चित्रपटांचे न पटलेले शेवट

Submitted by चीकू on 4 August, 2015 - 14:12

बर्‍याचदा आपण चित्रपट बघायला घेतो, त्यात रंगत जातो, कथानक, अभिनय सगळ्याचीच छान गुंफण असते आणि अचानक अनपेक्षित, एकूण आत्तापर्यंतच्या सर्व कथानकाला अजिबात न्याय न देणारा असा शेवट होतो (काहीसा anti-climax म्हणता येईल असा). म्हणजे एकूण चित्रपट ज्याप्रकारे build होत असतो त्यात अशा शेवटाने एकदम तडा जातो. तर असे कुठले चित्रपट तुम्हाला आठवतात? अर्थात उगीचच अचाट आणि अतर्क्य करामतीचे सीन्स असणारे शेवट यात धरत नाही. तर ज्या शेवटामुळे चित्रपटाच्या कथाबीजाला न्याय मिळाला नाही असं वाटून राहातं, असे चित्रपट इथे अपेक्षित आहेत. इन्ग्रजी/हिंदी/मराठी कुठलेही चालतील.

मला ज्यांचा शेवट पटला नाही असे काही चित्रपट. अर्थात चित्रपटांचा शेवट खाली सांगितलेला असल्याने ज्यांना हे चित्रपट बघायचे आहेत त्यांनी वाचू नये Happy

जगाच्या पाठीवरः राजा परांजपे, सीमा यांचा अभिनय आणि सुमधुर संगीतासाठी हा प्रसिध्द चित्रपट. सर्व काही सुरळित चालले असताना अचानक कुठल्याही कारणाशिवाय अंध सीमाचे डोळे परत येतात, आणि शेवट शोकदायकच करायचा असं ठरवलं असल्याने की काय राजा परांजपेंचे डोळे जातात! तोपर्यंत सुरेख चाललेल्या चित्रपटाला शेवट खरंच मातीत घालतो Sad

एक दुजे के लिये: इथे परत उगीचच शोकात्म शेवट केला आहे ओढूनताणून असं वाटतं. कयामत से कयामत तक सारख्या चित्रपटात तो शेवट कथेत व्यवस्थित बसत होता पण एक दुजे के लिये मधे शोकांत केल्यानेच प्रेमाची महती पटेल असे वाटले की काय कोण जाणे!

हैदराबाद ब्लूजः हलकाफुलका चांगला चित्रपट आहे पण शेवटी लग्नाच्या मंडपात मनपरिवर्तन, अदलाबदल आणि जो काय घोळ घातला आहे त्यामुळे चित्रपटाच्या वास्तवतेला खूपच धक्का पोचतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरस्वतीचंद्रचा शेवटही मला पटला नव्हता. सरस्वतीचंद्र विधवा कुमुदला मागणी घालतो. त्यांनी लग्न करायला हवे होते. पण सासूसासर्‍यांची मला काळजी घ्यायला पाहिजे म्हणून कुमुद त्याला नकार देते आणि आपल्याच बहिणीशी लग्न करायला सांगते. कदाचित त्याकाळात विधवा स्त्रियांचा पुनर्विवाह एवढा रूढ नसेल पण तरीही सरस्वतीचंद्र तिचा स्वीकार करण्यास तयार होता, तिचेही लग्नाआधी त्याच्यावर प्रेम होते, सासूसासर्‍यांची सेवा त्याच्याशी लग्न करूनही तिला करता आली असती त्यामुळे तिच्या नकारामागे कुठलेही सबळ कारण आढळत नाही.

टायटॅनिकचा शेवट सुद्धा मला फारसा पटला नाही. म्हणजे हिरो मेला ते ठिकाय, पण त्याला स्वत:ला वाचवायची संधी होती, वा त्याने तसा प्रयत्नही नाही केला. हिरोईन सेफ झाल्यावर त्याने स्वत:लाही सेफ करायला हवे होते. अजून काही सापडतेय का बघायचे होते. तर राहिला लटकून फळकूटावरच, आणि मेला आपल्या कर्माने.

ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करत असतात त्यांना जगवल्यानंतर स्वत:ही त्यांच्यासाठी जगणे गरजेचे असते.

हॉलिवुडवर भारतीय संस्कृती सांभाळायचे ओझे नाही, त्यामुळे ते वास्तववादी शेवट दाखवु शकतात.>> +१
हिरोईन सेफ झाल्यावर त्याने स्वत:लाही सेफ करायला हवे होते.>> +१

स्वत:ही त्यांच्यासाठी जगणे गरजेचे असते.
>> +१००

शरद पोंक्षे ची मराठी मालिका कुठली ती ? कन्यादानच ना ? शेवट नाही पटला. अशी अचानक मालिका गपकन संपते म्हणजे काय ? कित्ती स्कोप होता.. लग्नानंतर मुलगा दारकळतं, बाहेरख्याली असल्याचं कळतं. मोठं घर, चांगले दीडशे जण एकत्र राहत असतात. सर्वांचं तिला करावं लागत असतं.... सगळ्यावर पाणी सोडलं. पोंक्षेंना वेळ नसेल तर भाऊ कदमांना घेऊन पूर्ण करायची.

टायटॅनिकमधे मला वाटतं आजूबाजूला दुसरा काही सपोर्ट मिळत नसतो आणि ते फळकूट एकाचंच वजन पेलू शकणार असतं. पण तरीही तो त्या फळकुटाला धरून ठेवून शक्य तितका वेळ जिवंत राहाण्याचा प्रयत्न करतो. जर rescue boats जरा लवकर पोचल्या असत्या तर तोही वाचू शकला असता.

सगळ्यात 'पचका' शेवट म्हणजे अमिताभ च्या डॉन चा. बाकी ८०% पिक्चर महा टॉप क्लास आहे, थोडाफार प्राण चा त्या दोरावरून चालणे वगैरे भाग सोड्ला तर. पण शेवटी सलीम जावेद, चंद्रा बारोट ने दुसर्‍या कोणाला तरी दिग्दर्शन उरकून टाकायला दिल्यासारखे आहे - त्या दफनभूमीतील फायटिंग.

तो फळकुटावर चढायचा प्रयत्न करतो तिने त्याला बोलावल्यावर आणी फळकूट डळमळते म्हणून उतरतो असे काहीतरी आठवतेय.
बाकी इतक्या बर्फगार पाण्यात पडल्याच्या धक्क्याने पोहता येत असेल तरी ह्रुदय बंद पडून मरणे शक्य आहे.

अजून एक चित्रपट म्हणजे धर्मेंद्र-शर्मिलाचा देवर. त्यात धर्मेंद्रच्या हातून अपघाताने शर्मिलाच्या नवर्‍याची हत्या होते. शर्मिला कोर्टात त्याच्याविरुद्ध साक्ष द्यायला सज्ज झालेली असते पण अचानक तिला उपरती होते आणि ती साक्ष फिरवते. हे अचानक मनपरिवर्तन का होतं हे कळत नाही. तिने आपला मेलेला नवरा आणि धर्मेंद्रच्या हातात बंदूक पाहिली असते, अपघात होताना बघितला नसतो त्यामुळे सत्य घटना तिला माहित नसते. त्यामुळे सबळ कारण काय ते कळत नाही. केवळ धर्मेंद्र तिचा देवर असतो आणि त्याला क्षमा करावी असं असेल तर तेही प्रभावीपणे व्यक्त होत नाही.

देवर मधे बहुधा असेही काहीतरी होते की धर्मेन्द्र चे तिच्यावर प्रेम असते पण त्याचा मित्र की भाउ देवेन वर्मा (बहुधा) तिच्याशी ते माहीत असून लग्न करतो.

HAHK - अजिबातच पटला नाही शेवट. बळच त्या टफीला कामाला लावले.>>> या शेवटावरच ते कुत्र जाम फेमस झाले
हा पिक्चर बघायला आमच्याकडे समस्त महिला मन्डळ भिशी ग्रुप एकत्र गेलेला...आल्यावर सगळ्याच एकच वाक्य होत
" अग! त्या कुत्र्याने काय छान काम केलेय" smiley16.gif

देवर मधे बहुधा असेही काहीतरी होते की धर्मेन्द्र चे तिच्यावर प्रेम असते पण त्याचा मित्र की भाउ देवेन वर्मा (बहुधा) तिच्याशी ते माहीत असून लग्न करतो. >>>>

बरोबर आहे. धर्मेंद्र-शर्मिलाचे लग्न मोडावे म्हणून देवेन वर्मा धर्मेंद्रला बदनाम करणारे निनावी पत्र पाठवतो. काही खोटे आळही त्याच्यावर आणतो. पण हे त्याचे कृत्य शर्मिलाला माहिती नसते. त्यामुळेच तिचे शेवटी धर्मेंद्रला माफ करणे पटत नाही.

बाकी चित्रपट खरंच चांगला होता. देवेन वर्माने निगेटिव्ह भूमिका मस्त केली आहे. शर्मिला-धर्मेंद्र-शशिकला सगळ्यांचीच कामे चांगली झाली आहेत. ही सगळी अनुपमा सिनेमातलीच टीम होती आणि अनुपमा व या चित्रपटाचं चित्रीकरण समांतरच चाललं होतं असं ऐकलं आहे. अर्थात दोन्ही चित्रपटांचे विषय आणि व्यक्तिरेखा पूर्ण भिन्न होत्या.

सदमा : करायचा म्हणून दु:खद शेवट केला असे वाटले.

उंबरठा :पहिल्यांदा पाहिला तेव्हा शेवट आवडला नाही. "..आणी सारे सुखाने नांदू लागले" असे हवे होते असे वाटले. पण पुन्हा एकदा पाहिल्यावर तो शेवट अपरिहार्य आणी मूळ कादंबरीच्या नावाशी साजेसा होता हे पटले.

बजरंगी भाईजान चा शेवट ( आणि पूर्ण सिनेमाच ) अतिशय बंडल !
मुन्नी सुख्॑रूप पोचल्यानंतर पाकने बजरंगीचं डोकं उडवून भारताला पाठवलं टाइप शेवटच पटला असता मला फक्त , उगीच टिपिकल कनवाळु पाकि जनता :).
अर्थात असल्या फाल्तु सिनेमाचा शेवट लॉजिकला धरू असेल अशी आपेक्षाच करु नये !

सगळ्यात 'पचका' शेवट म्हणजे अमिताभ च्या डॉन चा >>> म्हणूनच शाहरूखने चूक सुधारत आपल्या डॉनमध्ये शेवट बदलला वाटते Wink

मुळात बॉर्डर क्रॉस केल्यावर त्याची सावली बघुनच गोळ्या घातल्या असत्या सैनिकानी भले ते कुठल्याही देशाचे असुदेत.. दी एन्ड Lol

" म्हणूनच शाहरूखने चूक सुधारत आपल्या डॉनमध्ये शेवट बदलला वाटते" - शेवटात चूक सुधारली. पण मुळात असला कॉपी करण्याचा आचरटपणा करून सुरुवातच चुकीची केली. Happy

मुळात असला कॉपी करण्याचा आचरटपणा करून >>>>> तो फरहान अख्तरने केला Happy
असो, चर्चा शेवटावरच करा, तो वेगळा आहे ना मग तर झालं

मला शाहरूखच्या अंजामचाही शेवट काही पटला नाही, वा शेवटाकडे जाणारा त्याचा प्रवास.
डरमध्ये शेवटी शाहरूख मेल्यावर जसे व्हिलन मेला असे वाटते. तसे अंजाममध्ये माधुरी त्याला मारते तेव्हा व्हिलन मेल्याचा आनंद फारसा होत नाही, झाल्यास थोडेसे वाईटच वाटते. हे असे नाही व्हायला हवे, यात दिग्दर्शक कमी पडला.

बाझीगरमध्ये तर काही कळतच नाही, शाहरूखला सहानुभुती दाखवावी की त्याचा राग करावा वा आणखी काही...
चित्रपटातल्या काजोलच्या जागी स्वताला ठेवले तर आपण आणखीनच भंजाळून जाऊ, अरे तिच्या निरपराध बहिणीला त्याने क्रूरपणे मारले होते, भले तुमच्या बापाने काहीही काशी का केली असेना.

Pages