भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<<< आपण बर्फ खाला तर तो पोटात तस्साच नाही ना राहत....थंड पाणी प्यायल्याने त्याचे तापमान शारिरीक तापमान जेव्हढे आहे तेव्हढेच होत असेल. >>>>>>>

जस गर्मी वाढल्याने शरीराला घाम येऊन तापमान मेंटेंन केले जाते तसेच जर थंड पाणी अथवा बर्फ खाल्याने शरीराला काही तरी करावच लागत असणार तापमान मेंटेंन करण्यासाठी !!

<<<<<<<<जेवताना गार पाण्याऐवजी कोमट पाणी प्या व हृदयविकार व कॅन्सरपासून दूर रहा. >>>>>>

हृदयविकार व कॅन्सर च सोडा हो, फक्त न्युमोनिया झालेल्या पेशंटला बर्फाच गारेगार पाणी पाजा की !

जीडी, दोन निरीक्षणं आहेत, त्यावरून तुला योग्य वाटेल तसा निर्णय घे.

पोटात गॅसेस झाले असतील तर कोमट/ गरम पाणी प्यायल्याने सुसह्य वाटते.

लोणीतूपतेलाची ओशट भांडी गरम पाण्याने विसळल्यास ओशटपणा निघून जातो.

आमच्या कडे तर असे आले होते कि , गार पाणी प्या , ते पाणी गरम करण्यासाठी शरीर जे काही काम करेल त्यासाठी कॅलरी जळतील आणि तुम्ही बारीक होणार .
आता ठरवा पाणी गार हवे का कोमट का गरम
अवांतर - आमच्याकडे भांड्याचा ओशटपणा जाण्यासाठी उकळते पाणी वापरतो

http://www.snopes.com/medical/myths/coldwater.asp

chilled liquids do not solidify ingested fats when the two meet in the stomach: the internal heat of the human body quickly nullifies any temperature differences among the various items that have been swallowed, and stomach acids very efficiently break down lumps of ingestibles before they are passed into the intestines.
As for oils reacting with stomach acids to form a resultant sludge that is subsequently absorbed more quickly by the intestine than solid food is, remember that "solid food" doesn't generally get into the intestines. By the time most of what we ingest gets that far along in our digestive process, it's all pretty much the same consistency.
Read more at http://www.snopes.com/medical/myths

http://www.livestrong.com/article/487339-is-it-bad-to-drink-cold-water-w...

The myth that it is bad to drink cold water with meals is a variation on a popular rumor that has become widespread both on and off the Internet. On closer examination, however, it turns that it is only that -- a rumor -- and in the vast majority of cases, is not supported by actual scientific research.

लिंबू मिरची बांधणे ही प्रथा तुम्हाला अंधश्रद्धा जरी वाटत असली तरी ती अंधश्रद्धा न म्हणता काल बाह्य प्रथोमोपचार उपाय म्हणू शकता. कारण ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक चालत किवा बैल गाडीतून प्रवास करीत असत. मैलो न् मैलाच्या ह्या प्रवासात बैलगाडीला लिंबू , मिरची , बिबवा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अशा भागात बांधत कि तो लगेच लोकांच्या निदर्शनास पडेल. किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणार् या वाटसरूना तो लगेच मिळेल .
पण हे का? असा प्रश्न आता तुम्हाला हि पडला असेल?
ह्याचे उत्तर असे आहे कि मैलो न् मैली चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते ज्या मुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमवता येवू शकते. त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत जेणे करून हा साप विषारी होता की, बिनविषारी ह्याची माहित मिळे. जर साप चावला असताना मिरची तिखट लागली तर साप बिनविषारी होता आणि तीखट नाही लागली कि साप हा विषारी होता. असा अंदाज बांधला जात. बिबवा हा उत्कृष्ट एन्टीबायोटीक समजला जातो म्हणून जखम झाल्यास , कापल्यास बिबवा लावला जात , आणि हे सगळे एका टोकदार तारेत ओवले जात जी तार पायातला काटा काढण्यास उपयोगात येई. अशा प्रकारे हा प्रथोमपचार बैल गाडीवर , घराच्या दर्शनी भागात लावला जात कारण त्याचा उपयोग प्रथोमोपचारा साठी लावला जात. पुढे वाहने आली आणि हा प्रथमोपचार एक प्रथा बनून अजून हि चालू आहे. आणि कधी प्लास्टिक चे लिंबू मिरची कधी बिबव्याच्या जागी कोळसा असे काही हि यंत्र बनवून विकले जात असून खरच हा एक मोठा धंदा झाला आहे. ह्या बाबत आपल्या मित्रांना माहिती व्हावी म्हणून आणि हिंदू धर्मातील प्रथा त्या त्या वेळेस वैज्ञानिक दृष्ट्या कशा योग्य होत्या हे दाखविण्यासाठी हि माहिती देतो आहे.
ती जास्तीती जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि हा प्रथमोपचारपद्धतीची कशी प्रथा झाली ह्याची माहिती पोहोचावी हा एकच उद्देश….!

भरत, असल्या बादरायण फॉर्वर्डस पेक्षा "भुताखेतांना" घालविण्याकरता लिंबुमिरची लावतो हेच्च सांगणे मला तरी बरे पडेल. उग्गाच ओढुन ताणून प्रत्येक धार्मिक बाबतीत सायन्सचा आधार कुबडीसारखा घेण्याची असली धेडगुजरी सवयही हिंदुधर्माला घातकच आहे असे माझे वैयक्तिक मत.

विठ्ठला, बरोबरे तुमचे, सहसा माझ्या वाटेला साप जात नाहीत पण या ना त्या कारणाने विषारी प्राणी बहुसंख्येने संपर्कात येतातच. कुंडलीमधिल ग्रहस्थिती त्यास कारणीभूत आहे असे माझे मत.
अन तसे तर भुतेखेतेही वाट्यास जात नाहीत.
हां आता मनुष्यरुपातील काही अतृप्त आत्मे हात धुवुन माझे पाठी लागलेले अस्तात... पण मी काळजी करीत नाही.... माझे पाठीमागेही "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' म्हणणारे सदद्गुरु कायम असतातच. ते काळजी घेतात माझ्या "पाठीवरील वाराची" Happy

मला एक कळत नाही,

दारावरचे लिंबू तोंडात पिळण्यापेक्षा, दार वाजवून पाणी का नव्हते मागत?

दुसरं, मिरची, लिंबू हे सगळं किती दिवस ताजं रहायचं?

बैलगाडीच्या धुर्‍याला बांधलेल्या लिंबूमिर्च्यांवर बसलेली धूळ-चिखल-शेण-माती-कुत्र्यांनी केलेले पराक्रम इ. त्यांच्या चवीत भर घालीत असत काय?

लिंबू-मिर्चीच्या खाली ती काळी कापडी भावली काय मिर्ची चावून खाल्ल्याने नाकाला आलेलं पाणी पुसायला बरी असते म्हणून टांगतात का?

बाकी बिब्बा "अँटीबायोटीक" म्हण्णार्‍याच्या प्रत्येक इन्फेक्शियस आजारात बिब्बाच लावला पाहिजे आतून बाहेरून. Lol

सगळ्यात महत्वाचं म्हणजे, हे प्रकरण अमावस्येलाच का टांगतात?

सोच्नेका नै. फॉर्वर्ड मारने का.

Dima thanks for this post....
I will reply in same words from nw n onwrds fr this particular forward

दिमांची पोस्ट सही Lol

अजुन एक फॉरवर्ड आहे ना कांदा जवळ ठेवुन झोपलं की फ्ल्यु होत नाही कि झालेला बरा होतो अशा अर्थाची....

भारतीय समज/परंपरा/प्रथा यांचा विज्ञानाशी ओढुन ताणुन लावलेला संबंध केविलवाणा विनोदी वाटतो.

अरे बेसिक लोचा तर लक्षातच घेतला नाही मी.

साप पायी चालताना चावतो. (त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास)

तहान पायी चालताना लागते. ( मैलो न् मैली चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात)

बैलगाडी नसताना पायी चालणार्‍या माणसाच्या कोणत्या दर्शनी भागावर तारेत टोचून बिब्बा लिंबू मिर्ची टांगत असत ? Lol

दीमा

ते लिंबू, मिरच्या सगळं एका तारेत खुपसणं यासाठी होतं असं वाटलं होय ?
तुमच्याकडची डीमार्टची ७८ रु त मिळणारं गॅस ग्रील तेव्हां नव्ह्तं. चूल पेटवायचे आणि ती धार जाळावर धरायचे. मस्त ग्रिल्ड फूड बनायचं. लगेचच जय मल्हार शिरेलीतल्या थ्री जी वरून एकमेकांना फॉर्वर्ड करायचे रेसिपीज !

पण १६व्या शतकात भारतात मिरची आली. त्या आधी लिम्बाबरोबर काय बांधत असतील बरे? एक भा. आणि नि. प्रश्न Proud
हिंदू धर्म, परम्परा, विज्ञान असे शब्द घेऊन उगाच काहीही भकायचं .......

मला एक कळत नाही,

दारावरचे लिंबू तोंडात पिळण्यापेक्षा, दार वाजवून पाणी का नव्हते मागत?

दुसरं, मिरची, लिंबू हे सगळं किती दिवस ताजं रहायचं?

बैलगाडीच्या धुर्‍याला बांधलेल्या लिंबूमिर्च्यांवर बसलेली धूळ-चिखल-शेण-माती-कुत्र्यांनी केलेले पराक्रम इ. त्यांच्या चवीत भर घालीत असत काय?

लिंबू-मिर्चीच्या खाली ती काळी कापडी भावली काय मिर्ची चावून खाल्ल्याने नाकाला आलेलं पाणी पुसायला बरी असते म्हणून टांगतात का?
<<<< लगे रहो दिमा.... एकदम करेक्ट.....
बाकी बिब्बा "अँटीबायोटीक" म्हण्णार्‍याच्या प्रत्येक इन्फेक्शियस आजारात बिब्बाच लावला पाहिजे आतून बाहेरून. हाहा

सगळ्यात महत्वाचं म्हणजे, हे प्रकरण अमावस्येलाच का टांगतात?

बैलगाडी नसताना पायी चालणार्‍या माणसाच्या कोणत्या दर्शनी भागावर तारेत टोचून बिब्बा लिंबू मिर्ची टांगत असत ? हाहा

आमावशेला अंधार असतो ना. म्हणून Happy

लिंबुभाऊंना विचारा (सध्या स्वतःच्या दाराला लटकलेले असतात :दिवा:)

व्हॉट्स अप वर बरेच दिवस येत होती ही पोस्ट. आज मूळ स्त्रोत मिळाले. भोंदू फॉर्वर्डस आहे कि नाही कल्पना नाही.

http://indiannova.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A...

सत्य घटना------
हा संदेश खरचं वेळ असेल तर plz plz plz plz pllzzzzzzzz वाचा •••

विद्युत डिजीटल कॅमेऱ्याच्या फ्ल्याश लाईट मधून आपल्या शरीरात प्रवेश करू शकते का ..??? हो१०० % करू शकते....!!!
...
हि एक खरी घटना आहे, एका १९ वर्ष
वयाच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये
शिकणाऱ्या मुलाबरोबर घडलेली. त्याचा मृत्यु केशवानी हॉस्पिटल, मुंबई येथे झाला.
त्याला हॉस्पिटल मध्ये जळालेल्या अवस्तेत दाखल करण्यात आलं होतं. कारण ...???????
तो अमरावतीला स्टडी टूर साठी गेला होता, परत येताना तो मित्रांसोबत रेल्वे स्तानकावर रेल्वेची वाट पाहत होता. बरेचजण “मोबाईल आणि डिजीटल कॅमेऱ्यातून” ग्रुप फोटोज काढतहोते. त्यात हाही मुलगा होता, तो जिथे उभा होता तिथून डिजीटल कॅमेऱ्यात संपूर्ण ग्रुप फोटोत येत नवता म्हणून पूर्ण ग्रुपचा फोटो काढण्यासाठी तो मुलगा थोडा मागे झाला.(सचिन गमे) तो उभा असलेल्या जागेच्या वर ४०,००० व्होल्ट विद्युत क्षमतेची तार होती. त्याने फोटो काढण्यासाठी डिजीटल कॅमेऱ्याचं बटन दाबताक्शनी ४०,००० व्होल्ट क्षमतेची विद्युत कॅमेऱ्याच्या फ्ल्याश लाईट मधून कॅमेरा, कॅमेऱ्यामधून त्याच्या हाताच्या बोटांमध्ये आणि तेथून त्याच्या शरीरात घुसली. हे सर्व एका सेकंदापेक्षाही खूप कमी वेळात घडलं आणि त्याचं आर्ध शरीर जळालं. त्याचं आर्ध जळालेलं शरीर केशवानी हॉस्पिटल, मुंबई येथे रुग्नवाहीनीतून आणण्यात आलं होतं. तो दीड दिवस बेशुद्ध अवस्तेत होता. ५०% शरीर जळालेलं असल्यामुळं डॉक्टरांना त्याच्या जगण्याच्या आशा कमीच वाटत होत्या. नंतर त्याचा मृत्यु झाला.
आपल्यापैकीकिती जणांना असे तांत्रिक धोके घडू शकतात हे माहित आहे...????? आणि माहित असतील तरी किती जण काळजी घेतात...???? खरच आपण शिकलेलो आणि समजदार आहोत का ...?

★मोबाईल फोन/डिजीटल कॅमेरा - फ्ल्याश यांचा वापर रेल्वे स्थानकावरील किव्वा अन्य कुठल्याही ठिकाणावरील उच्च क्षमतेच्या विद्युत तारांपाशी अजिबात करू नका. तुमच्या हितासाठीच आहे, वाचून झाल्यावर शेअर अवश्य करा !!!
यामुळे कुणाचा तरी जीव वाचेल. .
कृपया शेयर करा
इतराना पण सांगा.

विश्वास नांगरे पाटील (I.P.S)

४०,००० व्होल्ट क्षमतेची विद्युत कॅमेऱ्याच्या फ्ल्याश लाईट मधून कॅमेरा, कॅमेऱ्यामधून त्याच्या हाताच्या बोटांमध्ये आणि तेथून त्याच्या शरीरात घुसली.>>> खरंच कि काय? अमानवीयच आहे कि.

Pages