चित्रपटांचे न पटलेले शेवट

Submitted by चीकू on 4 August, 2015 - 14:12

बर्‍याचदा आपण चित्रपट बघायला घेतो, त्यात रंगत जातो, कथानक, अभिनय सगळ्याचीच छान गुंफण असते आणि अचानक अनपेक्षित, एकूण आत्तापर्यंतच्या सर्व कथानकाला अजिबात न्याय न देणारा असा शेवट होतो (काहीसा anti-climax म्हणता येईल असा). म्हणजे एकूण चित्रपट ज्याप्रकारे build होत असतो त्यात अशा शेवटाने एकदम तडा जातो. तर असे कुठले चित्रपट तुम्हाला आठवतात? अर्थात उगीचच अचाट आणि अतर्क्य करामतीचे सीन्स असणारे शेवट यात धरत नाही. तर ज्या शेवटामुळे चित्रपटाच्या कथाबीजाला न्याय मिळाला नाही असं वाटून राहातं, असे चित्रपट इथे अपेक्षित आहेत. इन्ग्रजी/हिंदी/मराठी कुठलेही चालतील.

मला ज्यांचा शेवट पटला नाही असे काही चित्रपट. अर्थात चित्रपटांचा शेवट खाली सांगितलेला असल्याने ज्यांना हे चित्रपट बघायचे आहेत त्यांनी वाचू नये Happy

जगाच्या पाठीवरः राजा परांजपे, सीमा यांचा अभिनय आणि सुमधुर संगीतासाठी हा प्रसिध्द चित्रपट. सर्व काही सुरळित चालले असताना अचानक कुठल्याही कारणाशिवाय अंध सीमाचे डोळे परत येतात, आणि शेवट शोकदायकच करायचा असं ठरवलं असल्याने की काय राजा परांजपेंचे डोळे जातात! तोपर्यंत सुरेख चाललेल्या चित्रपटाला शेवट खरंच मातीत घालतो Sad

एक दुजे के लिये: इथे परत उगीचच शोकात्म शेवट केला आहे ओढूनताणून असं वाटतं. कयामत से कयामत तक सारख्या चित्रपटात तो शेवट कथेत व्यवस्थित बसत होता पण एक दुजे के लिये मधे शोकांत केल्यानेच प्रेमाची महती पटेल असे वाटले की काय कोण जाणे!

हैदराबाद ब्लूजः हलकाफुलका चांगला चित्रपट आहे पण शेवटी लग्नाच्या मंडपात मनपरिवर्तन, अदलाबदल आणि जो काय घोळ घातला आहे त्यामुळे चित्रपटाच्या वास्तवतेला खूपच धक्का पोचतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'पडोसन'मध्ये शेवटी ज्याप्रकारे मेहमूदला 'लाफिंग स्टॉक' करून ठेवलंय, त्यामुळे मला त्या सगळ्या व्यक्तिरेखांचा राग येतो क्षणभर. जरा जबाबदारीने हाच शेवट अधिक अ‍ॅक्सेप्टेबल करवून दाखवता आला असता.

'इजाजत'मध्ये आणि 'आंधी'मध्ये बायकोने नवऱ्याच्या पाया पडणं, हे मला अत्यंत बुरसटलेल्या विचारांचं लक्षण वाटलं. एकदम प्रतिगामी. विषयांच्या बाजाला ते शोभणारं नव्हतं. त्या काळाच्या मानाने ते विषय 'हट के' ही होते आणि आव्हानात्मकही. त्याला हे असलं फडतूस 'पतीच्या पाया पडणं' ठिगळ जोडून विचकाच केलाय.

'आनंद' माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे.
पण चित्रपटाची सुरुवात 'फ्लॅशबॅक' मध्ये होते. 'पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. भास्कर पुस्तकाची - आनंदची - कहाणी सांगायला सुरुवात करतो', अशी. आणि चित्रपटाच्या शेवटी, आनंद जेव्हा मरतो आणि सगळे ओक्साबोक्शी रडतात, त्यानंतर हवेत उडणारे फुगे आणि 'आनंद मरा नही, आनंद मरते नही' येतं. 'फ्लॅशबॅक' संपतच नाही !

'शोले' मध्ये शेवटी ठाकूर गब्बरला पोलिसांच्या हवाली करतो. त्याला ठेचायलाच हवा होता. पण मला वाटतं, आधी तसाच शेवट होता आणि नंतर सेन्सॉर बोर्डाने तो बदलायला लावला. (म्हणजे असं ऐकलं तरी आहे)

रामूचा एक भयपट मध्यंतरी आला होता. 'अज्ञात' म्हणून. एक फिल्म युनिट एका जंगलात शूटिंगला जाते आणि तिथे कुणी तरी अज्ञात शक्ती त्यांना त्रास द्यायला लागते. एकेका माणसाला मारत सुटते. सगळ्यात शेवटी हिरो- हिरवीण सुखरूप वाचतात. एका गावात पोहोचतात आणि ती अज्ञात शक्ती 'अज्ञात'च राहते. काही आगा-पिच्छाच नाही !

सरते शेवटी...
'च्यायला, त्या कटप्पाने बाहुबलीला का मारलं, हे पाहण्यासाठी आम्ही २०१६ पर्यंत धुसफूस करत बसायचं की काय ?', असा विचार करत चरफडतच मी थेटरातून बाहेर पडलो होतो, १० जुलै २०१५ ला. Angry

मलाही तालचा शेवट पटला नव्हता. अनिल कपूरला सोडून त्या अक्षय खन्नात काय बघितले Uhoh

'कहानी' मध्ये विद्या बालन आणि सत्योकीची लव्हस्टोरी बघायची इच्छा होती. कदाचित मला सत्योकी खुप
आवडल्याने असेल.>>>> +1

रांझणाचा शेवट तशी एक स्टोरी प्रत्यक्ष बघितल्याने पटला होता

हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील तीन दिग्गज नायक.....१) दिलीपकुमार, २) राज कपूर आणि ३) देव आनंद. या तिघांनी दिलेले आणि कला तसेच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक गटात कायमस्वरुपी स्थित झालेले तीन चित्रपट १) मुघले आझम, २) संगम आणि ३) गाईड.....

....या चित्रपटांचे न पटलेले शेवट....त्याविषयी.

१) मुघले आझम ~ जवळपास तीन तासापेक्षाही जास्त लांबीच्या या चित्रपटात सम्राट अकबरापुढे जणू एकच आव्हानाचे काम आहे आणि ते म्हणजे सलिमच्या जीवनातून अनारकलीला नाहीसे करायचे. त्या विरोधात शहजादा बापाविरोधात युद्धही पुकारतो आणि दोन्ही बाजूंनी हजारोंच्या संख्येने सैन्य मैदानात उतरते...कत्तली होतात. खुद्द बादशहा हत्तीवर बसून युद्धात भाग घेतो....सलिमच्या साथीदारांना अल्लाघरी पाठवून सलिमचा पराभवही करतो. हे ज्या सुंदरीच्या चेहर्‍याने घडून आले त्या भारतीय भूमिकेतील ट्रॉयच्या हेलेनला...अनारकलीला भिंतीत चिरेबंद करून ठार मारण्याचा हुकूमही सहीशिक्क्यासह जारी होतो.....इथपर्यंत सारे काही ठीक आणि कथानकाला आवश्यक असे वातावरण....पण शेवटच्या पाच मिनिटात काय घडते ? तर हा न्यायनिष्ठुर न्यायप्रेमी बादशहाने म्हणे जोधाबाईच्या बाळंतपणाची वार्ता ज्या बाईने त्याला सांगितलेली असते तिला अनारकलीला जीवनदान देणार मी, असे वचन दिले असते म्हणे.....ते पाळलेच पाहिजे या भूमिकेतून ज्या भिंतीत तिला जिवंतपणी मरण द्यायचे आहे तिथल्या गवंड्यांना वा कंत्राटदाराला नकळत अगोदरच भुयार खणून (हे कुणी खणले ते फक्त के.असिफ याना माहीत) ठेवले आहे आणि लिफ्टद्वारे...होय चक्क लिफ्ट दाखविली आहे...मानवी शक्तीवरील...त्या सुंदरीला तळघरात आणले जाते आणि मग मोठ्या मनाने अकबरराव त्या दाईला सांगतात, "लेकर जाव तुम तुम्हारी बेटी को....हमने वचन पूरा किया....!" ~ मग ती अनारची आई अनारकलीला घेऊन जाते, कुठे ? कसे ? किती लांब ? काहीही खुलासा नाही....तीन तास सलम्याच्या नावाने दंगा घालणारी ती बया आता सलिमचे नावही न घेता जाते शून्यात नजर लावून पाय ओढत ओढत अज्ञाताच्या दिशेने.

अजिबात पटला नाही हा शेवट. त्यापेक्षा बिना रायच्या अनारकलीमध्ये तिचा थेट मृत्यू दाखविला होता ते जास्त भावले.

२) संगम ~ हा देखील तीन+ तासांचा आणि चक्क दोन मध्यांतर असलेला आर.के.फिल्म्सचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट. सुंदर आणि गोपाल या दोन मित्रांची एक प्रेयसी राधा....त्रिकोणी कथा राज कपूरच्या प्रेमकथा हाताळणीला आवाहन देणारी...जी त्याने अतिशय सुंदररित्या रंगविली. तिन्ही कलाकारांनी आपापल्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट असे अभिनय केले. पण शेवटी काही आवश्यक नसलेली गोपालची आत्महत्या दाखवून सार्‍या चित्रपटाचा सूर बिघडवून टाकला दिग्दर्शकाने. अगदी शालेय जीवन म्हणजेच लहानपणापासून ही तिन्ही पोरे एकत्र राहतात, फिरतात, गप्पा मारतात, शाळेला जातात, नंतर कॉलेजला जातात, करीअर घडवितात....रोज म्हणजे रोज यांच्या भेटी होतात....सार्‍या गावाला माहीत असते की राधाच्या घरातील लोक गोपालसोबत तिचे लग्न ठरविणार आहेत...त्या दोघांचे प्रेम आहे....पण ही बाब ह्या अतिशय बडबड करणार्‍या आणि गावाची माहिती मेंदूत ठेवणार्‍या सुंदरलाच फक्त माहीत नाही...हे अजिबात पटत नाही. तरीही असो....राधाचे लग्न सुंदरशी होते आणि ती गोपालला आपल्या जीवनातून पुसून टाकते...सुखी होण्यासाठी...पण बेअक्कल पोरीला ते एक गोपालने कधीतरी तिला लिहिलेले पत्र फाडून टाकावेसे वाटत नाही...दागिन्याच्या पेटीत लपवून ठेवले आहे....का ? कशासाठी ? काही खुलासा नाही. त्याचा परिणाम काय होतो तर सुंदरला ते पत्र सापडते...जी खरेतर एक कविताच आहे...राधेवर बेतलेली. तर ती वाचून आपली पत्नी दुसर्‍या कुणाची तरी आहे ह्या धक्क्याने हा वेडा होतो...पण त्याला आपल्या जीवश्चकंठश्च मित्राचा... गोपालचा...संशय येत नाही....तिघांचे जीवन असह्य अवस्थेत आल्यावर शेवट काय ? तर जिल्ह्याचा न्यायाधिश असलेला हा हुशार आणि गुणवंत माणूस गोपाल...स्वतःच पिस्तुलातील गोळी हृदयात मारून घेतो आणि मरतो.... गंगायमुनाच्या संगमासाठी म्हणे सरस्वतीने लुप्त व्हायला हवे ! अजिबात पटत नाही. तो मेल्यावर म्हणे सुंदरराव त्या राधाबाईला आपले म्हणणार यासाठी ? सार्‍या निर्मितीचा त्या आत्महत्या प्रसंगाने सूरच बदलून टाकला.

३) गाईड ~ स्वामी राजू खरेतर मारूनमुटकून गावकर्‍यांनी त्याला "स्वामी" पदावर बसविले आहे आणि आपण यापूर्वी केलेली काही फसवणूकीची पापे या निमित्ताने धुवून टाकावीत म्हणून गावातील मुलांमुलींसाठी, गावकर्‍यांसाठी विविध लोकोपयोगी कार्ये करत आपले जीवन शांतपणे नदीकाठच्या देवळात व्यतीत करीत राहिलेला एक पश्चात्तपदग्ध युवक. अवर्षण काळात लोक त्याच्याकडून देवाला साद घालून पाऊस पाडण्याची अपेक्षा बाळगतात....ग्रामसभेची ती एक भावना असू शकते हे मान्य...पण सुशिक्षित राजू सुरुवातीला नाही म्हणतो पण नंतर याला कसलीतरी उपरती होते आणि स्वामी म्हणून आमरण उपोषणाला बसतो. इथपर्यंत ठीक आहे असे मानू या. पण पाऊस येण्यासाठी स्वामीने मरायलाच हवे हा आग्रह कादंबरीकारांने वा विजय आनंदसारख्या दिग्गज दिग्दर्शकाने का धरावा आणि तसा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा शेवट का करावा हे आकलनापल्याडची बाब होती. स्वामी हिंदू...त्याची प्रेयसी ख्रिश्चन...जवळचा मित्र मुस्लिम....तीन धर्म एकत्र आले आहेत...पण ते एकत्र राहिलेले दाखवायचे नाही, असली विचारसरणी मनी ठेवून चित्रपट तयार करायचा म्हटल्यावर मग स्वामीने मरणे ही आवश्यक बाब बनते हे कटू असले तरी सत्यच....तो शेवट नाही पटला.

असो....धाग्याचा विषय आवडल्याने हे लिखाण केले आहे...हे मत अर्थातच वैयक्तिक पातळीवरील आहे.

संगम बद्दल अगदी अगदी... राज कपुर डोक्यात जातो. मित्र मित्र म्हणुन गळ्यात पडायचे आणि तरीही मित्रांच्या (दोघाही मित्रांच्या, गोपाल आणि राधा) मनात काय चाललेय हे माहित नाही हे पाहुन तर त्याची मैत्री खोटी, फक्त स्वसमाधानासाठी असे वाटून चिड आली त्याची.

इजाजत'मध्ये आणि 'आंधी'मध्ये बायकोने नवऱ्याच्या पाया पडणं, हे मला अत्यंत बुरसटलेल्या विचारांचं लक्षण वाटलं. एकदम प्रतिगामी. >+१ .

संगम काय आणि तसलेच लव्ह टृअँगलवाले चित्रपट काय.धडधडीतपणे "हा याच्या प्रेमात पडलाय" असं सांगायला का जाम्त नाही कुणास ठाऊक, भरीसभर जाड जाड उर्दू शब्दाम्ची गाणी मात्र पार्टीमद्ये म्हणून दाखवती.

तसाच यशराज्चा अजून एक ट्रेंड असतो. एक मुलगा आनि एक मुलगी "फ्रेण्ड्स" आहेत, पण मुलीचं मुलावर असलेलं प्रेम त्याला माहित नाही. माझा एक मित्र म्हणायचा "अरे चोरून करायचं तर ****** करा, प्रेमं काय चोरून करताय!!"

हम दिल दे चुके सनम, वोह सात दिन हे दोन्ही शिणेमे गिरीश कर्नाड, शबानाच्या स्वामी वर बेतलेले आहेत. स्वामी चे दिग्दर्शक बासुदा किंवा हृषिदांपैकी कुणी तरी आहे. हा सिनेमा ७० च्या दशकात आलेला असावा, त्या काळच्या वातावरणात तसा बोल्डच.

देवदास (ऐश्वर्या रायचा) शेवट पटला नाही. दिलीपकुमारच्या देवदासच्या ज्याने चिंधड्या उडवल्या तो शारुक मरत असताना एव्हढं धावत जायला तो काय याकूब होता का ? नंतर दिसलंच अस्सतं ना केबलवर सगळं..

अभिताभला जयाकडे आणि रेखाला संजीवकुमारकडे जाताना बघून किती दुःख होतं. >>> Sad Uhoh Happy Proud Biggrin

आपापल्या बायकांकडेच (पडद्यावरच्या) चाललेत म्हटल्यावर विबासंदेवी पावली गं म्हणत उदबत्यांनी स्क्रीनला ओवाळायचं सोडून दु:खं कसलं झालंय Proud Rofl

'रंगीला' टोटल गंडलेला शेवट, खर्‍या जगात अशी कोणतीही हिरॉईन टपोरी हिरोकडे परतणार नाही. या शेवटावरुन रामू आणि आमिरचे बिनसले आणि त्यांनी परत एकत्र काम केले नाही असे वाचल्याचे स्मरते.

ती कुठे गेलेली असते? तिच्या मते ती तिथेच असते. हिरोच्या मते ती गेलेली असते. त्याला असे वाटल्याचे तिला आश्चर्य वाटते. (मला आता निटसे आठवत नाहीय )

नवर्याच्या पाया पडणे आँधीमध्ये १००% खटकते, कारण बायको बोल्ड, स्वतंत्र विचारांची आहे आणि ती परत 'उंबरठ्याबाहेर' चालली आहे. पण इजाजतमधली रेखा घरगुती, त्यागमूर्ती आहे. ती नवर्याला सोडून जाते ती रागाने नाही, तर ' मी उगाच तुम्हा दोघांमधे आले' असे म्हणून! ती चालली आहे ती दुसर्या नवर्याकडेच. तिच्या व्यक्तिमत्वाला ते अशोभनीय मला तरी वाटले नाही

राज कपूर आणि वैजयंतीमालाच्या नजराना चित्रपटाचाही येथे उल्लेख करायला लागेल. यात या दोघांचं प्रेम असतं पण तिच्या मोठया बहिणीचेही राज कपूरवर प्रेम असल्याने वैजयंतीमाला त्याच्यापासून दूर होते. राज कपूर आणि तिच्या मोठया बहिणीचं लग्न होतं. त्यांना एक मूलही होतं. वैजयंतीमाला दुसर्‍या शहरात नोकरी करायला लागते, तिथे तिचा बॉस तिच्या प्रेमात पडतो, तिला मागणी घालतो, अनेक आढेवेढे घेऊन शेवटी ती तयार होते. इकडे तिची मोठी बहीण आजारपणात मरते. तिला यांचे आधीचे प्रेमप्रकरण कळलेलं असतं, ती मरण्याच्या आधी राज कपूरला वैजयंतीमालाशी लग्न करून सुखी होण्याची विनंती करते. तोही आशेने मुलाला घेऊन वैजयंतीमालाला भेटायला येतो. इथे आपली अपेक्षा की त्यांची भेट होईल, लग्न होईल वगैरे. पण तो पोचतो तेव्हा नेमकं वैजयंतीमालाचं नुकतच लग्न झालं असतं. आता राज कपूरने मुकाटयाने तिथून निघून जावे तर ते नाही, तो तिला लग्नाबद्दल एक नजराना अर्पण करतो. तो नजराना म्हणजे त्याचं मूल! तो आपलं मूल तिच्या दारात सोडून त्याबद्दल काही फिकीरही न करता निघून जातो. आणि बिचारी नवपरिणीत वैजयंतीमाला आणि तिचा नवरा 'आता काय करावं' अशा हताश चेहर्‍याने एकमेकांकडे पाहातात!

शोले - अमिताभला मारण्याऐवजी ठाकूरला मेलेले दाखवायला हवे होते. बिचार्‍या त्या रामलालने तरी सुटकेचा निश्वास टाकला असता. शिवाय जयाच्या मांग मध्ये सिंदूर की काय ते आले असते.

पीके - आमीर ला पान खाण्याची एवढी सवय लागलेली असते पण तो नुसत्या कॅसेट घेऊन जात असतो. त्याने परतताना निदान गेला बाजार एक मिनी पानाची गादी किंवा एखादा पानवाला सोबत न्यायला हवा होता.

हम दिल दे चुके सनम चा शेवट बरोबर आहे माझ्यामते...शेवटच्या अर्ध्या तासात ऐश्वर्या हळूहळू अजय देवगन च्या प्रेमात पडताना दाखवली आहे....शेवटी तो तिला सोडून जातो तेव्हाच तिला ते पूर्ण कळते... कदाचित त्याच्याशी लग्न झाल्याने थोडा influence झाला असेलही..जर दोघेही तिचे boyfrinds असते तर तिने सलमान ला निवडणे योग्य झाले असते..

हा हा हा <<तर तिने सलमान ला निवडणे योग्य झाले असते..>>> तिला सलमानच हवा होता पण दिग्दर्शक प्रेक्षकांची पिळवणुक थोडी सोडणारे अन त्यात पप्पांचा शब्द वैगेरे आपल्या इथली संस्क्रुती (टायपो माफी ) मला हे एक कळत नाही चांगला नवरा पाहिजे अन झक्कास प्रियकर पायजे असल्या टुकार ष्टोर्‍या फुल्ल पैसा वसुल कश्या होतात चित्रपटात . तीघांचा पण सुखाचा कायमचा अंत Happy

<<<<< तसाच यशराज्चा अजून एक ट्रेंड असतो. एक मुलगा आनि एक मुलगी "फ्रेण्ड्स" आहेत, पण मुलीचं मुलावर असलेलं प्रेम त्याला माहित नाही. माझा एक मित्र म्हणायचा "अरे चोरून करायचं तर ****** करा, प्रेमं काय चोरून करताय!!">>>> + अनंत Happy

<<<< काही फिकीरही न करता निघून जातो. आणि बिचारी नवपरिणीत वैजयंतीमाला आणि तिचा नवरा 'आता काय करावं' अशा हताश चेहर्‍याने एकमेकांकडे पाहातात!>>> ह्या वाक्यान मला लोटपोट होउन हसाव कि रडाव आस होतय , र च्या क ने हा धागा फुल्ल विनोदी झालाय Happy

अजून एक न पटलेला शेवट चांदनीचा. तिने विनोधशीच लग्न करायला हवं होतं असं मला वाटतं. ऋषीचं इतकंच प्रेम असतं तर तिला विश्वासात घेऊन का नाही सांगत की बाई मी बरा होईपर्यंत थांब. त्याला हवं तेव्हा तो दूर लोटणार, हवं तेव्हा परत येणार आणि तरीही हिने त्याला अ‍ॅक्सेप्ट करायचं. कशाला?

इजाजत चा शेवटी तिने पाया पडण्याचा सीन मलाही पटला नाही कारण पुर्ण चित्रपट रेखाने आपल्या कुशल अभिनयाने आणि डॉयलॉग्सने डॉमिनेट केलाय.. नासिर ने कन्फ्युज नवर्‍याची भुमिका उत्तम केली असली तरी इजाजत पुर्ण रेखाचाच (आणि उत्तम गाण्याचा) होता.

कदाचित त्याच्याशी लग्न झाल्याने थोडा influence झाला असेलही..
>>>>>

हाच तर चुकीचा ट्रेंड सेट होतो मग समाजात !

असे पिक्चर बघून मग एखाद्या प्रेमप्रकरणात त्यांचे घरचे विचार करतात की लग्न झाले की नवरा-बायको एकत्र येतील आणि जुने प्रेम विसरतील... अरे विसरायला काय ती लफडी असतात का? किमान मग आधी गहरे प्रेम नाही दाखवायचे होते, किंवा त्यात सलमान लबाड वृत्तीचा दाखवायचा होता.

आठवा तो सीन ज्यात ऐश्वर्या तिच्या आईला किंचाळून सांगते, उसने मुझे यहा छुआ है मां.. ऊसने मेरे रूह को छुआ, मेरी आत्मा को छुआ है.. वगैरे वगैरे..

बाकी काही नाही, अश्याने प्रेम हे कितीही पाक, पवित्र, अन अथांग असले तरी ते शाश्वत नसते असा समज होऊन लोकांचा खर्‍या प्रेमावरचा विश्वास उडतो ! .. आणि हे असे होऊ देणे हा माझ्यामते मानवता द्रोह आहे

हम दिल दे चुके मधे अ‍ॅश दिसली कितिही छान असली तरी तीला अ‍ॅक्टिन्ग अजिबात जमलेली नाही, एकतर काही ठिकाणि ती फार कर्कश वाटते, हसताना जाम नाटकी वाटते... सलमान सगळ्यात जेन्युइन वाटलेला (मे बी त्याच तिच्यावर रिअल लाइफमधल प्रेम पण रेफ्लेक्ट झाल असेल)

ऋन्मेष ची पोस्ट आवडली,

हम दिल दे चुके मधे अ‍ॅश दिसली कितिही छान असली तरी तीला अ‍ॅक्टिन्ग अजिबात जमलेली नाही, एकतर काही ठिकाणि ती फार कर्कश वाटते, हसताना जाम नाटकी वाटते... सलमान सगळ्यात जेन्युइन वाटलेला (मे बी त्याच तिच्यावर रिअल लाइफमधल प्रेम पण रेफ्लेक्ट झाल असेल)

सहमत. Happy दिसण्यात मात्र जबरी दिसलीय. मला दोन सिन्समध्ये तर खुप आवडली. एक ते आंखोंकी गुस्ताखिया. आणि दुसरा आजीबरोबरचा ह्या दोघांचा सिन, ज्यात आजी ह्यांना पकडते.

शेवटच्या सिनमध्ये सलमानने त्याच्या कुवतीच्या मानाने कमाल केलीय.

ऋण्मेष सहमत. रुह को छुवा हुवा प्यार.. Happy

Pages