"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ५

Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:53

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"हा सागरी किनारा"

Zabbu_Photo_Samudra.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे समुद्र पाहून मला आत्ताच्या आत्ता समुद्रावर जाऊसं वाट्टंय.. भ्या ऽऽऽऽ

अरे व्वा!!!
सगळे झब्बू एकापेक्षा एक आहेत अगदी..

आता हा ओळखा पाहू... Happy
Photo10000.JPG

होय केप्या.. हर्णेकडून नवीन पुलाकडे जाताना मधेच ती टाकीसदृश काहीतर दिसते बघ. कठडा वगैरे पण केलाय त्याला. त्या ठिकाणाहून ही खालची पुळण दिसते.

samudra.jpg

केद्या योकोहामा का? सॉरी सॉरी. येस्स कामाकुरा. लांबुनच बराय हा बीच. Happy बाकी त्या छोट्याशा बेटावर जायला मजा येते.

हा घ्या माझा...
रोहिल्याकडून तवसाळकडे जातानाच्या रस्त्याच्या उजव्या बाजूला हे असं आहे सगळं..
samudrakinara.jpg

किरु, छान आहे. वाळूच्या लाटा..

माझा अजून एक. मोठी लाट येतेय, पळा,पळा... Happy
laaT.JPG
नॉर्थ कॅरोलिना

Pages