"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ९

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:08

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"खाद्ययात्रा"

झब्बू म्हणून कुठल्याही खाद्यपदार्थाचे छायाचित्र अपेक्षित आहे. कोलाज अपेक्षित नाही.

jhabbu_khadyapadarth.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा ... ओहो .... जबरी.

'दाने दाने पर ...' लई खास. मस्तच.
फोटो शोधलेच पाहिजेत आता.

हि अमेरिकेत बनवलेली पाणीपुरी... पुर्‍या पण घरीच बनवल्यत बर का...
panipuri.jpg

काही खरं नाही... मी चाललो घरी... मस्तपैकी काहितरी खल्याशिवाय चैन पडणार नाही आता!

इथे जेवणाची वेळ होत आलीय आणि त्यावर हा असा सुग्रास पदार्थांचा मारा Sad
ही घ्या खानदेशी शेवभाजी -

Shevbhaji

ह्या मी आणि आईनी मिळुन केलेल्या चकल्या... सगळे आकार मी दिलेत (आणि तळले देखिल)

IMG_1420.jpg

मस्तच! Happy

Pages