बर्याचदा आपण चित्रपट बघायला घेतो, त्यात रंगत जातो, कथानक, अभिनय सगळ्याचीच छान गुंफण असते आणि अचानक अनपेक्षित, एकूण आत्तापर्यंतच्या सर्व कथानकाला अजिबात न्याय न देणारा असा शेवट होतो (काहीसा anti-climax म्हणता येईल असा). म्हणजे एकूण चित्रपट ज्याप्रकारे build होत असतो त्यात अशा शेवटाने एकदम तडा जातो. तर असे कुठले चित्रपट तुम्हाला आठवतात? अर्थात उगीचच अचाट आणि अतर्क्य करामतीचे सीन्स असणारे शेवट यात धरत नाही. तर ज्या शेवटामुळे चित्रपटाच्या कथाबीजाला न्याय मिळाला नाही असं वाटून राहातं, असे चित्रपट इथे अपेक्षित आहेत. इन्ग्रजी/हिंदी/मराठी कुठलेही चालतील.
मला ज्यांचा शेवट पटला नाही असे काही चित्रपट. अर्थात चित्रपटांचा शेवट खाली सांगितलेला असल्याने ज्यांना हे चित्रपट बघायचे आहेत त्यांनी वाचू नये
जगाच्या पाठीवरः राजा परांजपे, सीमा यांचा अभिनय आणि सुमधुर संगीतासाठी हा प्रसिध्द चित्रपट. सर्व काही सुरळित चालले असताना अचानक कुठल्याही कारणाशिवाय अंध सीमाचे डोळे परत येतात, आणि शेवट शोकदायकच करायचा असं ठरवलं असल्याने की काय राजा परांजपेंचे डोळे जातात! तोपर्यंत सुरेख चाललेल्या चित्रपटाला शेवट खरंच मातीत घालतो
एक दुजे के लिये: इथे परत उगीचच शोकात्म शेवट केला आहे ओढूनताणून असं वाटतं. कयामत से कयामत तक सारख्या चित्रपटात तो शेवट कथेत व्यवस्थित बसत होता पण एक दुजे के लिये मधे शोकांत केल्यानेच प्रेमाची महती पटेल असे वाटले की काय कोण जाणे!
हैदराबाद ब्लूजः हलकाफुलका चांगला चित्रपट आहे पण शेवटी लग्नाच्या मंडपात मनपरिवर्तन, अदलाबदल आणि जो काय घोळ घातला आहे त्यामुळे चित्रपटाच्या वास्तवतेला खूपच धक्का पोचतो.
" म्हणूनच शाहरूखने चूक सुधारत
" म्हणूनच शाहरूखने चूक सुधारत आपल्या डॉनमध्ये शेवट बदलला वाटते">> ऋन्मेऽऽष, मोदक घे ह्या वाक्यासाठी...:)
" म्हणूनच शाहरूखने चूक सुधारत
" म्हणूनच शाहरूखने चूक सुधारत आपल्या डॉनमध्ये शेवट बदलला वाटते
मुळात असला कॉपी करण्याचा आचरटपणा करून >>>>> तो फरहान अख्तरने केला
>>> हे बरय ! फरहान ने शाहरुखला शेवट लिहायला दिला होता की काय?
इंग्रिड बर्गमनच्या
इंग्रिड बर्गमनच्या 'अनास्तासिया'चा शेवटही अनाकलनीय होता. त्यात ती युल ब्रायनरबरोबर निघून जाते असे सूचित करण्यात आले आहे. पण संपूर्ण चित्रपटात त्या दोघांचा एकही प्रेमसंवाद किंवा दोघांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर असं आढळत नाही. आणि अनास्तासिया निघून गेल्यावर ती डचेस काही झालंच नाही अशा आविर्भावात लोकांना सामोरी जाते तेही खटकलं. चित्रपट आणि बर्गमनचा अभिनय उच्च आहे पण शेवट जरा जास्त चांगला करायला हवा होता असं वाटून राहातं.
नाही मूळच्या डॉन चा शेवट
नाही मूळच्या डॉन चा शेवट चुकीचा नव्हता - त्याचे चित्रीकरण पाचकळ होते. फरहान ने बदलले ते इंटरेस्टिंग होते, पण derivative होते - म्हणजे लोकांच्या डोक्यात मूळ डॉन बसल्यावर त्यानंतर असे दाखवणे इफेक्टिव्ह होते.
बाकी मुळात शाखाला नाही त्या उद्योगांत ओढल्याबद्दल फरहान ची चूक आहेच. हा सीन पाहा, आणि पुलंच्या रावसाहेबांसारखे शाखा ला सांगा - इतक्या क्लासीपणे एक संवाद म्हणून पाहा, मूळ्व्याध होते की नाही बघा
https://www.youtube.com/watch?v=E8mH94G2c4k
नवीन डॉन "फरहान" ने समर्थपणे
नवीन डॉन "फरहान" ने समर्थपणे पेलला होता, शाखा सुसह्य वाटण्याइतपत. डॉन २ मात्र ब्येक्कार झाला होता.
कुछ कुछ होता है चा शेवट खटकला
कुछ कुछ होता है चा शेवट खटकला होता.. SRK आपल्या जुन्या मैत्रीणीला बघून लगेच प्रेमात पडतो...वाट लावलीये best friends च्या नात्याची..
आणी मैने प्यार किया मधे सुरूवातच खटकली..आधी मैत्री दाखवून नंतर प्रेमात पडले आणी मैत्रीच्या नात्याचा ढाल म्हणून वापर केला..
म्हणजे दोन्ही सेमच झाले की!
म्हणजे दोन्ही सेमच झाले की!
कुकुहोहै खटकायचं मेन कारण हे होतं की ती जेव्हा टॉमबॉइश असते तेव्हाही तेवढीच क्यूट असते. पण ती पारदर्शक साड्या, लांब केस, भरतनाट्यम इ.इ. पद्धतीने 'पारंपारिक' झाल्यावर मग याला प्रेमाचा साक्षात्कार होतो.
र्म्द, प्रेमाचा साक्षात्कार
र्म्द, प्रेमाचा साक्षात्कार त्याला एका विशिष्ठ घटतेने त्या क्षणीच होतो
मंदार. परफेक्ट!!!!! त्या
मंदार. परफेक्ट!!!!! त्या चित्रपटाचा नंतर रागच आला होता.
मंदार. परफेक्ट!!!!! >>
मंदार. परफेक्ट!!!!! >> +१
त्या चित्रपटाचा नंतर रागच आला होता.>> +१००
मैंने प्यार किया आवडला होता.
मैंने प्यार किया आवडला होता. मैत्री आधी झाली त्याला ते दोघे काय करणार बिचारे ! प्रेमात पडल्यावर पहिल्या फटक्यात भावनांची खात्री नसेल तर काय सांगणार ती बिचारी, बारावी पास अठरा वर्षाची तर असते. गिव्ह हर अ ब्रेक! जाने तू जाने ना बद्दल तर मग फार तीव्र भावना आहेत का इथे ह्या धाग्यावर ?
म्हणजे हिरवीणीने काय फक्त पहली नजर मे घडला प्यार तरच प्यार करावा का? जुन्या आणि काही नवीन मुली तसे अजूनही करत असतील - क्या है भरोसा आशिक दिल का और किसी पे ये आजाए, आगया तो बहुत पछ्ताएगी तू असल्या भीतीपायी. बँड बाजा मध्ये तर आधी बिन्नेस, मग मैत्री, मग 'कांड' (मैंने कौनसा अनुष्का के साथ बिन्नेस करना है, मैं तो कांड कह ही सकती हू!) मग प्रेम असला प्रवास. "शुद्ध देसी रोमांस" तर मग बघूच नका.
एकूणात काय माझ्या मते फॉर मॉडर्न विमेन - जैसे भी प्यार हो जाय, साथी मिल जाय, सब जायज है.
दिल चाहता है चा शेवट अजिबात
दिल चाहता है चा शेवट अजिबात पटला नव्हता.
बाकी सिनेमाच्या तुलनेत प्रिती झिंटाच्या लग्नात जाऊन आमीर खानने तमाशा करणं हा प्रकार टोटल भंपक वाटला होता. हेच थोड्या वेगळ्या प्रकारेही दाखवता आलं असतं.
@ कुछ कुछ, प्रचंड असहमत
@ कुछ कुछ, प्रचंड असहमत
पहिले म्हणजे मंदार यांनी दाखवलेल्या सीनमध्ये जेव्हा काजोलचा पदर उडतो तेव्हा शाहरूखच्या चेहर्यावर पुरुषी स्वभावाला अनुसरून भाव येण्याबरोबरच त्याच वेळी एक संकोचही येतो.
जर अशी एखादी घटना प्रत्यक्ष आयुष्यात कुठल्या मित्रमैत्रीणींमध्ये घडली तर मुलगा लागलीच विषय बदलून पुढे जातो आणि मुलीला संकोचू देत नाही.
पण या द्रुश्यात काजोलच्या चेहर्यावरचे भाव बघा. तीच संकोचलेल्या शाहरूखकडे कशी बघते ते पाहा. अर्थात यात तिचाही दोष नाही कारण ती आधीच त्याच्या प्रेमात असते. बास्केटबॉल खेळतानाचेही आठवा, शाहरूख हा मित्रासारखाच खेळत असतो पण काजोल मात्र संकोचून खेळत असते.
असो, तर काजोलच्या तश्या बघण्याने होते काय, हा किस्सा तिथेच न संपता शाहरूखलाही आणखी अवघडल्यासारखे होते आणि आपल्या आत देखील तिच्याबद्दल काही भावना आहेत हे जाणवते. हे जाणवण्याची वेळ भिन्नलिंगी आकर्षणाचा एक क्षण असेल तर त्यात चुकले काय? आजकाल तर समलिंगीचेही समर्थन होतेय. मग भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होणे तर नक्कीच नैसर्गिक आहे. जर ती निव्वळ वासनाच असती तर मित्र म्हणून शाहरूख नंतर तिच्या नजरेला नजरही देऊ शकला नसता. पण तसे नसते, तर त्याला जाणवते की हे काहीतरी वेगळे आहे. आणि मग अर्थातच पुढे जाऊन समजते की हे प्रेम आहे.
आता राहिला प्रश्न दोस्तीचे नाते प्रेमात बदलणे. तर एखाद्याचे प्रत्येक दोस्तीचे नाते प्रेमात बदलले तर त्याच्या नियत वा कॅरेक्टरवर संशय घ्या. पण एखादी घनिष्ट मैत्री पुढे प्रेमात रुपांतर होणे काय चूक आहे? वर माऊ यांनी best friends च्या नात्याची वाट लावली हे असे लिहिले आहे की जसे प्रेम म्हणजे काहीतरी घाणेरडा प्रकारच आहे जो मैत्रीत करू नये. पुढे जाऊन दोघे व्यवस्थित लग्नही करतात. अर्थात लग्न म्हणजेच प्रेम खरे असल्यावर शिक्कामोर्तब असे नाही पण तरीही.. करतात ना.
असो, बाकी मला तो सीनही कुठूनही अश्लील वाटत नाही. एखाद्याने काही आगापिछा माहीत नसताना फक्त तोच सीन बघितला तर तसे वाटू शकते, पण पुर्ण चित्रपट ज्याने समरसून पाहिलेय त्याला नाही वाटणार. हा एक आणि तो कभी खुशी कभी गम एक, हे दोन्ही चित्रपट मी नेहमीच फॅमिली बरोबर एंजॉय करतो.
अवांतर - त्या द्रुश्यात अभिनय मात्र दोघांनीही कमालीचा केला आहे. तसेच या धाग्यावर जाऊन पहिल्याच पोस्टमध्ये याच चित्रपटातील एक द्रुश्य बघा. यात तर त्यांनी अॅक्टींग चक्क तोडलीय.
तळटीप - मी ही एवढी भलीमोठी पोस्ट शाहरूखचा फ्यॅन म्हणून नाही तर ‘दोस्तीतून प्रेम’ क्लबचा मेंबर म्हणून लिहिलीय. माझा या प्रोसेसवर पुर्ण विश्वास आहे.
मैत्रीतून प्रेम यासाठी रितेश
मैत्रीतून प्रेम यासाठी रितेश देशमुखचा "तुझे मेरी कसम" हा चित्रपट सुद्धा नक्की बघा.
"अरे देवा, मैत्रीत प्रेम कसे करून बसलो आपण..." अश्याच काही विचारांमुळे अपराधीपणाची भावना मनात घेऊन तो आपले प्रेम गमावायला जात होता.
ऋन्मेऽऽष, पण एखादी घनिष्ट
ऋन्मेऽऽष,
पण एखादी घनिष्ट मैत्री पुढे प्रेमात रुपांतर होणे काय चूक आहे?>> काहीच नाही..पण शाहरुख खान चे काजोल वरचे प्रेम फार अचानक बसले आहे..३ दिवसात मैत्रीचे प्रेमात रुपांतर होणे आणी ५ दिवसात लग्नाच्या मंडपातून काजोलला almost पळवून नेणे पटले नाही..
बाकी मी पण मेजर शाखा फ्यॅन आहे..
पण शाहरुख खान चे काजोल वरचे
पण शाहरुख खान चे काजोल वरचे प्रेम फार अचानक बसले आहे..
>>>
कदाचित जाणीव अचानक झाली असेल..
कित्येक अॅक्शन सिनेमांत तर प्रेमप्रकरणावर टाईमपास नको म्हणून लव अॅट फर्स्ट साईट दाखवले जाते त्याला काय म्हणाल.. ते असो, त्या चित्रपटांचा प्रेम हा विषय नसल्याने त्यांना माफ करू.. पण जेव्हा आधी घनिष्ट मैत्री असते तेव्हा प्रेम अचानकच होते, किंबहुना ते झालेले असते, पण कधीतरी अचानक त्याची जाणीव होते ईतकेच..
ती जाणीव होण्यासाठी ते काजोलचे पदर उडणे वगैरे दाखवत स्त्रीसुलभ आणि पुरुषसुलभ भावना निर्माण होतील अशी सिच्युएशन पिक्चरमध्ये निर्माण केली आहे, ज्यात मला तरी खटकण्यासारखे काही वाटले नाही..
त्यात काजोल आधी टॉमबॉईश दाखवल्याने मग या द्रुष्याचा अर्थ लोकांना वरच्यासारखा लागू शकतो, पण माझ्या स्वताच्या अनुभवावरून सांगतो,
आपली एखादी मैत्रीण आपल्याला एवढी क्लोज असते, ईतके कम्फर्टेबल असतो आपण तिच्याशी, की आपण एक मुलगा आहोत आणि ती एक मुलगी आहे हे आपण त्या नात्यात विसरून गेलेलो असतो. पण कधीतरी अचानक तशी नजर जाते, वा कोणीतरी सहज चिडवते आणि जाणीव करून देते, वा कधी तिला नेहमीपेक्षा वेगळ्या पेहरावात वा नेहमीपेक्षा वेगळ्या ओकेजनला, म्हणजे कॉलेजातला सारी डे वगैरे ला बघतो, आणि अचानक मनात कुछ कुछ होते...
हे नक्कीच लव्ह अॅट फर्स्ट साईट नसते, यामागे घनिष्ट मैत्रीच असते, तीच त्यावेळीही आपल्याला तिच्याकडे आकर्षित करत असते. अन्यथा येताजाता बस, ट्रेन, रस्त्याने, वा कॉलेजातल्याच ईतर आसपासच्या, ईतक्या सुंदर मुली दिसत असतात, कित्येक रोज वा वरचेवर दिसत असतात, पण ऊठसूठ कोणी त्यांच्या प्रेमात नाही पडत.. फक्त मान वळवून बघितले जाते ईतकेच
नंदिनी, मला उलट डॉन-२ आवड्ला.
नंदिनी, मला उलट डॉन-२ आवड्ला. पहिल्या चित्रपटाप्रमाणे अमिताभचे बॅगेज नव्हते त्याच्यावर.
डॉन-२ आवड्ला >> फा खरंय.
डॉन-२ आवड्ला >> फा खरंय. मला तो आवडला. मस्त होती स्टोरी वगैरे. आणि शारूख पुर्णपणे त्या डॉन च्या कॅरॅक्टर मध्ये घुसलेला वाटला. एक निर्दयी, खुनशी डॉन !!
>> मला उलट डॉन-२ आवड्ला.
>> मला उलट डॉन-२ आवड्ला. पहिल्या चित्रपटाप्रमाणे अमिताभचे बॅगेज नव्हते त्याच्यावर

बरोबर. बाकी बर्याच मिशन इम्पॉसिबल्सचे वगैरे होते, पण ते असायचेच.
अमिताभच्या डायलॉग्जची वाट लावण्याचं होतं तितकं दु:ख बाकी काही बघून होत नाही.
स्वाती + १ डॉन २ ला बच्चन
स्वाती + १
डॉन २ ला बच्चन बॅग्राउंड नसल्याने आवडला, शाहरुख्चा गेटप अॅटिट्युड मस्तं जमला होता त्यात :).
पहिला डॉन मात्रं नाहीच बघवला
त्या वरच्या क्लिप मधे बच्चन
त्या वरच्या क्लिप मधे बच्चन चा एक सीन जबरी आहे - ते दोघे पिस्तुल काढतात तेव्हा. ७० च्या दशकातील इतर पिक्चर्स मधले नव्या लाटेत कानावर केस वाढवून अॅक्शन रोल करू लागलेले इतर हीरो अशा वेळेस काय 'अॅक्शन अॅक्टिंग' करायचे ते आठवा आणि त्या तुलनेत पाहा, डॉन च्या लेव्हल ला सूट होणारी अगदी अन-अॅनिमेटेड रिअॅक्शन. सलीम जावेद च्या स्क्रिप्ट्स मधे तो वेगळ्याच पीच वर खेळत असे. बहुधा तेच दिग्दर्शन टेक ओव्हर करत असावेत.
>> सलीम जावेद च्या
>> सलीम जावेद च्या स्क्रिप्ट्स मधे तो वेगळ्याच पीच वर खेळत असे
एक्दम एकदम!
सारुकानचा सर्वात असह्य झालेला सीन म्हणजे 'मुझे उसके जूते अच्छे नहीं लगे - शूज'! अर्र अर्र!
तू परवा चॅन्डलरच्या भुवया उडवण्याची आठवण काढली होतीस. 'दीवार'मध्ये मारामारी करून आल्याबद्दल अनंत काळची माता निरुपा रॉय त्याला ओरडत असते तेव्हा 'तो क्या मैं भी भाग जाता?' इतकंच विचारतो तो शांतपणे!!
हा बाफ अमिताभच्या डायलॉग डिलीव्हरीबद्दल नाहीये. पण असू दे. एव्हरीथिंग इज फेअर इन फॅनडम.
टोटली, स्वाती अनंत काळची
टोटली, स्वाती
अनंत काळची माता >>>
फरहान अमिताभ च्या वेळी असता
फरहान अमिताभ च्या वेळी असता तर... काय खतरा कोन्बो असते ते... शारुख डॉन म्हणून फारच पाचकळ वाटलेला त्यातही डॉयलॉगला तो प्र्चन्ड मार खातो... अग्निपथ मधे रितिक सुधा तितका अपिल झाला नाही मला...हे सगळे रिमेक अभिषेक ला घेवुन काढले असते जास्त योग्य झाले असते.
वझिर येतोय. त्यात आहे
वझिर येतोय. त्यात आहे फरहान-अमिताभ काँबो.
कुछ कुछ होता है या सिनेमातले
कुछ कुछ होता है या सिनेमातले हिरो हिरविण हे अजाण अबोध पातळीवरचे निष्पाप जीव असतात. प्रेम म्हणजे वात्सल्य एव्हढंच ठाऊक असणा-या त्या गोड जिवांना शेवटच्या रीळात अॅपल खायला मिळालेलं असतं, त्यामुळे त्यांच्या निष्पाप मनात स्त्री पुरूष नात्यातील प्रेमनामक पापाचा अंकुर फुलू लागतो असं कथानक आहे. यातलं अॅपल गुंतागुंतीचं असतं. आधीचं अॅपल राणी मुखर्जीशी लग्न करायला लावतं ते बहुतेक चायनीज असतं आणि नंतरचं उशिरा डोळे उघडायला लावतं ते इंडीयन.
यातलं अॅपल गुंतागुंतीचं
यातलं अॅपल गुंतागुंतीचं असतं. आधीचं अॅपल राणी मुखर्जीशी लग्न करायला लावतं ते बहुतेक चायनीज असतं आणि नंतरचं उशिरा डोळे उघडायला लावतं ते इंडीयन. >>
हाहाहा...खडी साखर- अमेझिंग!!
आमीर खानच्या ’तलाश’चा शेवट
आमीर खानच्या ’तलाश’चा शेवट बिलकुल आवडला नाही. करीना भूत असते, ती आमीरला क्ल्यू देते, स्वत:च सूड घेते आणि नंतर आमीरला मरता मरता वाचवते. इथेच सिनेमा संपायला हवा होता. त्यानंतर शेवट म्हणून आमीरला त्याच्या मृत मुलाने लिहिलेलं पत्र मिळतं हे मुळीच पटलं नाही!! त्या पत्रातही मुलगा उपदेश करतोय त्याला- तुमची काही चूक नव्हती म्हणून! हे तर अतीच! म्हणजे प्लॅन्चेट करून आत्मे तर येतातच, वर पत्र लिहून उपदेशही देतात का?
अर्थात, भूत सूड घेऊ शकतं, पोलिसाला क्ल्यू देऊ शकतं तर मृत व्यक्ती पत्र का लिहू शकत नाही या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे!
आशिकी २ चा शेवट अजिबात आवडला
आशिकी २ चा शेवट अजिबात आवडला नाही. बिचारी श्रद्धा कपूर इतका दारुडा प्रियकर स्वीकारते. त्याचं व्यसन सोडवायला झटते. आणि हा शहाणा शेवटी 'शी इज बेटर ऑफ विदाउट मी' असा तर्क काढून मरुन जातो.आधीच मेला असता 'मै उसके प्यार के लायक नही' असा विचार करुन तर सगळ्यांचाच ताप वाचला असता.
>> ...हे सगळे रिमेक अभिषेक ला
>> ...हे सगळे रिमेक अभिषेक ला घेवुन काढले असते जास्त योग्य झाले असते.
नको नको!! नक्को प्लीज!!
Pages