पिझ्झा बेस - कणिक, तेल, मीठ, पाणी
पिझ्झा सॉस - टोमॅटो, पिझ्झा मसाला, चिली फ्लेक्स, मीठ, ऑलिव्ह ऑईल, गाजर (ऐच्छिक)
टॉपिंग्ज - बेसिल, मॉझरेला चीज (किसून), रंगित ढब्बू मिरच्या, वांग्याचे काप, मशरूम्स
बेस - कणिक चपात्यांसाठी मळतो त्याप्रमाणे मळून घ्यावी.
पिझ्झ्याकरता टोमॅटो सॉस -
लालभडक, छान पिकलेले टोमॅटो धुऊन कापून त्यांच्या मोठ्या फोडी कराव्यात. मध्यम आकाराचे टोमॅटो साधारण ६-७ घेतले तर त्यात ६ पिझ्झे होतील. या फोडी मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्याव्यात. हा ज्यूस मग मोठ्या कढईत / वोकमध्ये घालून गॅसवर आटत ठेवावा. झाकून ठेवला तरी चालेल. गॅस साधारण मध्यम ठेऊन शिजवत ठेवावे. सॉस शिजेपर्यंत भाज्या कापणे, चीज किसणे इ. कामं करता येतील. जर सॉसमध्ये गाजर घालणार असाल तर गाजराच्या फोडी करून त्यात थोडं पाणी घालून कुकरमधून ३-४ शिट्या काढाव्यात. जरा गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घ्याव्या. यातच मग टोमॅटोच्या फोडी घालून बारीक करता येतील. गाजरांचे प्रमाण जास्त असू नये. चव बदलेल. ६-७ टोमॅटोंकरता एखादं मध्यम आकाराचं गाजर घालावं.
पाणी बर्यापैकी आटलं की या सॉसमध्ये चवीनुसार मीठ, पिझ्झा मसाला (यातही मीठ असतं), चिली फ्लेक्स आणि थोडं ऑलिव्ह ऑईल घालावं. ऑऑ नाही घातलं तरी चालेल.
टॉपिंग्ज -
चीज किसून घ्यावं. रंगित ढब्बू मिरच्यांचे बारीक बारीक तुकडे करावेत. बेसिलची पानं निवडून, धुऊन घ्यावीत. वांग्याचे गोल काप करून तव्यावर थोड्या तेलावर आणि थोडं मीठ लावून भाजून घ्यावेत. मशरूम्स धुऊन चार चार फोडी कराव्यात आणि थोड्या तेलावर शिजवून घ्याव्यात. त्यात थोडं मीठ घातलं तरी चालेल पण मीठ घातल्यावर मशरूम्सना पाणी सुटतं. ते पाणी आटू द्यावे / काढून टाकावे.
पोळपाटावर आपल्याला हव्या त्या जाडीची चपाती लाटून घ्यावी. तवा गरम करून त्यावर थोडं ऑऑ घालून चपाती एका बाजूला जरा भाजून घ्यावी. वर असलेल्या भागावर ऑऑ लावून चपाती तव्यावर उलटून घ्यावी. आता थोडी भाजलेली बाजू वर आहे आणि ऑऑ लावलेली कच्ची बाजू खाली आहे.
मग गॅस अगदी बारीक करून / बंद करून प्रथम चपातीवर टोमॅटो सॉस पसरवावा. हा कॉन्सन्ट्रेटेड झाल्यानं आंबट असतो त्यामुळे जास्त लावण्याची गरज नाही. एका चपातीला एक टेबलस्पून पुरेसा होतो. चवीनुसार कमी जास्त करावा.
यावर आपल्याला आवडतील त्या क्रमानं टॉपिंग्ज घालावीत. चीज सॉसवर घाला अथवा बाकीचे टॉपिंग्ज घालून झाल्यावर घाला. आवड आपली आपली.
मग पिझ्झ्याला चिकटणार नाही असं जरा उंच झाकण ठेऊन बारीक गॅसवर पिझ्झा शिजू द्यावा. खालची बाजू शिजली की प्लेटमध्ये काढून, तुकडे करून गरमागरम पिझ्झा खावा.
बेसिल ताजी आवडत असेल तर पिझ्झा शिजल्यावर मग त्यावर पानं घालावीत.
सॉरी, तयार पिझ्झ्याचा फोटो काढायचा राहिला.
मला माहित आहे या शिवाय अनेकानेक टॉपिंग्ज असतात. उगाच आपलं ज्ञान पाजळू नये.
वाह मामे ,मस्त पाक्रु
वाह मामे ,मस्त पाक्रु
कणकेचा पिझ्झा! आहा! तयार
कणकेचा पिझ्झा! आहा!
तयार पिझ्झ्यांचे फोटो काढायचे राहुन गेले म्हणजे खुपच मस्त झाले होते, खाण्यांत एवढे गुंग झाले सगळे.
मस्तच!
मस्तच!
मस्त पाकृ मामी! फुप्र - झाकण
मस्त पाकृ मामी!
फुप्र - झाकण घालून केला तरी वर घातलेलं चीझ वितळतं का? बबली तर नाही होणार बहुतेक पण वितळलं तरी खूप; आणि पोळीकरता नॉनस्टिकच वापरायला लागेल ना?
वाह मस्तं.
वाह मस्तं.
अरे वा, मस्तं...हे मला जमेल
अरे वा, मस्तं...हे मला जमेल असं वाटतय . नक्की करणार
मामी, पिझ्झा खतरा दिसतोय. आणी
मामी, पिझ्झा खतरा दिसतोय. आणी करायला सोपा वाटतोय. कृती खरच छान सोप्या पद्धतीने लिहीलीत त्याबद्दल धन्यवाद!
मस्त दिसतोय पिझ्झा. माझी
मस्त दिसतोय पिझ्झा. माझी मैत्रिण करते कणकेच्या बेसचा पिझ्झा.कळतही नाही कणकेचा आहे त.
छानच दिसतोय.. अगदी ओरिजिनल. (
छानच दिसतोय.. अगदी ओरिजिनल. ( ओरिजिनल असाच असतो. आपण जाडजूड बेसवाला खातो ते अमेरिकन व्हर्जन ) या टोमॅटो सॉस मधे लसूण पण छान लागते.
मस्तच!
मस्तच!
पाककृती आवडली. नक्की करून
पाककृती आवडली. नक्की करून बघेन.
>>>मला माहित आहे या शिवाय अनेकानेक टॉपिंग्ज असतात. उगाच आपलं ज्ञान पाजळू नये.
ये क्या हुआ?
म्हणजे कांदा, अननस, झालंच तर
म्हणजे कांदा, अननस, झालंच तर आपलं ते हे.. याबद्दल काहीच बोलायचं नाही म्हणता? बरं राहिलं!
चांगली कल्पना आहे. पिझ्झा रोलसारखा न खाता एकेक पीस उचलून खायचा तर पोळी बर्यापैकी जाड लाटावी लागेल असं वाटतंय. टॉपिंग्जचं (तीच ती - ज्यांच्याबद्दल पाजळायचं नाहीये ती..
)वजन पेलायला हवं तिला. 
मस्त दिसतोय. मी यिस्ट घालून
मस्त दिसतोय.
मी यिस्ट घालून होल व्हीट पिझ्झा बेस बनवते. इथे नेहमीची पोळी असल्याने पिझ्झा बेस सारखी चव लागते का ?
ये क्या हुआ? >>> नही मृ,
ये क्या हुआ? >>> नही मृ, कुछ नही हुआ हय. ऐसेइच्च लिख्खा हय.
अगदी ओरिजिनल. >>> मला तरी थिन क्रस्ट पिझ्झाच आवडतो. नीसला दोन ठिकाणी अप्रतिम पिझ्झे खाल्ले. त्यातलं एक ग्रीक पिझ्झेरिआ होतं. त्यांनी साधारण असा पिझ्झा बनवला होता. वांगी बिंगी घातलेला तो पिझ्झा एकदम ढिंकच्यॅक लागला. तेव्हापासून घरी पिझ्झा म्हटलं की वांग्याचे काप हवेतच (म्हणजे असले पाहिजेतच).
या टोमॅटो सॉस मधे लसूण पण छान लागते. >> लसूण का नाही चांगला लागणार? मस्तच लागतो. मात्र मध्यंतरी असाच कोणतातरी प्रोग्रॅम बघत होते. अँकरबाई इटलीत पोचल्या होत्या आणि ऑथेंटिक स्पॅगेटि कशी बनवतात ते सांगत होत्या. त्यावेळी त्यांनी ऑऑ मध्ये दोन लसूण पाकळ्या घालून, त्या तळून शांतपणे बाहेर काढून ठेवल्या. त्या तेलाला लसणाचा वास आला की बास. इटालियन्स म्हणे डायरेक्ट लसूण खात नाहीत. खखोदेजा. पण अर्थात आपण इटालियन्स नसल्यानं लसूण खाल्ला तरी चालेलच.
पिझ्झा रोलसारखा न खाता एकेक पीस उचलून खायचा तर पोळी बर्यापैकी जाड लाटावी लागेल असं वाटतंय. टॉपिंग्जचं (तीच ती - ज्यांच्याबद्दल पाजळायचं नाहीये ती.. फिदीफिदी )वजन पेलायला हवं तिला. >>> नाही गं. चपातीचा बेस कितीही पातळ असला तरी चालेल. आठ तुकडे केले तर उचलायला सोप्पं. हो, मात्र जरा रोल करावं लागेल. आणि टॉपिंग्ज मर्यादेत घालायची. काडी पैलवानाच्या पाठीवर सुमो रेसलर बसवला तर तो बिचारा कापै कसा उठणार?
इथे नेहमीची पोळी असल्याने
इथे नेहमीची पोळी असल्याने पिझ्झा बेस सारखी चव लागते का ? >>> वेगळी लागते पण मस्त लागते इतकं नक्की.
विशेषतः हे वरच्या कॉम्बोमध्ये आणि ऑऑ मध्ये केलं की नेहमीच्या पिझ्झ्यापेक्षा खूप वेगळं लागतं.
विकतचा पिझ्झा सॉस अंथरला तर
विकतचा पिझ्झा सॉस अंथरला तर चालेल का हो? घरी-बिरी सॉस बनवणं झेपत नाही आम्हाला...
अंथरा की.
अंथरा की.
अग्गोबाई खरच की पिझ्झ्यात
अग्गोबाई खरच की पिझ्झ्यात वांग! कसल्याश्या अॅड्मधे ....मंजे आपली झाइरात हो....जुही चावलाचा मुलगा नाक वाकडं करू न आईला ...जुहीला...म्हणतो....वांग ???? आणि पिझ्झ्यात कुणी घातलं होतं का?
पण आता मामींची रेस्पी आहे तर मस्तच असणार!
छान आहे रेसिपी. मला घरी
छान आहे रेसिपी. मला घरी पिझ्झा करण्याचे खूप वेड होते. पण विकतच्या बेस वर टॉपिन्ग टाकून आयत्या पिझ्झ्यासरखा झाला नाही आणि ब्रेड आटा करुनही जमले नाही.
ही रेसिपी जमणेबल वाटतेय, नक्की करुन पाहेन.
मामी, मायक्रोवेव्ह अवन मधे
मामी, मायक्रोवेव्ह अवन मधे ठेवायची एक फरशी मिळते. त्यावर ठेवून केला तर छानच चव येते. आणि कुरकुरीतही होतो.
Oven pick shopmadhe wheat
Oven pick shopmadhe wheat pizza base milato. Thin asato. To me anate kadhi kadhi.
सहीच! करून खाणार! पीटा
सहीच! करून खाणार!
पीटा ब्रेडवरचा पिज़्ज़ा खाल्ला आहे. मस्त लागतो..हां साधारण तसाच लागत असणार!
अग्गोबाई खरच की पिझ्झ्यात
अग्गोबाई खरच की पिझ्झ्यात वांग! >>>>> मानुषी, पिझ्झ्यात वांग बर्यापैकी कॉमन आहे. पिझ्झा एक्प्रेसचा वांग्याचे कापवाला पिझ्झा मस्त आहे.
ती ऑलिव्ह ऑइलची बाटली जरा
ती ऑलिव्ह ऑइलची बाटली जरा स्कॉचच्या बाटली सारखी दिसतेय.
मामी ,वर्णनम्
मामी ,वर्णनम् अतिसुंदरम....येत्या दिवाळीत घरी हा प्रयोग करण्यात येईल . पिझ्झाच्या बाबतीत जरा जरा कॉन्फिडन्स वाढला आहे या तोपासु पाकृ मुळे.., धन्यवाद!!!
ती ऑलिव्ह ऑइलची बाटली जरा
ती ऑलिव्ह ऑइलची बाटली जरा स्कॉचच्या बाटली सारखी दिसतेय. >>>
मामे आमच्या गावात फक्त
मामे आमच्या गावात फक्त डॉमिनोचा पिझा मिळतो. आणि आम्ही फारसे पिझ्हा प्रेमी नाही. (पण बेसिकली सांगलीकर असल्याने वांगं प्रेमी नक्कीच आहे!,)
त्यामुळे पिझ्झ्यातल्या व्हरायटीज फारश्या माहिती नाहीत. आणि सध्या पिझ्झा डिमान्ड करणार्या वयाचंही कुणी नाही. ज्याच्यासाठी करून बघायला नक्कीच आवड्लं असतं. पण ती अॅड कशाची होती ....जुही चावलाची ..ज्याच्यात शेवटी ती त्या मुलाला गुदगुल्या करते.?
मस्त वाटतोय. हे इटलीत लसूण
मस्त वाटतोय. हे इटलीत लसूण घालत नाहीत हे मी पण बघितलं आहे टिव्हीवर. एन.डी.टि.व्ही. गुड टाईम्स चॅनेलवरचा रितू दालमियाचा शो तर बघत नव्हतीस नां? ती फिरत असते इटलीत. तिच्याच एका शो मध्ये बघितलं होतं.
पण ती अॅड कशाची होती
पण ती अॅड कशाची होती ....जुही चावलाची ..ज्याच्यात शेवटी ती त्या मुलाला गुदगुल्या करते.?
>>>> काय माहित! मी जे प्रोग्रॅम्स बघायचे ते रेकॉर्ड करून सगळ्या अॅड्स टाळून बघते.
एन.डी.टि.व्ही. गुड टाईम्स
एन.डी.टि.व्ही. गुड टाईम्स चॅनेलवरचा रितू दालमियाचा शो तर बघत नव्हतीस नां?
>>> बहुतेक तोच असावा, आडो. कोणीतरी इटालियन आजीबाई तिला एकदम सिंपल, बेसिक स्पॅघेटी कशी करायची ते शिकवत होती.
Pages