मटण चॉप्स - 8 ते 10
(जाड असतील तर एखाद्या जड वस्तूने थोडे फ्लॅट करून घ्यावेत)
मॅरीनेशन - घट्ट दही 2 टे स्पू , आले लसूण पेस्ट 2 टी स्पू , तिखट 1 टी स्पू (किंवा आवडीनुसार), धणे जिरे पावडर - 1 टे स्पू, हळद अर्धा टी स्पू , गरम मसाला 1 टे स्पू अर्धा कांदा बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, अर्धा टे स्पू लिंबाचा रस, व्हिनेगर 1 टी स्पू, चिमूटभर साखर, चवीनुसार मीठ, पाऊण टे स्पू मैदा, अर्धा टी स्पू तेल
सर्व एकजीव करून घ्यावे.
चॉप्स परतण्यासाठी दोन-तीन टे स्पून तेल
चॉप्सना मॅरीनेशन लावून किमान अर्धा तास ठेवावे
नॉन स्टिक फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर चॉप्स पसरून घालावेत
पाच मिनिटे मोठ्या आंचेवर एका बाजूने परतून घ्यावेत
नंतर दोन्ही बाजू दहा दहा मिनिटे झाकण लावून, मध्यम आंचेवर परतून घ्याव्यात. आंच कमी असेल तर शक्यतो खाली लागणार नाहीत पण तसे दिसले तर अगदी चमचा चमचाभर पाणी मधून मधून घालत रहावे. आवडत असेल तर शेवटच्या दहा मिनिटांत हळद- मीठ लावलेल्या कांद्याच्या चकत्याही फ्राय करून घेता येतील.
चॉप्स चांगले शिजल्यावर काढून घ्यावेत.
वाह शेफने या सोबत "Curry Leaves-Coconut Rice रेकमेंड केला होता तोही लगेहाथ केला. सोपी कृती आहे
कढीलिंबाची 15-20 पाने, पाऊण वाटी खोवलेले ओले खोबरे, दोन लसूण पाकळ्या, एक छोटी हिरवी मिरची, छोटा चमचा चिंच पेस्ट आणि आवडत असेल तर अगदी थोडी कोथिंबीर थोड्या पाण्यासोबत (नारळाचे पाणीही चालेल) बारीक मसाला वाटून घ्यावा.
पाऊण वाटी तांदळाचा मोकळा भात करून घ्यावा.
कढईत तेल किंवा लोणी गरम करून त्यात कढीलिंबाचा वाटलेला मसाला परतून घेऊन, चमचाभर पाणी व मीठ टाकून भातही नीट परतून घ्यावा.
(फोटोत फ्रीजमध्ये उरलेल्या कोल्हापुरी ओल्या मसाल्याची झटपट केलेली ग्रेव्हीही आहे,
दुसरे म्हणजे चॉप्सचा हातात धरायचा भाग मॅरीनेट करायच्या आधी सुरीने व्यवस्थित खरवडून घेतात, शेफ भाषेत त्याला Frenching म्हणतात. मी कंटाळा केला त्यामुळे टोकाशी जरा जळलेत पण बाकी चॉप्स मस्त शिजले)
ग्रेव्हिसाठी:
दोन मीडियम कांदे उभे चिरून
आले साधारण अर्धा इंच चिरून
लसूण पाकळ्या 8-10
सुके खोबरे अर्धी वाटी (कापून/किसून)
ओले खोबरे खोवून पाव वाटी
टोमॅटो दीड बारीक चिरून
तीळ तीन टी स्पून
जिरे अर्धा टी स्पून
हे सर्व थोड्या तेलात खरपूस भाजून घेणे. ओले खोबरे आणि टोमॅटो सर्वात शेवटी टाकणे.
भाजलेले जिन्नस थोड्या कोथिंबीरीसोबत आणि पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून ओला मसाला करून घ्या.
कढाईत थोडे तेल गरम करून मसाला चांगला परतून घ्या. तेल सुटले की कांदा लसूण मसाला (किंवा काश्मीरी तिखट) एक टे दीड टे स्पून धणे जिरे पावडरसोबत परता. नंतर हवा तितका पातळ/दाट रस्सा होईल इतपत गरम पाणी घालून चांगली उकळी काढा. चवीपुरते मीठ आणि गरम मसाला घालून दोन मिनिटे शिजवा.
स्रोत : वाह शेफ
बी, कोणी काय खावं आणि काय खाऊ
बी,
कोणी काय खावं आणि काय खाऊ नये, हे कोणी कोणाला सांगू नये. 'शाकाहार हाच सर्वश्रेष्ठ आहार' हाही एक अतिरेकच आहे.
बाकी, विदर्भात दिवाळीत मांसाहार करत नाहीत, हे चूक आहे.
बाकी, विदर्भात दिवाळीत
बाकी, विदर्भात दिवाळीत मांसाहार करत नाहीत, हे चूक आहे.>>> चिनूक्स , तू हार्टलेस वैदर्भिय असल्याने हे मत ग्राह्य धरल जाणार नाही

रीया, स्माईली मस्त आहे.
रीया,
स्माईली मस्त आहे.
(No subject)
ती ग्रेव्ही कशी बनवली तेही
ती ग्रेव्ही कशी बनवली तेही लिहा प्लीज.
हार्टलेस वैदर्भिय असल्याने हे
हार्टलेस वैदर्भिय असल्याने हे मत ग्राह्य धरल जाणार नाही>>>>>.
:
माझ्या बायकोच्या चुलत
माझ्या बायकोच्या चुलत बहिणीच्या जावेचे सख्खे मामेसासरे पुण्यात असतात. त्यांचे शेजारी वैदर्भिय आहेत आणी ते दिवाळीत मांसाहार करत नाहीत.
मी "ब्याडवर्ड" चॉप्स आणि तो
मी "ब्याडवर्ड" चॉप्स आणि तो भात करून खाणार. कार्ब्सचा डबल डोस घेतला की शांत झोप लागून चिडचिड कमी होते म्हणतात.
मऊ पाठीच्या बकऱ्याचे मटण
मऊ पाठीच्या बकऱ्याचे मटण वापरून भाकऱ्या करता येतील का?
खीमा पराठा सदृश ...
आधी स्वतः दिवाळी आणि
आधी स्वतः दिवाळी आणि मांसाहाराचा ओढून ताणून काहीतरी संबंध जोडलाय. आणि नंतर त्यासाठी काहीतरी स्पष्टीकरणं येत आहेत.
असो. आज करीपत्ताभात करून पाहिला. आमच्याकडे दारातच कढीपत्त्याचं झाड असल्यानं एकदम ताजी पानं वापरली होती. ओलं खोबरं मी जास्त वापरलं नाही. चिंचपेस्ट घातली नाही, पण मिरच्या दोन घातल्या. भात रेडी झाल्यावर वरून लिंबू पिळला. घरात होते म्हणून मी त्यातच थोडे फ्रोझन मटार आणी चार दोन काजू पण ढकलले. मस्त चव आली होती. आवड्या.
नंदिनी मी पण फक्त भात करुन
नंदिनी मी पण फक्त भात करुन पाहाण्याच्या विचारात आहे. माझी ही तुझ्यासारखीच रेसि पी होईल. खोबरं चिंच न घालता.
अमेय करी ची रेसिपी दे लवकर
अचानक इतके प्रतिसाद
अचानक इतके प्रतिसाद म्हटल्यावरच गम्माझिम्मा असणार हे लक्षात आलं !
मी पण भात करून पहाणार.
बाकी मटण चॉप्स करणार नाही कधी पण चिकन चॉप्स या पद्धतीने करून बघेन.
(मैदा मॅरिनेशनमध्ये वापरला नव्हता पूर्वी.)
तोंडाला पाणी सुटल ..... एवढचं
तोंडाला पाणी सुटल ..... एवढचं म्हणु शकतो.
फोटो तोंपासु! करून बघू शकत
फोटो तोंपासु! करून बघू शकत नाही पण दर्दी लोकांना रेसिपी देणेत येईल.
तस तर आपल्या संस्कृतीत समुद्र ओलांडण पण निषिद्ध मानलय तरी आपण ओलांडलाच ना?
मी नॉन वेज प्रेमी नाहीये पण दिवाळी आणि मांसाहार यांचा लावलेला संबंध काहीच्या काही आहे. विदर्भातल्या लोकांना दिवाळी दरम्यान नॉन व्हेज खाताना बघितलं आहे.
भाताची रेसिपी मस्त आहे अमेय.
भाताची रेसिपी मस्त आहे अमेय. करुन बघेन भात, ह्याच आठवड्यात करेन. नव-याने भरपुर कढीलिंब आणलाय.
हल्ली तुझी रेसिपी लिखाण स्टाईल मिस करतेय मी
. खास उसके लिये आयी मै (मटण वाचुनही), पण भाताचा वेगळा प्रकार मिळाला, अगदी हटके
.
मस्तच. बघूनच अस वाटतंय की
मस्तच. बघूनच अस वाटतंय की उचलून पटकन तोंडात टाकावं. छानच !!!
केवढे प्रतिसाद,मला वाटल
केवढे प्रतिसाद,मला वाटल सगळयांनी वेगवेगळे मॅरीनेशन वापरुन ,पॅनफ्राय , ओव्हन्,तंदुर वगैरे वापरुन केलेल्या पदधती लिहल्या असतील.ठीक आहे.असो.
डिश भारी दिसतीये. एवढी
डिश भारी दिसतीये. एवढी प्रतिसादसंख्या बघून कुतूहल जागे झाले.
रेसिपीने आणि प्रतिसादांनी अजिबात निराश केले नाही.
त्या बाकीच्या(भात, ओला मसाला वगैरे) रेस्प्या पण जरा भिरकवा हो प्लीज इकडे.
मला वाटल सगळयांनी वेगवेगळे
मला वाटल सगळयांनी वेगवेगळे मॅरीनेशन वापरुन ,पॅनफ्राय , ओव्हन्,तंदुर वगैरे वापरुन केलेल्या पदधती लिहल्या असतील.>>> +१
पुन्हा आल्यावर पुन्हा फोटो पाहुन दिल खुश. लवकरच करायला पाहिजेत म चॉ.
---दिवाळीत मांसाहार करु नये. देवबाप्पा कान कापतो.
---दिवाळीत मांसाहार करु नये.
---दिवाळीत मांसाहार करु नये. देवबाप्पा कान कापतो.>>>>>>
हायला... असल्या टपाटप
हायला... असल्या टपाटप प्रतिसाद पडत्यात म्हणून बघाया आले तर हीतं काय तरी नविनच...
चांगली माहीती मिळाली जातपात, खाणंपिणं आणि दिवाळी
आता बीबी च नाव बदला
आता बीबी च नाव बदला
छान गोंधळ सुरू
छान गोंधळ सुरू झालाय.
---दिवाळीत मांसाहार करु नये. देवबाप्पा कान कापतो.>>>.
योग्य ठिकाणी रेस्पी फॉरवर्ड
योग्य ठिकाणी रेस्पी फॉरवर्ड केली आहेच. कढीपत्ता भात सवड मिळाली की करून बघणार.
रच्याकने, दिवसभरच्या श्रमांनंतर या बीबीवर येऊन एकदम श्रमपरिहार झाला
आमच्याकडेही बंगालमधे भाऊबीजेला मांसाहार सहसा असतोच. जेवायला बोलवायचं आणि मासे-चिकन-मटण नाही? अब्रह्मण्यम्...
हार्टलेस वैदर्भी
ये धागा तो सैरावैरा पळणे लगा
ये धागा तो सैरावैरा पळणे लगा है..
टेम्प्टींग दिसतेय डिश.. मटण खायच जीवावर येत अन त्यात त्याचे इतके लाड..पण प्रेझेंटेशन बघुन करावस वाटतयं..चिकनचं कस लागेल मीपन विचार करतेय
घरी नै पण गावी दिवाळीत गेलो तर एक लक्ष्मीपुजन सोडून बाकी दिवशी चालतो कोंबडी, कोंबडा.. लिंगभेद नै मानत आम्ही पण तरी असो.. आता काही दिवस तर निस्तच झुराव लागणार.. एवढे दिवस नजरअंदाज करत होती हा धागा पण चर्चा बघुन म्हटल आता बघुच किती बकरे कापले इथं ते..तर आकडा मलाबी लक्षात आला नै अजुन.. मोजला कि सांगते..
जेवायला बोलवायचं आणि
जेवायला बोलवायचं आणि मासे-चिकन-मटण नाही?>>>>>>>>>>>> माझ्या दोन्हीकडच्या फॅमिलीत असंच आहे.
वाचल्या सगळ्या प्रतिक्रिया.
वाचल्या सगळ्या प्रतिक्रिया.
व्वा मस्तच -- तो पा सु
व्वा मस्तच -- तो पा सु
टीनातै, बकरे बरीच असले तरी बी
टीनातै, बकरे बरीच असले तरी बी खाटिक येकच हाय.
तरी बी खाटिक येकच हाय. >>>
तरी बी खाटिक येकच हाय. >>>
Pages