पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोया दूधात उकळवून वगैरे एक चमचा आपले ऑरगॅनिक दही टाकावे. रोजचे दही लावतो तीच पद्ध्त. होते मग.

लाजो त्या रसात पाणी व साखर जास्त असते त्यामुळे आटवावा लागेल. (आंबा मावा मिळाला असला तर ते जास्त चांगले झाले असते ) तसेच मायक्रोवेव्ह मधेच भाजायचे असतील तर नजर ठेवावी लागेल. वरुन कच्चे राहिले तरी साखरेमुळे आतले सारण लवकर गरम होते.
उकडिचे करायचे असतील, तर पाण्याच्या जागी तो रसच वापरुन उकड काढता येईल ( शक्यतो रव्याची ), सारण नेहमीचेच.

रव्याची उकड कशी काढायची? तांदळाची काढतो तशीच का?? रवा बारीक वापरायचा कि जाडा ??
कोणी सांगू शकेल का??

सोया दूधात उकळवून वगैरे एक चमचा आपले ऑरगॅनिक दही टाकावे.

म्हणजे आधी जी सोया दुधाची कृती दिलीय त्याप्रमाणे दुध तयार करुन मग नेहमी दही लावतो तसे त्या दुधाचे लावायचे, होय ना?? आपल्या गाई/म्हशीच्या दुधाचा इथे काही संबंध नाहीय ना??

नाही नाही..... माझा योगर्ट बाबतचा प्रश्न हा सर्व प्रकारच्या दुधाना लागू आहे... सोया मिल्क रेडी मेड मिळते इथे...... दही चान्गले लागणारे कोणतेही दूध चालू शकेल...

मला एका मित्राने दही भात करायची कृती सान्गितली... भात करून कोमट दुधात घालायचा.. त्यात एक चमचा दही घालून २-३ तास ठेवायचे........ छान दही भात होतो...... मग फोडणी, मीठ वगैरे घालायचे.... मला करून बघायचे आहे असे...... योगर्ट घालून ठेवले तर होइल का ?

धन्यवाद गं मनु... लग्गेच फोटु सकट रेसिपी... तुला दंडवतच घातलं पाहिजे... हे घे.. _/\_
सोप्पी आणि सुटसुटीत रेसिपी आहे. करुन बघते नी टाकते फोटो...

दिनेशदा, मला माव्याचे करायचेत आणि इथे दुधाच्या पावडरीचाच करायला लागतो...
मला वाटलच होत की रस आटवुन घ्यायला लागेल... सारण भरुन नाही करणार, मावा आणि आंबा मिक्स करुनच...
पण तुमची उकडीच्या मोदकाची आयडिया आवडली. पुढच्या वेळी करुन बघिन...

तान्दळाची उकड हा पदार्थ कसा करायचा ? जुन्या मायबोलि वर फोन्ट प्रॉब्लेम आहे.. दिसत नाही..

आणि झकास लागतो जामोप्या. करुन पाहा.
पाणी मात्र जपून- जेवढ्यास तेवढं घ्यावं. जास्त झालं की उपम्यासारख अ‍ॅब्सॉर्ब होत नाही. उकरपेंढीचा पार सत्यानाश होतो.
तसेच तेल भरपूर लागते, नाहीतर खाताना जीभ चिकटून बसते. हा अजिबात डायेट पदार्थ नाही. (मी मायक्रोवेव्ह मध्ये कणिक वगैरे भाजून तेल कमी लागते का वगैरे संशोधन करुन पाहिलेय. काही उपयोग नाही.)

जामोप्या - त्या ब्लॉगची मालकिण मुंबईची मराठी मुलगी आहे हो आण्णा कुठे काढलत?

कोणाला बीटाचे पराठे कसे करतात ते माहित आहे का?

मी एकदा बीट आणि गाजर किसुन पिठात मिसळले होते पण माझा तो प्रयोग फसला. Happy

बीट शिजवून मग किस्ऊन पिठात मिसळून करता येतील. त्या किसातच मीठ, मसाले व तेल घालायचे. थोडा कोरडा रवा घालायचा आणि मग कोरडीच कणीक घालायची. लागलेच तर पाणी वापरायचे.

रव्याची उकड तांदळाप्रमाणेच काढायची. रवा बारिक घ्यायचा.

धन्यवाद दिनेशदा. नक्की करुन बघेन. माझ्या लेकीने शाळेत कोणाच्यातरी डब्यात बीटाच्या पुर्‍या खाल्ल्या होत्या तेव्हापासुन मागे लागली आहे करुन दे म्हणुन.

मला तिला डब्यात देता येतील आणि पौष्टीक असतील असे काही पदार्थ सांगाल का. ती आजिबात भाज्या खात नाही त्यामुळे मला तिला रोज डब्यात काय करुन द्यायचे हा प्रश्नच असतो.

इथे बहुतेक मागच्या पानावरच मनुने सांगितलय तसा केला होता मी खवा २ दिवसांपूर्वीच. २ कप मिल्क पावडर मध्ये दिड चमचा साजुक तुप घालुन दुध घालुन कणकेसारखे सैलसर मळुन घेतले. नंतर कुकर मध्ये एका भांड्यात धोतराच्या कापडात गुंडाळुन ठवले. १० मिनिटे वाफवून घेतले. अगदी मस्त खवा झाला होता. मला गुलाबजामला वापरायचा होता म्हणून थोडासा भाजुन घेतला.

सालासकट बटाट्याप्रमाणे उकडावे, डाळ्भात लावताना वर ताटली ठेवून. नंतर गार झाल्यावर साल काढावे. Happy

किट्टू, मी तांदूळ आणि नाचणिचे पीठ ३:१ या प्रमाणात घेऊन नेहमीप्रमाणे भाकर्‍या करते. गुलाबी रंगाच्या भाकर्‍या होतात. माझ्या मते फक्त नाचणिच्या भाकर्‍या बनत नाहीत. जाणकार प्रकाश टाकतील.

नुसत्या नाचणीच्या भाकर्‍या होतात. नाचणीला पण विरी कमी असते त्यामुळे खुप गरम पाणी घालावे लागते. किंचित मीठ घालावे आणि भाकरी जाड थापावी. भाकरी तयार झाली की त्याचा पापुद्रा फोडुन त्यात आत तेल घालावे आणि पसरावे त्याने भाकरी मऊ रहाते.
अमी म्हणते तसे तांदळाचे पीठ घालायला हरकत नाही.

धन्यवाद अमि, कराडकर.. Happy
आताच मी एक छोटी अमी ने सांगितल्याप्रमाणे करुन पाहिली बरी झाली पण मोठी नाही करता आली कारण थापताना मोडत होती..
आता कराड्कर प्रमाण करुन बघते..

नाचणीची भाकरी आदीवासी लोकांचे मुख्य अन्न आहे. पण आपल्याला हि भाकरी पचवणे त्रासाचे होते.
नाचणीचे डोसे, रागी मुद्दी हा कर्नाटकी प्रकार, उकड काढून शेवया, नाचणीचा केक, हे चांगले पर्याय आहेत.

किट्टू नाचणीचं पीठ विकत आणलं असशिल तर सगळीकडे चांगलं नाचणीचं पीठ नाही मिळत. जाडसर पीठाची अजिबात भाकरी चांगली होत नाही. तेल तूप लावलं तरी.. भाकरी चाउन खायला कंटाळा येतो मग.
अमिचा पर्याय मी पण वापरते बर्‍याचदा..
नाहीतर कराडकर ने सांगीतल्याप्रमाणे खूप गरम पाणी... त्याने पण मस्त मउ होते भाकरी.

धन्यवाद दिनेशदा..
अतिशय चांगली माहिती दिलीत आपण...
डोसे..रागी मुद्दी इ. प्रकार कसे करायचे तेही सांगताल का जमल्यास ? :)\

धन्स डेफो ( Sad )
कुठले घेऊ मग .. कुठले ठराविक माहित असल्यास सांगशील Happy

Pages