"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ९

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:08

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"खाद्ययात्रा"

झब्बू म्हणून कुठल्याही खाद्यपदार्थाचे छायाचित्र अपेक्षित आहे. कोलाज अपेक्षित नाही.

jhabbu_khadyapadarth.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा! मला हे आख्खं ताट पाहिजे... आत्ताच्या आत्ता Sad
नलिनी, झकास फोटो!
आर्च, घरच्या भाज्या खासच. पीचेस आहेत तुझ्या बागेत??? मी कधी येऊ?? :p

बेसनाच्या लाडवांचा फोटो ख ल्ला स! हा घ्या फोर्टमधल्या ब्रिटानियातला अस्सल पारशी 'बेरी नो पुलाव' Happy

Berry no pulao

भावना, सहीच झालेत गं जांबु... सगळे मस्त एका साईजचे झालेत. रंग पण मस्त आलाय...अत्ता उचलुन तोंडात टाकावासा वाटतोय एखाद-दुसरा....मग तिसरा... चौथा.... Happy

अहाहा. काय मस्त पदार्थ,ताज्या भाज्या,उस इ इ आहेत. एका पेक्षा एक अक्षरशः:)
आमच्या backyard मधले यंदाचे दोडके Happy
DSC04879.JPG

सिन्डरेलाचा तो पदार्थ झूलॉजी पण नाही आणि बॉटनी पण नाही..... बहुतेक तो फ्राय केलेला बूट आहे... Happy

पोंगापंडीत !! Lol काय नांव ठेवलंय !
याला आमच्याइकडे बॉबी/नळ्या म्हणतात.

पोंगा पंडित ... Happy मस्त नाव....
आमच्या कडे विदर्भात (गडचिरोलीकडे) ह्याला..नड्डे म्हणतात...आणी fingers पण म्हणतात...
मस्त झब्बू....

<<लाजो, फोटो कुठला आहे? फाउन्टन- चर्चगेट का ?>>

हो बरोब्बर... उसाची रसगाडी तिथलीच... Happy

Pages