गट्टे की सब्जी

Submitted by स्नू on 7 August, 2015 - 05:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गट्टे :
१. बेसन - १ वाटी
२. पाणी - ४-५ चमचे
३. ओवा - अर्धा चमचा
४. मीठ - चवीनुसार
५. तेल - ३-४ चमचे
६. लाल मिरची पाऊडर - चिमूटभर

भाजी :
१. दही - एक ते दीड वाटी फेटलेले
२. तेल- २ चमचे
३. जीरे - अर्धा चमचा
४. लसूण आले पेस्ट - १ चमचा
५. साखर - अर्धा चमचा
६. हिरवी मिरची - दोन (चिरा देवून)
७. लाल मिरची पाऊडर- १ चमचा
८. धने पाऊडर - १ चमचा
९. गरम मसाला - अर्धा चमचा
१०. मीठ - चवीनुसार
११. बारीक चिरलेली कोथिंबीर (सजावटीसाठी)

क्रमवार पाककृती: 

गट्टे :
१. गट्टे ह्या शीर्षकाखाली लिहिलेले सर्व साहित्य एकत्र करून बेसन मळून घ्यावे.
२. मळलेल्या पीठाचा एक लांब किंवा दोन छोटे रोल करावे.
३. उकळत्या पाण्यात हे रोल साधारण १५ मिनिटे शिजवावे.
४. पाण्यातून बाहेर काढून एका चाळणीत पानी निथरू द्यावे.
५. रोल थंड झाल्यावर त्याचे काप करावेत.

भाजी:
१. एका कढईत तेल गरम झाले की जीरे टाकावेत.
२. जीरे तडतडले की त्यात आले लसूण पेस्ट परतावी. लगेच थोडीशी साखर टाकावी. साखरेमुळे दह्याचा आंबटपणा कमी होण्यास मदत होते.
३. फेटलेले दही आणि बाकीचे सर्व मसाले फोडणीत घालावेत.
४. सगळे मिश्रण व्यवस्थित ढवळून त्यात साधारण अर्धी वाटी पाणी घालावे.
५. एक उकळी काढावी.
६. गट्टे ह्या भाजीत टाकून साधारण ५-७ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
७. सजावटीसाठी कोथिंबीर भुरभुरावी.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

दही फेटलेलेच असावे नाहीतर फोडणीत टाकल्यावर फाटते.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे स्वत:चे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्नू छान आहे रेसिपी.
आणि सातीबाय....... किती तो उरका!! ...पदार्थ करून फोटोबिटो सुद्धा ! आणि हो ....तो तगडा जवान क्यूटच आहे की!

मानुषी, तगडा जवान मदतीला असल्यावर उरका असणारच ना!! तगडा जवान खूपच क्यूट Happy
मी एका पुस्तकात याच रेसिपीचं हेल्दी वर्शन वाचलं होतं, त्यात दुधीचा कीस (एक कप) करुन, तो पिळून पाणी काढून टाकायचं आणि गट्टयाचं पीठ मळताना त्यात मिसळायचं असं दिलं होतं.. (पण केलं नै कधी, आपली झेप वाचनापुरतीच) Wink

सोन्याबापू, नाही नाही मला मूळीच तसं म्हणायचं नव्हतं. उलट खरंच मिसेसला विचारून सांगा पारंपारिक पद्धत.

sonalisl, मी शक्यतो रवीने घुसळून घेते दही म्हणजे अजिबात गुठल्या होत नाहीत.

सुखदा, प्राची - गटग ठरवा लवकर. गटग के सामने गट्टे कया चीज है ??

अल्पना - एक्स मेड Lol एक्स बॉयफ्रेंड सारखं वाटतय ...बाकी रेसीपी चांगली आहे ...ज्या दिवशी दहिही नसेल त्या दिवशी करायला हरकत नाही.

सशल, रश्मी, तिकडच्या दहयाची कल्पना नाही पण रवीने फेटून बघा एकदा.

साती, मोठ्ठं थॅंक्स तुम्हाला इतके छान फोटो टाकल्याबदल. तगडा जवान गोंडस आहे आणि चेहर्‍यावरून अगदी कामसू, आज्ञाधारक बाळ वाटतय Happy

सगळ्यांना थॅंक्स Happy

आत्मधून, आमच्याकडे दुधीचे कोफ्ते करतात तेव्हा साधारण असंच बेसनात दुधी किसून घालतात आणि भज्यासारखे तळतात. पण त्याची आमटी कांदा टोमॅटो वापरुन करतात. माझ्यामते दुधी पिळून काढला की काही खास उरत नाही.

सर्वांना जवानासकट ,प्रतिसादकर्ते,त्यांचे कुटुंबिय ++1 देऊन "उरकणे ही वेळेची गरज आहे" हे पटले.

साती, मस्त फोटो. छोटा जवान लईच उत्साही दिसतोय. Happy

सशल, अगं वेळ लावते म्हणजे ती मुळातच खूप हळूबाई आहे. हळूहळू आणी मनापासून करत असते. ज्या दिवशी घरात दुसरं काही महत्वाचं काम करून घ्यायचं नसेल आणि जेवायला बराच वेळ असेल तरच तिला गट्टे करायला सांगावे लागायचे. Happy

रेस्पी टेम्प्टिंग आहे. करून बघेन नक्की.
साती, यश गोडू दिसतोय हां एकदम! पण पडेल अशी भिती वाटली मला Uhoh

एक शंका - बेसनाचे असेच गोळे मी एकदा कुकरला वाफवून घेतले, आणि मग फोडणीत घातले, पण नंतर मंद आंचेवरही शिजता शिजेनात! Sad म्हणजे घट्ट आणि कच्चेच कितीतरी वेळ. माकाचु?
या भाजीत गट्टे कितपत घट्ट असतात? मी कधी खाल्ली नाहिये अजून ही भाजी, ऐकून आहे खूप. म्हणून शंका.

प्रज्ञा, कुकरात वाफवून घेऊ नको.
त्या वळकट्या उकळत्या पाण्यात सोड आणि थोडा वेळ आच मोठीच राहूदे.
शिजल्या की त्या वळकट्या आपोआप वर येऊन तरंगू लागतात.
मग चार पाच मिनीटे शिजू दे. आणि नंतर काढ.
कोथिंबीर वड्या तळण्यापूर्वी नुसत्या उकडलेल्या वड्यांची जी कन्सिस्टन्सी असते तसे हे कापलेले गट्ट्यांचे काप वाटतात.

आम्ही तर थोडेसे बाजूला काढून ठेवले होते ते शॅलोफ्राय करून मुलांना ब्रेफाला दिले आज.

...

न रहावून केलीच भाजी. भन्नाट! मी ऑथेंटिक नाही खाल्लेली, पण ही (म्हणजे मी केलेली) भाजी अप्रतिम झाली आहे.

साती, भाजी केल्यावर तुझी पोस्ट वाचली. आता पुढच्या वेळी तसं करीन. पण पूर्वानुभवावरून मी केलेले बदल -
१. गट्टे कुकरमधून काढून झाल्यावर कढईत शॅलो फ्राय केले.
२. मला आवडतात म्हणून थोडे तीळ आणि बारीक्क चिरलेली कोथिंबीर घातली. मग गट्टॅ बाजूला काढून त्याच कढईत कमी तेलाची फोडणी केली. बाकीचं सामान घातलं.
३. रिस्क नको म्हणून दही फेटताना थोडं बेसन लावलं.
४. दही आंबट झाल्यामुळे शेवटी थोडी मिल्क पावडर घातली. आणि
५. एक महत्त्वाचं, फोडणी झाल्यावर हिरवी अख्खी वेलची घालून मग वर फेटलेलं दही ओतलं. एकाच वेलचीचा खूप मस्त स्वाद लागलाय!

मस्त रेस्पीसाठी धन्यवाद! Happy

तगड्या जवानाच्या क्यूट्नेसने धागा हायजॅक केला .. Happy
तगडा पुरुष म्हणजे मला नवराच वाटला.. त्यामुळे त्यांचा उत्साह टिकून राहायला फोटो काढले हे फार गंमतीशीर वाटले..
बसलाय मात्र खरेच ओट्याच्या कडेला.. काटक अन लवचिक मुलेच असा प्रकार करू शकतात.. त्यामुळे चांगलेच आहे.
बाकी त्याचा फोटो बघून मला माझे बालपणातले आईला चकल्या गाळून द्यायचे काम आठवले..

@ गट्ट्याची भाजी माझ्याही आवडीचीच .. ईतर कुठल्याच भाज्या फारश्या आवडीच्या नसल्याने हा पर्याय आवडतोच .. त्यामुळे लोकं भाज्या संपल्या की नाईलाजाने का हा करतात हे माझ्या आकलनशक्तीच्या बाहेरचे Happy

सप्पाटून भुक लागली होती..
अँगल वगैरेच्या भानगडीत पडली नै .. आहे ते तिखट गोड मानुन घ्या.. घाई अभावी अधले मधले फटू काडाची इसरली Wink

हे रॉ मटेरिअल :

हि गंजुलीतली भाजी :

हे ताट :

हि प्लेट :

टीना!
हाय हाय!
ही खरी राजस्थानी गट्टे की सब्जी.
माझी अगदीच गुजराती झाली होती.
मला प्लेट बघूनच तोंपासू!

साती, तगडा जवान गोड दिसतोय.पोझ एकदम सही.
टीना, भा़जी एकदम झक्कास दिसतेय.

अर्रे...ठांकु लोक्स..
माझ्याकडे काश्मिरी लाल तिखट आहे..निव्वळ नावाला तिखट..सब कुछ रंगातच आहे Proud
दही असल की इतकुस पन तेल टाकल तरी न चुकता तर्री येते ना म्हणुन दिसतय तस ते..
बाकी टेस्ट..ट्रस्ट मी लोक्स..चुम्मा झाली होती..काश यात चव टाकता आली असती..आहाहाहा..

टीना, खतरा फोटो!

साती, मलई गट्टे>> Lol पण अगदी थोडी घातली मि पा. त्यामुळे खमंगपणा कॉम्प्रमाईज होणार नाही ही काळजी घेतली मी. फोटो काढायचा उत्साह मात्र उरला नाही. मेनू वाचा..

सकाळी ब्रेफाला म्हणून मेथी पराठे
काकडी कोशिंबीर
गट्टे भाजी
कोबीची भाजी
जीरा राईस
दाल तडका
पोळ्या

अगदी अवांतरः
हे सगळं कामवाली ताई यायच्या आत उरकायचं म्हणून गडबड. हाताशी चिराचिरी/ पूर्वतयारी करून द्यायला कोणी नाही, आणि लुडबुडायला आमचं दीड वर्षाचं दुडदुडबोचकं! त्यात माझा पाय सुजलाय थोडासा..त्यामुळे किचन आवरून मी जी सोफ्यावर जाऊन बसले ती थेट जेवायला आत आले! Proud

पण अगदी थोडी घातली मि पा.
<<
थोड्या मिसळ पाव मुळे देखिल भयंकर तिखटपणा येतो बर्का Wink

*

टीना, पोळ्या अशा त्रिकोणी का दिसताहेत? आयत्या आहेत का? 10.gif

हैला!! काय फोटो आहेत एकसे एक... तोंपासु!

साती, तुझी कमाल आहे.. क्लिनिक-स्वयंपाक-फोटो-क्लिनिक-जेवण कशी काय करू शकतेस __/\__

९, तुझा बेत तोंपासु आहे.

टीनाबाय, कमाल हाय !! मी चिमूटभर तिखट लिहिलं होतं. तू किती लोकांच्या चिमट्या वापरल्यास कल्पना नाही !! Light 1 पण भाजी मस्त दिसते आहे.

Pages