IBS (irritable bowel syndrome) आजाराबद्द्ल मार्गदर्शन हवे आहे.

Submitted by prashant०६२ on 11 January, 2016 - 02:43

गेल्या २ वर्षा पासुन मला पोटाचा त्रास होत आहे. सगळया तपासण्या केल्या पण आजाराचे निदान झाले नाहि. लक्षणावरुन डॉ. नी IBS (irritable bowel syndrome) हा आजार असावा असे निदान केले. बरेच औषध उपचार झाले पण काही फायदा झाला नाहि. याबाबत कुणाला काही औषधाची माहीती असल्यास कृपया मद्त करावी.

प्रशांत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेवण झाल्या झाल्या किंवा काहीही खाल्ल्यवर लग्गेच शौचाला जावे लागते हे या आजाराशी संबंधीत असू शकेल का?

हो.
नेहमीच्या वेळी पूर्ण इव्हॅक्युएशनचे समाधान नसणे आणि काही खाल्ल्यावर जावे लागणे हे एक लक्षण यात मोडतं.

अंजली_१२ कुठले फूड ट्रिगर करतात याचे स्वयंनिरिक्षण करणॅ. आहार विहाराचे डिझाईन त्यानुसार आपले आपण करणे.मानसिक आरोग्य चांग्ले ठेवणे.

वजन कमी करण्यासाठी आहारात बदल केले आहेत. परिणामस्वरुप कॉन्स्टीपेशनचा त्रास सुरू झाला. मॅग्नेशिअमयुक्त आहाराचा शोध घेताना लाल भोपळ्याच्या रसाबद्दल वाचनात आले. शनिवारपासून सकाळी नाश्ता घेण्यापुर्वी १५-२० मि. आधी साधारण १०० ग्रॅ. कच्च्या लाल भोपळ्याचा रस घ्यायला सुरवात केली. सोमवारपासून कॉन्स्टीपेशनचा त्रास अगदीच कमी झाला आहे.
विशेष म्हणजे ज्यांना शौचास कडक किंवा पातळ होते दोन्ही साठी ह्याचा फायदा होतो.
रस करण्यासाठी भोपळ्याच्या बिया काढून त्याची पाठ सोलून घ्यावी. फोडी करून मिक्सरमध्ये पाण्यासोबत रस करावा.
रसाची चव आवडली नाही तर हवे असल्यास ह्यात मिठ, दालचिनी पावडर, मध, सपरचंदाची फोड, अर्धे गाजर ह्यापैकी जे आवडते ते घालावे.
IBS साठी ह्याचा फायदा होतो असे वाचनात आले. आपल्यापैकी जर कोणी ह्याचा प्रयोग करून पाहिला तर खरेच फायदा होतो का ते कळू शकेल.
ज्यांना लाला भोपळ्याची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी हा रस घेवू नये.

हा धागा मी काही महिन्यांपुर्वी काढ्ला होता. त्यानंतर मला बरेच चांगले सल्ले मिळाले व अनेक चांगल्या डॉ. बद्द्ल माहिती मिळाली. मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे कि या त्रासापासून मी आता जवळपास पुर्ण बरा झालो आहे आणि ते ही कोणत्याही उपचाराशिवाय. मला काही तरी भयंकर आजार झाला आहे अशी मला भिती होती पण इथे मिळालेली विविध माहीती सल्ले यामूळे माझा आत्मविश्वास वाढ्ला व मी स्वतःच या आजारातून (मुळात हा आजारच नाही) बाहेर पडायचे असे ठरवले. त्यानंतर मी माझ्या जेवणाच्या वेळा निश्चित केल्या कोणत्यावेळी काय खावे / खाऊ नये, किती खावे, ज्या पदार्थामूळे मला त्रास होत होता ते प्रकर्षाने टाळले, योग्य तितकी झोप, योग्य आहार , काही हल्के व्यायाम (प्राणायाम) यांच्यामूळे मी यातून बाहेर पडलो. अर्थात हे सर्व माझ्यासाठी इतके सोपे नव्ह्ते. पण मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्द्ल सर्व मा. बो. करांचा मी शतशः आभारी आहे. धन्यवाद.

अभिनंदन! मनाने ठरवलं तर काहीही असाध्य नाही... योगिक जीवनशैली स्वास्थाची गुरुकिल्ली... असेच म्हणावेसे वाटते ...

prashant०६२ - परत इथे येऊन सांगीतल्याबद्दल धन्यवाद आणि त्रासापासून सुटका झाल्याबद्दल अभिनंदन

प्रशांत, खूप आनंद झाला तू ह्या पासून बरा होत आहे. तू जे काही केलेस ते नीट मुद्दे करुन लिही कारण त्यातून अनेकांना फायदा होईल. असे प्रश्न कित्येक डॉक्टर मिटवू शकत नाही.

prashant०६२
तुम्ही तुमच्या स्व उपचारांबद्दल अधिक तपशीलात लिहलेत तर इतरानाही त्याचा खूप फायदा होईल. तुम्हाला इथे जी मदत/माहिती मिळाली ती इतर कुणाला मिळाली तर तुम्हाला नक्कीच आवडेल ना?

लोक वर्षानुवर्षे झगडत असताना, तुम्ही केवळ सहा मिहीन्यात बाहेर पडलात अभिनंदन, तुमचा प्रवास अजुन सविस्तर लिहिलात तर बाकी लोकांना नक्कीच प्रेरणा मिळेल

सर्वांचे मनापासून आभार, मला होणारा त्रास आणि त्यापासून मिळवलेली सुट्का या बद्द्ल मी नक्की सर्व सविस्तर लिहीन.

तुम्हाला इथे जी मदत/माहिती मिळाली ती इतर कुणाला मिळाली तर तुम्हाला नक्कीच आवडेल ना?>>>>> हो हा धागा काढण्याचा मुळ उद्देश तोच होता.

सर्व औषधे बंद करा.
फक्त कुटजारिष्ट रोज संध्याकाळी,तीनचार दिवस घ्या.
कोणतेही औषध सतत घेतल्याने गुण येत नाही.
या रोगाचा मेंदूशी काही संबंध नाही. तुम्ही किती मोठ्या व्यक्ती, तुम्हाला कसा ट्रेस असतो वगैरे सांगितले की पेशंट सुखावतो. हे मार्केटिंग टेक्निक असते.

वरील आजारावर कुटजारिष्टापेक्षा मुश्तारिष्ट जास्त प्रभावी आहे . त्याला दाडिमाष्टकचूर्ण आणि पंचलवण भस्म यांची जोड दिल्यास लवकर फरक पडतो .
नेहमीच्या कंपन्यांचे औषधं वापरण्यापेक्षा केरळमधील कोट्टाक्कल आर्य वैद्य शाळेची किंवा वैदयरत्नम यांची किंवा avp कोईम्बतूर यांची औषधे वापरून बघा ..
फरक लगेच कळेल ..

भैषज्य रत्नावलीत अग्नीमांद्याधिकारात मुश्तारिष्टाचे बरेच उपयोग दिलेत . त्यात ग्रहणी रोगाचा उल्लेख स्पष्ट आहे .. आता आयुर्वेदात ibs ला काय म्हणतात माहित नाही पण केरळ भागातील काही वैद्य ibs साठी ग्रहणी रोगाची चिकित्सा म्हणून वरील तीन औषधे साधारणतः देत असतात .
यावर अजूनही बरेच औषधे आहेत जसेकी कुटजत्वगादी लेह , तालीसपत्रादी लेह, यवण्यादि चूर्ण (हि सर्व अष्टांग हृदयात आहेत ) वगैरे पण प्रत्येक वैद्य आपल्या अनुभवावरून आणि रोग्याला पाहून त्याची चिकित्सा ठरवतो ..
आयुर्वेदात एकाच रोगावर बरेच औषधे सापडतात आणि एकच औषध बऱ्याच रोगांवर वापरतात .
वरील पंचलवण भसम हे साधं औषध केरळच्या अष्टवैद्य परंपरेतील असून फार प्रभावी आहे पण केरळ बाहेर कोणी वापरात असेल असं वाटत नाही .

तसेही रोज रात्रौ झोपताना मोरावळा आणि मनुके खायची सवय असल्यास पोटाच आरोग्य टकाटक राहत शिवाय बाकीचे पण फायदे मिळतात ..

वरील एकही औषध न घेताही पचन आणि उत्सर्जन सिस्टिमची काळजी घ्यायचा भारी अनुभविक उपाय सांगतो -

१०० ग्राम सोनामुखी पावडर
५० ग्राम काळा दाना
२५ ग्राम गुलाब पाकळी
१५ ग्राम सुंठ आणि बडीशेप
१० ग्राम काळ मीठ
१० ग्राम निशोथ
३० ग्राम छोटी हरड

हे सगळं मिक्सर मधून काढून चूर्ण बनवा . रात्री झोपताना कोमट पाण्यातून चमचाभर घ्या . एक नंबर हार्मलेस डिटॉक्स आहे हा . महिन्यातून चार-पाच वेळेस घेत जा .. शक्यतो दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल तर बरं राहील.. वैद्य परंपरेतून मिळालेला उपाय आहे .. १००% अनुभविक पण आहे

रात्री झोपताना कोमट पाण्यातून चमचाभर घ्या . एक नंबर हार्मलेस डिटॉक्स आहे हा . महिन्यातून चार-पाच वेळेस घेत जा .. शक्यतो दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल तर >>>>>>> ibs च्या रुग्णासाठी हा उपाय?कठीण आहे.

ताई , मुळात जुनाट ग्रहणी रोग हा निवारणाला तसाही अति जटिल असतो पण हा ibs सारखा प्रकार चांगल्या वैद्यांच्या देखरेखीखाली व्यवस्थित नीट होऊ शकतो .

आणि वरील मी दिलेलं औषध हे बद्धकोष्ठतेवर आणि शरीरातील आम बाहेर काढण्यास उपयुक्त आहे .. माझ्या ८९ वर्षांच्या आजोबांना ८-९ दिवस शौचास होत नसे तर त्यांना हे औषध दिल्यापासून काहीही त्रास होत नाही .याचे तसे बरेच फायदे जाणवले तरी पोटाचे आजार असणाऱ्या व्यक्तीने महिन्यातून ७-८ वेळा घेऊन बघा आणि नंतर काय अनुभव येतो ते इथं लिहा .. पण शेवटी हा ibs किंवा इतर जटिल रोगांचा स्टॅण्डअलोन इलाज होऊ शकत नाही .

वरील पैकी फक्त सोनामुखी, काळा दाना, गुलाब आणि बडीशोप यांचं मिश्रण जरी वापरलं तरी पूर्ण परिणाम मिळतो .. ज्यांना शक्य आहे त्यांनी वापरून मला कळवा इथं..
सोनामुखी रेडीमेड पावडर घेण्यापेक्षा नुसती पाने घेऊन त्यातली चांगली पाने निवडून घ्या आणि तव्यावर थोडं तुप लावून मंद आचेवर परतवून घ्या .. तसेच काळा दाना आणि हरड हि आधी मंद आचेवर किन्चित भाजून घ्या तुपाच्या तव्यावर

Pages