्रमाणे? 
मधल्या काही महिन्यांत माझा इंटरेस्ट एकदम कमी झाला होता. पण गेल्या काही दिवसांतील येथील चर्चा/पोस्ट्स व टी-२० मधला खेळ यामुळे सध्या पुन्हा जोरात.
फा, कालच्या चर्चेच्या
फा, कालच्या चर्चेच्या अनुषंगाने ही एक आठवण बघ - http://www.maayboli.com/node/25289#comment-1339957
विकेटकीपर्स बद्दल सहमत. विजय
विकेटकीपर्स बद्दल सहमत.
विजय भारद्वाज आठवला , चष्मा होता ना त्याल ? >> अरे हो आत्ता आठवला. तुरळक मॅचेस खेळला बहुधा तो.
वाचले ते, भास्कराचार्य
"घर पाण्यावरी, बंदराला करतोय
"घर पाण्यावरी, बंदराला करतोय ये जा" प्रमाणे?" - १++++
"मधल्या काही महिन्यांत माझा इंटरेस्ट एकदम कमी झाला होता" - असं नका करू. ('सुधाकर, तुम्ही आमचे पाठचे भाऊ, आम्ही तुम्हाला काय बरं सांगायचं, पण तुम्ही हा दारूच दुष्ट नाद सोडा' - च्या चालीवर वाचावं). ऐन १०वी - १२वी च्या परिक्षेच्या मधे आलेल्या मॅचेस सुद्धा, आई-वडिलांच्या शिव्या खाऊन पाहील्या, तेव्हा नाही सुधारलो, आता काय सुधारणार? (कुत्र्याच्या शेपटासारखे झालेले आमचे पिंड, भगवद्गीतेच्या नळकांड्यात घातले म्हणून थोडीच सरळ होणार आहेत?)
.
.
विजय भारद्वाज केनियातल्या
विजय भारद्वाज केनियातल्या ट्राय-सिरीज ला मॅन ऑफ द सिरीज होता. अचानकपणे भरवशाचा मिडल ऑर्डर बॅट्समन आणी ऑफ-स्पिनर मिळाल्याचा आनंद झाला होता. पण नंतर एक मॅच चश्मा काढून खेळल्याचं आठवतो (१ ओव्हर टाकून काहीतरी ९ रन्स वगैरे दिले होते आणी बॅटींग करताना रनआऊट झाला होता असं अंधुकसं आठवतय). नंतर एक्दम कर्नाटक चा कोच म्हणूनच आला होता.
विकेटकीपर च्या बाबतीत असं
विकेटकीपर च्या बाबतीत असं नेहेमीच होतं, की एकाचा जम बसला, की बाकीचे समकालीन 'ऑल्सो रॅन' मधे मोडतात. >> त्याबाबतीत विकेट कीपर किंवा लेग स्पिनर , किंवा ऑसी/इंग्लंड मधे कसलाही स्पिनर हे करियर जरा धोक्याचच आहे ना ?
अक्ख्या टीम मधे १ जागा . तीही कोणीतरी अडवली तर संपलच
"घर पाण्यावरी, बंदराला करतोय
"घर पाण्यावरी, बंदराला करतोय ये जा" >>
फे.फे. लिस्ट मधली बरीच नावे आठवली. तेंव्हा एकंदर रणजी फॉलो करण्यामधे पण मजा असायची. कधी कधी सणासुदीचा दिवस म्हणून रणजी उपांत्य, अंतिम सामन्यांच्या वेळी सगळे international players खेळायचे नि धमाल यायची. मला वेंगसरकरने एक हाती खेचली मुंबई वि. हरयाणा हि अंतिम लढत अजून ही आठवते.
विकेटकीपर्स बद्दल सहमत >> +१. तरी सध्या टेस्ट साठि वेगला ठेवायची फॅशन आल्यामूळे कमीत कमी दोघांना तरी संधी मिळते हेही नसे थोडके.
साईराज बहुतुले हे नाव आठवतेय का ? मुंबईचा leg spinning allrounder होता. हमखास मुंबई अडचणीत आली कि बहुतुले वाचावत असे. २००१ ची सिरीज खेळला होता.
संजय मांजरेकर > >Aus Media च्या नादी लागून भारतीय मिडीया ने बुडवायला मदत केलेला आगरकर च्या आधीचा एक खेळाडू.
फेरफटका . नाही ही विरक्ती
फेरफटका :D. नाही ही विरक्ती तात्पुरती आहे हे कळत होते. या तीन टी-२० चे हायलाईट्स पाहिल्यावर संपली. मला क्रिकेट पाहायला कधी बंदी आल्याचे लक्षात नाही (बहुधा घरातील सार्वत्रिक आवड हे कारण असावे. माझे आजोबासुद्धा पाहात). चित्रपट पाहायला मात्र आली होती - मधली दोन तीन वर्षे फक्त दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत अलाउड होते. पण एकूण क्रिकेट क्रेझीनेस बराच केला आहे. सचिन ची चेन्नई ची १९९९ ची पाक वि. इनिंग पाहायला हापिसातून पळून गेलो. मॅच पाहिली व हापिसात परत आलो. त्यावेळेस आमचा बॉस व त्याचा एक कलीग यांच्यात लोकांबद्दल रस्सीखेच सुरू होती. त्याला संशय आला होता आम्ही त्याच्याबरोबर काम करायला गेलो आहोत. जेव्हा कळले की तिकडे नव्हतो, व मॅच बघायला गेलो होतो. तेव्हा ते योग्य पर्स्पेक्टिव्ह मधे घेउन तो काहीच बोलला नाही. तसा तो ही फॅनच. सादागोपन रमेश चा उच्चार सडगोपन रमेश आहे असे आम्हाला त्याच्याकडूनच कळले. तो तमिळ. त्यामुळे तसे अगदीच काही शिकायला मिळाले नाही त्याच्याकडून असे म्हणू नाही शकत (कारण एरव्ही तो दोन तीन दिवसांत निवृत्त होणार असल्यासारखा असे कायम हापिसात)
असामी, "वेंगसरकरने एक हाती
असामी, "वेंगसरकरने एक हाती खेचली मुंबई वि. हरयाणा हि अंतिम लढत अजून ही आठवते." - ऑलमोस्ट शब्द राहीला. अगदी ३ रन्स वगैरे राहीले असताना अॅबी कुरूविल्ला (तोच तो, जो आळीपाळीनं, एक नॉर्मल आणी दुसरा स्लोअर वन टाकायचा. सनथ जयसुर्या ला आऊट करण्याचं पुण्य बरेच वेळा संपादन केलेला) आऊट झाल होता आणी वेंगसरकर पिचवर बसून रडला होता.
बहूतुले सचिन च्या कॅप्टन्सीमधे भारताकडून खेळला. नंतर तो महाराष्ट्र, विदर्भ, आंद्र, आसाम असा मुंबईबाहेरच्या संघांकडून पण रणजी खेळला.
संजय मांजरेकर टेक्निक च्या आहारी जाऊन स्वतःचा बळी देऊन बसला असं मला वाटतं. शेवटी शेवटी तो ऑफ स्टंप च्या ईंचभर बाहेर असलेल्या बॉलला सुद्धा बॅट न लावता, नुसताच एका एंड ला उभा रहायचा. (३७ - ३८ चा काहीतरी करियर स्ट्राईक रेट आहे त्याचा टेस्ट मधे आणी २००० च्या आसपास रन्स). सुरूवातीला छान खेळायचा.
फारएण्ड, ज्जेब्बात! सही पकडे है!
ऑलमोस्ट >> हो राहिला तो
ऑलमोस्ट >> हो राहिला तो शब्द. चेतन शर्माला मियांदाद बरोबर पाण्यात वेंगसरकर दिसायची वेळ आणली होती.
अॅबी कुरूविल्ला (तोच तो, जो आळीपाळीनं, एक नॉर्मल आणी दुसरा स्लोअर वन टाकायचा. सनथ जयसुर्या ला आऊट करण्याचं पुण्य बरेच वेळा संपादन केलेला >>
... बहुधा रन आऊट होता आणि. हेच वर्णन प्रसाद ला पण देतात येईल जो एक स्लोअर वन आणी दुसरा अजून स्लोअर वन टाकायचा तो. 
शेवटी शेवटी तो ऑफ स्टंप च्या ईंचभर बाहेर असलेल्या बॉलला सुद्धा बॅट न लावता, नुसताच एका एंड ला उभा रहायचा >>हो 91 World Cup नंतर तो पार वेगळाच बॅट्समन झाला. खरतर सचिनच्या अगोदर ८८-८९ च्या पाकिस्तान सिरीज मधे मांजरेकर एका बाजूला ठाम उभा राहिल्यामूळे वाचलो होतो. (प्रेक्षकांची हुल्लडबाजी वगैरे बाजूला ठेवून)
"प्रसाद ला पण देतात येईल जो
"प्रसाद ला पण देतात येईल जो एक स्लोअर वन आणी दुसरा अजून स्लोअर वन टाकायचा तो." - प्रसाद तर श्रीनाथ चा साईडकीक आणी पाकिस्तान विरुद्ध हमखास खॅळणारा खेळाडू ह्या व्यतिरिक्त कसा काय ईतका काळ खेळला हे नास्तिकाला आस्तिक करेल असं आश्चर्य आहे. मला तर फास्ट ओपनिंग बॉलर पहिल्या ओव्हर पासून कटर्स टाकतोय हे दृश्यच करूण वाटायचं.
मांजरेकर ने पाकिस्तान विरुद्ध २३६ रन्स केलेल्या आठवतायेत. (आणी लगेच अब्दुल कादीर च्या बॉलिंग वर त्याच्याच हातात बॉल मारून २-३ पावलं पळून, मागे वळताना रनआऊट झाला होता).
शारजा ला काही मॅचेस मधे चांगली बॅटींग केली होती. मग दिवा विझताना एक्दम मोठा होतो, तसं १९९६ च्या वर्ल्ड कप मधे काही फटकेबाजी केली होती.
प्रसाद जेथे स्विंग मिळेल तेथे
प्रसाद जेथे स्विंग मिळेल तेथे एकदम वेगळा बोलर व्हायचा. भारतात व लंकेत मात्र जाम बोअर करायचा.
प्रसादचे डोके नि temperament
प्रसादचे डोके नि temperament जर श्रीनाथला असते तर काय बहार झाली असती
गावसकर, व मांजरेकर/द्रविड
गावसकर, व मांजरेकर/द्रविड मधे हा एक फरक असेल ना? गावसकर पाहिजे तेव्हा खूप आक्रमक खेळू शकायचा. द्रविडही कदाचित खेळू शकत असेल पण प्रत्यक्षात फारसे कधी दिसले नाही. वन डेज मधे मात्र मस्त खेळायचा मधली काही वर्षे. कोणताही गाजावाजा न करता आवश्यक तेवढे रन्स आवश्यक त्या रेट ने काढायचा तो. पाक मधल्या २००४ त्या जिंकलेल्या सिरीज मधे व तसेच त्या २००३ मधल्या फेमस मॅच मधे पाकविरूद्ध त्याने युवी व कैफ बरोबर केलेल्या भागीदार्या एकदम इफेक्टिव्ह आहेत.
फरक असेल तर बोलर ला 'मी बॉस आहे' हे दाखवणार्या आक्रमकतेत. ऐन भरातील मार्शल ला पहिल्या तीन बॉल्स ना तीन फोर मारणे, विंडीज सारख्या बोलिंग विरूद्ध ९१ बॉल्स मधे शतक असले प्रकार गावसकर एकदम कात टाकल्यासारखे खेळ बदलून करू शकत होता.
गावसकरला attitude (चांगल्या
गावसकरला attitude (चांगल्या अर्थाने) होता जो मांजरेकर/द्रविड ला नव्हता. गावसकर जास्त तंत्रशुद्ध होता बाकीच्या दोघांपेक्षा किंवा अगदी सचिनपेक्षाही. त्याने बंगलोरच्या ८७ च्या मॅच मधे त्या mine field वर ज्या सहजतेने पाकिस्तानचे दोन्ही स्पिनर्स हाताळले होते ते जे ब्बात. (बेदीने पाकिस्तानच्या दोन्ही स्पिनर्स ना टिप दिली होती कसे बॉलिंग करायची ती, ह्या अपराधाला क्षमा नसावी.)
द्रविड ने स्वतःला अतिशय सुंदर तर्हेने adopt केले २००० नंतर. हवे तेंव्हा strike rotate करायला शिकल्यामूळे किती फरक पडला. strike rotate म्हटले कि मला डीन जोन्स, डेव्हिड बून्स, अर्जुना रणतुंगा आठवतात राव.
असाम्या त्या बंगलोर च्या मॅच
असाम्या त्या बंगलोर च्या मॅच बद्दल अयाझ मेमन का कोणाचातरी लेख आहे तो वाचला आहेस का? लिन्क शोधतो. इक्बाल कासिम व तौसिफ होते का ते स्पिनर्स? लंच का टी टाईमला "वो बाबा आदम खेल रहा है ना अभीतक" म्हणून तोपर्यंत मॅच हातात नाही असे म्हंटले होते म्हणे
http://www.espncricinfo.com/m
http://www.espncricinfo.com/magazine/content/story/413441.html
"बॅट है, या दीवार!"
आपल्या अंपायने ही जरा दिले असते नॉट आउट तर काय बिघडले असते. याद करो खिजर हयात और शकूर राणा को असे कोणीतरी आधीच सांगून ठेवायला हवे होते
आयला, डाउन द मेमरी लेन का
आयला, डाउन द मेमरी लेन का आज?
अयाझ मेमन फारच मस्त लिहितो. आणि बोलतो.
महाराश्त्राच्या संधी न
महाराश्त्राच्या संधी न मिळालेल्या दादा प्लेअरमध्ये मिलिंद गुंजाळ राहिला ना भाऊ. एकतर मुंबै महारष्ट्राच्या हाडवैरात लै खेळाडू वाया गेले. नंतर दिल्ली,कर्नाटकच्या लोकानी मुम्बैची सद्दी सम्पवली. एकेकाळी मुम्बईचा फक्त सचि नच राहिला होता संघात. पण धोनी रांचीतून येऊन एवढा मोठा झाला हे आश्चर्यच आहे क्रोकेटमधले
मस्त लेख रे फा. कसा काय मिस
मस्त लेख रे फा. कसा काय मिस झाला देव जाणे. "बॅट है, या दीवार!
माझ्या क्रिकेट प्रेमाला खत पाणी घालण्यामधे त्या इनिंगचा जबरी वाटा होता.
गावसकर ची तुलना (खरं तर नकोच
गावसकर ची तुलना (खरं तर नकोच कुणाशी कुणाची तुलना), सचिन शी होऊ शकते. एक म्हणजे दर्जा (डिसक्लेमरः मी द्रविड चा सब्जेक्टीव्ह, ऑबजेक्टीव्ह, ऑबसेसिव्ह, पझेसिव्ह, अॅग्रेसिव्ह फॅन आहे) आणी दुसरं म्हणजे चेंज एजंट, अशा दोन्ही पद्धतीनं. दोघांनी तत्कालीन फलंदाजांच्या आणी भावी पिढ्यांच्या मानसिकतेत आमुलाग्र बदल घडवला.
द्रविड मांजरेकरपेक्षा खुपच उजवा खेळाडू होता. एक तर adaptation हा त्याचा खूप मोठा गुण ठरला. १९९९ च्या वर्ल्डकप पासून वन-डे मधे त्याने खूप effective खेळ केला (१९९९ ते २००७). टेस्ट मधे तर तो फारच वरच्या दर्जाचा खेळाडू (टॉप ५) आहे.
१९८६ ची गावसकर ची ईनिंग: तो लेख वाचलाय. अफाट आहे.
असामी, शकुर राणा च्या बरोबरीनं न विसरण्यासारखं आणकी एक नाव म्हणजे, इद्रिस बेग!
छान चाललीय चर्चा गावसकर
छान चाललीय चर्चा



गावसकर बद्द्ल फक्त ऐकूनच होतो .
आपल्यात लोकाना वाईट म्हणण्यातच लोकाना आनंद मिळतो
गावसकर अन वन डे म्हटल की ती ३४ ची खेळीच आठवते सगळ्याना
कपिलही ज्याकाळी फक्त ४३१ का ४३४ साठी खेळत होता , तेव्हा बघितलेला थोडा . अन त्यामुळे लहानपणी वाईट इमेज झाली होती ( इंग्रजीला धडा असूनही )
नंतर नंतर जस जस वाचत गेलो तस कळत गेल
सगळ्यात महत्वाच म्हणजे लॉर्ड्स बघायला गेले असता तिथला ८०-९० वर्षाचा टूर गाईड ज्या पध्द्तीने अन आदराने कपिल बद्द्ल बोलत होता ते पाहून तर अगदीच .
Pages