IBS (irritable bowel syndrome) आजाराबद्द्ल मार्गदर्शन हवे आहे.

Submitted by prashant०६२ on 11 January, 2016 - 02:43

गेल्या २ वर्षा पासुन मला पोटाचा त्रास होत आहे. सगळया तपासण्या केल्या पण आजाराचे निदान झाले नाहि. लक्षणावरुन डॉ. नी IBS (irritable bowel syndrome) हा आजार असावा असे निदान केले. बरेच औषध उपचार झाले पण काही फायदा झाला नाहि. याबाबत कुणाला काही औषधाची माहीती असल्यास कृपया मद्त करावी.

प्रशांत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Gastritis साठी Bland diet करायला सांगितलयं. त्याविषयी माहिती हवी होती . अशा पेशंटना कोणती धान्यं आणि कडधान्यं चालतात ? गव्हाची पोळी चालते का ?

ब्लँड म्हणजे सपक, गव्हाची अ‍ॅलर्जी आहे का?
नाहीतर स्वतःला काय चालते व काय चालत नाही, कशाने पोट बिघडते हे स्वत"स कळते..... नव्हे कळले पाहिजे अगदी तुम्ही निरोगी असलात तरी काही अन्नपदार्थ आपल्याला सोसत नाहीत

कोलायटिस या आजाराबद्दल कोणी सांगू शकेल का? हा पूर्ण बरा होतो का?
कोणी या त्रासातून गेले असेल तर नक्की कोणती ट्रीटमेंट घ्यायची याबद्दल माहिती हवी आहे.
माझ्या नवऱ्याला झाला आहे, सध्या तो आयुर्वेदिक उपचार घेत आहे.

अलोपथीवाले औषधं लागू पडली नाहीत की दोन गोष्टी करतात
१) स्ट्रेस आहे ठोकून देतात,
२) टेस्टींग करूया कंप्लीट.

Pages