IBS (irritable bowel syndrome) आजाराबद्द्ल मार्गदर्शन हवे आहे.

Submitted by prashant०६२ on 11 January, 2016 - 02:43

गेल्या २ वर्षा पासुन मला पोटाचा त्रास होत आहे. सगळया तपासण्या केल्या पण आजाराचे निदान झाले नाहि. लक्षणावरुन डॉ. नी IBS (irritable bowel syndrome) हा आजार असावा असे निदान केले. बरेच औषध उपचार झाले पण काही फायदा झाला नाहि. याबाबत कुणाला काही औषधाची माहीती असल्यास कृपया मद्त करावी.

प्रशांत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.youtube.com/watch?v=osTx9MpZWlc

Irritable bowel syndrome, bloating, pain, diarrhea, constipation maybe caused by fungus, virus or bad bacteria. Probiotics can often make you feel better, but a comprehensive stool analysis may be the best way know exactly which probiotics to take or which treatment would be the best. Scope procedures for the upper and lower bowel, called endoscopy, can often help to find disease but rarely provide the information necessary to treat irritable bowel syndrome from a natural perspective.

आय बी एस साठी एन्दोस्कोपी,कोलोनोस्कोपी आवश्यक नाही

मी डॉ. परिमल लवाटे यांचे उपचार घेतले. त्यांनीही तुम्हाला एण्डोस्कोपी वगैरेची आवश्यकता नाही असे सांगितले. चिकित्सक लोकांना हा त्रास होत असल्याचे निरिक्षणही सांगितले.

चिकित्सा करू नका.
जेवण सौम्य अन नियमित ठेवा.
लक्षणांकडे दुर्लक्ष करा.
मन गुंतवा, संगीत, वाचन इ. छंद जोपासा.

संदर्भ : स्वानुभव

पण एन्डोस्कॉपी करुन घेण्यात काहीच हरकत नाही. तुमच्या आतड्याच्या आत काय चालले आहे हे एकदा नजरेने दिसते. आणि डॉक्टर थोरात पॉवरफुल डॉक्टर आहेत.

काही विशीष्ट पदार्थ खाल्ल्याने मला वेगवेगळ्या प्रकारे त्रास होतो उदा:- केळी, शेंगदाणे, बिस्कीटे, तळ्लेले पदार्थ, लसुन किंवा कडीपत्ता घातलेले पदार्थ, इ. असले पदार्थ खाने टाळ्तो आहे.

इथे इतके विचारल्यापेक्षा एकदा तरी डॉक्टरांकडे जा कारण इथे तुम्हाला लोक फक्त अनुभव सांगतील. मी हे खातो आणि हे टाळतो हे करुनही त्रास होतोच ना.. मग नक्की आता डॉक्टरच तुम्हाला मदत करतील.

प्रसन्न अ डॉक्टरांनी त्यांचे निरिक्षण सांगितले. कदाचित गट ब्रेन अ‍ॅक्सिस हे कारण असावे.किंवा माझे प्रश्न टाळण्यासाठी असावे.

>>काही विशीष्ट पदार्थ खाल्ल्याने मला वेगवेगळ्या प्रकारे त्रास होतो उदा:- केळी, शेंगदाणे, बिस्कीटे, तळ्लेले पदार्थ, लसुन किंवा कडीपत्ता घातलेले पदार्थ, इ. असले पदार्थ खाने टाळ्तो आहे.>>
आहाराची एक डायरी ठेवा. काही वेळा एखादा घटक नुसता त्रासदायक नसतो पण दुसर्‍या घटकाबरोबर त्रासदायक होतो किंवा कशा पद्धतीने शिजवला याने देखील फरक पडतो. हळू हळू तुम्हाला पॅटर्न लक्षात येइल. ताण घेवू नका. ही कंडीशन आहे आणि लाईफस्टाईलमधे बदल केल्यास त्रास आटोक्यात ठेवता येतो.

४ वर्शा पुर्वी डॉ. नि Mebeverine च्या गोळ्या सुरु केल्या होत्या २ - ३ महिने कोर्स सुरु हो़ता.

झालो बरा...

मेबास्प , मेबेव्हिरान , कोलास्पा या सर्व आतड्य्य्ची अचानक हालचाल थांबवण्याचे मसल रिल्याक्शंट आहेत , या सर्व फायदा करतात.

बर्याचदा IBS चे मूळ कारण मेंदू आणि आतडी यांचा समन्वय नसणे हे असते . त्यामुळे कितीही टेस्ट केल्या तरी त्यात काही आढळून येत नाही , पण त्रास तर होतंच असतो.

भूक न लागणे, वजन कमी होणे , अंगावर पित्त उठणे , पिंपल्स, मूड स्विंग,सतत चिडचि,, असे अनेक त्रास व्हायला लागतात .. पोट साफ होण्याची औषधे मग घेतली जातात, पण त्याने काहीही फरक पडत नाही.उलट आतडी अजूनच सेन्सेटिव होतात. पोट निट नसल्याने चिडचिड आणि चिडचिड सतत राहिल्याने पोट नीट नसणे हे दुष्टचक्र अनेक वर्षे सुरु राहते.

मेंदू आणि आतडी यांच्यातले कनेक्शन नीट करणे हाच एक उपाय यावर आहे

http://pearceonearth.com/how-i-cured-my-irritable-bowel-syndrome/

हि लिंक वाचनात आली आणि फारच उपयुक्त वाटली.

बी, प्रकाश घाटपांडे , स्वाती२, निलापी, रेव्यु, प्रसन्न अ़. खुप छान व उपयुक्त माहीती दिल्याबद्द्ल सर्वांचे मनापासुन आभार, आशा आहे की माझ्यासारख्या अनेक लोकांना याचा फायदा होईल. धन्यवाद

माझ्या आईला गेली १५ वर्ष हा आजार आहे .लपुण्यात डॉ लवाटे सांनी स्कोपी केली . प्रचंड घाबरट चिंता करायचा स्वभाव . वय सध्या ७८ वर्षे . प्रिप्रो व मेसेकॉल ह्या गोळ्या घेते सतत जुलाब जाऊन आले तरी परत लागल्याची भावना . जेवल्यैवर पोटात दुखणे . होमिओपाथिक एौषध घेते .

मला याच्या जवळपास्स जाणारा क्रोन्स डिज़ीज़ आहे त्यावर दोन वर्ष औषाध घ्यायला सांगितले आहे (salazopyrin). याने आतड्याला आलेले inflamation कमी होईल. पण मधेमधे मूळ लक्षणे येतात आणि त्यावर वेगळे उपचार घ्यावे लागतात.
माझा अनुभव असा आहे की खाण्याचे पथ्य पूर्ण पाळले तर सगळे आलबेल असते ते जराजरी एकडे तिकडे झाले तरी त्रास चालू होतो. शिवाय प्रत्येकाला झालेला त्रास वेगळा असतो यात म्हणून ज्याने त्याने स्वाताची फुड डाइयरी तयार करून काय सोसते आणि काय त्रास देते ते पाहून डाइयेट ठरवावे. शिवाय स्ट्रेस हा फॅक्टर आहेच माझी या आजाराची सुरवात स्ट्रेस मुळेच झाली होती.

काळजी घ्या. शुभेच्छा...

मला अजूनही आराम मिळत नाहीये

IBS- C (कोन्स्तीपेशान - स्टिकी स्तुल्) शौचाला चिकट होते, पोट साफ होत नाही, त्यामुले भूकही लागत नाहि
आहार कमी झाल्याने वजनही वाढत नाहीये. त्याने चिडचिड वाढते. कितीत शांत राहिले तरी सुधारणा काहीच होत नाहीये

अक्ख आयुष्य असंच कस जगणार हा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे Sad

बन्या आहार विहार संतुलन व मानसोपचाराची मदत घ्या. चिंता करु नका. वर लिंक दिलेला ह वि सरदेसाईंचा लेख व्यवस्थित वाचा.

कोन्स्तीपेशान - स्टिकी स्तुल्>>> Magnesium citrate घेतल्यास फायदेशीर ठरते असे वाचनात आले आहे.
तसेच अननस खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

बन्या, तू इसबगोल घेऊन बघ खूप खूप बरे वाटेल. बाकी इतर घ्यायची तुला गरजच भासणार नाही बघ. तुला माझे हे एक आश्वासन आहे असे समज. मीही ह्यातून गेलो आहे. तू एकदा एन्डोस्कोपी करुन बघ.

वमन करण्याची ही एक सोपी पद्धत अवगत कर ह्यानेही लाभ होतो:

https://www.youtube.com/watch?v=Sqv2eUAuNYM

बी, वमन धौतीचा आणि कॉन्स्टिपेशनचा / IBS चा संबंध काय? मला ती व्यवस्थित करता येते. पण त्याचा IBS साठी फायदा होत नाही.

एन्डोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी हे इतर काही नाही ना हे तपासण्यासाठी उपयोगी होतील. त्याने IBS चे निदान होते असे नाही.

मला IB set वगैरे गोळ्यांनी फायदा झाला नाही. पोटात cramps मात्र यायच्या. मनावरील तणाव कमी करणे, योग्य आहार (मैदा, पॉलिश्ड गोष्टी टाळणे, तेलकट तुपकट कमी / क्वचित, भरपूर भाज्या, कोशींबीरी, काकडी यांचा समावेश, भरपूर पाणी पिणे इत्यादि) हे तर काही वर्षांपासून सुरु आहे.
कॉन्स्टिपेशन साठी डॉक्टरांच्या सल्ल्याने महिनाभर अभयारिष्ट घेतले. याने मला बर्‍यापैकी फरक पडला.

माझे जुलाबचा त्रासवाल्या गीऱहाईकला दही पेढा खाऊन फायदा हेतो. तसेच चांगल्या कम्पनीचे बिसलरी पाणी पिणे. जुला ब होणार नाही.

बन्या
>>> मला अजूनही आराम मिळत नाहीये

IBS- C (कोन्स्तीपेशान - स्टिकी स्तुल्) शौचाला चिकट होते, पोट साफ होत नाही, त्यामुले भूकही लागत नाहि
आहार कमी झाल्याने वजनही वाढत नाहीये. त्याने चिडचिड वाढते. कितीत शांत राहिले तरी सुधारणा काहीच होत नाहीये >>
मनाचा आणि या लक्षणांचा ( रोग नव्हे) खूप जवळचा संबंध आहे. चिंता याला अ‍ॅग्रेव्हेट करते. योग, प्राणायाम इ. खूप मदत कर्तात., एकदा थायरॉइड फंक्शन तपासा. मला त्याचा त्रास होता , त्यावर उपचार झाल्यावर खूप फायदा झाला. नाशिकला येवू शकत असाल तर पहा. मी मदत करू शकेन ज्यांना मी रेफर केले त्यांची भेट घडवून.

Pages