IBS (irritable bowel syndrome) आजाराबद्द्ल मार्गदर्शन हवे आहे.

Submitted by prashant०६२ on 11 January, 2016 - 02:43

गेल्या २ वर्षा पासुन मला पोटाचा त्रास होत आहे. सगळया तपासण्या केल्या पण आजाराचे निदान झाले नाहि. लक्षणावरुन डॉ. नी IBS (irritable bowel syndrome) हा आजार असावा असे निदान केले. बरेच औषध उपचार झाले पण काही फायदा झाला नाहि. याबाबत कुणाला काही औषधाची माहीती असल्यास कृपया मद्त करावी.

प्रशांत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mala pn hya ajara cha tras hoto . Upay suchva
Mazya potat dukhat . Sansad la saf hot nahi. Bapacha hote. Amlpittacha tras hoto

कॉन्स्टिपेशन वर कोणी उपाय सुचवू शकेल काय ?
त्रिफळा चूर्ण , गंधर्व हरितकी वैगेरे खूप रुक्ष पडतात ते सोडून काही उपाय आहे का ?
इसबगोल नक्की कसे घ्यावे कॉन्स्टिपेशन करता ?

बैद्यानाथचा अभयारीष्ट काढा वापरून बघा.
बाकी तंतूमय / चोथायुक्त अन्न खाणे, पुरेशा प्रमाणात पाणी पिणे, मैदा न खाणे वगैरे उपाय आहेतच.

Submitted by शोधक on 29 March, 2020 - 22:05 >>

तुमचं वय काय? नमस्कार मारता येत असतील तर सकाळी 5 वाजता उठून 2 ग्लास कोमट पाणी प्या आणि झोपा. मग 7 वाजता उठून जेव्हढे होतील तेव्हढे प्रातविधी आटपले की १२ स्टेप्स वाले ५ सूर्यनमस्कार "अगदी सावकाश" हालचाल करून मारा.. २ ते ३ दिवसांत थोडा फरक दिसेल व एक महिन्या नंतर व्यायाम थांबवला तरीही चालेल. मग पोटाचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी दर दोन- तीन महिन्यांनी एक महिन्यासाठी व्यायाम करत रहा.

कॉन्स्टिपेशन वर कोणी उपाय सुचवू शकेल काय ?
त्रिफळा चूर्ण ?
by शोधक

-
त्रिफळा रात्री गरम पाण्याबरोबर घ्यायला सांगतात. पण त्यापेक्षा फक्त हिरडा चूर्ण मिळते ते आणा. प्रत्येक खाण्याबरोबर, जेवणाच्या वेळी एक दोन चिमुटभर घेऊन पाहा. जुलाब वगैरे होत नाहीत. पण अन्न पुढे सरकते. तीन दिवसांत फरक कळेल.
चूर्ण घेण्याचा त्रास म्हणजे पाण्यासह गिळता येत नाही. यापेक्षा चूर्ण आणि थोडी साखर तोंडात ठेवून चोखायचे. सोपे जाते. प्रवासात किंवा ओफिसला चूर्ण नेणे सोपे असते.

अभयारिष्ट म्हणजेच त्रिफळ्याचा काढा.

बाकी लेखाचा विषय IBS आणि कॉन्स्टिपेशन वेगळे आहेत.
IBS हे कृमिंचा प्रताप. कुटजारिष्ट तीन दिवस एकेक चमचा.

अभयारिष्ट म्हणजेच त्रिफळ्याचा काढा. >> Uhoh

IBS हे कृमिंचा प्रताप.>> Uhoh

कृपया आपली माहिती व्यवस्थीत तपासून पहाल का?

चुकलंय का? तो रोग वेगळा असेल. ठीक आहे.

बाकी सोशल मिडियावरून रोग निवारण ,औषधयोजना वगैरे फार गंभीरपणे घेत असावे असं वाटत नाही.
मागे तीनचार महिन्यांपूर्वी आ.रा.रा. यांनी मला सावध केलं होतं याची आठवण झाली.

हे खरं आहे. फ्री सल्ला कोणी गांभीर्याने घेत असेल असं वाटत नाही भले मग तो कुठे दक्षिणा देऊन मिळालेल्या सल्ल्यापेक्षा चांगला असला तरी. असेही पुढच्या व्यक्तीची प्रकृतीची पुर्ण कल्पना नसल्याने त्याला नक्की काय लागू होईल हे कोणत्याही पॅथीचा डॉक्टर सांगू शकत नाही. अपवादाला उद्या एखाद्याने काही औषध घेऊन त्याला त्रास झाला तर त्याच्या शिव्या पडतील त्या वेगळ्या. शिवाय वैदू वगैरे उपाध्या मिळतात.
प्रत्यक्ष डॉक्टर ला भेटून त्याची दक्षिणा देऊन उपचार करून घेणेच चांगले.

मला कोलायटिस झाला त्यावेळी आधी अ‍ॅलोपथी औषधे घेऊन नंतर सलग २-३ वर्षे कुटजारिष्ट दोन वेळा घेतले होते.खूप म्हणजे खूप फरक पडला.सुखाची गोष्ट म्हणजे त्यावेळी आंबे खाऊ शकले.
अ‍ॅलोपथी डॉ.ने मला विचारले की तुला कसला ताण वगैरे आहे का?त्यावेळी काय ते सांगितले.तेव्हा ते म्हणाले कोलायटीस जंतुमुळे होतो,पण त्याची जास्त वाढ मानसिक ताण तणावाची आपली स्थिती असेल त्यावेळी होते.

मजा म्हणजे फक्त वैध्यनाथचे कुटजारिष्ट लागू पडायचे,इतर नाही.

पोट साफ व्हायचा धागा ट्रेंडिंग होताना पाहून मला एक गमतीशीर औषध आठवतंय. आयुर्वेदात बद्धकोष्ठतेसाठी इच्छाभेदी रस नावाच्या गोळ्या आहेत. हे जरा उग्र पद्धतीने काम करतं पण याच नाव इच्छाभेदी का आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक नसेल. ह्या औषधाचा गुण असा आहे कि त्याने आपल्याला इच्छा आहेत तेवढे रेच होतात. नन्तर थकवा आल्यावर पाय गरम पाण्याने धुतले की रेच थांबतात. माझे आजोबा जोपर्यंत ठीक होते तोपर्यंत ह्या गोळ्यांनी इलाज करायचे लोकांचा. अर्थात ते स्वतः हाताने हे औषध तयार करायचे. सध्या मार्केटमध्ये रेडिमेड औषध हा गुण दाखवत असेल का हे माहीत नाही. आजोबा डिसेंबरमध्ये निवर्तले पण औषधाच्या आठवणीने त्यांच्या सर्व स्मृती जाग्या झाल्या.
अश्वकंचुकी किंवा घोडाचोली नावाचं एक चमत्कारिक औषध आहे त्याचीबी अशीच स्टोरी आहे. यात काळ्या घोड्याचा घाम वापरला जातो. तो कसा मिळवतात त्याची अजून महाचमत्कारिक पद्धत आहे. हे एक औषध वेगवेगळ्या अनुपानाने शेकडो रोगांवर काम करतं पण त्याचा जो मेन कंटेंट आहे तो नसेल तर सामान्यच उपयोग होतो.
बद्धकोष्ठतेवर अजून एक युनानी तेल आहे. ज्यात जमालगोटा, धोत्रा, गुंजा अश्या बऱ्याच तीक्ष्ण वस्तू पाताळयंत्रात टाकून तेल काढतात. हे तेल मोजून काही थेंब दोन्ही पायांच्या अंगठ्यांना चोळायला द्यायचे. हे केल्यावर तासाभराने जी बुळकांडी लागायची ती थांबवायला एक अफूयुक्त स्तंभक औषधींनी बनलेला काढा आधीच तयार करून ठेवायचे. पूर्वी परसाला लांब जायला लागायचं त्यामुळे जातानाच त्याला डबड्याबरोबर ह्या काढ्याचा पेला घेऊन जावे लागे. Lol

@जिद्दू,
आयुर्वेदिक औषधे आणि त्यांची उपयुक्तता यावर लेख येईल कुणाचा तेव्हा चर्चा करू .

पण बद्धकोष्ठतेवर अजून एक युनानी तेल आहे. ज्यात जमालगोटा, धोत्रा, गुंजा अश्या बऱ्याच तीक्ष्ण वस्तू पाताळयंत्रात टाकून तेल काढतात.
हे वाचून खूप हसतो आहे. (हे तिन्ही आणि अतिविषकळी प्रतिबंधित आहे.)

आयुर्वेदिक काढे बरेच सौम्य आणि सेफ असतात. गुणकारी असतातच. औषधाच्या नावाच्या शेवटी 'रस' असेल तर त्यात पारा आणि गंधक असते. फार पूर्वी antibiotics नसताना तो एकच पर्याय असावा. अतिरेक वाईटच.

IBS हे कृमिंचा प्रताप.>>>
नाही...स्वानुभव.... मन शांत ठेवा..... जेवणाच्या वेळा व्यवस्थित ठेवा, १० मिनिटे ध्यान करा.... पंचकर्माने फायदा होतो...

मी सुद्धा या आजार मुळे त्रस्त होतो, मग मी आयुर्वेद मध्ये काही उपाय आहे का मी थोडा रिसर्च केलं तेव्हा मला माहितीमध्ये अस कळल की बेल फळ अतिशय उपयुक्त आहे
जेव्हा मी बेल फळाच आर्क किवा बेल वटी घेतली तेव्हा मला नविन आशा मिळाली. बेल फळ हे पोटा साठी वरदान आहे . Jana काही पोटाच्या समस्या आहेत त्यांनी जरूर उपयोग करा.

मी सुद्धा या आजार मुळे त्रस्त होतो, मग मी आयुर्वेद मध्ये काही उपाय आहे का मी थोडा रिसर्च केलं तेव्हा मला माहितीमध्ये अस कळल की बेल फळ अतिशय उपयुक्त आहे
जेव्हा मी बेल फळाच आर्क किवा बेल वटी घेतली तेव्हा मला नविन आशा मिळाली. बेल फळ हे पोटा साठी वरदान आहे . Jana काही पोटाच्या समस्या आहेत त्यांनी जरूर उपयोग करा.

मी सुद्धा या आजार मुळे त्रस्त होतो, मग मी आयुर्वेद मध्ये काही उपाय आहे का मी थोडा रिसर्च केलं तेव्हा मला माहितीमध्ये अस कळल की बेल फळ अतिशय उपयुक्त आहे
जेव्हा मी बेल फळाच आर्क किवा बेल वटी घेतली तेव्हा मला नविन आशा मिळाली. बेल फळ हे पोटा साठी वरदान आहे . Jana काही पोटाच्या समस्या आहेत त्यांनी जरूर उपयोग करा.

मी सुद्धा या आजार मुळे त्रस्त होतो, मग मी आयुर्वेद मध्ये काही उपाय आहे का मी थोडा रिसर्च केलं तेव्हा मला माहितीमध्ये अस कळल की बेल फळ अतिशय उपयुक्त आहे
जेव्हा मी बेल फळाच आर्क किवा बेल वटी घेतली तेव्हा मला नविन आशा मिळाली. बेल फळ हे पोटा साठी वरदान आहे . Jana काही पोटाच्या समस्या आहेत त्यांनी जरूर उपयोग करा.

मी सुद्धा या आजार मुळे त्रस्त होतो, मग मी आयुर्वेद मध्ये काही उपाय आहे का मी थोडा रिसर्च केलं तेव्हा मला माहितीमध्ये अस कळल की बेल फळ अतिशय उपयुक्त आहे
जेव्हा मी बेल फळाच आर्क किवा बेल वटी घेतली तेव्हा मला नविन आशा मिळाली. बेल फळ हे पोटा साठी वरदान आहे . Jana काही पोटाच्या समस्या आहेत त्यांनी जरूर उपयोग करा.

एका प्रतिक्रियेत मी याची लिंक दिली होती. पण आता लक्षात आले की ती लिंक आता काम करीत नाही. मी मूळ लेख ठेवला असल्याने तोच इथे कॉपी पेस्ट करुन देत आहे.

अपचन आणि अतिसार
डॉ. ह. वि. सरदेसाई
Friday, November 12, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. h v sardesai, dr. balaji tambe

या आजाराचे नेमके कारण काय आहे हे वैद्यकशास्त्राला अद्याप उमगलेले नाही. किंबहुना हा कोणताही एक विकार नसून, मानसिक तणावांचे शारीरिक तक्रारीत झालेले रूपांतर आहे, असे समजले जात होते. गेल्या काही दशकांतील संशोधनामुळे या आजाराची कारणमीमांसा अधिक स्पष्ट होत आहे.

पोटाच्या आजारांपैकी नेहमी आढळणारा आजार म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (Irritable bowel syndrome किंवा खइड). काही व्यक्तींना या आजाराचा त्रास जाणवतो. पोटात दुखते, कधी जुलाब होतात तर कधी मलावरोध होतो.

पोटात "वारा' किंवा "वायू' असल्याचे जाणवते (पोट फुगते (डंबारते), ढेकर येतात, वारा सरतो, पोटात गुरगुरणे किंवा गडगडणे) आणि शौचाला साफ न झाल्याची भावना होत राहते. या आजाराचे नेमके कारण काय आहे हे वैद्यकशास्त्राला अद्याप उमगलेले नाही. किंबहुना हा कोणताही एक विकार नसून, मानसिक तणावांचे शारीरिक तक्रारीत झालेले रूपांतर आहे, असे समजले जात होते. गेल्या काही दशकांतील संशोधनामुळे या आजाराची कारणमीमांसा अधिक स्पष्ट होत आहे. आतड्यांची हालचाल, आतड्यांतून मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना, मेंदूतील न्यूटॉन पेशींच्या कार्यात होत असलेले बदल, तणाव आणि आतड्यांच्या आतील घटक या सर्वांचं महत्त्व कळू लागले आहे. आयबीएस हा आजार तरुणाईतच व्यक्तीला गाठतो. वयाच्या ४५ नंतर या आजाराची सुरवात होताना क्वचितच आढळते. अर्थात, प्रौढ आणि वृद्धांनासुद्धा आयबीएसचा त्रास होत राहतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या आजाराची लागण दुपटी-तिपटीने जास्त होते. आयबीएसच्या रुग्णांत दोन प्रमुख प्रकार आढळतात. एका प्रकारात रुग्णांना पोटदुखीच्या त्रासाबरोबर जुलाब आणि मलावरोध याचा त्रास होतो, तर दुसऱ्या प्रकारात पोट न दुखता केवळ जुलाब होत राहतात. अशा पोट न दुखता जुलाब होत असणाऱ्या रुग्णांचे निदान "आयबीएस'ने करावे किंवा कसे, याबद्दल तज्ज्ञांत दुमत आहे. पोटात दुखणे हे आयबीएसचे प्रमुख लक्षण असते. ओटीपोटात (२५ टक्के रुग्णांत). पोटात उजवीकडे (२० टक्के) आणि डावीकडे (२० टक्के) वरच्या पोटात १० टक्के रुग्णात दुखते. पोट अधूनमधून दुखते, कळ येते, कधीकधी सतत सौम्य वेदना असतानाच एकदम जोरात कळ येते.

वेदनेची तीव्रता सौम्यापासून तीव्रपर्यंत कितीही असू शकते. असा त्रास असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात उष्मांकाच्या तृटीची लक्षणे क्वचितच आढळतात. म्हणजे अशा रुग्णांचे वजन कमी होत चालल्याचे आढळत नाही. वेदना दिवसाकाठी जागेपणी जाणवतात. त्यामुळे झोपेत व्यत्यय आल्याची तक्रार सहसा नसते. अर्थात, झोपमोड होणे हे तीव्र आजारात होणे शक्यी असते. त्यामुळे केवळ या मुद्‌द्‌यावर आयबीएसचे निदान नाकारता येत नाही. काहीही खाल्ल्यानंतर वेदना वाढते, मानसिक ताणांमुळे दुखणे अधिक जाणवते. मलप्रवृत्तीनंतर (शौचाला गेल्यावर) किंवा वारा सरल्यावर पोट दुखण्यात उतार पडतो. स्त्रियांना मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा पाळी चालू असताना हे त्रास वाढतात. मलावरोध आणि वाढलेली मलप्रवृत्ती ही दोन्ही आयबीएसची प्रमुख लक्षणे होत. मलावरोध सुरवातीला अधूनमधून होतो. नंतर तो नेहमीचाच होतो. स्वाभाविकपणे शौचाला होण्याकरिता काहीतरी उपाय करण्याकडे रुग्णाची प्रवृत्ती होऊ लागते. चुर्णे, गोळ्या, लिक्विड पॅटॅफिन, एरंडेल तेल, विविध क्षार, मॅकसल्फ यांचा वापर सुरू होतो. या सर्व उपायांचा सुरवातीला जितका परिणाम दिसतो तितका कालांतराने हळूहळू कमी होऊ लागतो. मल घट्ट असतो. बाहेर पडताना अरुंद व सपाट होऊ लागतो. याचे कारण हा मल मोठ्या आतड्यात बराच काळ राहिलेला असतो. त्यामुळे त्यातील पाणी अधिकाधिक शोषले गेलेले असते. शौचाला झाल्यावरदेखील अद्याप मल आत असावा, अशी भावना राहते. या भावनेला चुकीने रुग्ण "मलावरोध' किंवा "कॉन्स्टिपेशन' असे शब्द वापरतो. या भावनेमुळे रुग्ण दिवसातून बऱ्याच वेळा मलप्रवृत्तीचा प्रयत्न करतो. शौचाला व्हावे म्हणून घेतलेल्या औषधांनी (मोठ्या गेझमध्ये) अधूनमधून जुलाबही होतात. आयबीएसच्या काही रुग्णांना मलावरोधाऐवजी जुलाबच होत राहतात. मल पुरेसा बांधलेला नसतो (नरम किंवा पातळ राहतो) व थोड्या थोड्या प्रमाणात मलप्रवृत्ती होते (प्रत्येक वेळी थोडाच मल बाहेर पडतो). शौचाला गेल्यावर मलाबरोबर आव पडते (mucus). पोटात "गॅसेस' झाल्याचे रुग्ण सांगतो; परंतु संशोधनात असे आढळले आहे की आयबीएसच्या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारे जादा "गॅस' तयार होत नसतो. आतड्याची संवेदनक्षमता वाढलेली असते आणि आतड्याच्या खालच्या भागातून "गॅस' वरच्या भागात सरकतो, त्यामुळे ढेकर येऊ लागतात. २५ ते ५० टक्के रुग्णांना ढेकर येण्याचा, छातीत जळजळ होण्याचा, मळमळण्याचा किंवा उलटी होण्याचाही त्रास होतो. दिवसा जागेपणी लहान आतड्यातील हालचाल वाढते. "अपचन' होत असल्याचे रुग्ण सांगतात. तेव्हा छातीत जळजळ, मळमळ, उलटी, ढेकर येणे, पोटात गडगडणे, वारा सरणे, मलावरोध किंवा वाढलेली मलप्रवृत्ती यांतील काही घटना घडत असतात.

नव्या संशोधनात सिरोटॉनिन (serotonin) या रेणूचे महत्त्व कळू लागले आहे. ज्या व्यक्तींना जुलाब होण्याची प्रवृत्ती असते, त्या व्यक्तींमध्ये सिरोटॉनिन असणाऱ्या पेशी मोठ्या आतड्यात विपुल प्रमाणात आढळतात. या रेणुमुळे जेवणा-खाण्यानंतर मोठ्या आतड्याची हालचाल वाढते. मलप्रवृत्ती होते, जुलाब होतात. या माहितीचा उपयोग आता उपचारांत केला जातो. या प्रकारच्या उपचारांबद्दल संशोधन चालू आहे. या औषधांचा वापर सध्या प्रायोगिक स्थितीतच आहे. सध्या आयबीएसच्या उपचारात सर्वांत महत्त्वाचा भाग रुग्णाशी संवाद करून आजाराचे स्वरूप समजावण्याला असतो. आपल्या आतड्यांचे कार्य समजणे जरुरीचे असते. आजाराचे स्वरूप आतड्याचे कार्य नीट न होणे असे असते, आतड्याच्या रचनेत फरक पडत नसतो. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या अन्नघटकाचा त्रास होतो, याची जाणीव होणे आवश्य,क असते. बहुतेक व्यक्तींना मिरचीचे तिखट, लवंग, कच्चा कांदा, लसूण, पालेभाज्या, शिरांच्या भाज्या, कॉफी, साखर, वाटाणा, पावटा, हरभरा, डाळी, उसळी, कोबी अशा पदार्थांच्या सेवनाने कमी-जास्त त्रास होतो. आपल्याला जो पदार्थ पचत नाही तो टाळणेच इष्ट असते, हा उपचारातील सर्वांत महत्त्वाचा भाग असतो.

आहारात विरघळणाऱ्या तंतूंचे प्रमाण वाढवणे इष्ट असते. भाताची पेज, अधिक पिकलेली केळी, बिया काढून राहिलेला पेरूचा गर, उकडलेले सफरचंद, डिंक यांत असा विरघळणारा तंतू विपुल असतो. (Pectin gums). तंतूमध्ये पाण्याचे रेणू राहतात. त्यामुळे मलावरोध होत नाही. उलटपक्षी जुलाब होताना होणारी आतड्यांची जलद हालचाल या विरघळणाऱ्या तंतूमुळे संथावते. या तंतूंवर आतड्यातील जिवाणूंचा परिणाम होतो व शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्‌स (Short chain fatty acids) या रेणूंची निर्मिती मोठ्या आतड्यात होते. हे रेणू मोठ्या आतड्याच्या अस्तराला ऊर्जा पुरवतात. त्यामुळे आतड्याचे कार्य सुधारते. औषधांमध्ये पोटात कळ येऊ नये या प्रकारची औषधे वापरली जातात. जुलाब होणाऱ्या रुग्णांना जुलाब थांबविण्याची औषधे दिली जातात. परंतु, या उपचारांचा वापर काळजीपूर्वक करावा लागतो. अनेक रुग्णांना खिन्नता जाणवते. अशांना खिन्नता घालविणारे उपचार उपयुक्त पडतात. हा विकार दीर्घसूत्री आहे याची जाणीव रुग्णाला होणे आवश्य्क असते; अन्यथा अकारण तपासण्या व नवेनवे उपचार करणे या चक्रात रुग्ण अडकतो. त्रास बराच झाला तरी आयबीएसमुळे अपाय होत नाही, हे समजणे आवश्ययक आहे. जीवनशैलीतील बदल महत्त्वाचे आहेत, आवश्यलक तेव्हा औषध घ्यावे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

माझी रिक्षा

#Irritable bowel syndrom/IBS
#जेवणानंतर शौचाला जाणे

रोज सकाळी उठल्यावर एकदाच शौचाला साफ होत असेल तर च आपण निरोगी आहात.

दिवसातून ३,४ वेळा जावे लागणे किंवा जेवण झाले की लगेच पोटात कळ करून शौचाला होणे यालाच IBS म्हणतात .. आयुर्वेदात "ग्रहणी " असे म्हणले जाते.

IBS ची सर्व सामान्य कारणे बघितली तर
१)कृमी किंवा जंत
२)द्रवरूप आहार अधिक घेणे
३)आतड्याची अन्न धारण करण्याची क्षमता कमी होणे
४)ग्रहणी या अवयवाची विकृती असणे..

आपल्या शरीराचा संपूर्ण डोलारा हा आपण घेतलेल्या आहारावर च अवलंबून असतो.पचन व्यापार चांगला असेल , metabolism छान असेल तर शरीराचे पोषण होते आणि आपण तंदुरुस्त राहतो .

IBS मध्ये घेतलेला आहार हा न पचता तसाच शरीराबाहेर जातो त्यामुळे कालांतराने शरीर दुर्बल होते, आणि वजन पण कमी कमी होऊ लागते. चिडचिडे पणा वाढतो,शरीराचे पोषण नीट न झाल्यामुळे immunity पण कमी होते आणि तब्येतीच्या बारीक सारीक तक्रारी सुरू राहतात..

बऱ्याचदा सगळ्या आधुनिक चाचण्या, blood reports,stool reports negative येतात आणि मानसिक ताण किंवा anxiety मुळे हा त्रास होत असेल असे निदान आधुनिक डॉक्टर करतात.

पण आयुर्वेदीक दृष्टीकोनातुन तपासले,पेशंट ची संपूर्ण history घेतली की रोग कशामुळे झाला याचे अचूक निदान होते..माझे गुरू नेहमी म्हणतात की बऱ्याचदा "क्ष" किरणांपेक्षा "ज्ञ"(ज्ञान) किरण जास्त उपयोगी ठरतात Happy

पचन व्यापार हा शरीराची immunity चांगली ठेवण्यासाठी किती जरुरीचा आहे हे मी वारंवार माझ्या पोस्ट मध्ये लिहीत असते...शरीरातले निम्मे अधिक व्याधी पचन व्यापार दुरुस्त केल्यावर ठीक होतात असा अनुभव येतो..

IBS चे patient's नेहमी uncomfortable feel करत असतात .त्यांच्या मनात भीती बसलेली की बाहेर गेल्यावर शौचाला जावे लागले तर..या भीतीने ते कमी खातात..

तीन ते सहा महिने चिकित्सा घेतल्यावर IBS पूर्ण बरा होतो..चांगले बरे वाटल्यानंतर सुद्धा पुढचे काही दिवस पथ्य पाणी सांभाळले तर पुन्हा त्रास होत नाही:)

डॉ स्वप्ना कुलकर्णी
shatayu ayurved Pune
whats app 7559160066

Pages