गट्टे की सब्जी

Submitted by स्नू on 7 August, 2015 - 05:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गट्टे :
१. बेसन - १ वाटी
२. पाणी - ४-५ चमचे
३. ओवा - अर्धा चमचा
४. मीठ - चवीनुसार
५. तेल - ३-४ चमचे
६. लाल मिरची पाऊडर - चिमूटभर

भाजी :
१. दही - एक ते दीड वाटी फेटलेले
२. तेल- २ चमचे
३. जीरे - अर्धा चमचा
४. लसूण आले पेस्ट - १ चमचा
५. साखर - अर्धा चमचा
६. हिरवी मिरची - दोन (चिरा देवून)
७. लाल मिरची पाऊडर- १ चमचा
८. धने पाऊडर - १ चमचा
९. गरम मसाला - अर्धा चमचा
१०. मीठ - चवीनुसार
११. बारीक चिरलेली कोथिंबीर (सजावटीसाठी)

क्रमवार पाककृती: 

गट्टे :
१. गट्टे ह्या शीर्षकाखाली लिहिलेले सर्व साहित्य एकत्र करून बेसन मळून घ्यावे.
२. मळलेल्या पीठाचा एक लांब किंवा दोन छोटे रोल करावे.
३. उकळत्या पाण्यात हे रोल साधारण १५ मिनिटे शिजवावे.
४. पाण्यातून बाहेर काढून एका चाळणीत पानी निथरू द्यावे.
५. रोल थंड झाल्यावर त्याचे काप करावेत.

भाजी:
१. एका कढईत तेल गरम झाले की जीरे टाकावेत.
२. जीरे तडतडले की त्यात आले लसूण पेस्ट परतावी. लगेच थोडीशी साखर टाकावी. साखरेमुळे दह्याचा आंबटपणा कमी होण्यास मदत होते.
३. फेटलेले दही आणि बाकीचे सर्व मसाले फोडणीत घालावेत.
४. सगळे मिश्रण व्यवस्थित ढवळून त्यात साधारण अर्धी वाटी पाणी घालावे.
५. एक उकळी काढावी.
६. गट्टे ह्या भाजीत टाकून साधारण ५-७ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
७. सजावटीसाठी कोथिंबीर भुरभुरावी.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

दही फेटलेलेच असावे नाहीतर फोडणीत टाकल्यावर फाटते.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे स्वत:चे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमची मिसेस खासी मारवाड़ प्रदेशातली आहे बीकानेर ची फार्मास बनवते गट्टे !!! त्यातला रसा मस्त असतो चवीला एक नंबर !!

सोन्याबापू, पण ही रेसीपी पारंपारिक असल्याची गॅरंटी नाही हां !! तुम्हीच मिसेसला विचारून सांगा ह्यात काय कमी जास्त आहे ते.

टीने, माबोवर गट्ट्यांचे तोफगोळे व्हायला वेळ लागत नाही.. Light 1

टिफिन भरायच्या गडबडीत ह्या वेळेस फोटो काढला नाही.. पुढच्या वेळी नक्की..

टिफिन मधे गट्टे..वॉव..
मी तर एकट करायच म्हटल तरी फारशी हौशी नसते Proud मुड पायजेन मुड Wink
करावी लागेल..नव्हे करेनच..

स्नू ,

अहो गट्टे ते गट्ट्या सारखे त्यात काय ऑथेंटिक अन कसले काय !!! तुम्ही त्यात मेहनत घेतली ना मग तेच ऑथेंटिक! बायको च्या माहेरचा उल्लेख म्हणजे फ़क्त गट्टे ह्या विषयाशी कनेक्ट झाल्याची एक पावती आहे बाकी काही अभिनिवेष नाही अजिबात!!

उत्तम पाकृ

एक शंका : फेटलेले दही म्हणजे गुठळया नसलेले दही ना? चमच्याने हलवून एकसारखे केलेले?
पण असे दही उकळल्यावर फाटते. ते फाटू नये म्हणून त्यात थोडे बेसन घालतात किंवा ते फक्त गरम करतात, उकळू देत नाहीत.

छान आहे रेसेपी. दही घातलेले गट्टे खाल्ले नाहीत अजून. नेक्स्ट गटगला खाऊ घाल. Happy

आमची राजस्थानी एक्स मेड मस्त बनवायची गट्टे की सब्जी. ती गट्टे बनवतानाच बेसनात थोडं दही, तिखट, भरपूर लसूण आणि कोथिंबीर घालायची. मग वळकट्या वळून कुकरमध्ये डब्ब्यात वाफवून घ्यायची. नंतर तुकडे करायची.
आमटी करताना कढईत तेलाची फोडणी करून त्यात तिखट, लसूण, धणे पुड, गरम मसाला हे सगळं घालायची आणि मग त्यात गट्ट्याचं पीठ भिजवलेल्या परातीतलं बेसन असलेलं पाणी घालायची... आणि मग त्यात गट्टे घालून उकळायची. खूप पातळ रस्सा नसायचा, अगदी अंगासरशी. पण भन्नाट लागायचे. Happy
(खूप वे़ळ लावायची पण करायला. गट्टे खायचे असतिल तर किमान दोन एक तास आधी सांगावं लागाय्चं म्हणजे मग गट्टे + पोळ्या मिळायच्या खायला. )

अरे वा .. मस्त रेसिपी ..

लहानपणी आमचा शेजार मारवाड्यांचा होता तेव्हा त्यांच्याकडे खाल्ली जायची गट्टे की सब्जी ..

हे फोडणीवर दही घालणं मला कधीच जमलेलं नाही .. फेटलेलं/घुसळलेलं असूनही फाटतंच .. माकाचु? की अमेरिकेतल्या योगर्ट च्या माथी खापर फोडू बिन्धास्त? Wink (ह्याच कारणासाठी मी कढिही सतत हलवत वेगळी उकळून घेते आणि मग वरून फोडणी घालते ..)

अल्पना, वेळ लावायची म्हणजे रश्श्यात सिमर करायची का खूप वेळ?

क्लिनिक सोडता सोडता घरून फोन आला. भाजी संपलीय.
'बरोब्बर शुक्रवारी भाजी संपते कशी?'
'संपली नाहीये, पण उद्या काकू (माझ्या साबा) येणार म्हणून वांगी उद्या करणार.'
- या गावात शुक्रवारी बागवानांकडे ताजी भाजी येत नाही.
माबोकृपेने ही रेसिपी नेमकी आजच यावी!

घरी गेल्यावर एक तगडा पुरुष मदतीला बोलावला.
फटाफट पाकृ करून त्या तगड्याचा उत्साह टिकून रहावा म्हणून फोटो काढले.
गरमागरम भाताबरोबर लेकीला गट्टे की सब्जी बनवून परत कामाला हास्पिटलात आले.
आता निवांत फोटो टाकतेय.
ही गट्ट्यांची तयारी
image_32.jpg
ह्या वळकट्या
image_34.jpg
हे गट्टे पाण्यात उकळतायत
image_35.jpg
हे गट्टे रस्स्यात उकळतायत
image_36.jpg
हे फायनल प्रॉडक्ट
image_37.jpg

आणि हा तो मदतीला नेहमीच तत्पर तगडा जवान
Wink
image_38.jpg

धन्यवाद स्नू!
आम्ही रस्सा पातळ बनवला सगळ्यांना पुरायला हवा म्हणून. आयत्यावेळी दही कमी पडलं.
लेकीने नेहमीपेक्षा अर्ध्या वेळात जेवण संपवलं.
अजून कसं झालंय ते खाऊन पाहिलं नाही पण घरातल्या बाकीच्यांनी 'मस्तं झालंय' असा रिपोर्ट दिलाय.
Happy

मस्त आणी चटपटीत कृती स्नू.:स्मित: भारतातले दही फाटत नाही शक्यतो, परदेशात मात्र विचीत्र अनूभव आहे.

साती, तगडा जवान गोड दिसतोय.:स्मित: उकळताना रस्सा झणझणीत वाटला, पण फायनल फिके का दिसतेय? तिखट कमी घातले का मुलान्साठी?

>> आम्ही रस्सा पातळ बनवला सगळ्यांना पुरायला हवा म्हणून. आयत्यावेळी दही कमी पडलं.

फोटो पाहून मनात विचार आला आणि लगेच हे दिसलं ..

छान आहेत फोटो Happy तगडा जवान इम्प्रेसिव्ह Happy

तगड्या जवानाचा फोटो मस्त.
आमच्याकडे गट्टे प्रकरण फार पसंत पडत नाही. पण करून ओरपाविशी वाटतेय सब्जी. मस्त रेसिपी स्नू.

तगडा 'जवान' भलताच क्यूट आहे.
गट्टे की सब्जी म्हणजे दही घातलेली आपली गोळ्यांची आमटी. मस्त होते. मी नेहमीच्या बेसनाऐवजी डाळीचं भरड किंवा इथे मिळणारं लाडू बेसन घेते.

स्नू!
मस्तं झालीय गट्टे की भाजी.
नवर्‍याचं डाएट पूरेपूर मोडलं आज.

धन्यवाद तगड्या जवानाच्या कौतुकाबद्दल!
Wink

रश्मी, हो. सध्या कमी तिखट खायचा झटका आलाय मुलांना. पूर्वी खूप तिखट खायची मुले.
टीना 'यश' नाव आहे.

गट्टे की सब्जी म्हणजे दही घातलेली आपली गोळ्यांची आमटी.>>>>+१

स्नू, मस्त रेसिपी.

साते, तगडा जवान गोड आहे. ओट्यावर चढून बसलाय :हाहा:. खूप कडेला पाठमोरा बसलाय गं पण!

तगड़ा जवान मस्त आहे आणि आत्तापासून कामाची/ मदतीची सवय लागतेय/लावतेय हे ही छानच.
बाकी रेसिपी झक्कास. करून बघनार नाही पण खाणार! Lol

Pages