चित्रपटांचे न पटलेले शेवट

Submitted by चीकू on 4 August, 2015 - 14:12

बर्‍याचदा आपण चित्रपट बघायला घेतो, त्यात रंगत जातो, कथानक, अभिनय सगळ्याचीच छान गुंफण असते आणि अचानक अनपेक्षित, एकूण आत्तापर्यंतच्या सर्व कथानकाला अजिबात न्याय न देणारा असा शेवट होतो (काहीसा anti-climax म्हणता येईल असा). म्हणजे एकूण चित्रपट ज्याप्रकारे build होत असतो त्यात अशा शेवटाने एकदम तडा जातो. तर असे कुठले चित्रपट तुम्हाला आठवतात? अर्थात उगीचच अचाट आणि अतर्क्य करामतीचे सीन्स असणारे शेवट यात धरत नाही. तर ज्या शेवटामुळे चित्रपटाच्या कथाबीजाला न्याय मिळाला नाही असं वाटून राहातं, असे चित्रपट इथे अपेक्षित आहेत. इन्ग्रजी/हिंदी/मराठी कुठलेही चालतील.

मला ज्यांचा शेवट पटला नाही असे काही चित्रपट. अर्थात चित्रपटांचा शेवट खाली सांगितलेला असल्याने ज्यांना हे चित्रपट बघायचे आहेत त्यांनी वाचू नये Happy

जगाच्या पाठीवरः राजा परांजपे, सीमा यांचा अभिनय आणि सुमधुर संगीतासाठी हा प्रसिध्द चित्रपट. सर्व काही सुरळित चालले असताना अचानक कुठल्याही कारणाशिवाय अंध सीमाचे डोळे परत येतात, आणि शेवट शोकदायकच करायचा असं ठरवलं असल्याने की काय राजा परांजपेंचे डोळे जातात! तोपर्यंत सुरेख चाललेल्या चित्रपटाला शेवट खरंच मातीत घालतो Sad

एक दुजे के लिये: इथे परत उगीचच शोकात्म शेवट केला आहे ओढूनताणून असं वाटतं. कयामत से कयामत तक सारख्या चित्रपटात तो शेवट कथेत व्यवस्थित बसत होता पण एक दुजे के लिये मधे शोकांत केल्यानेच प्रेमाची महती पटेल असे वाटले की काय कोण जाणे!

हैदराबाद ब्लूजः हलकाफुलका चांगला चित्रपट आहे पण शेवटी लग्नाच्या मंडपात मनपरिवर्तन, अदलाबदल आणि जो काय घोळ घातला आहे त्यामुळे चित्रपटाच्या वास्तवतेला खूपच धक्का पोचतो.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल तो पागल है .....
खर तर माधुरीसाठी अक्षयकुमार आणि शाहरुख़ साठी करिश्मा परफेक्ट असतात

ज्यात ती शेवटी चंकी पांडेला नाही म्हणुन ऋषीबरोबर संसार पुढे चालु ठेवते. <<<
चंकी पांडेला नाही म्हणून ऋषीबरोबर जाण्यात न पटण्यासारखे काय आहे? Proud

हा हा हो आशू.. अनिल कपूरला सोडणे हे कधीही चूकच Happy

धडकन म्हणजे अजिबात अभिनय न येणारे तीन लोक (दोन शेट्टी आणि एक अक्षय कुमार) आणि खूपसा अंधार ज्यात शिशे पांढर्‍या कपड्यात तोच का?

ज्यात ती शेवटी चंकी पांडेला नाही म्हणुन ऋषीबरोबर संसार पुढे चालु ठेवते. <<<
चंकी पांडेला नाही म्हणून ऋषीबरोबर जाण्यात न पटण्यासारखे काय आहे?

अगदी खर
चंकी पांडे आणि ऋषि कपूर असे दोन ऑप्शन्स समोर असतील तर कुणीही ऋषीचीच निवड करणार Wink

तालमधे ती अक्षयला सोडते की अनिल कपूरला? लक्षात नाहीये माझ्या.

आधी अक्षयला सोडते मग अनिल कपूरशी तीच लग्न होणार असत पण लग्न लागण्याच्या अगदी १० मिनिट आधी अनिल कपूरला सोडून अक्षयकडे परत जाते

इजाजतमधले पाया पडणे हे फारच सॉरी होते.
म्हणजे पूर्ण सिनेमाभर जे एक मस्त मॅच्युअर आणि काहीसे आव्हां गार्द वातावरण होते त्याचा पार पचका केला तिथे.
त्यापेक्षा तिने त्याला एक फ्रेंडली मिठी मारली असती तर परवडले असते.
अर्थात साधारण २८ वर्षांपूर्वीचा काळ त्यामुळे... (८७ ला आला होता ना इजाजत?)

खरंतर तालमध्ये अक्षय खन्नाकडचं छोटंसं कुत्रं किती गोड दिसतं त्या ऐश्वर्यापेक्षा!
हो नीरजा. त्यापेक्षा भोक पडलेली चप्पल आपल्या भावी सासर्याला टीपॉय वर पाय ठेवून दाखवणारा अतीमूर्ख जावई ही ओळख लक्षात आहे माझ्या धडकनची. तेव्हा किरण कुमार अगदी करेक्ट बोलतो, अब मुझे यकीन हो गया की मैने बिलकुल सही फैसला किया है Proud

आशूडी तुम्ही काय पर्फेक्ट पिक्चर उचलला आहे....ताल..!!
या चित्रपटाचा शेवटचा अर्धा तास अत्यंत बंडल आहे...आणि ती मान्सी बया त्या चम्या मानव कडे जाते...अनील कपूर इतका आवडला होता मला त्या पिक्चर मधे...शेवट च्या अर्ध्या तासात घईंना काही तरी पाट्या टाकाव्याश्या वाटल्या बहुदा !!

म्हणजे पूर्ण सिनेमाभर जे एक मस्त मॅच्युअर आणि काहीसे आव्हां गार्द वातावरण होते त्याचा पार पचका केला तिथे

अगदी अगदी.. मला हे म्हणायचे होते पण असे मांडता येत नव्हते म्हणुन सोडुन दिले.

ताल तर पुर्णपणे गंडलेला पिक्चर आहे. त्यात मुळात प्रेम जमलेले दाखवलेच नाही निटपणे आणि मग ह्या नीटपणे न जमलेल्या प्रेमात मुलीचे बाबा मुलीला घेऊन मुलाच्या घरी जातात, हिला स्विकारा म्हणुन. तिला धक्के देऊन बाहेर घालवणे हे कोणीही केले असते तरी ते पटले असते पण ते अगदी हातोडा मारुन पटावे म्हणुन ते लोक श्रीमंत आणि म्हणुन माजोरी दाखवलेत. काय च्या काय पणाची हद्द आहे हा सिनेमा.

बाकी चित्रपटात श्रीमंत सासरा कधीकधी दयाळू दाखवतात पण श्रीमंत सासु मात्र माजोरी दाखवली पाहिजेच.

हो ना, विवाह पाहिल्यावर तर मलईपेढा साखरेच्या पाकात बुडवून जिलबीच्या तुकड्यावर ठेवून श्रीखंडात बुडवून खाल्ल्यासारखं फीलींग येतं.

हो ना, विवाह पाहिल्यावर तर मलईपेढा साखरेच्या पाकात बुडवून जिलबीच्या तुकड्यावर ठेवून श्रीखंडात बुडवून खाल्ल्यासारखं फीलींग येतं.>>>>>>:हहगलो: Rofl

सर्व चर्चा लवस्टोरीवरच चालू आहेत,
लोकांना कोणती हिरोईन कोणत्या हिरोली मिळाली पाहिजे या भानगडीत जास्त लक्ष दिसतेय.

आयला ईथे कॉलेजच्या कित्येक पोरींना मी शोभलो असतो पण त्यांनी दुसरा शोधला, मी रडतोय का...

सर्व चर्चा लवस्टोरीवरच चालू आहेत,
लोकांना कोणती हिरोईन कोणत्या हिरोली मिळाली पाहिजे या भानगडीत जास्त लक्ष दिसतेय.

आयला ईथे कॉलेजच्या कित्येक पोरींना मी शोभलो असतो पण त्यांनी दुसरा शोधला, मी रडतोय का...

तू त्यांना शोभतोस अस तुला वाटत पण त्या मुलींना तस वाटल पाहिजे ना

मला बदलापूर चा शेवट पटला नाही... असा काय नवाजुद्दीन सिद्द्कीला साक्षात्कार होतो की तो उगाच ब्लेम स्वतःवर घेतो ? अशी माणसं कधीच बदलत नसतात असं वाटतं मला... त्याने हुमा कुरेशी आणि आईसाठी पैशाच्या बदल्यात वरुण धवन शी सौदा केला असतं तर थोडं पटलं असतं..

च, तो त्याच्या कॉलेजलाईफ चित्रपटाचा न पटलेला शेवट आहे. Proud
अजून एक न पटलेला शेवट म्हणजे गुपचूप गुपचूप मध्ये रंजना अशोक सराफच्या साधेपणाचा गैरफायदा घेते ( मिस्टर धोंड) आणि कुलदीप पवारशी लग्न करते. रंजना अशोक ही जोडी कधीच तुटू नये असं वाटायचं. Sad
आणखी एक म्हणजे शोले मध्ये अमिताभ ला काय मारलं राव! त्यापेक्षा ठाकूर मेला असता तर जय जयाचा संसार तरी सुरू झाला असता.

तू त्यांना शोभतोस अस तुला वाटत पण त्या मुलींना तस वाटल पाहिजे ना
>>>>
एक्झॅक्टली, यातच सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर दडलेय असे नाही का वाटत Happy

तू त्यांना शोभतोस अस तुला वाटत पण त्या मुलींना तस वाटल पाहिजे ना
>>>>
एक्झॅक्टली, यातच सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर दडलेय असे नाही का वाटत

तुला नक्की काय म्हणायचय ????? Uhoh

दिल चाहता है आणि थ्री ईडियटसमध्ये सुद्धा शेवटी फोकस लव्हस्टोरीवरच न्यावासा वाटला ..
तसा तो फारसा गेला नाही हे सुद्धा खरेय..
पीके मध्ये गेला ईतकेच ..

म्हणून मला आमीरखानचे गुलाम, सरफरोश हे चित्रपट आवडतात ..

मला 'घनचक्कर'चा शेवट आवडला नाही. Sad
इम्रान हाश्मीला ती बॅग मिळायला हवी होती. त्याचे मित्र जिवंत राहायला हवे होते.
थोडक्यात सुखांत हवा होता.

'कहानी' मध्ये विद्या बालन आणि सत्योकीची लव्हस्टोरी बघायची इच्छा होती.
कदाचित मला सत्योकी खुप आवडल्याने असेल.

पण एक नक्की कि या दोन्ही मुव्हीज मध्ये स्टोरीवरचा फोकस अजिबात ढळला नाही.

Pages