Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद दिनेशदा. चकत्या करून
धन्यवाद दिनेशदा. चकत्या करून वाळवतांना काही प्रक्रिया करावी लागेल का? तसेच सफरचंदाच्या चटणीची कृती द्या प्लीज.
सफरचंदाच्या चकत्यांना मीठ अन
सफरचंदाच्या चकत्यांना मीठ अन थोडेसे लिंबू लावलेस तर त्या सुकून काळ्या पडणार नाहीत.
एका ब्लोगवर वाचलेले (नक्की
एका ब्लोगवर वाचलेले (नक्की कुठे ते आठवत नाही आता :() , खवा करायला दुध पावडर दुध घालुन सैलसर गोळा मळायचा नी मग कुकरमधे वाफवायचा... होइल का असा खवा, मला वड्या करायला हवाय खवा.
हो होतो. फक्त एक चमचा शुद्ध
हो होतो. फक्त एक चमचा शुद्ध तूप घातलेस एला वाटी पॉवडर तर आणखी रवेदा होइल.
सोया मिल्क कसे बनवतात?
सोया मिल्क कसे बनवतात?
मी तरी असे बनवते सोया मिल्क,
मी तरी असे बनवते सोया मिल्क, सोया भिजवून पाण्यात ठेवायचे दिवसभर. पुन्हा रात्री पाणी बदलून दुसर्य दिवशी सकाळी बारीक पांढरे कोंब दिसताहेत वाटले की पुन्हा वरचेवर धोवून वाटून घेते. मग गाळून घेते.
त्यात organic vanilla इसेन्स ची काडी टाकून मंदन्ग्नीवर उकळवते. वेलची शेवटी टाकते. रोज सकाळी मस्त प्यायला. इसेन्से नाही टाकला तरी ठिक. दही पण मस्त लागते.
चिन्नू अॅपलच्या दोन चटण्या
चिन्नू अॅपलच्या दोन चटण्या लिहिल्या आहेत. सफरचंद सुकवायची असतील, तर चकत्या करुन लिंबाच्या पाण्यातनं काढायच्या. मग पूर्ण निथळू द्यायच्या. मग दोर्यात उभ्या ओवून टांगून ठेवायच्या. उन वा वाहता वारा असेल तर ४ ते ५ दिवसात वाळतील.
तसे नशेल तर ओव्हनमधेहि वाळवता येतात. प्रत्येकवेळी ओव्हन लावला, कि करायचा पदार्थ करुन झाल्यावर या चकत्या ठेवायच्या. मग थंड करुन बाहेर काढून कपड्याने झाकून ठेवायच्या. असे करत करत त्या ४ ते ५ दिवसानी कोरड्या होतात. मग बरणीत भरुन ठेवायच्या. असेच पीच, पेअर व अॅप्रिकॉट वाळवता येते. दह्यात हि फळे मुरवून खायला छान लागतात.
धन्यवाद मनु ! एकदम मस्त झालाय
धन्यवाद मनु ! एकदम मस्त झालाय खवा
खूप खूप धन्यवाद दिनेशदा!
खूप खूप धन्यवाद दिनेशदा!
धन्यवाद! सोया मिल्क चे दही
धन्यवाद! सोया मिल्क चे दही कसे बनवतात ? ... सोया मिल्क बाहेर किती वेळ टिकते??
सध्या दुपारच्या डब्यासाठी मी
सध्या दुपारच्या डब्यासाठी मी भात करतो... भाज्या, कडधान्ये, डाळी, कान्दे, लसूण, इ इ जे जे मिळेल ते घालून खिचडी/ मसाले भात करतो... पण त्यात पुरेसा दमटपणा नसतो.... काय करावे ? मला दम बिर्यानी सारखा दमटपणा अपेक्षित आहे...
जामोप्या... बारीक चिरलेला
जामोप्या...
बारीक चिरलेला कांदा / पेस्ट, ओलं खोबरं याचं प्रमाण वाढवून बघ...
तसंच भात शिजवायला थोडं नारळाचं दूध वापरून बघ...
किंवा भाताबरोबर काकडी / कांदा / टोमॅटो / कॉर्न्स याचं दह्यातलं रायतं घेऊन जात जा...
स्वाती, मी असाच खवा बनवला व
स्वाती, मी असाच खवा बनवला व हातानेच मोदक बनवले प्रसादाला. मायक्रोवेव मधून काढून पाच मिनीटे ओवन मध्ये लालसर केला. मस्तच लागताहेत.

मी काल मोदक बनवण्याचा असफल
मी काल मोदक बनवण्याचा असफल प्रयत्न केला.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/115312.html?1156606545
इथल्या सूचना वाचून बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण उकडिला चीरा पडू लागल्या. पारीच बनू शकली नाही. मग कसेतरी वेडे वाकडे मोदक बनवले.
मोदकासाठी दादर, माटुंगा, माहीम भागात चांगले पीठ कुठे मिळते? कुणी ट्राय केले असेल तर प्लीज सांगा.
मी काही हळदीची पाने आणली आहेत. त्यातील बरीचशी उरली आहेत (कारण आमचे मिशन मोदक फेल झाले) . त्याचा काय उपयोग करता येईल? ती टाकावी लागतील का?
अमि, वनिता समाज मध्ये मोदकाची
अमि, वनिता समाज मध्ये मोदकाची सुवासिक आणि सुंदर पिठी मिळते.
मी काही हळदीची पाने आणली
मी काही हळदीची पाने आणली आहेत. त्यातील बरीचशी उरली आहेत (कारण आमचे मिशन मोदक फेल झाले) . त्याचा काय उपयोग करता येईल? ती टाकावी लागतील का?>> अमि त्या हळदीच्या पानाला तांदळाची उकड लावुन पानगी बनवता येतील. मी उद्या टाकेन रेसिपी घरी विचारुन. टाकुन देऊ नको ती पानं.
धन्यवाद , मंजू आणि योगिता.
धन्यवाद , मंजू आणि योगिता.
मंजू, वनिता समाज म्हणजे शिवाजीपार्क जवळ का?
आधी menu काय असावा असा एक
आधी menu काय असावा असा एक धागा होता. अता काहि सापडत नाहि आहे. म्हणुन इथे च टाकते आहे. मला गणपती प्रसादा ला साधारण ४५ लोकाना घरी बोलवायचं आहे. साधं सुट्सुटित करायचं म्हणुन मी नागपुरी वडे (वडा भात फेमस) + चटणी असा बेत करते आहे. गोड बाहेरुन आणणार.
हा मेनु कसा वाटतोय? चटणी कसली असावी? हिरव्या मिरचिची ? कि लाल मिरचि ची दहि घालुन?
सुचवा काहितरी. दुसरा कुठला सुटसुटीत मेनु सुचवलात तरी चालेल.
मला फणसाच्या भाजीची रेसिपी
मला फणसाच्या भाजीची रेसिपी कोणी देऊ शकेल का प्लीज ? पण फ्रेश इथे मिळत नाही.
गौरी.
कॉप -
कॉप - http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/03/blog-post_17.html
इथे माझी रेसिपी आहे बघ!
धन्यवाद.
धन्यवाद.
सगळ्यात बेस्ट पिठ निर्मलचे
सगळ्यात बेस्ट पिठ निर्मलचे अपना बाजार मध्ये मिळते मुंबईत. ह्यावेळेला गोडबोलेचे ऑर्डर केले पण उकड केल्यावर खास वाटली नाही मग रव्याची उकड केली पहिल्यांदाच. त्याचे मस्त उकडीचे मोदल झाले. गोडबोल्यांची उकड शुभ्र पांढरी नाहीये, त्या पिठाची पातोळी व निवरी केली केली घरी लावलेल्या हळदीच्या पानावर.
रव्याची उकड पांढरी दिसत नसली तरी वेगळा अनुभव होता/आहे.
पण आजपर्यन्त निर्मलचे सुवासीक तांदूळ पिठ एकदम मस्त उकड करायला. ह्यावेळेला मुंबईला जाणार म्हणून आणायला सांगितली नाही कोणाला. गोडबोले मला जराही आवडली नाही. बहिणीला आवडली. केले तर मोदक पांढरेच हवे सुंदर नाहीतर रव्याचे असे आहे.
उकडीला चिरा पडल्या तर ती मस्त
उकडीला चिरा पडल्या तर ती मस्त मळून घ्यायची. पाणी + तेल समप्रमाणात घेवून गरम करून त्यात हात बुडवून उकड मळायची व ५ एक मिनीटे झाकून ठेवायची. होते मस्त.
चिरा पडायची कारणे(माझ्या मते): १.जुनी पिठी, २.कमी पाणी व कमी तापलेले पाणी व ३. न मळलेली उकड वगैरे वगैरे.
अशी चिरा पडलेली उकड मळून जरी ठिक नसेल तर पुरणयंत्रातून काढ शेवटचाच उपाय म्हणून. जादू सारखे मुलायम. पाण्याचा हातच लावावा लागत नाही.
मनु, मस्तच झालेत मोदक. मी
मनु, मस्तच झालेत मोदक. मी देखील त्या खव्याचे मोदक केले ह्यावेळी गणपती बाप्पाला...
मनस्विनी,सोया म्हणजे सोयाबीनच
मनस्विनी,सोया म्हणजे सोयाबीनच का? त्या भाजुन भिजवायच्या का आमच्याकडे सासरी सोयाबीन भाजुन गव्हामध्ये दळूण आणतात त्यामुळे विचारते की भाजुन घ्यायच्या का.
रमजानमध्ये'' रोट''करतात
रमजानमध्ये'' रोट''करतात त्याची रेसिपी कुणाला माहित आहे का?
सोया भाजायचा नसतो. असाच
सोया भाजायचा नसतो. असाच भिजवायचा.
रोटची रेसीपी आहे इथेच.(दिनेश ह्यांनी लिहिलीय वाटते). सोपी आहे रवा,अंडे,साखर वगैरे. आपला रव्याचा केक पण फ्लॅट लाटून भाजलेला.
धन्यवाद! मनस्विनी,
धन्यवाद! मनस्विनी,
नमस्कार, मला प्रसादासाठी
नमस्कार,
मला प्रसादासाठी आंबा-मावा मोदक करायचेत. मावा मी मिल्क पावडर आणि क्रिम घालुन मायक्रोत करणार आहे. त्यात देसायांचा आंब्याचा टीन मधला रस कधी घालायचा? रस आधी आटवुन घ्यायला लागेल का? प्लिज लवकर सांगा, शुक्रवार साठी करायचेत मोदक....
माझा नैवेद्या हा होता, आंबा
माझा नैवेद्या हा होता, आंबा बर्फी ते ही स्लो कूकरमध्ये.
मावा पॉवडर(दूध पॉवडर), रत्ना पल्प्(हाही आमच्या रत्नागिरीचा असल्याने चवीला उत्तम), साखर अॅडज्ट केली(रस गोड असतो),किंचित दूध, १ चमचा तूप.वेलची वगैरे.
टाकेन रेसीपी आजचा नेवेद्य मध्ये लाजो थोड्या वेळातच फोटो सकट.
Pages