चित्रपटांचे न पटलेले शेवट

Submitted by चीकू on 4 August, 2015 - 14:12

बर्‍याचदा आपण चित्रपट बघायला घेतो, त्यात रंगत जातो, कथानक, अभिनय सगळ्याचीच छान गुंफण असते आणि अचानक अनपेक्षित, एकूण आत्तापर्यंतच्या सर्व कथानकाला अजिबात न्याय न देणारा असा शेवट होतो (काहीसा anti-climax म्हणता येईल असा). म्हणजे एकूण चित्रपट ज्याप्रकारे build होत असतो त्यात अशा शेवटाने एकदम तडा जातो. तर असे कुठले चित्रपट तुम्हाला आठवतात? अर्थात उगीचच अचाट आणि अतर्क्य करामतीचे सीन्स असणारे शेवट यात धरत नाही. तर ज्या शेवटामुळे चित्रपटाच्या कथाबीजाला न्याय मिळाला नाही असं वाटून राहातं, असे चित्रपट इथे अपेक्षित आहेत. इन्ग्रजी/हिंदी/मराठी कुठलेही चालतील.

मला ज्यांचा शेवट पटला नाही असे काही चित्रपट. अर्थात चित्रपटांचा शेवट खाली सांगितलेला असल्याने ज्यांना हे चित्रपट बघायचे आहेत त्यांनी वाचू नये Happy

जगाच्या पाठीवरः राजा परांजपे, सीमा यांचा अभिनय आणि सुमधुर संगीतासाठी हा प्रसिध्द चित्रपट. सर्व काही सुरळित चालले असताना अचानक कुठल्याही कारणाशिवाय अंध सीमाचे डोळे परत येतात, आणि शेवट शोकदायकच करायचा असं ठरवलं असल्याने की काय राजा परांजपेंचे डोळे जातात! तोपर्यंत सुरेख चाललेल्या चित्रपटाला शेवट खरंच मातीत घालतो Sad

एक दुजे के लिये: इथे परत उगीचच शोकात्म शेवट केला आहे ओढूनताणून असं वाटतं. कयामत से कयामत तक सारख्या चित्रपटात तो शेवट कथेत व्यवस्थित बसत होता पण एक दुजे के लिये मधे शोकांत केल्यानेच प्रेमाची महती पटेल असे वाटले की काय कोण जाणे!

हैदराबाद ब्लूजः हलकाफुलका चांगला चित्रपट आहे पण शेवटी लग्नाच्या मंडपात मनपरिवर्तन, अदलाबदल आणि जो काय घोळ घातला आहे त्यामुळे चित्रपटाच्या वास्तवतेला खूपच धक्का पोचतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहारोंके सपने ( राजेश खन्ना, आशा पारेख ) मधे आधी दोघेही मरतात असा शेवट होता, आणि तो योग्यही होता. पण पब्लिकला ते न पटल्याने, त्यांना परत जिवंत झालेले दाखवलेय.

पब्लिकच्या दडपणाला बळी न पडता, कथेचा यथायोग्य शेवट म्हणजे बंदीनी आणि अगदी शेवटच्या संवादात, नायिकेला वेगळ्याच उंचीवर नेणारा चित्रपट सौदागर ( दोन्ही नूतनचे )

पब्लिकच्या दडपणाला बळी न पडता, कथेचा यथायोग्य शेवट म्हणजे बंदीनी आणि अगदी शेवटच्या संवादात, नायिकेला वेगळ्याच उंचीवर नेणारा चित्रपट सौदागर ( दोन्ही नूतनचे ) >>>>

अनुमोदन!

यात तीसरी कसमचाही उल्लेख केला पाहिजे. राज कपूरला नायक-नायिका एकत्र येतात असा सुखी शेवट हवा होता. पण दिग्दर्शकाने त्याला दाद दिली नाही. आणि त्यामुळे चित्रपटाच्या कथेला पूर्ण न्याय मिळाला. हा माझा अतिशय आवडता चित्रपट. राज कपूर एरवी डोक्यात जातो पण यात त्याने आणि वहिदा रेहमानने उच्च अभिनय केला आहे.

आह मधेही राज कपूर मेलेला दाखवलाय (जो योग्य शेवट होता), पण नायकाला तसे लोक स्वीकारतील की नाही ही धास्ती राज कपूरला वाटली आणि त्याने शेवटाचे परत चित्रीकरण केले चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी आणि नायक नायिकेचे मिलन दाखवले Sad

पब्लिकच्या दडपणाला बळी न पडता, कथेचा यथायोग्य शेवट म्हणजे बंदीनी आणि अगदी शेवटच्या संवादात, नायिकेला वेगळ्याच उंचीवर नेणारा चित्रपट
<<<
सदमाचा शेवटही इनक्लुड करा यात , अगदी चटका लावणारा :).
चान्दनी बार चा शेवट पण अगदी रिअ‍ॅलिस्टीक !

धूम २ चा शेवट पटला नव्ह्ता. ह्रिथिक चोरलेल्या मालाची लॉकर की अभि. ला देतो,आणि अभि त्याला देतो सोडुन..का ही ही!
जर चोरलेल्या चिजवस्तूंचा वापर अभिषेक ने केला तर? आणि ग्रिसला इतके दिवस मजा मारून भारतिय पोलिस त्याला काहिही विचारत नाहित की तपासाचा काय निकाल/तपशिल?

धूम २ चा शेवट पटला नव्ह्ता.<<< शेवट?? अख्खा पिक्चरच पटला नव्हता! पण तरी ह्रितिकसाठी या दोन डोळ्यांची निरांजनं करून करून पाह्यला!!!! Lol

धूम २ अतिशय बेक्कार आहे म्हणायची संधी धूम ३ ने हिरावून घेतली. धूम २ पेक्षा जात लॉजिक झोल धूम ३ मध्ये होते (शिवाय कॉन्स्टिपेटेड आमिर खान! आणी त्याचा तो हॉरीबल टॅप डान्स!)

पीकेचा शेवटः असं कुठलं बूक रीडींग अस्तं ज्यात लेखक आपल्याच पुस्तकाचा शेवट वाचकांना वाचून दाखवतो!

३ इडिय्ट्सचा शेवट मित्रांची भेट इथवर गुंडाळला असता तर चाललं असतं ती दुल्हन ड्रेसमधली करीना आणी स्कूटर वगैरे जरा अति अति झालं होतं.

असल्या पिक्चरची स्क्रिप्टे तीन चार जण मिळून लिहीत असतील त्यामुळे एकाने पूर्वी काय लिहिले आहे ते बाकीच्याना माहीत नसेल त्यामुळे असले घोळ होत असावेत Proud

मला तलाशमधले ते करिना शेवटी येऊन वाचवते प्रकरण अजिबात आवडले नाही. आमिर स्वतःच स्वतःला वाचवु शकला असता.

पण तो मुलाचे पत्र वाचुन त्यावर विश्वास ठेवतो हा शेवट योग्य वाटला. त्याचा आधीपासुनच मुलगा बोलू इच्छितो यावर विश्वास नसतो, आत्मे वगैरे भानगडी पटत नसतात. पण करिना प्रकरणानंतर त्याचा विश्वास बसतो. विश्वास बसल्यानंतर मुलाची नोट वाचल्यवर तो स्वतःच्या गिल्टमधुन थोडाफार बाहेर येतो. नवराबायकोचे आधीसारखे नाते परत सुरू झालेय या नोटवर चित्रपट संपतो.

मृत मुलगा वडिलांना पत्र लिहितो- हेच तर न पटण्यासारखं आहे!

धूम २ ची खासियतच ही आहे की हे सगळं अशक्य आहे हे माहित असूनही हृथिकमुळे तो पाहिला जातोच Proud मला वाटतं अनुनेच इथे त्या चित्रपटाची चिरफाड केली होती तेव्हा कुठे मला खाडकन जाणवलं होतं की धूम २ किती कैच्याकै आहे! Lol

मला तलाशमधले ते करिना शेवटी येऊन वाचवते प्रकरण अजिबात आवडले नाही.<< इथवर सिनेमा खरंच ग्रेट होता.

करीना जिथं त्याला वाचवते तो खर्‍या अर्थानं सिनेमाचा टर्निंग पॉइंट होता. पाण्यात बुडालेला मुलगा, त्या गिल्टचं ओझं घेऊन जगणार्‍याला जेव्हा स्वतः पाण्यात बुडत असताना जेकाही फील होतं आणी त्यानंतर त्याचा ज्यावर अजिबात विश्वास नाही अशी गोष्ट येऊन त्याला वाचवते हेच तर फार महत्त्वाचं होतं. नंतर ते प्रकरण पत्राऐवजी प्रत्यक्ष संवादामधून (करीना येतेच, मग मुलगाही आला असता ना) उतरवले असते तर अधिक पटले असते.

३ इडिय्ट्सचा शेवट मित्रांची भेट इथवर गुंडाळला असता तर चाललं असतं ती दुल्हन ड्रेसमधली करीना आणी स्कूटर वगैरे जरा अति अति झालं होतं.
>>
+१

यात शेवट नाही पण तो डिलेव्हरीवाला प्रसंगही (कथेची गरज पण अन रिअ‍ॅलॅस्टीक वगैरे) उगाच!

तलाश अगदी क्लायमॅक्स पर्यंत खिळवून ठेवणारा होता. क्लायमॅक्सला करीना येते तो हायलाइट होता पण नंतर ती जे काय पांढरा झगा बिगा घालून फेअरी टाइप पाण्यात येऊन आखाला वाचवते ते अगदीच अ आणि अ होतं.. Lol
त्यापेक्षा त्याला खटाखट त्याच्या मुलाचा आणि करीनाचा चेहरा वगैरे मोंताज दिसून तो पाण्याच्या वर आला असता तरी खूप इफेक्टिव वाटलं असतं..

करीना जिथं त्याला वाचवते तो खर्‍या अर्थानं सिनेमाचा टर्निंग पॉइंट होता. पाण्यात बुडालेला मुलगा, त्या गिल्टचं ओझं घेऊन जगणार्‍याला जेव्हा स्वतः पाण्यात बुडत असताना जेकाही फील होतं आणी त्यानंतर त्याचा ज्यावर अजिबात विश्वास नाही अशी गोष्ट येऊन त्याला वाचवते हेच तर फार महत्त्वाचं होतं

ह्म्म.. बरोबर आहे. पण ते फेअरीटाईप झाल्याने माझा एकदम फोकस गेल्यासारखा वाटला. त्या दृश्यावर लक्ष जाते, दृश्यामागचा मेसेज दुर्लक्षित होतो.

मृत मुलगा वडिलांना पत्र लिहितो- हेच तर न पटण्यासारखं आहे!

मुलाला शेरनाझच्या माध्यमातुन बाबाशी बोलायचे असते, तो आईशी तिच्या माध्यमातुन बोललेला असतोच. शेरनाझशी भेटून तिच्या माध्यमातुन मुलाशी बोलुन राणी थोडीथोडी बदललेली दाखवलीय (ती हळूहळू त्या दु:खामधुन थोडीशी मोकळी होते असे मला वाटले) पण आमिर असे काही आहे हेच स्विकारायला नकार देतो. त्यामुळे मग त्याला जे बोलायचे ते शेरनाझ पत्रात लिहिते.

करिनाचे पात्र स्विकारले तर मग मुलाचे स्विकारायला काय हरकत आहे? शेवटी ती गोष्टच तशी आहे Happy

बाहुबली......

कटप्पाच गुढ तसच ठेवायला नको होत.

खरच विचारावस वाट्ट....... कटप्पाने बाहुबली ला का मारलं? Rofl

थ्री इडियट्स चा शेवट जाऊ दे मला सुरुवात डोक्यात गेली होती. स्वताला विमानातून उतरायचंय म्हणून अख्ख्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करणं- त्यात इतरांच्या कनेक्टिंग फ्लाइट्स मिस होणार, महत्वाच्या मिटिंग्ज, तातडीची कामं मिस होणार हा काही विचार नाही. पूर्ण इंधन भरलेलं विमान असं लगेच उतरवण्याआधी इंधन हवेत फेकून द्यावं लागतं जे खूप मूल्यवान असतं. त्यानंतर माधवन दुसऱ्या कोणासाठी आलेली कॅब घेऊन मित्राकडे जातो.

राजू हिरानी डोक्यात जातो तेव्हापासूनच!

मधुरा, तो बाहुबलीचा "शेवट" नाहीये. त्या सिनेमाचा दुसरा भाग २०१६ ला येणार आहे. तसं बघायल गेलं तर तो केवळ इंटरव्हल आहे.

और प्यार हो गया== बॉबी आणि अ‍ॅश्वर्याच्या या सिनेमामधेय सुंदर लोकेशन्स आणि गानी सोडल्यास काहीही बघण्यासारखं नाही. (शम्मी आहे, पण तरीही!!) या सिनेमामध्ये इतक्या अचाट गोष्टी आहेत तरीही सिनेमाच्या शेवटी बॉबी आपल्या दोन हातांनी अख्खं विमान थांबवतो (चाकं धरून) त्या सीनका जवाब नही.

Pages