तवा पिझ्झा - थिन क्रस्ट, कणकेचा पिझ्झा

Submitted by मामी on 30 October, 2015 - 10:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पिझ्झा बेस - कणिक, तेल, मीठ, पाणी

पिझ्झा सॉस - टोमॅटो, पिझ्झा मसाला, चिली फ्लेक्स, मीठ, ऑलिव्ह ऑईल, गाजर (ऐच्छिक)

टॉपिंग्ज - बेसिल, मॉझरेला चीज (किसून), रंगित ढब्बू मिरच्या, वांग्याचे काप, मशरूम्स

क्रमवार पाककृती: 

बेस - कणिक चपात्यांसाठी मळतो त्याप्रमाणे मळून घ्यावी.

पिझ्झ्याकरता टोमॅटो सॉस -
लालभडक, छान पिकलेले टोमॅटो धुऊन कापून त्यांच्या मोठ्या फोडी कराव्यात. मध्यम आकाराचे टोमॅटो साधारण ६-७ घेतले तर त्यात ६ पिझ्झे होतील. या फोडी मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्याव्यात. हा ज्यूस मग मोठ्या कढईत / वोकमध्ये घालून गॅसवर आटत ठेवावा. झाकून ठेवला तरी चालेल. गॅस साधारण मध्यम ठेऊन शिजवत ठेवावे. सॉस शिजेपर्यंत भाज्या कापणे, चीज किसणे इ. कामं करता येतील. जर सॉसमध्ये गाजर घालणार असाल तर गाजराच्या फोडी करून त्यात थोडं पाणी घालून कुकरमधून ३-४ शिट्या काढाव्यात. जरा गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्याव्या. यातच मग टोमॅटोच्या फोडी घालून बारीक करता येतील. गाजरांचे प्रमाण जास्त असू नये. चव बदलेल. ६-७ टोमॅटोंकरता एखादं मध्यम आकाराचं गाजर घालावं.

पाणी बर्‍यापैकी आटलं की या सॉसमध्ये चवीनुसार मीठ, पिझ्झा मसाला (यातही मीठ असतं), चिली फ्लेक्स आणि थोडं ऑलिव्ह ऑईल घालावं. ऑऑ नाही घातलं तरी चालेल.

टॉपिंग्ज -

चीज किसून घ्यावं. रंगित ढब्बू मिरच्यांचे बारीक बारीक तुकडे करावेत. बेसिलची पानं निवडून, धुऊन घ्यावीत. वांग्याचे गोल काप करून तव्यावर थोड्या तेलावर आणि थोडं मीठ लावून भाजून घ्यावेत. मशरूम्स धुऊन चार चार फोडी कराव्यात आणि थोड्या तेलावर शिजवून घ्याव्यात. त्यात थोडं मीठ घातलं तरी चालेल पण मीठ घातल्यावर मशरूम्सना पाणी सुटतं. ते पाणी आटू द्यावे / काढून टाकावे.

पोळपाटावर आपल्याला हव्या त्या जाडीची चपाती लाटून घ्यावी. तवा गरम करून त्यावर थोडं ऑऑ घालून चपाती एका बाजूला जरा भाजून घ्यावी. वर असलेल्या भागावर ऑऑ लावून चपाती तव्यावर उलटून घ्यावी. आता थोडी भाजलेली बाजू वर आहे आणि ऑऑ लावलेली कच्ची बाजू खाली आहे.

मग गॅस अगदी बारीक करून / बंद करून प्रथम चपातीवर टोमॅटो सॉस पसरवावा. हा कॉन्सन्ट्रेटेड झाल्यानं आंबट असतो त्यामुळे जास्त लावण्याची गरज नाही. एका चपातीला एक टेबलस्पून पुरेसा होतो. चवीनुसार कमी जास्त करावा.

यावर आपल्याला आवडतील त्या क्रमानं टॉपिंग्ज घालावीत. चीज सॉसवर घाला अथवा बाकीचे टॉपिंग्ज घालून झाल्यावर घाला. आवड आपली आपली.

मग पिझ्झ्याला चिकटणार नाही असं जरा उंच झाकण ठेऊन बारीक गॅसवर पिझ्झा शिजू द्यावा. खालची बाजू शिजली की प्लेटमध्ये काढून, तुकडे करून गरमागरम पिझ्झा खावा.

बेसिल ताजी आवडत असेल तर पिझ्झा शिजल्यावर मग त्यावर पानं घालावीत.

सॉरी, तयार पिझ्झ्याचा फोटो काढायचा राहिला. Happy

वाढणी/प्रमाण: 
पिझ्झ्याकरता प्रमाण?????????
अधिक टिपा: 

मला माहित आहे या शिवाय अनेकानेक टॉपिंग्ज असतात. उगाच आपलं ज्ञान पाजळू नये.

माहितीचा स्रोत: 
स्वयंभू.
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी , कालच केला लगेच .

सन्ध्याकाळच्या पोळ्या करत होते , लेकाला पिझ्झा-पोळी हवी झाली . मी एरवी तयार पोळीला पिझ्झा सॉस आणि बटर लावते , वर चीज किसून टाकते आणि मावेत अर्धा मिनिट गरम करते .
काल या पद्धतीने केला. वरून जरासा कच्चा वाटला , पण एक्दम थीन क्रस्ट ची आठवण झाली. तसाच कडक झालेला. आणि चार तुकडे करून खाताही आला. रोल करायची गरज पडली नाही.

परत करताना , पोळी अगोदर थोडी परतून घेइन .

#मानुषी ती अँड kelocks cornflex ची होती वाटत.

By the way,मी केला ट्राय पिझ्झा, छान लागला... फक्त चीझ व मशरुम वापरले...

आह्हा..छान पाकृ.मस्तं दिस्तोय रोटी पिझ्झा,,,
आधिक टिपा.. Rofl Lol हीहीही
बाटली,बरण्या ट्रेडर जो कडल्या ना?? Wink हे ज्ञान पाजळायला तुझ्याकडून वैधानिक चेतावनी नवतीच मुळी.. Proud

kelocks cornflex ची होती वाटत.>>>>>>>>>>>>> एक वाचनवेडा...........बरोबर ती जाहिरात Kellogg s corn flakes चीच होती.

आयला हे मस्त दिसतय प्रकरण .. करुन पाहणेत आपल्म हे खाण्यात येईल..
बाकी तयार प्रॉडक्ट चा फोटो न टाकल्याबद्दल निषेध...

परवा करून बघितला मी हा. बदल म्हणजे घरात यीस्ट होतं म्हणून कणीक मळताना तेही घातलं. मस्त झाला पिझ्झा.

संपूर्ण आयडियाच जबरी आहे.

शिवाय डॉमिनोज वा पिझ्झा हटच्या तुलनेतील घरच्या पिझ्झावरील चीझचे प्रमाण बघून मन भरून आले.

Pages