IBS (irritable bowel syndrome) आजाराबद्द्ल मार्गदर्शन हवे आहे.

Submitted by prashant०६२ on 11 January, 2016 - 02:43

गेल्या २ वर्षा पासुन मला पोटाचा त्रास होत आहे. सगळया तपासण्या केल्या पण आजाराचे निदान झाले नाहि. लक्षणावरुन डॉ. नी IBS (irritable bowel syndrome) हा आजार असावा असे निदान केले. बरेच औषध उपचार झाले पण काही फायदा झाला नाहि. याबाबत कुणाला काही औषधाची माहीती असल्यास कृपया मद्त करावी.

प्रशांत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही बुवा माहित मी तर या रोगाचं नावच पहिल्यांदा ऐकलं

मग प्रतिसाद कशाला दिलाय तर, धागा वर राहून जाणकारांच्या नजरेस पडावा म्हणून Happy

आतड्याचा दाहचा त्रास हा पचनसंस्थेमध्ये सर्वात जास्त आढळणारा विकार आहे.सर्व साधारण पाहणीमध्ये लोक संखेच्या १५ % इतका या विकाराचा प्रादुर्भाव आढळतो .या विकाराची मुख्य लक्षणे पुढील प्रमाणे :-
१. पोटात अधून मधून दुखणे.
२.बद्धकोष्ठता.
३. अतिसार (जुलाब) होणे .
सर्वात महत्वाचा मुदा म्हणजे ह्या विकारात रक्ततपासणी अथवा मलतपासणी मध्ये काहीही दोष आदळत नाही . तसेच लहान व मोठ्या आतड्याची बेरियम देवून एक्सरेने तपासणी केली तर त्यातसुधा कोणताही दोष दिसत नाही .थोडक्यात म्हणजे ह्या विकारात अताड्याला सूज ,अलसर ,टि. बी . कन्सर अथवा कोलायटिस होत नाही .वरील प्रकारे कोणताही रोग नसताना मग पोटात मात्र सतत दिवसाच्या दिवस का बरे दुखत राहते ? ह्याचे कारण आहे आतड्याचा आकुंचन प्रसारणातील किर्या मध्ये झालेला बिघाड हे होय .ह्या विकारात आतड्याचे आकुंचन नेहमीपेक्षा जास्त जोरात व दाबाने होते . त्यामूळे रुग्णांना पोटात निरनिराळ्या टिकाणी वेदना जाणवतात .अत्याधुनिक संसोधनाद्वारे आता असे सिध्द झाले कि आतड्यापासून मेंदूपर्यत जाणार्या मज्ज्यतन्तु (Nerves) ह्या विकारात अधिकच संवेदनशील होतात व त्याचे रुपांतर पोटदुखीची तीव्रता वाढवण्यात होते .जर ह्या विकाराचे काही निश्चित निदान केले नाही तर अपेंडिकस पिताशय अथवा गर्भासयला सूज आली आहे म्हणून पोटावर शस्त्रक्रिया करून एखादा अवयव काढण्याची शक्यता असते .पोटात दुखण्याच्या कारणाने जर वेळेवर निश्चित निदान "आतड्याचा दहाचा त्रास " असे झाले तर वरील शस्त्रक्रिया टाळू शकतात .
यास्तव आतड्याचा दहाचा त्रास हा विकार नेमका काय आहे ,त्याची मुख्य लष्ने कोणती , हे आपण पाहू .
१. कधी बद्धकोष्ठता तर कधी अतिसार होणे .
२.पोटात निरनिराळ्या भागात अधून मधून दुखणे.
३. पोटातील दुखणे चालू होताच शोचाला जाण्याची इच्छा होणे .
४. शोचास जावून आल्यावर सुद्धा कोठा साफ न झाल्याची भावना होणे .
५.शोचास कधी खडा होणे तर कधी पातळ परसाकडेच होणे .
६. कधी आव पडणे .
७.जेवणानंतर पोटात दुखण्यास सुरवात होणे .
८. पोट फुगणे किवा डब्ब झाल्या सारखे वाटणे .
९.शोचास साफ झाल्यावर बरे वाटणे ,अर्थात पोटात दुखण्याचे कमी होणे अथवा थांबणे.
१०.काही रुग्णांना सकाळीच ३ ते ४ वेळा पोटात दुखून शोचास होणे व नंतर दिवसभर काही त्रास जाणवत नाही .
११.काही रुग्णांना खाल्यानंतर किवा चहा कॉफी घेतल्यानंतर लगेच शोचास जावे लागते.
१२. रात्रीची झोप मोडून शोचास जाण्याची इच्छा ह्या विकारात मुळीच आढळून येत नाही ,परंतु हेच लक्षण मात्र निरनिराळ्या कोलायटिसच्या रुग्णामध्ये आदळून येते .

जर त्रास खूप होत असेल तर एन्डोस्कोपी करुन घ्या चांगल्या डॉक्टरांकडून काय झाले आहे ते लवकर कळेल. ५ मिनिटात एन्डोस्कोपी होते आणि निकालही लगेच मिळतो. जर लार्ज ईन्टेस्टाईन वेडीवाकडी असेल तर हमखास बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. महिनाभर इसबबोल घेऊन खूप फरक पडतो. पण एकदा तर एन्डोस्कोपी करुन निदान करुन घ्या.

मला हा त्रास ३ वर्षे झाला. हा मुख्यतः तणावामुळे व अति चिंतेने होतो. या वर उपाय म्हणजे प्राणयाम , नियमित आहार, चिंता न करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक सिंप्टम्स कडे दुर्लक्ष करणे, मी तुन्म्हाला फोन नंबर कळवला आहे. हवे असल्यास बोलता येईल

मला हा त्रास ३ वर्षे झाला. हा मुख्यतः तणावामुळे व अति चिंतेने होतो. या वर उपाय म्हणजे प्राणयाम , नियमित आहार, चिंता न करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक सिंप्टम्स कडे दुर्लक्ष करणे, मी तुन्म्हाला फोन नंबर कळवला आहे. हवे असल्यास बोलता येईल

माझ्या भावाला पण असा त्रास आहे धागा वाचुन आजाराचे नाव कळाले सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात पण त्रास होतो.
वय ४२ वर्ष आहे.

..,.

Gastrinoma has similar symptoms. Blood test for Gastrin can determine Gastrinoma diagnosis.
All the best.

दिवसभरात थोडे थोडे ५-६ वेळा खाल्ल्याने खूप फरक पडतो. त्याच बरोबर आर्टिफिशल स्विटनर, सिंपल शुगर्स, कॅफिन, तळलेले चमचमीत पदार्थ टाळा. गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास होवू नये म्हणून कोबी -फ्लॉबरसारख्या भाज्या टाळा किंवा कमी प्रमाणात, तसेच कडधान्ये भिजवून, मोड आणून आणि नीट शिजवून, वरणासाठी डाळ देखील ६ तास भिजवून वापरावी. तुम्हाला शुभेच्छा!

माझ्या एका मैत्रिणीला आहे हा त्रास. ती खाण्याचे खूप पथ्य सांभाळ्ते आता. चहा कॉफी अजिबात नाही. पोळी नाही. सगळा भर भाज्या व मांस. तिला अजुन विचारून लिहिन.
अन हो.. प्रोबायोटिक घेतल्याने फायदा होतो.

मला पोटाचा, आतड्याचा एक कधीही बरा न होणारा आजार आहे. त्याचे निदान होईस्तोवर त्याने मला कित्येक वर्षे छळलेय. या अनुभवांबद्दलही लिहायला हवे कधीतरी. ते एक असो, पण फायनली नवी मुंबईच्या एका डॉक्टरने निदान केले आणि आता योग्य ऊपचारही चालू आहेत. योगायोग म्हणजे आता मी त्याच्याकडेच जात आहे, रस्त्यात मोबाईलवर ही पोस्ट टाकत आहे. तुम्ही मुंबई, नवी मुंबई परीसरातले असाल तर तो बेस्ट आहे. त्याचे नाव सुचवू ईच्छितो. पण वर बी यांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर कडून टेस्ट करून कन्फर्म करून घ्या. तसे न झाल्यास किती छळ होतो मला अनुभव आहे. पोटाचा लांबलेला आजार कधी हलका घेऊ नका. बी म्हणतात तसे एण्डोस्कोपी असते तसेच एक कोलोनोस्कोपी देखील असते, माझा आजार त्यातून डिटेक्ट झालेला.

हा मुख्यतः तणावामुळे व अति चिंतेने होतो. या वर उपाय म्हणजे प्राणयाम , नियमित आहार, चिंता न करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक सिंप्टम्स कडे दुर्लक्ष करणे>>>>>>>>>>>>>>> +१

तुमच्या इतर अ‍ॅलोपथिक औषधाबरोबर कुटजारिष्ट (तेही वैद्धनाथचे) २ वेळा नियमित घेत चला.अगदी ३-४ चमचे.दूध आणि दूधाचे पदार्थ वर्ज्य करा.त्याऐवजी ताक्,दही घेत चला.तिखट्,मसालेदार टाळा.काही दिवस बिनतिखटाच्या,अत्यंत कमी तेलाच्या भाज्या खा.
तुमचा त्रास कमी झाला तरी कुटजारिष्ट १-१.५ वर्षे चालू ठेवा.खरंच आराम मिळेल.

देवकी +११११११११११
त्या बरोबर ताक्, खिचडी इ. घ्या.
तूपाचा वापर थोडा वाढवा. या वर अ‍ॅलोपाथीमधे फारसा उपाय नाही. ते कोलोस्पा,इ. देतील. या तील बरीच औषधे अँटी दिप्रेसंट असतील. बी केअरफुल!!
वेळेवर झोपा व वेळेवर उठा
हा रोग नाही,, ही प्रवृत्ती आहे

तुम्ही मुंबई, नवी मुंबई परीसरातले असाल तर तो बेस्ट आहे.>> मी पुण्यात रहातो. पुण्यातील् कोणी तज्ञ माहीतीचे अस्तील तर सुचवावे.
तुमच्या इतर अ‍ॅलोपथिक औषधाबरोबर कुटजारिष्ट (तेही वैद्धनाथचे) >> मी कुट्जारिष्ट वापरतो पण पतंजलीचे

सर्वांचे मनापासुन आभार

कुट्जारिष्ट वापरतो पण पतंजलीचे>>>>>> त्यांचे माहीत नाही.कारण सांडूचे कुटजारिष्टपण प्रभावी ठरत नाही.

तुम्ही मुंबई, नवी मुंबई परीसरातले असाल तर तो बेस्ट आहे.>>

मी माझी कॅलोनोस्कोपी पुण्यातच केली आणि ते डॉक्टर एक नंबर आहेत पुण्यात. अतिशय छान आहेत. त्यांच्याकडे सकाळपसून १०० लोकांची रांग असते. प्रत्येक व्यक्तीला ते ३ ते ४ मिनिट इतकाच वेळ देतात. लवकर काय ते सांगतात. त्यांच्याकडे फक्त ते एकच तेवढे दवाखान्यात दिसतील बाकी सर्व पेशन्ट. कुणाचीही मदत ते घेत नाहीत कामाला. मला त्यांचे नाव आत्ता आठवत नाही पण मी घरी जाऊन फाईल चेक करेन. पहिल्या दिवशी मी त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी आधी पोटाला दाबून पाहिले. मग म्हणाले उद्या सकाळी ७ वाजता या. एक औषध दिले होते ते घेतले की जुलाब होऊन पोट साफ होते. ते रात्री जेवण न करता घ्यायचे. ते घेतले की रात्रभर तुम्हाला जुलब होऊ शकतात. मला झाले नाही. एक दोन वेळाच मी गेलो. नंतर सकाळी सात वाजता त्यांच्याकडे गेलो तर लोकांची संख्या बघून अवाक झालो. संपुर्ण भारतातून कुठुन कुठुन त्यांच्याकडे लोक आली होती. सर्वांचे अभिप्राय अतिशय छान होते त्यांच्याबद्दल. बरोबर ७ लाच माझा नंबर लागला. त्यांनी कोलोनोस्कोपी सुरु केली. आधी भिती वाटली. मग ती करता करताच ते माझ्याशी बोलले आणि दोन मिनिटात आतमधे टाकेलेला स्कोप काढला. म्हणाले काहीच नाही फक्त लार्ज ईन्टेस्टीन थोडी वेडीवाकडी आहे. ती सरळ होईल. दोन महिने इसबगोल घ्या. मी दोन महिने इसबगोल घेतले. आता मी ९५ टक्के बरा आहे.

त्यांचा पत्ता असा आहे:

डेक्कनमधे जिथे गुडलक आहे तिथे समोर पुढे गेलो की डाव्या बाजूला जी बोळ लागते त्या बोळीत एक हॉटेल आहे की मंगलकर्य आहे त्याच्या आतल्या बाजूस हे डॉक्टर आहेत. मला त्यांचे नाव आता आठवत नाही. मी घरी फाईल चाळतो वर परत लिहितो. पण तुम्ही जर गुडलक कॅफ जवळ जर गेला तर तिथे समोर एक मेडीकलच दुकान आहे. म्हणजे गुडलक ज्या बाजूला आहे त्याच बाजूला रस्त्याच्या कडेला हे मेडीकलचे दुकान आहे. त्या मेडीकल वाल्याला नक्कीच ते डॉ माहिती आहेत.

एन्डोस्कोपीचे दोन प्रकार असतात. जर तुमच्या स्मॉल ईन्टेस्टाईनमधे काही असेल तर ती मुखावाटून करतात. आणि जर लार्ज मधे असेल तर ती अ‍ॅनस मधून करतात. आपले अन्न नक्की कुठे अडकले आहे हे आपल्याला कळते. माझे अन्न नेहमी लास्ट फेसमधे अडकायचे. मला माहिती होते की लार्ज आतड्यांमधेच काहीतरी झाले आहे. आणि तेही डाव्या बाजुला झाले आहे. आपले मोठे आतडे हे उजव्या बाजुला सुरु होऊन डाव्य बाजुला ते संपतात. माझा त्रास हा अगदी डाव्या बाजुला होता.

आयबीएस मधे आतडे व मेंदु यांची असलेली गट लिंक ही संवेदनशील बनते.आयबीएस चे प्रमुख तीन प्रकार सी, डी, ए
सी मधे बद्धकोष्ठतेची प्रवृत्ती अधिक डी मधे मोशनची व ए म्हणजे अल्टरनेट. हे प्रकार बदलते देखील आहेत. पिंडानुसार आहार व त्रासाची लक्षणे याची आपणच नोंद ठेवून त्यानुसार पदार्थ टाळावेत भुकेपेक्षा कमी खाणे, कमी फूड जास्त वेळा खा,
शरीर व मन याचे अतूट नाते आहे. शरीराचा मनावर व मनाचा शरीरावर परिणाम होत असतो. आयबीएस मधे या दुष्टचक्रात माणुस अडकतो. हा सायकोसोमॅटिक त्रास आहे. याच्या तीव्रता बदलतात. हा तसा पूर्ण बरा होणारा नसतो.
वर सरदेसाईंच्या लेखाची लिंक दिली आहे त्यात शेवटी त्रास बराच झाला तरी आयबीएसमुळे अपाय होत नाही, हे समजणे आवश्‍यक आहे. जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे आहेत, आवश्‍यक तेव्हा औषध घ्यावे. असे सांगितले आहे.
मला हा त्रास आहे कमी जास्त होत असतो. आहार व मलप्रवृत्ती जपणे आवश्यक असते. सार्वजनिक जीवनात अनेक ठिकाणी स्वच्छतागृह उपलब्ध नसते त्यामुळे मनावर ताण येत असतो.
सीबीटी या सायकोथेरपीचा उपयोग होतो.

Pages